त्या भज्याच्या पिठांमध्ये सांग तू आहेस का?
भरल्या वांग्याच्या भाजीत ओतिशी तू चव का?
मिसळीच्या रश्शांत सांग तू तरंगतोस का??
ओनियन उत्तप्यास सांग तुझ्याशिवाय चव का?
भाजी रस्सा वरण सांबाराचा प्राण तू आहेस का?
चिरताना तुला अश्रू चे घोर ते तू रूप का?
शेव चिवड्यात वर्षणारा चवीचा तू मेघ का?
कोथिंबीर मिरची खोबरे वाटणात नेमका हवा का?
सामिष असो वा मत्स्य आहारातला प्राण तू आहेस का?
कष्टणार्या बांधवांच्या भाकरीचा मित्र तू आहेस का?
सुगरिणीच्या व्यंजना चा सांग तू अविभाज्य भाग का?
असो सामिष वा शाक पाकात तिथे रे, सांग तू आहेस का
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6503
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
ट ला ट...!
काय हे झेंगाट ?
अरे पंख्या, (अकलेचा) कांदाय
In reply to ट ला ट...! by माम्लेदारचा पन्खा
अरे पंख्या, (अकलेचा) कांदाय रे तो.
'अकु'लेचा?
In reply to अरे पंख्या, (अकलेचा) कांदाय by अभ्या..
'अकु'लेचा?
कोथिंबीरीवर एवढी भारी कविता
कोथिंबीरीवर एवढी भारी कविता.आवडली.सध्या भावपण भारी आहे.
"कांद्यावर" असे म्हणायचे आहे.
"कांद्यावर" असे म्हणायचे आहे.
आवडली :)
आवडली :)
अकु काकांची आत्मकुंथीत जिल्बी
अकु काकांची आत्मकुंथीत जिल्बी! ;)
अकुनी घाणा बदललेला दिसतोय...
अकुनी घाणा बदललेला दिसतोय... जिलबीच्या जागी भजी टाकलेली दिसत आहेत ! =)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-ये जवानी हद कर दे, बूढ़े जवां को मस्त कर दे, कोई न जाने कल क्या हो, आने वाला पल क्या हो, ले मज़ा ले ज़िंदगी का ज़िंदगी का ज़िंदगी का... ;) :- Sarfarosh
पैजारबुवांच्या प्रतीक्षेत !!!
पैजारबुवांच्या प्रतीक्षेत !!!
या संधीचे सोने करा...
नको नको
In reply to पैजारबुवांच्या प्रतीक्षेत !!! by चिनार
एकदा वाचल्यावर माझ्याच नाका पुढे कांदा धरावा लागला (लोकांना.... वाचता वाचता पडलो म्हणुन).
एका दुष्ट मित्राने कोल्हापुरी चप्पल देखिल काढली होती. पण आम्हाला काही करण्या आधी त्याचे लक्ष चुकुन माझ्या काम्युटराच्या पडद्यावर गेले आणि तो पण आमच्या शेजारी आडवा झाला. त्याची चप्पल त्यालाच हुंगवावी लागली.
तुमच्या विनंतीला मान देउन आम्ही यात हात घातला आणि काही बाही झाले तर आम्हाला त्यातुन बाहेर काढायला आमचे "मांत्रिक" बुवाही हल्ली मिपावर येत नाहित.
पैजारबुवा,
=))
In reply to नको नको by ज्ञानोबाचे पैजार
विडंबनारिष्ट मारा की दोन ग्लास !
विनंतीला मान दिल्याबद्दल
In reply to नको नको by ज्ञानोबाचे पैजार
विनंतीला मान दिल्याबद्दल धन्यवाद !
पण तुमच्या लेखणीतून काही वाचायला मिळाले असते तर मजा आली असती बुवा...
असो. पण अकुकाकांना या कवितेसाठी 'भजेपीठ' पुरस्कार' आपल्या शुभहस्ते द्यावा अशी प्रार्थना करतो.
पुढले कडवे,
पुढले कडवे,
भजी खाऊन झाल्यावर
सकाळी सहाच्या एक्सप्रेस मध्ये
सांग तू आहेस काय!
त्यासाठी विचारायला कशाला हवे?
In reply to पुढले कडवे, by कैलासवासी सोन्याबापु
ते विचारायची गरज नाही.
ते तर तुम्ही पलिकडच्या डब्यात बसुन देखिल सहज ओळखू शकता.
पैजारबुवा,
नाखुकाका तुम्ही उगाचच तिकडे
नाखुकाका तुम्ही उगाचच तिकडे शेतीविषयक लांबलचक धागे काढता...
ही कविता वाटा जागोजागी उभे राहून...कांद्याचे मागणी वाढून भाव गगनाला भिडतील..
प्रयत्न चांगला आहे
पण चालीत बसत नाहीये.
डोक्यात जाणे, हे आपले डोक्यात
In reply to प्रयत्न चांगला आहे by बोका-ए-आझम
डोक्यात जाणे, हे आपले डोक्यात बसणे महत्वाचे!
कहर आहेत अकुकाका!
कहर आहेत अकुकाका!
टोमॅटो उत्तप्पा जास्त चवदार
टोमॅटो उत्तप्पा जास्त चवदार असतो.
चकत्यावाला की तुकडेवाला?
In reply to टोमॅटो उत्तप्पा जास्त चवदार by एस
चकत्यावाला की तुकडेवाला?
नो चकती
In reply to चकत्यावाला की तुकडेवाला? by अभ्या..
ओन्ली तुकडा !