✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सॉफिस्टीकेटेड

स
सुबोध खरे यांनी
Tue, 07/05/2016 - 11:04  ·  लेख
लेख
सॉफिस्टीकेटेड ही दहा एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी दादर पश्चिमला कॅमेरा दुरुस्तीसाठी गेलो होतो. तेथे प्लाझा सिनेमासमोर तृप्ती म्हणून एक उत्तम हॉटेल आहे. याचे मालक श्री भागवत हे आमचे तसे दूरचे नातेवाईक आहेत. परंतु ते सर्व कुटुंब आमच्या कुटुंबाचे अत्यंत जवळचे स्नेही आहेत. तृप्ती हॉटेल हे राजेंद्र आणि श्रीरंग हे दोन चुलत भाऊ चालवतात. ती जागा त्यांची वडिलोपार्जित असून त्याचा त्यांनी अतिशय सदुपयोग केला आहे. मी त्या हॉटेलच्या समोरून चाललो असतात श्री राजेंद्र भागवत बाहेर उभे होते. ते आमच्या कडून पैसे घेते नाहीत आणि कुणाकडून काहीही फुकट घेऊ नये ही आमची घरची शिकवण. त्यातून सरकारी नोकरी तसलं तरी लष्करात नोकरी असल्याने फुकट काहीही घेण्याची मला सवय नव्हती. म्हणून मी आपलं दुसरीकडे पाहत तोंड चोरून चाललो होतो तिचा राजेंद्रने मला पाहिले आणि लगेच आडवा आला. राजेंद्र --काय् रे कुठे चाललास? मी -- अरे असाच चाललो होतो राजेंद्र -- चल आत मी-- अरे जाऊदे जरा घाईत आहे. राजेंद्र -- अरे माहिती आहे काय घाई आहे ती चल चल म्हणून मला तो हात धरून आत घेऊन गेला. मी आरोग्य विभागात काम केले असल्याने रस घेउन ते हॉटेल अगोदर आतून बाहेरून पूर्ण पाहिलेले होते. स्वयंपाकघर अतिशय स्वच्छ होते सर्व पाईप नळ सर्व गोष्टी स्टेनलेस स्टील च्या होत्या आणि भागवत मंडळी कटाक्षाने ते चमकतील इतके साफ ठेवत असत. मी राजेंद्र बरोबर स्थानापन्न झालो त्याने थालीपीठ, कोथिंबीर वडी आणि मसाला ताक मागवले ते खात असताना मी त्या टेबलवर ठेवलेले मेनू कार्ड उघडून काय पदार्थ आहेत ते पाहू लागलो. त्यात बटाटे वडा एक प्लेट रुपये ८/- (२००५-६ ची गोष्ट आहे) आणि खाली ब्रेड बटर १५ रुपये. मी राजेंद्रला विचारले काय रे एवढे मोठे दोन बटाटे वडे चटणी आणि मिरच्यांसकट ८ रुपये फक्त कसे ? -- तो म्हणाला - मध्यमवर्गीय माणूस ठाणे डोंबिवली कल्याण हून खरेदी साठी दादरला येतो खरेदी आटोपून घरी जायला तास दीड तास तरी लागतो. घरच्या बाईला घरी जाऊन स्वयंपाक करून जेवायला अजुनच वेळ लागतो. तेवढ्या वेळात पोटाला आधार म्हणून आणि पटकन खाता येणारा चविष्ट असा पदार्थ. हा कोणताही नफा ना आकारता आम्ही देतो. पाहिजे तर समाजसेवा म्हण किंवा मार्केटिंग म्हण. मग मी त्याला विचारले की मग हे ब्रेड बटर दोन स्लाइस चे चार त्रिकोणी तुकडे फक्त आणि ते सुद्धा १५ रुपये? त्यावर तो हसत म्हणाला येथे "सॉफीस्टीकेटेड" लोक येतात आणि सांगतात आमच्या मुलाला "ब्रेड बटरच लागतं". म्हणून अशा लोकांची ही "सोय" आहे. बाकी किती नफा ते तू विचारू नकोस.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
12995 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

एखाद्या गोष्टीमागील विचार

रेवती
Tue, 07/05/2016 - 11:08 नवीन
एखाद्या गोष्टीमागील विचार आवडला.
  • Log in or register to post comments

मस्तच, आता जाउन खावाच लागेल

कविता१९७८
Tue, 07/05/2016 - 11:12 नवीन
मस्तच, आता जाउन खावाच लागेल बटाटावडा
  • Log in or register to post comments

कोणताही नफा ना आकारता आम्ही

स्वीट टॉकर
Tue, 07/05/2016 - 11:14 नवीन
कोणताही नफा ना आकारता आम्ही देतो. पाहिजे तर समाजसेवा म्हण किंवा मार्केटिंग म्हण. उत्तम कॉम्बिनेश! _____/\_____
  • Log in or register to post comments

सॉफिस्टीकेटेड खाद्य...

खटपट्या
Tue, 07/05/2016 - 11:14 नवीन
सॉफिस्टीकेटेड खाद्य...
  • Log in or register to post comments

याला म्हणतात

नाखु
Tue, 07/05/2016 - 11:24 नवीन
व्यवहार चातुर्य हे फंडे कुठल्याही बिजीनेस स्कूलात शिकवत नाहीत तर फक्त "जीवनशाळा" शिकवते तेही फुकट. खरे साहेब धन्यवाद अशी माहीती दिल्याबद्दल
  • Log in or register to post comments

+ १

मुक्त विहारि
Tue, 07/05/2016 - 11:51 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

मस्त किस्सा :)

सतिश गावडे
Tue, 07/05/2016 - 11:44 नवीन
मस्त किस्सा :)
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

उल्का
Tue, 07/05/2016 - 11:45 नवीन
लेख आवडला. कैक वर्षं झाली तृप्तीला भेट देऊन.
  • Log in or register to post comments

चांगली स्ट्रेटेजी होती. आता

मृत्युन्जय
Tue, 07/05/2016 - 13:10 नवीन
चांगली स्ट्रेटेजी होती. आता बटाटा वडा ४० रुपये आहे आणी ब्रेड बटर ३८ :(
  • Log in or register to post comments

खरेदी

सुनील
Tue, 07/05/2016 - 13:33 नवीन
आताशा ठाणे-कल्याणहून दादरला खास खरेदीसाठी म्हणून फारसे कुणी जातही नसावेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

:)

स्पा
Tue, 07/05/2016 - 13:39 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

+१

आदूबाळ
Tue, 07/05/2016 - 13:48 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

ह्याचा अर्थ आता बटाटेवडा

गंम्बा
Tue, 07/05/2016 - 17:59 नवीन
ह्याचा अर्थ आता बटाटेवडा अपमार्केट् आणि ब्रेड बटर डाऊन मार्केट झालेले दिसतय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

याला आम्ही पोर्टफोलिओ अप्रोच

आदूबाळ
Tue, 07/05/2016 - 13:50 नवीन
याला आम्ही पोर्टफोलिओ अप्रोच टु प्रायसिंग म्हणतो. म्हणजे रेझरवर तोटा होऊ द्यायचा, पण ब्लेड्सवर अतिप्रचंड नफा करायचा. अर्थात दोन्हीकडे हेतू वेगवेगळे आहेत.
  • Log in or register to post comments

कृपया असल्या मार्केटिंग /

मोदक
Tue, 07/05/2016 - 14:06 नवीन
कृपया असल्या मार्केटिंग / अर्थशास्त्रीय फंड्यांची थोडी माहिती एकत्र करून एक धागा काढा. आंम्ही उपकृत राहू. डॉक्टरांचा किस्सा झकासच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

येस सार.

आदूबाळ
Tue, 07/05/2016 - 14:52 नवीन
येस सार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मोदकशी सहमत.

धनंजय माने
Tue, 07/05/2016 - 15:36 नवीन
मोदकशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अगदी असेच

प्रदीप
Wed, 07/06/2016 - 19:19 नवीन
ह्या मार्केटिंगच्या फंड्याच्या माहितीविषयी धागा काढण्याबाबत तसेच डॉक्टरांचा किस्सा झकास आहे, ह्या दोन्हींशी सहमत आहे. आदूबाळांनी सांगितलेल्या कॅटेगरीतील दुसरे उदाहरण म्हणजे घरगुती वापरासाठीचे प्रिंटर्स. मी घेतलेल्या प्रिंटरच्या किंमतीच्या मानाने त्यातील कार्टरेजच्या किमती भरमसाट आहेत. प्रिंटरची किंमत केव्हाच भरून निघाली आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मोदक

अन्या दातार
Wed, 07/06/2016 - 22:35 नवीन
कृपया असल्या मार्केटिंग / अर्थशास्त्रीय फंड्यांची थोडी माहिती एकत्र करून एक धागा काढा. आंम्ही उपकृत राहू.
हे आदूबाळाला बहुतेक मागच्या वर्षी सांगितलेलं. हो म्हणालेला, मीही वाटच बघतोय अजून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अरारारा. व्हाय गेटिंग अप माय

आदूबाळ
गुरुवार, 07/07/2016 - 00:08 नवीन
अरारारा. व्हाय गेटिंग अप माय मार्केट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

सर

अन्या दातार
गुरुवार, 07/07/2016 - 22:05 नवीन
आयाम पुशिंग यु अपमार्केट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

असं म्हणतात का याला आता ?

असंका
Tue, 07/05/2016 - 20:49 नवीन
असं म्हणतात का याला आता ? शनीवार रविवारचा इकोनोमिक टाइम्स बाकी दिवसांच्या किमतीपेक्षा पाचपट किमतीत मिळायचा तेव्हा आम्ही त्याला क्रॉस सबसिडायझेशन असं म्हणायचो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

तत्त्व तेच आहे, पण थोडा फरक

आदूबाळ
Wed, 07/06/2016 - 13:41 नवीन
तत्त्व तेच आहे, पण थोडा फरक आहे. क्रॉस सबसिडायझेशन म्हणजे एकच वस्तू वेगवेगळ्या वेळी (उदा. १), वेगवेगळ्या ठिकाणी (उदा. २) किंवा वेगवेगळ्या ग्राहकगटांना (उदा. ३) वेगवेगळ्या किमतीत विकणे. पोर्टफोलियो अप्रोचमध्ये एकमेकांना पूरक (कॉम्प्लिमेंटरी) अशा दोन किंवा जास्त वस्तू असतात. उदा. रेझर-ब्लेड, मोबाईल-कॅमेरा, इ. त्यात एकात नुकसान सोसून दुसर्‍यात मोठा नफा कमावणे ही स्ट्रॅटेजी जमून जाते. विशेषतः या वस्तू पॅकेज म्हणून विकतात तेव्हा. __________________________________ उदा. १: इकॉनॉमिक टाईम्स उदाहरण उदा. २: मल्टिप्लेक्समध्ये मिळणारी पाण्याची बाटली उदा. ३: ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेभाड्यात मिळणारी सवलत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

लक्षात आलं...! सुरेखच

असंका
Wed, 07/06/2016 - 20:17 नवीन
लक्षात आलं...! सुरेखच सांगितलंत...! धन्यवाद..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

हटके किस्सा!!

सूड
Tue, 07/05/2016 - 14:31 नवीन
हटके किस्सा!!
  • Log in or register to post comments

+१

प्रियाजी
Tue, 07/05/2016 - 14:44 नवीन
किस्सा आवडलाच. तुमचे सर्वच लेखन नेहमीच आवडते.
  • Log in or register to post comments

किस्सा आवडला..

जेपी
Tue, 07/05/2016 - 14:52 नवीन
किस्सा आवडला..
  • Log in or register to post comments

सोफिस्ट्री

नंदन
Tue, 07/05/2016 - 15:26 नवीन
छोटेखानी किस्सा आवडला. मार्मिक आहे. थोडं अवांतर: काही वर्षांपूर्वी, 'मटा'तल्या एका सुमार मुलाखतीत (द्विरुक्ती!) 'ते (पक्षी: मालिकेतलं काम) माझं ब्रेड आणि बटर आहे', असे एका अभिनेत्रीचे उद्गार वाचले होते; तेव्हा आयात केलेल्या या उपमेचं परकेपण खटकलं होतं, ते आठवलं. (पुलंनीही 'पैशाची ऊब' याबद्दल हे निरीक्षण नोंदवलं आहे. उष्णकटिबंधातल्या देशात, गारवा खरं तर चपखल वाटला असता. असो. 'सूरज कहीं भी जाये, तुम पर ना धूप आये'सारखी एखादी ओळ मग अधिकच अस्सल वाटू लागते.)
  • Log in or register to post comments

सुंदर विचार.

एस
Tue, 07/05/2016 - 16:01 नवीन
सुंदर विचार.
  • Log in or register to post comments

किस्सा आवडला आणि नंदन यांचे

अजया
Tue, 07/05/2016 - 16:46 नवीन
किस्सा आवडला आणि नंदन यांचे अवांतरही!
  • Log in or register to post comments

हा डॉ चा नातेवाईक शोभतो...

चौकटराजा
Tue, 07/05/2016 - 17:07 नवीन
काही डॉ लोक असेच करतात . माझे पैसे नको पण हॉस्पिटलचे द्या असे कन्सेशन गरीबाला देतात व ......... हा भागवत तसाच दिसतोय !
  • Log in or register to post comments

किस्सा आवडला.

गवि
Tue, 07/05/2016 - 17:33 नवीन
किस्सा आवडला. पण एक विचार आला की ही माहिती त्यांनी तुम्हाला स्नेही म्हणून / जवळचे म्हणून सांगितली असेल तर ती पब्लिकली लिहीणं अनुचित ठरेल. ते जर ही व्यावसायिक अंतर्गत माहिती (काही प्रमाणात बिझनेस मॉडेल आणि किंचित ट्रेड सीक्रेटही) कोणत्याही उत्सुकतेने विचारणार्या/ जिज्ञासू पण अनोळखी प्रश्नकर्त्याला खुलेपणाने सांगत असतील तर मग असा जाहीर उल्लेख चालून जावा.
  • Log in or register to post comments

एक्झॅक्टली !!!

पियू परी
Tue, 07/05/2016 - 17:38 नवीन
हाच विचार पहिल्यांदा आला मनात किस्सा वाचल्याबरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

किस्सा आवडला.

गवि
Tue, 07/05/2016 - 17:41 नवीन
उदा. आता कोणालाही तिथे ब्रेडबटर मागवताना नक्कीच उणेपणा वाटेल. मालक आपणांसारख्यांकडे काहीशा उण्या नजरेने पाहतात आणि नफा ज्यांच्याकडून काढायचा अशांपैकी आपल्याला मानतात असा बायस येणार. जनरली दुकानदार सर्व गिर्हाईकांना समान वागवतो (आणि शक्यतो आपल्याला इतरांहून खास वागवतो) अशी समजूत सर्व गिर्हाईकांना बरी वाटते. पण आपल्याकडे "लाडावलेल्या मुलांचे पालक" किंवा तत्सम निगेटिव्ह नजरेने पाहिलं जातं / त्यानुसार बिलिंग बदलतं हे फीलिंग ग्राहकाला येणं हे तो ग्राहक आणि व्यवसाय या दोघांसाठी अनिष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गवि, वरचा मृत्युंजय चा

धनंजय माने
Tue, 07/05/2016 - 17:51 नवीन
गवि, वरचा मृत्युंजय चा प्रतिसाद वाचावा. बटाटावडा 'आता' महाग आहे. परिस्थिती बदलली आहे. आपण न लाजता ब्रेड बटर खाऊ शकू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

वाचला प्रतिसाद. भेदभाव मिटला

गवि
Tue, 07/05/2016 - 17:55 नवीन
वाचला प्रतिसाद. भेदभाव मिटला तर. बरं झालं. माय सोल फेल इन युटेन्सिल. हॉर्स बेद्ड इन गँजेस. -(ब्रेड बटर लागणारा) गवि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

ओक्के!! आता युटेन्सिलमध्ये

सूड
Tue, 07/05/2016 - 18:45 नवीन
ओक्के!! आता युटेन्सिलमध्ये पडला तो तुमचा सोल होता होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गवि साहेब

सुबोध खरे
Tue, 07/05/2016 - 19:07 नवीन
गवि साहेब भागवत मंडळी अतिशय सज्जन आहेत. ते ग्राहकाला कधीही असे जाणवू देणार नाहीत की तुम्ही सॉफीस्टीकेटेड आहेत म्हणून तुम्हाला पैसे जास्त. उलट ते गरिबांचे खाणे म्हणून वडा स्वस्त ठेवला आहे असेच सांगतील. हा राजेंद्र ज्याबद्दल मी लिहिले आहे हा स्वतः अतिशय हुशार असून निगर्वी आहे. स्वतः व्ही जे टी आय चा मेकॅनिकल इंजिनियर आहे (त्याच्याशी बोलताना तुम्हाला कधीही जाणवणार नाही) महिंद्र आणि महिंद्र मध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीवर होता. परंतु वडिलोपार्जित वास्तूचा सदुपयोग करायचा म्हणून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आता बटाटेवडा खावाच लागेल...

शि बि आय
Tue, 07/05/2016 - 17:40 नवीन
आता बटाटेवडा खावाच लागेल...
  • Log in or register to post comments

मस्त किस्सा

सिरुसेरि
Tue, 07/05/2016 - 17:46 नवीन
मस्त किस्सा . काही अमॄततुल्य दुकानांमध्ये लावलेल्या "चहा - १० रु. , नुसते गप्पा मारत बसणे - २० रु. " अशा पाट्या आठवल्या .
  • Log in or register to post comments

मस्त किस्सा

सुधांशुनूलकर
Tue, 07/05/2016 - 18:09 नवीन
आता तृप्तीमध्ये कधी गेलो, तर भागवतांना हा धागा वाचायला नक्की सांगेन. या रेस्टॉरंटच्या बाहेर केव्हाही दहा-पंधरा माणसं तिष्ठत (waiting) आत जायला मिळतंय याची वाट बघत उभी असतात. इतकं ते प्रसिद्ध आहे.
  • Log in or register to post comments

आवडला किस्सा!

रातराणी
Tue, 07/05/2016 - 19:42 नवीन
आवडला किस्सा!
  • Log in or register to post comments

तृप्ती अप्रतिम आहे.

बोका-ए-आझम
Tue, 07/05/2016 - 20:56 नवीन
प्रकाश आणि आस्वाद यांच्या तोडीचं आहे असं म्हणायला हरकत नाही. नुकतीच त्यांनी मराठी थाळी चालू केलेली आहे आणि दादरसारख्या भागात चांगली मराठी थाळी मिळत नव्हती, ती कमतरता भरून काढली आहे.
  • Log in or register to post comments

डॉक्टर साहेब , कुठल्याही

माझीही शॅम्पेन
Tue, 07/05/2016 - 21:18 नवीन
डॉक्टर साहेब , कुठल्याही वास्तुची किंमत ही बर्‍याच गोष्टीवर ठरते जस की तुलनात्मक बाजार भाव आणि ब्रँड वॅल्यू , त्यामुळे ह्या गोष्टी मागे तुम्ही म्हणता ते लॉजिक आहे अस ठाम पणे सांगता येणार नाही , थोडा अतिशयोक्तीचा प्रकार वाटतोय
  • Log in or register to post comments

@माझीही शॅम्पेन -

सुबोध खरे
Wed, 07/06/2016 - 20:11 नवीन
@माझीही शॅम्पेन - समजलं नाही जरा उलगडून सांगाल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

माझे आवडीचे ठिकाण आहे तृप्ती.

विलासराव
Wed, 07/06/2016 - 18:30 नवीन
माझे आवडीचे ठिकाण आहे तृप्ती. दादरला कधीही गेलो तर इकडेच खाणे व्हायचे. पण घाई असेल तर वाट पहाण्यापेक्षा दुसरीकडे जायचो. पण तृप्तीची सेवाही खासच असायची.
  • Log in or register to post comments

अशीही माणस अजून आहेत तर! मस्त

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 07/07/2016 - 10:26 नवीन
अशीही माणस अजून आहेत तर! मस्त किस्सा
  • Log in or register to post comments

किस्सा छानच.

जागु
गुरुवार, 07/07/2016 - 14:29 नवीन
किस्सा छानच. दादरला गेलो आणि व्हेज जेवायच असत तेव्हा आम्ही फक्त आणि फक्त तृप्ती हॉटेलमध्येच जेवतो. कधी कधी वेटींगवर राहूनही तिथे जेवतो. कारण जेवणाची चव, दर्जा, स्वच्छता सगळच चांगल आहे. डाळींबीची उसळ, खरवस असे पदार्थही तिथे मिळतात.
  • Log in or register to post comments

उत्तम

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 07/07/2016 - 15:01 नवीन
छान किस्सा रे. गिरगावातले माधवाश्रम,अनंताश्रम.. वाजवी दरात सामिष थाळी मिळायची. आता कदाचित बंद झाली असावीत.
  • Log in or register to post comments

मस्त किस्सा!

पैसा
गुरुवार, 07/07/2016 - 18:20 नवीन
मस्त किस्सा! इतर प्रतिसादही आवडले.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा