✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुझी वाट बघता बघता........

ए — एक एकटा एकटाच, Sat, 05/14/2016 - 12:45
तुझी वाट बघता बघता नेहमी मला हे असेच होते प्रहरावर प्रहर उलटून जातात अन दिवसाची रात्र होते तूझ्या येण्याची चाहुल रातराणी हलकेच सांगुन जाते आठवणीने तुझ्या चंद्र शहारतो अन चांदणीही मोहरुन जाते नकळत कुठुनसा अल्लड वारा ओठी गीत तुझे गुणगुणत येतो उगाच सैरावैरा पळुन वैरी उरी घालमेल वाढवून जातो आठवत नाही कितीवेळ मी इथे एकाकी नि:शब्द बसुन आहे वेड्यापरी इथे येणार्‍या वाटांवरती तुझ्या पाउलखुणा शोधत आहे रात्र चढता चढत जाते, मात्र तू काही येत नाही तुला न भेटता निघण्यास हे पाउलही मग धजत नाही तु न आलेली पाहून चांदणी ही आता हिरमुसली आहे तिची ती घालमेल पाहुन पहाटही वेशीवर विसावली आहे दर रात्री या थडग्यावर वाट मी तुझी पहातो आहे "एकदातरी भेटुन जा, सोडव मला" अशी आर्त विनवणी करतो आहे तुझी वाट बघता बघता अजून एक रात्र विझुन जाते तुझी वाट बघता बघता नेहमी मला हे असेच होते......

प्रतिक्रिया द्या
4081 वाचन

💬 प्रतिसाद (9)

अंहं... something is missing...!

चांदणे संदीप
Sat, 05/14/2016 - 13:06 नवीन
पु.ले.शु. Sandy
  • Log in or register to post comments

कबरस्तानाचा रखवालदार?????

अभ्या..
Sun, 05/15/2016 - 01:04 नवीन
कबरस्तानाचा रखवालदार?????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

हा हा हा

एक एकटा एकटाच
Sun, 05/15/2016 - 10:08 नवीन
हा हा हा च्यामायला टायटल चुकल म्हणायच म्हणजे माझ बाय द वे हा आय डी पण चांगलाय कब्रस्तानचा रखवालदार :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

@संदीप

एक एकटा एकटाच
Sun, 05/15/2016 - 10:11 नवीन
@संदीप अरे हि माझी एकदम सुरुवातीची कविता आहे...... अगदी ट ला ट लावून केलेली. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

कविता आवडली!

एस
Sun, 05/15/2016 - 03:58 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

एक एकटा एकटाच
Sun, 05/15/2016 - 10:12 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

कविता खुप् छान आहे

अंतरिचा राजा
Fri, 07/01/2016 - 11:35 नवीन
कविता खुप् छान आहे
  • Log in or register to post comments

कवितेची संकल्पना आवडली

सुंड्या
Fri, 07/01/2016 - 16:32 नवीन
तुमची कविता माझ्या PoV ने- तुझी वाट पाहतांना असे वाटून जाते पळात दिवस, क्षणात रात्र उलटून जाते, चाहुल तूझ्या येण्याची रातराणी सांगुन जाते आठवणीने तुझ्या चंद्र काम्पितो, चांदणी मोहरुन जाते, अजाण अल्लड हवा गीत तुझे गुणगुणते उगाच स्वैर वाहूनी, वैरी मनी घालमेल वाढवून जाते, वेळ-काळाचे भान हरपून मी स्तब्ध आहे माझी वेडी-आशा इथल्या वाटांवरती तुझ्या पाउलखुणा शोधून जाते, -- ही विरहाची रात्र ढळता ढळत नाही तू सुद्धा येत नाही तुला न भेटता निघण्यास हे मनही धजत नाही, तु न येता चांदणीही आता हिरमुसली बघून तिची वेदना पहाटही क्षितिजावरच रुसली, "एकदाच भेटून मुक्त कर मला" आर्त करतो रोज याच थडग्यावर मी वाट तुझी पाहतो, तुझी वाट पाहता पाहता कित्येक नक्षत्रे ओघळून गेले तुझी वाट पाहता पाहता... सदैव मला असेच वाटून गेले.... ..............
  • Log in or register to post comments

मस्त

एक एकटा एकटाच
गुरुवार, 07/07/2016 - 23:25 नवीन
तुझी वाट पाहता पाहता कित्येक नक्षत्रे ओघळून गेले तुझी वाट पाहता पाहता... सदैव मला असेच वाटून गेले.... .............. हे आवडलं
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा