विश्वास आणि त्या पाठोपाठ येणार्या श्रद्धा सकारात्मक, रचनात्मक मंगलमय असतील आणि त्यात काही अनीष्ट आलेले नाहीना हे पाहून सुधारणाकरुन मार्गक्रमण केले तर काहीच समस्या नाही. बर्याचदा तसे होत नाही. आपलाच विश्वास आपलीच श्रद्द्धा केवळ खरी हा अट्टाहास साध्य करण्यासाठी सोईस्कर तत्वज्ञान उभेकरणे आणि अशा तत्वज्ञानातील तार्कीक उणीवांकडे लक्ष वेधण्यात विलंब झाल्याने भक्त वेगळ्याच दिशेने धावतात कुठे तरी नुकसान होते, कुठेतरी रक्त सांडते कुठे तरी माणसे संपतात आणि मग असे तत्वज्ञान उभे करणार्यांकडे सुजाण लोक दिगमूढ होऊन बघतात की हे कसं झाल आणि पुढे काय ?
सध्या महाराष्ट्रातून प्रसारीत होणार्या तत्वज्ञान चर्चेत आहे. पण हे केवळ महाराष्ट्रात होते असे नाही. केरळासारख्या उच्चसाक्षरता असलेल्या प्रदेशातील मेडीकल प्रोफेशन परेशान आहे. विशेषतः कोझीकोडे आणि मलपूरम या केरळातील दोन जिल्ह्यातून लसीकरण न झाल्याने diphtheria सारख्या आजारांनी दगावलेल्या केसेस पुढे येत आहेत. आजार पसरवणार्या जिवाणू आणि विषाणूंना खच्ची करून लसींच्या माध्यमातून शरीरात असलेल्या पांढर्या रक्तपेशींना लढण्यासाठी पूर्वतयारी करून घेतली म्हणजे जेव्हा आजाराचा हल्ला होतो तेव्हा तुमचे शरीर जिवाणू आणि विषाणूंचा अधिक चांगला मुकाबला करू शकते हा लसीकरणाचा फायदा (यात काही चुकल्यास डॉक्टर लोकांनी दुरुस्ती करावी).
केरळातील कोझीकोडेच्या डॉ. बीना उमेन यांच्याकडे मृत्यूच्या दाढेत पोहोचलेल्या अफझाझची केस आली आणि त्याला वाचवता आले नाही डॉक्टर भावूक झाल्या त्यांना प्रश्न पडला अफझाझच्या मृत्यूचा दोष कुणाचा अफझाज चे लसीकरण न करणार्या पालकांचा की लसीकरण विरोधात चुकीचे मार्गदर्शन आणि खोट्या अफवा पसरवणार्यांचा ? अफझाझच्या मृत्यूचे प्रमाणपत्र बनवणार्या डॉ. महमद नियास यांनी फेसबूकवर पोस्ट टाकली 'त्याच्या कडे पाहताना लसीकरणा विरुद्ध पेटवणार्यांना मी मनातल्या मनात हजारो बोल लावले, आधी मुलाच्या पालकांना बोल लावले पण लक्षात आले ती केवळ त्यांची चूक नाही लसीकरणा विरोधात प्रचार करणार्यांना उघडे पाडण्यासाठी आणि लसीकरणाच्या फायद्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यामध्ये आपला समाज अयशस्वी ठरला आहे'
वृत्तपत्रीय माध्यमातून केरळातील आरोग्य विषयक ज्या बातम्या पुढे येत आहेत त्या नुसार अफझाज सारख्या अनेक निष्पापांना आज विज्ञानाला लसीकरणाच्या माध्यमातून प्राण वाचवणे शक्य असूनही त्यांच्याच समाजात पसरवलेल्या अफवांमुळे प्राण गमवावे लागत आहेत.
काय अफवा पसरवल्या जात आहेत ? प्राण्यांपासून मिळवलेले विषाणू आणि जिवाणू शरीरात सोडणे इस्लाम मध्ये निषीद्ध आहे (हे सर्वांदेखत नसताना आपापसात सांगितले जात असण्याची शक्यता) , 'मानवाला इश्वर गर्भातच सगळ्या गोष्टी देऊन पाठवतो म्हणुन लसीकरणाची काही गरजच नाही' अशा आशयाच्या त्या शिवाय अजून इतरही अफवा प्रचार विवीध प्रकारे केला जातो आहे. त्यात भर म्हणून केरळातील युनानी आणि निसर्गोपचार करणारे व्यावसायीक लसीकरणाने मूळातली प्रतिकार शक्ती कमी होते मग युनानी आणि निसर्गोपचाराला शरीर साथ देत नाही असा खोटा प्रचार करतात.
गेल्यावर्षी सप्टेंबर महीन्यात अफझाजचे प्रकरण झाल्या नंतर केरळातील मलपूरम जिल्ह्यात सर्वेक्षण केले असता १,७०,००० मुलांचे/मुलींचे लसीकरणच उपरोक्त कारणांनी पालकांनी करुन घेतलेले नाही हे पुढे आले. या अफवांवर श्रद्धा ठेवणार्या श्रद्धावानांच्या अफवांचे निराकरण करणे केरळातील डॉक्टर लोकांसमोरचे आज सगळ्यात मोठे आव्हान ठरत आहे.
संदर्भ १, २ ३ ४
मेडीकल तथ्यांमध्ये काही चुकले असल्यास डॉक्टर लोकांनी दुरुस्ती सुचवावी.
****
* श्रद्धेचे प्रयोजन आणि उपयोजन ?
वाचने
12803
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यांना करावेसे वाटत नसेल तर
धागा लेखाचा मुख्य उद्देश
In reply to त्यांना करावेसे वाटत नसेल तर by कंजूस
श्रद्धावान आणि मूर्ख यांमध्ये
केरळ वॅक्सीनेशन हे गूगल न्यूज
In reply to श्रद्धावान आणि मूर्ख यांमध्ये by खालीमुंडी पाताळधुंडी
खाली मुंडी... शी पहिल्यांदाच
टनाटनी मरती धर्माच्या कर्माने
In reply to खाली मुंडी... शी पहिल्यांदाच by धनंजय माने
अजून अजून जुळवा ना यमक
In reply to टनाटनी मरती धर्माच्या कर्माने by अत्रुप्त आत्मा
=))
In reply to अजून अजून जुळवा ना यमक by धनंजय माने
(No subject)
In reply to =)) by अत्रुप्त आत्मा
जिथे तर्क संपतो तिथे श्रद्धा
सहमत आहे
In reply to जिथे तर्क संपतो तिथे श्रद्धा by नगरीनिरंजन
तीव्र असहमत. न्यूटनाकडे
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
न्यूटनाकडे
In reply to तीव्र असहमत. न्यूटनाकडे by आनन्दा
इथे मिपावरच कोणीतरी न्युटनचे
In reply to न्यूटनाकडे by आनन्दा
:):)
In reply to इथे मिपावरच कोणीतरी न्युटनचे by टवाळ कार्टा
तुम्ही गल्ली चुकत आहात
In reply to तीव्र असहमत. न्यूटनाकडे by आनन्दा
ते पुढचे वाक्य वाचले नव्हते.
In reply to तुम्ही गल्ली चुकत आहात by गॅरी ट्रुमन
:)
In reply to ते पुढचे वाक्य वाचले नव्हते. by आनन्दा
*
वडाची साल पिंपळाला?
In reply to * by कंजूस
अंडी न खाणं जीवावर बेतणार
In reply to * by कंजूस
डोळस श्रद्धा आणि अंधश्रद्धा
च्यायला
हे इस्कटून सांगा.
In reply to च्यायला by पैसा
अर्जंट मधे
In reply to हे इस्कटून सांगा. by बोका-ए-आझम
अवांतराबद्दल माफी
कमाल असते अशा धार्मिक शेखचिल्लींची.
In reply to अवांतराबद्दल माफी by पैसा