Skip to main content

लंडनवारीची तयारी

लेखक टवाळ कार्टा यांनी सोमवार, 11/07/2016 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
जै लंडनातले मिपाकर :) आम्च्या क्लाएंटकृपेने मी ऑगस्टात लंडनात येत आहे...२ आठवडे (विकांत सोडून) रोज मरमर काम आणि त्यानंतर १ आठवडा सुट्टी :) असा बेत आहे. १) पहिल्या २ आठवड्याच्या वेळेत"च" आणि शक्य असेल तर विकांत सोडून :D एखादा कट्टा करायला जमेल का? जमल्यास साहेबाच्या नाकावर टिच्चून स्वातंत्र्यदिन कट्टा करू :) २) २ विकांत आणि त्यानंतर १ आठवड्याच्या सुट्टीत किती आणि कुठे कुठे भटकता येईल? ३) तिथे बाईक / कार भाड्याने मिळते का? जमल्यास १ आठवडा रोड ट्रीप करायला आवडेल :) ४) अगदी स्वस्तात राहायच्या सोयी काय? मला अगदी आन्हिके आटपायाला आणि झोपण्यापुरती सोय असेल तरी चालून जाते :) आणि सगळ्यात महत्वाचे, UK व्हिसावर कुठे कुठे भटकू शकतो? चुकवू नयेत अशी ठिकाणे कोणती? मी काही ठिकाणे ठरवली आहेत...त्यात लंडनातल्या मिपाकरांनी आणखी भर घालावी ही विनंती १) स्टोनहेंज २) डर्डल डोअर आणि लुल्वर्थ कोव ३) टॉवर ब्रीज, आर्सेनल स्टेडियम, राणीचा महाल, लंडन आय, बिग बेन आणि जमल्यास change of guards ची परेड...थोडक्यात सांगायचे तर जीवाचे लंडन ४) जमत असेल तर आयर्लंड मधले ज्वालामुखी ५) ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज मला चर्चेसपेक्षा निसर्ग सौंदर्य (त्यातही बीचेस जरा जास्तच) बघायला जास्त आवडते...पण एखादे बघितलेच पाहिजे असे म्युझियम असेल तरी सुचवा पण फक्त पेंटिंग्ज/स्कल्पचर असणारे म्यूजियम नको...इजिप्शिअन / प्री-हिस्टोरिक वगैरे टाईप चालेल याच बरोबर तिथे भटकताना उपयोगी पडतील अश्या टिप्स पण द्याव्या (उ.दा. प्रवासात तिकिटांवर खर्च कमी कसा करता येईल) भेटू लवकरच :)

वाचने 32976
प्रतिक्रिया 109

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

या प्रतिसादासाठी तुला एक सरदारोंवाली पगड़ी (टाचण्या सह), एक मिस्टर बीन ची सीडी आणि न्यूटन यांचा दोन भोकं वाला दरवाजा सप्रेम भेट.

In reply to by धनंजय माने

एक सरदारोंवाली पगड़ी (टाचण्या सह), एक मिस्टर बीन ची सीडी आणि न्यूटन यांचा दोन भोकं वाला दरवाजा
:))) मि. बीन भेटेल बघ तुला लंडंन मध्ये पायजे तर.. ;)

झैरात झैरात.... (आता तरी बाळाचं लगीन जमू दे रे रवळनाथा ;) )

टक्कुबाळाला नाक पुसता येईना लंडनला चाललं का ;) या घे टिप्स.. विमानातून हात बाहेर काढु नको विमानाच्या सिटवर उड्या मारु नको सारखी चाॅकलेट मागु नको कपड्यांवर खायचं सांडायचं नाही अजिबात. राहायला राणीकडे चौकशी करणे.तिची कोणी पतवंडी लग्नाची असेल तर ते पण काम होईल एकात एक. रोझ तयार ठेवावे लागेल रोज.रोझ फाॅर रोज!

In reply to by स्पा

हे घे रे काही टिप्स 1) विमानात फुकट मिळते म्हणून जास्त पिवू नको 2) गोरी मुलगी दिसली म्हणून एकटक बघू नकोस अजुन मिपकर्स तुझा बाजार उठवायला समर्थ आहे हे नक्की म्हणून टंकनश्रम वाचावतो .. पळा

In reply to by माझीही शॅम्पेन

2) गोरी मुलगी दिसली म्हणून एकटक बघू नकोस
एखादी गोरी, हिरव्या डोळ्यांची पुणे तीस मधली असेल तर पंचाईत व्हायची. =))

In reply to by अजया

टक्कुबाळाला नाक पुसता येईना लंडनला चाललं का ;) या घे टिप्स.. विमानातून हात बाहेर काढु नको विमानाच्या सिटवर उड्या मारु नको सारखी चाॅकलेट मागु नको कपड्यांवर खायचं सांडायचं नाही अजिबात.
. =))

इथे नक्की जाऊन या. फार सुंदर आहे.

३) तिथे बाईक / कार भाड्याने मिळते का? ह्याच्यासोबत कंसात (कृपया एनफिल्डच्या बाईक्स सुचवू नये ही नम्र विनंती) असे लिहिले असते तर बरे पडले असते न टका भाऊ (तुम्हाला सांगायची गरज नाही तरीही हलके घ्या ही विनंती)

In reply to by मी-सौरभ

असंच काही नाही हो! टक्या आहे म्हणून टवाळपणा चाललाय, *विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते, असा टवाळपणा आमच्याबर करायची सुद्धा टकोजी राजे ह्यांसी परवानगी अध्याहृत आहेच सौरभ भाऊ! *डायलॉग सौजन्य धनंजय माने साहेब, अजिबात माफी न मागता त्यांची!

बाकी ऑन सीरियस मोड़, टका स्वत:च्या मेहनतीवर आणि स्वबळावर (स्वकष्टार्जित) लंडन ला जाऊन येत आहे याबद्दल त्याचे मन:पूर्वक अभिनंदन! अशाच संधी वारंवार येत राहोत आणि टका सहकुटुंब फिरत राहो.

In reply to by वाल्मिक

हो. तुझं देखील उजळेल. कल्जी क्रू न्ये. पोरं होतील,लग्न होईल, नोकरी लागेल, फिरुन येशील वगैरे. नशीब नसलं तर गोष्टी होतात फ़क्त क्रमाने होत नाहीत.

मस्त जीवाचे लंडन करून या, जमल्यास तिकडेच दोनाचे चार हातही करून या, काय सांगावं, फोटोशॉप केलेला फोटो प्रत्यक्षातही यायचा तिकडे (तरी :) शुभेच्छा !!

मला चर्चेसपेक्षा निसर्ग सौंदर्य (त्यातही बीचेस जरा जास्तच) बघायला जास्त आवडते...
असे असेल तर, मी ब्रायटन हे गाव सुचवेन. लंडनहून तासाभरात पोचता येते (रेल्वे वा बस). अतिशय सुरेख बीच.

लाॅर्डस् आणि ओव्हल आणि फुटबाॅल फॅन असलात तर वेम्बली सोडू नका. शिवाय मिलेनियम आय, मादाम तुसाँ, राॅयल आल्बर्ट हाॅल, बिग बेन, टाॅवर आॅफ लंडन वगैरे पाहाच. चेंजिंग आॅफ गार्ड्स ही उगाचच केलेली हवा आहे असं मत आहे. त्यापेक्षा आपला वाघा बाॅर्डरवरचा समारंभ जोशपूर्ण आणि दणदणीत असतो. बाकी ट्यूबमधून भटकणे आणि एखाद्या जर्मन kiosk मध्ये mustard sauce लावलेला pretzel खाणे अाणि हो, Fish n chips - हे विसरू नका.

दोन चार ब्रिटिश लोकांना १५ ऑगस्टला चोपून काढ आणि तो कोहिनूर परत आण ब्यागेत घालून गपचूप !

दोन चार ब्रिटिश लोकांना १५ ऑगस्टला चोपून काढ आणि तो कोहिनूर परत आण ब्यागेत घालून गपचूप !

दोन चार ब्रिटिश लोकांना १५ ऑगस्टला चोपून काढ आणि तो कोहिनूर परत आण ब्यागेत घालून गपचूप !

In reply to by माम्लेदारचा पन्खा

तो कोहिनूर पळवताना तो हिराच आहे ना .... हे पाहून घ्यावे. हल्ली कोहिनूर कशाचेही नाव असते.

कुठेही भटक पण... पण... पण.... येतांना २ कार्ढू ( https://www.thewhiskyexchange.com/p/1461/cardhu-12-year-old) मात्र नक्की आण. फार महागाची आणू नकोस. १२ वर्षे जूनी पण उत्तम लागते. कार्ढूची चटक एकदा लागली की, ब्लॅक लेबल, शिवास रीगल पण फिक्या वाटतात.

In reply to by मुक्त विहारि

सध्या फार्म हाउस चा एक कोपरा सुताराच्या हाती दिला आहे. मस्त ,, झाला आहे,, ये दुनिया उसीकी जमाना उसीका हे गीत ही गाउ ... !

लंड्न -> बेकवेल - > व्हिटबी अ‍ॅबी - > फ्लॅमबराह लाईट-हाऊस आणि फ्लॅमबराह हेड http://www.misalpav.com/node/32097

शून्य वेळ सुरु होणा-या बागेत जाऊन ये. पाण्यावर उगं लय पाऊंड उडवू नगंस, बीयर बरी त्यापरिस. जिथे प्रवेश शुल्क नसेल ते ते सर्व पहा ;-) नियमात रहावे, विनोदवीरता सगळेच खपवून घेतील असे नव्हे. पाऊंड इथल्या बँकेतनच घे, स्वस्त पडेल

चंदन तुझं अभिनंदन ! खुप खुप शुभेच्छा! नि नुकताच एक धागा आला होता मेघना मन्दार आणि अभिजीत अवलिया यांच्या लंडनवारीचा तो वाचुन जा. फक्त एकच कोणीही 1 असं केले तर लगेच पा-ग- घळू नकोस.

चंदन तुझं अभिनंदन ! खुप खुप शुभेच्छा! नि नुकताच एक धागा आला होता मेघना मन्दार आणि अभिजीत अवलिया यांच्या लंडनवारीचा तो वाचुन जा. फक्त एकच कोणीही 1 असं केले तर लगेच पा-ग- घळू नकोस.

आणायचे आहे लंडनवरून कोहिनूर आणि भवानी तलवार वगैरे त्याची यादी मलोजीरावांकडून घेणे इतर माहीती बॅट्याकडून लगेच घेणे (एकदा तो मिपावर आला की ,नाही तर थेट १५ दिवसांनी उगवतो नंतर तक्रार चालणार नाही) .तुला ललनांची नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची "विजय पुरोहित" जुन्या नावाने देतील. बुवांकडून तांब्या घे लंडनला त्याचे बदल्यात कोहिनूर मिळतोय का ते बघ, (ब्रिटिशांना जुन्या वस्तूंचा शौक आहे असे प्यारे मानेंना सांगत होते खखो दोघेच जाणे). आणि आल्याव्र तो बहुचर्चित धागा पुररुज्जीवेत करावा लागणार नाही याची बेगमी तिकडून्च करून ये (रडू देत इथल्या वाट पाहणार्या वधू पित्यांना) प्रवासाला शुभेच्छा... वाचकांची पत्रेवाला नाखु

या धाग्याचा 'तो' धागा रद्दबातल करण्यास उपयोग झाला का ते कळवणे.योग्य ठिकाणी झैरात झाली का;)

जायचा सूट त्या कोपऱ्यावरच्या फ्रान्सिस शिंप्याकडे शिवून घे आणि बूट चिनी चाम्भाराकडे. येताना शेक्सपियरच्या घरी जाऊन भेटून ये तो सारखं 'नावात काय ए' असं बोंबलत असतंय ते त्याला समजावून सांग . जाता जाता २२१ B वर ते वाह्यात कार्ट शेरलॉक भेटलं तर त्याला पूढचा सिजन कधी काढणारे ते इचार यमाई- ६ च्या हाफिसात तो बॉण्ड बाबा भेटला तर त्याला एवढ्या ललना आणि ती म्हातारी बॉस कश्या मॅनेज करतो ते सांग म्हणावं टेम्स च्या किनाऱ्यावर वर्डस्वर्थ ची कविता नक्की म्हण वाचून ...

In reply to by महासंग्राम

>>जाता जाता २२१ B वर ते वाह्यात कार्ट शेरलॉक भेटलं तर त्याला पूढचा सिजन कधी काढणारे ते इचार शेरलॉक च्या सिजन-४ चे चित्रीकरण एप्रिल पासुन सुरु झाले आहे. हे पहा - Sherlock-season 4

टकादादा यांस, सानविवि. लंडनास सूखरुप जाऊन परत येणे. तूमचे लेख छोटे छोटे आस्तात. जरा नीट लीहिणे. तूमचे लक्षण हे आधीपासून आसेच असे आजी म्हणत होती. तीकडून येतानातरी एकदाची कुणी बायको करून आणणे, म्हणजे हे कारटं संसाराला लागेल आणि जरा छळवाद कमी होईल आसे मिपाबायकांचे म्हणणे आहे आसे पार्वतीकाकू मानेकाकांना सांगत होत्या ते आमच्या कामवाल्या मावशीने आजीला सांगताना मी चोरून आईकले. लंडनच्या बाजारात छान छान रिबिनी मिळतात त्या सगळ्या छोट्या बहिणींसाठी घेऊन येणे. तूमची नम्र पिशी

In reply to by पिशी अबोली

हा शुद्ध हलकटपणा आहे पिशे. बाकी ते >>>एकदाची कुणी बायको करून आणणे 'एखाद्याची कुणाची बायको करुन'आणणे असं वाचल्या गेलं. म्हटलं असेल ब्वा काही चाल लंडनची!