Skip to main content
लेखक टवाळ कार्टा यांनी सोमवार, 11/07/2016 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
जै लंडनातले मिपाकर :) आम्च्या क्लाएंटकृपेने मी ऑगस्टात लंडनात येत आहे...२ आठवडे (विकांत सोडून) रोज मरमर काम आणि त्यानंतर १ आठवडा सुट्टी :) असा बेत आहे. १) पहिल्या २ आठवड्याच्या वेळेत"च" आणि शक्य असेल तर विकांत सोडून :D एखादा कट्टा करायला जमेल का? जमल्यास साहेबाच्या नाकावर टिच्चून स्वातंत्र्यदिन कट्टा करू :) २) २ विकांत आणि त्यानंतर १ आठवड्याच्या सुट्टीत किती आणि कुठे कुठे भटकता येईल? ३) तिथे बाईक / कार भाड्याने मिळते का? जमल्यास १ आठवडा रोड ट्रीप करायला आवडेल :) ४) अगदी स्वस्तात राहायच्या सोयी काय? मला अगदी आन्हिके आटपायाला आणि झोपण्यापुरती सोय असेल तरी चालून जाते :) आणि सगळ्यात महत्वाचे, UK व्हिसावर कुठे कुठे भटकू शकतो? चुकवू नयेत अशी ठिकाणे कोणती? मी काही ठिकाणे ठरवली आहेत...त्यात लंडनातल्या मिपाकरांनी आणखी भर घालावी ही विनंती १) स्टोनहेंज २) डर्डल डोअर आणि लुल्वर्थ कोव ३) टॉवर ब्रीज, आर्सेनल स्टेडियम, राणीचा महाल, लंडन आय, बिग बेन आणि जमल्यास change of guards ची परेड...थोडक्यात सांगायचे तर जीवाचे लंडन ४) जमत असेल तर आयर्लंड मधले ज्वालामुखी ५) ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज मला चर्चेसपेक्षा निसर्ग सौंदर्य (त्यातही बीचेस जरा जास्तच) बघायला जास्त आवडते...पण एखादे बघितलेच पाहिजे असे म्युझियम असेल तरी सुचवा पण फक्त पेंटिंग्ज/स्कल्पचर असणारे म्यूजियम नको...इजिप्शिअन / प्री-हिस्टोरिक वगैरे टाईप चालेल याच बरोबर तिथे भटकताना उपयोगी पडतील अश्या टिप्स पण द्याव्या (उ.दा. प्रवासात तिकिटांवर खर्च कमी कसा करता येईल) भेटू लवकरच :)

वाचने 33100
प्रतिक्रिया 109

प्रतिक्रिया

In reply to by पद्मावति

आयमाय स्वारी, स्पेसिफिक पुस्तक मला माहिती नाही. वाचून सांगतो. बायदवे इंग्लंडात स्थायिक झालेल्या अजून एका भारतीयाबद्दल इथे वाचता येईल. या प्राण्याने इंग्लंडातले पहिले इंड्यन हाटेल काढले तेही दोनशे वर्षांपूर्वी, एवढेच नव्हे तर शांपूचा शोधही त्यानेच लावला. इनफॅक्ट शांपू हा शब्दच चंपी या शब्दावरून आलेला आहे. https://en.wikipedia.org/wiki/Sake_Dean_Mahomed अजूनही काही लोक त्या काळाच्या आसपास इंग्लंडात जाऊन आले होते. त्यांच्या प्रवासवर्णनात "पायांनी तुडवलेल्या पिठाचे पाव खाणारे", "जाऊन आल्यावर न धुणारे", "धड आंघोळ न करणारे", "कुठल्याही फालतू विषयाची नोंद करणारे", अशी इंग्रजांची निरीक्षणे दिसतात.

In reply to by बॅटमॅन

अजून एकः वेणू चितळे या दुसर्‍या महायुद्धाच्या काळात बीबीसीमध्ये निवेदिका होत्या. त्यांनी जॉर्ज ऑरवेलबरोबर काम केलं होतं. http://www.open.ac.uk/researchprojects/makingbritain/content/venu-chita… त्यांची "इन ट्रान्झिट" आणि "इन्कॉग्निटो" अशी दोन पुस्तकं आहेत. फारा वर्षांपासून शोधतो आहे.

अजूनेक रिक्वेष्टः तिकडून जाऊन आल्यावर एक फर्मास मुक्तपीठीय शैलीत प्रवासवर्णन होऊन जाऊंदे.

In reply to by बॅटमॅन

"मी लंडनला होतो तेंव्हा" अशी सुरुवात अज्जिबात करु नये असे नाही असे नक्की नाही. धुराळी वाचक नाखु

टक्कूमक्कू लंडनला ? आकाशातला बाप लंडनवासियांचे भले करो !! आमेन !

टक्या नीट जा हो... राणी भेटली तर मी राम राम म्हंटल आहे, हे आठवणीने सांग. हल्लीच प्रिन्स इकडे गेंडे पाहुन गेला म्हणे... त्यामुळे तू तिकडे काय पाहिलेस ते सचित्र लिहुन प्रसिद्ध कर. चांगली गोरी गुबगुबीत फिंरगीण दिसली तर कटवुन "मोकळा" हो... आपण फॉरिनची टकीण असा पिच्चर काढु ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-ये जवानी हद कर दे, बूढ़े जवां को मस्त कर दे, कोई न जाने कल क्या हो, आने वाला पल क्या हो, ले मज़ा ले ज़िंदगी का ज़िंदगी का ज़िंदगी का... ;) :- Sarfarosh

In reply to by मदनबाण

गोरी गुबगुबीत फिंरगीण दिसली तर कटवुन "मोकळा" हो.
गुबगुबीत ?

In reply to by खटपट्या

गुबगुबीत नको म्हणता ? मगं गोलमटोल चालेल ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- रंभा हो हो...संभा हो हो... :- Armaan

In reply to by मदनबाण

त्यामुळे तिथे गुबगुबीत मुलगीच टक्याला पटेल ! केम छो...मजा मा ?

लंडन मधे कोवेंट गार्डन येथे माउसट्रॅप , द विकेड या नाटकांचे प्रयोग अनेक वर्षे होत आहेत असे ऐकले आहे . प्रसिद्ध अभिनेता जुड लॉ हा "हेन्री - ४" या नाटकात काम करतो . हॅरी पॉटर सिरीज मधला रॉन ग्रिफिथचे काम करणारा रुपर्ट प्रिंट याचे "मोजो" हे नाटकही गाजले आहे .

लंडन प्रवासात ऑयस्टर कार्ड खूप उपयोगी असते. तसेच वापस येताना त्यातील अनामत रक्कम परत मिळते (पावती असल्यास ) https://oyster.tfl.gov.uk/oyster/entry.do

In reply to by राघवेंद्र

ऑयस्टर कार्ड परत करायला पावती लागत नाही. मशीन ऑयस्टर रिटर्न साठी ऑप्शन्स देते

लंडनवारीसाठी मनापासून शुभेच्छा. कमीतकमी पैशांत जास्तीतजास्त स्थळे बघायला मिळोत ही सदिच्छा. याठिकाणी कोणी स्थळावर कोट्या करु नयेत.

सगळ्यांचे शुभेच्छांबद्दल धन्यवाद आणि काही सूचनांचा नक्कीच विचार केला जैल ;) भटकायचा रफ प्लान तयार झालेला आहे आणि वेळ + पैसे कमी आणि ठिकाणे जास्त अशी परिस्थिती आहे...तस्मात पैसे कसे वाचवावे यावर लंडनकरांनी थोडा प्रकाश टाकावा अशी विनंती :) अजून एक...जर कोणाकडे फोटोत दाखवल्याप्रमाणे पाठिवर घेण्यासारखी बॅकपॅक आहे का आणि मुख्य म्हणजे मला १० दिवसांकरता देउ शकाल का? :) backpack