Skip to main content

भग्न शरीरे - 1

लेखक रातराणी यांनी सोमवार, 04/07/2016 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविक: कथेतील भाषा आणि प्रसंगाचे वर्णन काहींना आक्षेपार्ह वाटू शकते. मानवी शरीर आणि त्याच्या गरजा हा दुर्लक्षिला गेलेला विषय. अनेकांच्या बाबतीत (स्त्री आणि पुरुष दोन्ही) लग्न झालं की घोड गंगेत न्हाल अशा भावनेने आयुष्यातल्या इतक्या सुंदर आनंदाला बळी दिले जाते. पण काही क्षणांपुरते का होईना शरीर बंड करतेच. त्या बंडाशी हात मिळवून काही गुरप्रीत आणि सौमित्र तो आनंद मिळवत जातात. काही जान्हवी बंड पुकारायच्या आधीच कोसळतात. अशा दोन स्त्रियांची ही कहाणी. या दोन्ही पात्रांचे वागणे अनेकांना खटकनारे वाटेल कदाचित पण मागेच कुठल्याशा धाग्यावर कुणीतरी म्हणलं होतं इट्स नेवर ब्लॅक अँड व्हाईट. तसंच पूर्ण वेळ कुणीही चुक नसतं आणि कुणीही बरोबर नसतं. तरी या कथाविषयाचे ज्यांना वावडे असेल त्यांनी इथून पुढे वाचू नये ही विनंती. भग्न शरीरे हे नाव दिले कारण (क्षणिक का होईना ) अपूर्णतेची जाणीव झालेल्या त्या दुर्दैवी स्त्री आणि पुरुषांच्या मनासारखीचं त्यांची शरीरे. दुभंगलेली. शक्यतो मी प्रास्ताविक लिहायचं टाळते पण विषय सेन्सिटिव असल्याने राहावंल नाही. असो नमनाला घडाभर तेल पूरे. कथा: दारावरची बेल वाजल्यावर मी डोळे चोळत दार उघडलं. इतक्या रात्री गुरप्रीतच असणार. "आजभी देर कर दी गुरप्रीत...?" माझ्या जवळजवळ गळ्यात पडत गुरप्रीत म्हणाली, "जानू आज उसकेसाथ फ्लॅटपे गयी थी!" मी झटकन तिला बाजूला केलं. तशी ती अजून लाडात येऊन माझ्या हाताला धरून हॉलमधे आली. मला सोफ्यावर बसायला लावून स्वतः माझ्या मांडीवर डोकं ठेऊन आडवी झाली. पर्स मधून सिगारेट काढून शिलगावली आणि धुराची वलय सोडू लागली. तिच्या निवांतपणाच मला आश्चर्य वाटलं. तिच्या कपाळावर हलके चापटी मारत मी म्हणलं, "नालायक कुछ तो शर्म कर. खुदका नहीं तो एक बार उसके बीवी बच्चोंका तो सोचती." बराच वेळ डोळे मिटून शांत बसलेली गुरप्रीत शेवटी म्हणाली, "वो हxx खुद नहीं सोचता अपने बीवी बच्चोंकी. मैं कौनसी पुजारन हूँ जो सोचुंगी?" "जो गलत है वो गलत है गुरप्रीत. कौन सोचेगा कौन नहीं सोचेगा ये मुझे नहीं पता पर ये तो मालूम है की इस सबका नतीजा ठीक नहीं होगा." "छोड ना तू भी जानू. मुझे कौनसा उससे शादी करनी है. एक प्रमोशन मिल जायें फिर तो बिग बॉस ही पकडूगी." तिच्याशी आता बोलण्यात काहीच अर्थ नाही हे समजून मी उठून बेडरूममधे गेले. दार बंद करता करता सहज गुरप्रीतकडे लक्ष गेलं. गोर्या गोर्या गालांवर हलकी लाली पसरलेली. ओठांवरची लिपस्टीक पूर्ण उडून गेली होती. आणि तरीही तिचे मूळचेच गुलाबी रंगाचे ओठ अजून सुंदर दिसत होते. केस कपाळावरून खाली तिच्या डीप वी नेक ब्लाउजवरून गळ्यात पडलेले. गडबडीत आवरताना बहुतेक आतली कॅमी घालायची राहून गेली असणार. आणि त्यामुळे चुकारपणा करत श्वासाच्या लयीत वर खाली होताना दिसणारे तिचे.. निसर्गाने सौंदर्य तिच्या अंगप्रत्यंगात अगदी ठासून भरलेलं. ती जसं आयुष्य उधळून देत होती तसं बहुदा निसर्ग त्याच्याकडंचं सर्व सौंदर्य तिच्यावर उधळत होता. दार बंद करून बेडवर पडले पण डोक्यातून गुरप्रीतचा विचार काही केल्या जाईना. माझी रेसीडनसी सुरू असताना रूममेटनी बॉय फ्रेंड बरोबर पळून जाऊन लग्न केलं. घरात रूममेट पण डॉक्टर म्हणल्यावर आम्ही फक्त हाय हॅलो पुरतच एकमेकाना भेटायचो. वेळच नसायचा. ती पळून गेल्यावर तिच्या आई वडीलांनी जणू काही मीच तिला भरीस पाडलं अशा आवेशात माझी झडती घेतली. मग दूसरी रूममेट शोधताना म्हणलं आता जरा वेगळ्या फील्डमधली शोधू. कधी बोललोच तर कमीत कमी विषय तरी पेशन्ट सोडून वेगळे असतील. काय करते, कुठं जाते कळत तरी राहिल. दोनच दिवसात गुरप्रीत दारात उभी. "जान्हवी देशमुख? मैं गुरप्रीत कौर. आपकी नयी रूममेट. " एवढं बोलून तिनं हातात हात मिळवला आणि आत आली सुद्धा. मला काहीच बोलायची संधी न देता तिनं फ्लॅटमधे एक चक्कर मारली आणि निवांत सोफ्यावर बसली. "बढीया है! अरे आप खड़े क्यूं हो बैठो तो." "देखीये मैंने ऍडमें साफ लिखा था की पहले अपना रेज़्यूमे भेजे. अपने पेरेंट्सका पता नंबर भेजे. कमसेकम दो लोगोंका तो रेफरनस चाहिए मुझे. बिना कुछ इन्फर्मेशनके मै नहीं रखनेवाली किसी भी लड़कीको." "अरे आप तो एकदम सिरीयस हो गये. और रेजुमे वगैरा में जो होगा उसका और साथ रेहनेका क्या रिलेशन? पेरेन्ट्स का अता पता मुझे मिल जाये तो दे दूँगी. और रेफरनस तो तब मिलेंगे जब मेरी किसीसे जान पेहेचान होगी. मैं तो लाइफमै पेहली बार यहाँ आयी हूँ. " खरंतर नाही मी तुम्हाला रूम देऊ शकत नाही असं तोंडावर आलेलं पण काय वाटलं कोण जाणे मी अच्छा ठीक है म्हणूनही गेले. तिच्या भारदस्त पर्सनेलीटीने भुरळ पाडली का? स्मार्ट, चंचल, ओवर कॉन्फिडेंट आणि मुख्य म्हणजे अतोनात सुंदर. पाहताक्षणी प्रेमात पडाव अशी! ती लहानाची मोठी झाली मामाकडे. वडील व्यवसायातल्या सततच्या अपयशाला कंटाळून घर सोडून गेलेले. आई नीरस आयुष्याला कंटाळून एका कॉलेजकुमाराशी लग्न करून पसार झालेली. मामाने हिच्या निरागस तोंडाकडे बघून हिला मोठी केली. शिकवली. चांगली एम बी ए झालेली. एखाद्याला वाटावं परिस्थितीने एवढे तडाखे दिलेलं माणूस कसं शांत समंजस असेल. पण ही त्याच्या उलट. घरी असली की दंगा धुड्गुस नुसता. दोन आठवड्यात ती दोन वर्षांची मैत्रीण झाली. तिला जॉब मिळायलाही फार वेळ नाही लागला. महिन्याभरापूर्वी मैं तो लाइफमें पेहली बार यहाँ आयी हूँ म्हणणारी गुरप्रीत सहज इथल्या गर्दीत मिसळून गेली. कुणाला खरं वाटणार नाही इतक्या सहज ती इथे फिरू लागली. कधी कधी मलाच सल्ले द्यायची कुठून कुठे कसं जायचं आणि मुख्य म्हणजे ते बरोबर निघायचे. तिच्या वेगाच मला कौतुकही वाटायचं आणि भितीही. असं वाटायचं हे खळखळ वाहणार पाणी काही कारणाने वाहायच बंद झालं तर? त्याहून जास्त भिती याची वाटायची की हे वाहत जाणं तिला मान्य होतं. जणू काही समाज अस्तित्वात नव्हताच तिच्यासाठी. तिला कधी आपण कसं वागावे सांगायला गेलं की तिचा ठरलेला डायलॉग. "सब बस चूx है यहाँपे. कोई सही नहीं होता और कोई गलत नहीं होता. " एका क्षणात तिचं आयुष्य जगायचं तत्वज्ञान सांगायची. आणि ते पटायच. असं काहीतरी विचित्र रसायन होतं ते. तिच्या चुकीच्या गोष्टींबद्दलही प्रेम वाटायचं. कदाचित तिचा भूतकाळ कळला की सर्वांनाच तिच्याविषयी एक प्रकारची करुणा वाटायची. ती कधी फायदा घेत असेल तिच्या भूतकाळाचा असं नाही वाटायचं. घेतही असती तरी त्यात काय एवढं. तिच्या आजुबाजुला घुटमळनारे सगळेच काही तिला प्रेम द्यायच्या उद्देशाने तिच्या जवळ येत नव्हते. एक दिवस खूप उशीरा आली घरी. आली ते सरळ तिच्या रूममधे जाऊन दार लाऊन बसली. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं झालंय हे कळायला मला वेळ नाही लागला. दार जरास ढकलून मी क्या हुआ गुरप्रीत म्हणलं तर बाईसाहेब आरशासमोर उभ्या राहून स्वतःला न्याहाळत बसलेल्या. जणू काही आपण किती सुंदर आहे हे माहीतच नव्हतं तिला. मला बघताच तिचा चेहरा खुलला. आरशात बघत, मानेवरचे केस वर उचलून धरत खांद्यावरच्या लाल व्रनाँवरून हलकेच हात फिरवत ती म्हणाली, "बडी कमाल चीज़ है यार सेx तो!" ते ऐकून मीच मटकन तिच्या बेडवर जाऊन बसले. मला रागावलेली बघून माझ्या जवळ बसत ती म्हणाली, "तूने कभी नहीं किया?" "गुरप्रीत.." "अच्छा चल कोई नहीं. हम ढूँढ लेंगे तेरे लिये कोई. " "पागल है तू? क्या मिलेगा ये सब करके?" "कुछ भी करके क्या मिलता है जानू? बस दो पल की खुशी. थ्रिल्ल. जिंदा होने का एहसास!" तिच्या ह्या बोलण्यावर उत्तर सुचलं नाही आणि मी शून्यात नजर लावून बसले. उगीचच. तिचं त्या शांततेला भेदत म्हणाली. " कभी न कभी तो करनाही है डार्लिंग. क्या फरक पड़ता है मैंने जरा जल्दी कर लिया तो. देख वो आकाश है बड़ा हॅन्डसम. आज ऑफीसके बाद पार्टी थी. तो आके बात कर रहा था मुझसे. ऐसी फटी हुई थी बेचारे की. मुझसे देखा नहीं गया. मैने किस कर दिया उसको. फिर ऐसेही हो गया सब. इतना क्या सोचना?" "शादीवादी का बोला कुछ? या ऐसेही चली आयी मुंह उठाके." "ऐसे कैसे? उसने पूछा ना. मै तो साफ ना बोलके आयीं हूँ." आता चक्कर येऊन पडायचचं राहिल होतं माझं. "देख यार गुरप्रीत ये सब ठीक नहीं है. अभी मजा आ रहा है लेकिन बादमें पछताएगी." "जानू ये शादी के चक्कर में तो मैं पड़नेवाली नहीँ हूँ. यहाँ सगे मा बाप अपने नही होते कोई पराये मर्द का क्या भरोसा?" सतत हसत खिदळत राहणारी गुरप्रीत असं अचानक काहीतरी अतिशय नकारात्मक बोलून जायची आणि अंगावर काटा यायचा. खरंच इतकी पोकळ असू शकतात का काही नाती? गोळ्यांवरच्या एक्सपायरी डेट सारखी नात्याना एक्सपायरी असती तर सर्वात आधी कुठलं बर नातं फेकून द्यावं लागलं असत? असे अनेक प्रश्नांचे भुंगे गुरप्रीत माझ्या मागे लावून जायची. फक्त एका उत्सुकतेपोटी केल्या गेलेल्या प्रयोगाने गुरप्रीतला मात्र तिच्यातल्या सूपर पॉवरची जाणीव करून दिली. त्याला महत्वाकांक्षेची जोड़ मिळाली आणि गुरप्रीतन मागे वळून पाहिलं नाही. तिच्यात होत गेलेल्या बदलांची मी साक्षीदार होते. खूप राग यायचा तिचा पण जे माझ्यासाठी चुक आहे ते तिच्यासाठीही चुकचं हे मला लादायचं नव्हतं तिच्यावर. का कोण जाणे आतून असं वाटायचं की ह्या मुखवट्यान्च्या शहरात एकटी गुरप्रीतचं आतून बाहेरून सच्ची आहे. कमीत कमी ती निर्धास्तपणे मान्य तरी करते की तिला काय हवे आहे. माझी रेसिडन्सी संपली आणि घरच्यांनी लग्नाचा तगादा मागे लावला. एकूणच प्रेम आणि त्यातून सरळ सोप आयुष्य कॉंप्लेक्स झाल्याचीचं जास्त उदाहरणं समोर त्यामुळे मी त्या वाटेला जाण शक्यच नव्हतं. घरच्यांनी एक मुलगा बघून मला फोटो पाठवला. अतिशय रूबाबदार. घरी सर्व व्यवस्थित. एकूण मी उद्या मला काही करायच नाही असं म्हणलं तरी कुणाचं काही अडनार नव्हतं. मुलाशीही एक दोनदा बोलल्यावर आक्षेपार्ह असं काहीच वाटलं नव्हतं. गुरप्रीतला त्याचा फोटो दाखवल्यावर तर लॉटरी लग गयी तेरी तो म्हणून माझ्याकडून जंगी पार्टी उकळली. लग्नानंतर तसं तिचं आणि माझं आयुष्य समांतर रेषांसारखं धावत होतं. ती तिच्या ऑफीसमधे मोठ्या पोस्टवर पोचली होती. आता तिला काही मिळवण्यासाठी स्वतःच्या शरीराचा बाजार करायची गरज नव्हती. आता ती करत होती ते फक्त स्वतःच्या आनंदासाठी. तिला कधी फोन केला की ती तिच्या सेx लाइफची रसरशीत वर्णन सांगत बसायची. मधूनचं हुक्की आली की काहीबाही प्रश्न विचारत राहायची. मलाच कंटाळा यायला लागला त्या सर्व गोष्टींचा. त्यामुळे साहजिकच आमचे बोलणं तुटत गेलं. गुरप्रीत कधी आठवण आली तर फोन करायची पण तेवढचं हालहवाल विचारून फोन ठेवायची. प्रत्येकवेळी मात्र असं आत कुठेतरी जाणवायचं की काहीतरी चुकतय. अजून काही आहे जे तिला सांगायचय पण तिचा धीर होतं नाही. पण मीच मुद्दाम शांत बसायचे. न जाणो हिने पुन्हा पाल्हाळ सुरू केलं तर. अशीच वर्षं दोन वर्षं गेली असतील. घरी एव्हाना पाळणा हलला होता. हॉस्पिटल, घर आणि आता बाळ अशा अनेक जबाबदार्या पार पाडता पाडता मला दिवसाची रात्र कधी होतं होती ते कळत नव्हतं. बाळाला बघायला गुरप्रीत आलेली तेव्हा ती उगीच कसल्यातरी विचारात हरवल्यासारखी वाटलेली. मला वाटलं असेल काही ऑफीसचं टेंशन. नंतर तिला फोन करून बोलेन बोलेन म्हणत राहूनचं गेल. सहा महिन्यांनी मॅडम हॉस्पिटल मधे हजर. मनात उगीच शंकेची पाल चुकचुकली. तिला सगळ्या टेस्ट करायला सांगून मी तिला घरी पाठवलं खरं पण पूर्वीच्या त्या हस्त्या खेळत्या मुलीने आपलं काय करून घेतलं अशी रुखरुख लागून राहिली. टेस्टचे रिपोर्ट आले तेव्हा तिला बोलावून घेतल. रिपोर्ट सांगितल्यावर तीच पुर्वीची गुरप्रीत एक क्षणासाठी प्रकट झाली. "थेँक गॉड यार मेरी तो फटी पडी थी." "गुरप्रीत कितने दिन खेलते रहेगी इस तरह. बंद कर यार ये सब. अच्छासा लड़का ढूँढके शादी कर ले अब. बहोत हो गया यार मजाक.ऐसेही चलता रहा तो आज नहीँ तो कल टूट जायेगी. " "अरे अभी तो खेलनेकूदनेकी उम्र है मेरी. शादी करके क्या तेरी जैसे बच्चा पैदा करनेवाली मशीन बन जाऊं. " "गुरप्रीत दिमाग तो ठिकाने है तेरा. कुछ भी बक मत." त्यावर गुरप्रीत शांतपणे उठून निघाली. मलाच काय झाले होते काय माहीत. इतकी वर्षं असं मनात दाबून ठेवलेले ते शब्द अखेरीस बाहेर पडलेचं. तिचे रिपोर्ट्स बाजूला ठेवता ठेवता अगदी सहज माझ्या तोंडातून निघालेले ते शब्द. "काश तेरे रिपोर्ट्स पॉज़िटिव आते. पता नही और कितने घर बरबाद करेगी." आतापर्यंत जगात मीच फक्त तिला समजून घेतीये हा गुरप्रीतचा विश्वास मी त्या शब्दांनी मातीमोल केला. चक्क गुरप्रीतच्या डोळ्यात पाणी. पण तेही क्षणभरचं. मी उठून तिला सॉरी म्हणलं तसं वाघिणीसारखी ती गरजली. "रख तेरे पास तेरा सॉरी. और मॅडम एक बार अपने भी सारे टेस्ट करवा लो." "बकवास बंद कर गुरप्रीत. आजतक तेरी बातें सुनती आयी इसका मतलब नहीं की तू मेरे दरवाजेपे आके मुझेही सुनाये." "दूसरोंके घर बचानेवाली अपना खुदका घर तो संभाल. पता नहीं कितने बॉयफ्रेंड बदल चुके है तेरे पती परमेश्वर." कानात कुणीतरी गरम तेल ओताव तसं ते शब्द आत गेले. खोलवर जाळत. तिला प्रति उत्तर द्यायची माझी ताकतचं नव्हती. मला दिसत होत्या मी तळमळत घालवलेल्या अनेक रात्री. हॉस्पिटलमधून आल्यावर कधी सौमित्रच्या मिठीत शिराव तर हव्या हव्याशा उबदार स्पर्शाऐवजी जाणवणारा फक्त सोपस्कार. घरी पार्ट्यामधे मित्रांशी होणारी त्याची लगट. सगळ सगळ माझ्या डोळ्यासमोर होतं. मीच झापड लावून घेतली होती. जगातल प्रत्येक कपल मुल झाल्यावर अशाच सेटबॅक मधून जात असणार ही स्वतःची घालून घेतलेली समजूत. ती एवढीशी रूम मला एका मोठ्या दरीसारखी वाटू लागली. एरवी काठावर उभी असलेली मी खोल खोल कोसळत होते आणि नेहमी कोसळणारी गुरप्रीत काठावर होती. माझा तोल सावरत गुरप्रीतन मला खुर्चीत बसवलं. "बहोत मन किया बतानेका तुझे. पर हिम्मत नहीँ हुई यार. एक दो बार दिखा था गे बारमें जाते हुए. पेहले तो लगा मेरा भरम ही होगा. फिर लगा गया होगा दोस्तोंकेसाथ ऐसेही. तुझे फोन किया तो तू बताती अभी वो खाना खाके आराम कर रहा है. तुझे नहीं पता पर लाइफमें पेहली बार किसीकेलीए दुआ माँगी की कमसेकम इसकी शादी तो बच जाये. फिर एक दिन हिम्मत करके उसके पीछे गयी थी तो..." पुढचं तिला सांगता आलं नाही. माझ्या डोळ्यांना लागलेल्या धारा पाहून नेहमीचा तो खळखळता झरा माझ्या कुशीत शिरून रडू लागला. रडता रडताही उगीच मला हसवायचा प्रयत्न करत होती. माझ्यालेखी, समाजाच्या लेखी नीतीअनीतीच्या भिंती तोडलेली एक टूटी हुई लड़की मला सांगत होती, "ब्रोकन तो तू है मेरी जान. और वो भी बिना कुछ किये." तळटीपा: भग्न शरीरे - 2 ही वेगळी कथा असणार आहे. अगदीच शरीरसंबंधाविषयी नसली तरी शरीर आणि त्याची काही प्रसंगांतून प्रकर्षाने होणारी जाणीव या मूळ संकल्पनेशी जोडणारी. ( ही कथा राहिली तर दूसरी टाकेन. :)) कथा डू आयडीने टाकावी की खऱ्या असा बराच वैचारिक गोंधळ होऊन शेवटी खऱ्या आयडीने टाकली. ( तसा माझा डुआयडी पण चांगलाच आहे.) सुज्ञ वाचक आयडी आणि त्याचे लेखन यातून कोणतीही प्रतिमा तयार करणार नाहीत असा विश्वास आहे. सर्व प्रसंग आणि पात्रे काल्पनिक. ( टीपान्ची काहीच गरज नाही हे अगदी बिनाशर्त मान्य आहे. :) )
लेखनविषय:

वाचने 9534
प्रतिक्रिया 51

प्रतिक्रिया

पता नहीं कितने बॉयफ्रेंड बदल चुके है तेरे पती परमेश्वर

तिचा पती कसा बॉयफ्रेंड बदलणार ? वाक्य चुकलय का?

In reply to by कैलासवासी

बरोबर आहे.
"बहोत मन किया बतानेका तुझे. पर हिम्मत नहीँ हुई यार. एक दो बार दिखा था गे बारमें
हे वाचलं का?

In reply to by किसन शिंदे

वरच्या प्रश्नाच्या गणगनमुळे हे लक्षातच राहिले नाही, बाकी अप्रतिम लेख. +१

In reply to by विनायक प्रभू

कैलासवासी तरी व्हायचत! तेवढीच गट्टी जमली असती! रच्याकने, लेख वाचून मीही खपल्या गेलोय!! Sandy

In reply to by स्पा

माननीय स्पा सर, मी लग्नानंतरच्या धक्क्याबद्दल बोलतोय, लग्नापूर्वीच्या नाही!

तुमचं गद्य लेखन कदाचित प्रथमच वाचलं - तुमचा डू आयडी कोणता ते ठाऊक नाही आणि कोणाचे डू आयडी कोणते याचा शोध घेण्यात वेळही दवडत नाही- तुमच्याच मराठी मनाला कुठे जाण्वल असेल म्हणून नाही तर आजकाल टिव्ही सिरीयल्स आणि चित्रपट भन्नाट पुढे गेले आहेत -त्यामुळे खूप मोठे धक्के बसतीलच असे नाही. तुमच्या सारख्या क्रिएटीव्ह रायटींगच्या करीअर मध्ये इंटरेस्टेड लोकांनी मेन आयडी का डू आयडी हा विचार करण्यापेक्षा मेन आयडीने लिहिल्यास कॉपीराईटची काळजी घेणे अधिक सोपे होते. मुख्य म्हणजे उत्पन्नाचे स्रोत असलेल्या माध्यमासाठी असे लेखन राखून ठेवण्यासाठी हरकत नसावी असे माझे व्यक्तिगत मत. बाकी उपरोक्त कथाशैली मांडणी उत्तम वाटली, गुरप्रीतची बाजू मांडण्याचा प्रयत्न जेवढा यशस्वी आहे त्या नाण्याची दुसरी बाजू तेवढी प्रकर्षाने पुढे येताना दिसत नाही. कथेची एक नायिका डॉक्टर आहे गुरप्रीतशी तीचा मनमोकळा संवाद झालेला असू शकतो पण नवर्‍याशी संवाद झालेला नसणे अशक्य नसले तरी नायिकेचे डॉक्टर असणे पाहता पूर्णतया पटले नाही. असो.

शीर्षकावरून पंजाबमधली व्यसनाधीनता किंवा दहशतवाद असा काही विषय असेल वाटले होते हे सांगायचे राहीले. मी कथा कादंबर्‍यांचा वाचक नसलो तरीही कथा पूर्ण वाचू शकलो म्हणजे बर्‍यापैकी जमली असावी.

In reply to by सस्नेह

अतिशय ताकदीचे लेखन! उत्तम शॉर्ट स्टोरीचे बीज या कथेत असू शकते. (किंवा एका ३ वर्षे चालणाऱ्या मालिकेचे)

( ही कथा राहिली तर दूसरी टाकेन. :))
विषय वेगळा असला तरी धागा उखडावा असं काही नाहिये. आणि समाजात जे काही (थोड्याफार प्रमाणात का होईना) घडतं त्याचंच चित्रण आहे तुमच्या कथेत. आणि उगाच डुआयडी वगैरे कशाला.. जे वाटेल ते लिहित रहावं बिनधास्त एकाच आयडीने.

मला वाटलं बोल्ड असेल. एनीवे, वेगळ्या वाटेवरचा प्रयत्न छान आहे! (कदाचित त्या टिपा नसत्या तर जबरा गोंधळ झाला असता ! फुल पॉपकॉर्न ;) )

आधी कथेबद्दल लिहीते. कथा नेहमीसारखी प्रवाही, एखाद दोन प्रति मांमधुन वगैरे तुमची निरीक्षण शक्ती दाखवणारी वाटली पण आवडली नाही. एक तर गुरुप्रीत चं पात्र बर्‍यापैकी क्लिशे ( मराठी शब्द? ) वाटलं, खास करुन तिचा भूतकाळ आणि तिचं प्रमोशनसाठी सेक्स वगैरे फंडे ! नात्यांवरचा विश्वास उडालेला असू शकतो सो, ते मान्य तिच्या बाबतीत. अजुन एक खटकलं म्हणजे जान्हवीचं पण डॉ असुन दुसरं टोक. जो परिणाम तुम्हाला साधायचा आहे तो या दोघींच्या अगदी भिन्न असलेल्या स्वभावधरमातून साधला जाण्यातली सोय मला समजू शकते पण एखाद्या डॉ मुलीला नवर्‍याचं गे अस्णं कळणार नाही आणि एक वेळ नाही कळलं हे मान्य केलं तरी मूल झाल्यानंतर येणारा सेट बॅक हे अजुन एक मिथ आहे. ते एका डॉ ला खरं वाटेल हे तर मुळीच नाही पटलं. तुमच्या तळटिपा वाचल्या. या विषया बद्दल आधी मिपावरच चर्चा झाली आहे. कोणार्क मधली सूर्यशिल्पे का असाच काहीसा एक सुरेख लेख इथे येऊन गेलाय आणि सूज्ञ पणाने च चर्चा झाली आहे त्यामुळे तळटिपा नसत्या दिल्या तरी चालल्या असत्या. पण एक वेळ दिल्या तरी खास खटकलं ते:
कथा डू आयडीने टाकावी की खऱ्या असा बराच वैचारिक गोंधळ होऊन शेवटी खऱ्या आयडीने टाकली. ( तसा माझा डुआयडी पण चांगलाच आहे.) सुज्ञ वाचक आयडी आणि त्याचे लेखन यातून कोणतीही प्रतिमा तयार करणार नाहीत असा विश्वास आहे. सर्व प्रसंग आणि पात्रे काल्पनिक.
डु आयडी घेणं न घेणं, स्त्री आहोत का पुरुष हे लपवणं किंवा जाहीर करणं हा तुमचा चॉईस आहे, तुमची खरी ओळख लपवण्यासाठी तुम्ही घेतलेला अप्रोच आहे. त्यावर मला काही बोलायचं नाहे पण तुमच्या या अप्रोच मध्ये लिहिण्याची सोय किंवा लिखाणावर किती ऑब्जेक्टिव प्रतिसाद येतात हे बघण्याच्या भावापेक्षा उगाचच एक खोडसाळपणा आहे. त्यामुळे कुठल्या आयडीने लिहायचं हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. उगाच वाचकांच्या सूज्ञपणाशी त्याची सांगड घालणे आवडले नाही. तुमचं लिखाण मी वाचते किंवा वाचायचे पण प्रतिक्रिया देणं मात्र या आविर्भावामुळे कधी कधी टाळावंसं वाटतं. कुठल्याही अविर्भावाशिवाय असलेल्या तुमच्या लिखाणावर मात्र मी आवर्जुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.

In reply to by स्रुजा

( टीपान्ची काहीच गरज नाही हे अगदी बिनाशर्त मान्य आहे. :) ) अस वर लिहिलेले आहेच त्यामुळे आपला पास :)

मला असं वाटतं जानूचा नवरा गे नाही तर बायसेक्श्युल आहे असं म्हणावं लागेल, कथेमधे त्यांना मूल झाल्याचा उल्लेख आहे. मला वाटतं बायसेक्श्युल च्या केस मधे शारिरिक पेक्षा मानसिकता जास्त कारणीभुत आहे, बाकी कथा ठीक.

अजुन एक उत्कृष्ट कथा. तुमच्या सर्वच कथा उत्कृष्तच आहेत. कथेचे माध्यम म्हणजे त्याची भाषा ही अत्यंत प्रवाही आहे. आणी कथाबीज देखील अतिशय सशक्त आहे .

१ वेगळ्या धाटणीची कथा ... डॉक्टर ची प्रतिक्रिया असायला हवी होती .... ! वेगवान कथा... पुढील लेखास शुभेच्छा ....!

मला वाटते आपल्या कडे कौमार्याला जरा जास्तच महत्व देतात पण सगळे हे विसरतात की दुसऱ्या वेळे पासून सगळं सारखच असत. मग कशाला इतका आटापिटा. तसच लग्नानंतर जोडीदारावर मालकी हक्क गाजवला जातो. पण आपल्या जोडीदाराला काय हवे आहे ह्याचा विचार नाही करत. जोडीदार जर दुसऱ्या व्यक्ती कडे आकर्षित झाला/ होत असेल तर त्याचे आपल्या वरचे प्रेम कमी झाले असा सरसकट निष्कर्ष काढला जातो. पण त्या दुसऱ्या व्यक्ती मध्ये काय आहे जे आपल्या जोडीदाराला आकर्षित करतय ह्याचा त्रयस्थपने विचार होत नाही. तसेच केवळ शरीर संबंध ठेवले म्हणजे जोडीदाराचे आपल्यावर प्रेम आहे असा होत नाही. परदेशात खूप लहान वयात कौमार्य पतन होते आणि तसे नाही झाले तर मुलामध्ये/ मुलीमध्ये काही कमतरता आहे असे समजले जाते. ह्या विषयावर चर्चा होत असताना आपली मुलगी ह्यातून जाईल तेव्हा आपली प्रतिक्रिया कशी असेल असा एक मुद्दा निघाला. मी बराच वेळ विचार करूनही माझे मला उत्तर मिळाले नाही. त्यावर एक परदेशी व्यक्तीने छान मत नोंदवले. "तो सर्वस्वी माझा मुलीचा निर्णय असेल कारण तिचे कौमार्य हे तिच्या मालकीचे आहे. मी एवढेच करू शकतो की असे प्रसंग हाताळण्या साठी तिला तयार करू शकतो (मानसिक दृष्ट्या) जेणे करून कोणी तिचा गैर फायदा घेऊ नये अथवा तिला अतिप्रसंगाला सामोरे जावे लागू नये". मला हे अगदी मनोमन पटले कारण अजून 15-20 वर्षांनी आपल्या कडेही हे लोण येणार आहे.

एवढ्या उत्तम कथेला तळटीप गालबोट लावून गेली. ती तळटीप अस्थानी आहे असे वाटते. बाकी लेखिकेची मर्जी. पैजारबुवा,

कथा आवडली, मांडायची स्टाइल सुध्दा अप्रतिम. मिपाच्या कथाविभागात आवर्जून वाचाव्यात असं लिखाण ह्या आयडीकडून होतंय.

In reply to by गामा पैलवान

व्यक्तीचित्रण आवडले. छान लिहिलं आहे. शेयर केल्याबद्दल धन्यवाद. :)