बिटरगाव - जंगी महाकट्टा आवतान
मंडळी, लगा हितं लय कट्टे, महाकट्टे चाल्लेले बगून पोरं म्हनली, दादा आपन का भरवत नाय एक कट्टा वो. आता मी पन विचार केला, असा पन एवडा मोट्टा कट्टा गावात आमच्या तात्यानी बांदून ठिवलाय, तित म्हातारी कोतारी तंबाकू मळत बसत्यात, तर जरा सांस्क्रुतिक आसं काम पन हुइल.
मग कार्येकर्त्यांच्या आग्रेवाला मान देवून आता आमी पन आमच्या गावात महाकट्टा करायचं ठरवलेलं हाये. आनि जरी पोरं सगळी यवस्था बगत आसली तरी आपले माननीय मित्र आनि मिपाकर आवरजून यावेत म्हनून आपुन स्वता (स्वत्ता बरका) आमंत्रन देन्यासाटी आलेलो आहे. तरी ज्यान्ला ज्यान्ला जमत असेल त्यानी येन्याचे आनि ज्याना जमत नसेल त्यानी जमवन्याचे करावे ही "विनंती".
(आदीच सांगतो. सोलापूराच्या आसपासच्या सगळ्या मिपाकरान्ला कट्टा करायचा "प्रेमाचा" आग्रेव आहे. बोलेरो गाडी घरी यिल, कार्यकर्ते प्रेमळ हायेतच तवा त्यान्ला "विनंती" करावी लागू नये यवडं बगावे. पुन्या-मुंबईलापन मोट्ट्या एसी वोल्व्हो गाड्या सोडूच तशा.)
तर बिरुटे मास्तर आनि आपल्या अभ्या.. हे दोस्त पयलेच रेडी हायेत. तसंच नावात प्रा आनि डॉ हे दोन्ही आसल्यामुळं कट्ट्याला मानाची खुर्ची बिरुटे मास्तराना देन्यात येनारे. ऐन वेळी कुनी गोन्दळ, रुसा-रुसी करु नये. मिपाचे मालक आले तरी त्याना वाळूत जागा असनारे (आपल्याला हित अध्यक्ष करत असला तर तित करु बगा तुमाला अध्यक्ष!).
खरं तर लोकान्ला प्ल्यान म्हाईत नसला म्हन्जे काय होतय ते तुमी इतर कट्ट्यान्ला बगताय न्हेमी. हित तुमाला म्हायतीय आपला बड्डे पन जंगी आसतोय ते. तवा ह्यो महाकट्टा पन जोरात प्ल्यानिंगनं असनारे हे फिक्संच बगा. तवा बिनधास्त यायचं.
तर खानं पिनं जे पायजे ते असनारे. सोत्रि काकटेलचं बगनारेत पन ज्यान्ला गावटी पायजे त्यांनी तसं सांगावं, आजिबात लाजायच काम नाय. आनि हो खास एक बोकड लावू तितच मग. फकस्त रस्ता चुकला तर शेजारी उघडं गटार हाय ते लक्षात ठिवून रस्ता चुकावा.
बाके ह्ये खानं पिनं, गानी-लावनी/ डिज्जे हे हायच हो, पन आजून म्हन्जे खास म्हन्जे खास लोकांसाटी आमी केलेलं नाटक पन हे. नाटकाबद्दल डिट्टेलमध्ये आभ्याने लिव्हलेलंच हाय तवा ते तितेच वाचा. तशी ही आयड्या आपल्या काही "लाडक्या" उत्साही मिपादोस्तांचीच पन आपल्याला त्यामधला उद्देश लगीच दिसल्याव आपन काम हातात घेतलेलंय.
पोस्टरे अभ्या बनवत आसून, बिरुटे मास्तर कथा लिव्हत हायती. तवा सग्ळं एकदम फ्रेश हे.
तसा पोरांचा आग्रेव म्हनून आपन विलनचं काम करतोय तर हिरोईन आनि बँड खास बेळगाववरनं येनारे. तेवडा एक कॉमेडियन पायजे कुनी इच्चुक असला तर सांगाच.
आनि हो, हिरोचं काम आपला कुनी पन मिपा-दोस्त करील तर लय भारी, कारन गावातली पोरं तयार हुईनात. त्याचं काये आपन एकदम खरी अॅक्टींग करतो बगा, म्हंजे कानफाडीत तर खरी कानफाडीत! पार अगदी खंग्री आवाज गेला पायजे बगा. तरीपन कुनाला कोन्चा रोल पायजे आसंल तर हितच सांगा म्हन्जे तशी यवस्था करु.
तर आस्सा सगळा जंगी बेत हाये. महाकट्टा जोरदार झाला पायजे म्हनून सगळ्यानी येनेचे करावे आनि आजून काय डिमांड, कल्पना, सूचना आसन तर हितंच सांगावी, नक्की इचार केला जाईल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लगा!
साती ताई ते सगुणा आहे.
खुर्चित बसलेल्या गॉगलवाल्या
अरे बाप्रे
आर्ची कुटंय ते तात्यास्नी
येणार येणार.
सर आता तुम्ही थेट औरंगाबाद
हो हो
त्ये पापडाचं सोडा गनामास्तर
बिरुटे मास्तर, राम राम. तुमी
प्रिन्स भैताड़, पोरायले का
आर्ची खंय गेला मरे?
कटट्याला येतो म्हणून जर कोणी
ह्ये बिटरगाव म्हंजं कुरडुची
का हो वडापभौ
आलं हुतो वाशीच्या कट्ट्याला
कट्टा..अकलूजला घ्यायचा का...
माज करायचा फक्त पाटलांनी.
वो प्रा डॉ, तूमच्या संग मले
बाबा, बोलेरो काय टोचती व्हय
नायतर टॅक्टर "आनि" ट्रॉली यिल
आंग आश्शी
सत्कारमूर्ती
माझा काय
पण मला
मास्तर ..
माई मोड ऑन
:)
प्रिन्सदादा, कट्ट्याला येताना