सकाळी स्वयंपाक करत गाणी ऐकत होते, घरी आणि ऑफिसातही गाणी ऐकत कामे करायची सवय आहे, कारण त्यामुळे
आपण एका फ्लोमध्ये जातो आणि अशा फ्लो मध्ये कामे व्यवस्थित आणि लौकर होतात.
रेडिओ मिर्चीवर 'चिट्टा वे' लागलं होतं. 'उडता पंजाब' सिनेमातील या गाण्याने बरेच दिवस झाले डोक्यात घर केले आहे.
याच्या ट्रेलर्स, गाण्यांत शाहिद कपूर ओळखू न येण्याइतपत वेगळा दिसलाय, सिनेमा अजून पाहिला नाही पण चांगला आहे
म्हणतात. अमित त्रिवेदीचे संगीत असलेले हे गाणं त्यातील बीट्स, र्हिदममुळे आवडतं.
https://youtu.be/XhypXqLR9co
ओ चिट्टा वे
ओ चिट्टा वे
कैय्यांनु है खुश कित्ता वे
हाय मीट्ठा वे
हाय मीट्ठा वे
कुंडी नशे वाली खोल के देख..
फकीरा वे
फकीरा वे
एही तेरी सोहणी मीरा वे
लकीरा वे
लकीरा वे
बस नाक नाल खींच के देख..
गाणे बरेच विद्रोही (rebelliousness) वगैरे प्रकारचे आहे, अशा बंडखोर गोष्टींची मुळात (नुसतीच) आवड असल्याने
गाण्यातील तशा शब्दांमुळे ते मनाला भिडतं. या 'चिट्टा' शब्दाबद्दल फार कुतूहल वाटले, म्हणजे अंमली पदार्थ, ड्रग्जसाठी
चिट्टा शब्द वापरतात हे आधी माहित नव्हते, पण ही कल्पना भारी आहे हे मानलं पाहिजे.
हे चिट्टा म्हणजे नक्की काय प्रकरण आहे, आणि याविषयी अजून माहिती मिळवून कुतूहल शमवण्यासाठी हा धागा प्रपंच.
या पदार्थांमध्ये कोकेन, हेरॉइन, चरस, गांजा, हशिश, LSD, Ecstasy ही ऐकलेली नावे आहेत, अजूनही पुष्कळ प्रकार
असतील. हे सर्व प्रकार स्टीम्युलंट्स म्हणजेच उत्तेजक पदार्थांत मोडतात. असे पदार्थ थेट मेंदूतील नर्व्हस सिस्टीमवर परिणाम
करतात, सिस्टीमचा शरीराशी असलेला संपर्क हळूहळू तोडत नेतात, त्यामुळे माणसाच्या संवेदना म्हणजे दृष्टी, गंध, स्पर्श इ.
बधीर होत जातात. त्याला इतर काहीही जाणिव न होता फक्त रिलॅक्स्ड, शांत वाटू लागतं.
जितका अधिक काळ तो या मादक पदार्थांचे सेवन करत राहतो, तितके त्याच्या नर्व्हस सिस्टीम पासून त्याच्या संवेदना
तुटत जातात. त्यात हे पदार्थ थेट रक्तात जातात पण विरघळत नाहीत, तसेच तरंगत शरीरातील फॅट्सना चिकटून बसतात,
फॅट्स आणि ह्यांचं एक मिश्रण बनून त्याचे थराच्यावर थर साठत जातात, शरीराला आतून कुरतडत तसेच राहतात.
किती भयंकर गोष्ट असेल ही. अर्थात योग्य उपचारांनी हे सर्व नकारात्मक परिणाम दूर करता येतात हेही खरं.
Ecstasy बद्दल तर हे वाचलेय की त्यात अनेक प्रकारच्या पदार्थांचे घातक मिश्रण असू शकते, उदा. कोकेन, हेरॉइन,
अॅम्फेटामाइन, शिवाय उंदीर मारायचे औषध, कॅफेन इ.इतर अनेक काहीही गोष्टी. हे वापरण्यामागील मुख्य धोका
म्हणजे वापरणार्याला हेही माहित नसतं की तो नक्की काय घेतोय.
तर लोक अंमली पदार्थांच्या एवढे आहारी का जात असावे ? अगदी त्यातील धोके जाणूनही.
मुळात जगणे, जिवंत असणे हाच मोठा स्टीम्युलंट असूनही लोकांना इतर बाह्य पदार्थांची गरज का पडावी.
अर्थात हे म्हणणे सोपे, पण अशी नशा करणार्यांसाठी, त्यांच्या लेखी या गोष्टी वापरणे म्हणजेच जगणे असू शकते.
किंवा त्यांच्यापुढे जगणे हीच एक मोठी समस्या असू शकते जिचा सामना अशा गोष्टींच्या आधाराशिवाय ते करू
शकत नाहीत. त्यामुळे नशा करणार्या लोकांचा रागही येतो आणि त्यांच्याबद्दल सहानुभूतीही वाटते, वाईटही.
ह्याच्याच बरोबर उलट काही लोक असतात, ज्यांच्यासाठी आयुष्य, जगणे हेच सर्वात मोठे व्यसन असते त्यामुळे ते
सतत उत्साही, आनंदी, एनरजायझर बनी मोडमध्ये असतात.
अंमली पदार्थांच्या वापरानंतर माणूस साधारणतः ट्रांस मध्ये जातो, म्हणजे शुध्दी आणि बे-शुध्दी, होश आणि बे-होशी,
consciousness आणि un-consciousness च्या अध्येमध्ये कुठेतरी तरंगत राहणे.
आजूबाजूचे जग हेझी, धुरकट, धूसर वाटणे, आपण अस्तित्वात असून नसल्यासारखे वाटणे.
या अवस्थेत माणसाची विचारक्षमता कमी होऊ शकते, तो नक्की काय करतोय समजत नाही, जाणिवा मंदावतात,
आजूबाजूला काय चाललेय त्याचेही सहसा भान नसते, फक्त एक हॅपी हॅपी फिलींग सगळं जगणं व्यापून उरते.
समाधी अवस्था म्हणतात तशी कदाचित..
(अर्थात वेगळ्या अर्थाने, ज्ञानी योगी लोकांना प्राप्त होते ती समाधीवस्था वेगळी)
डीप मेडिटेशन नंतर येणारे अनुभव आणि नशा केल्यावर येणारे अनुभव समान म्हणता येतील का?
मेडिटेशनने मनाला शांतता मिळते तशीच नशेनेही मिळते. मेडिटेशनने माणसाच्या जाणीवा जागृत होतात पण
नशेने उलट होते, म्हणजेच माणूस हळूहळू आपल्या जाणिवा हरवून बसतो.
मात्र ही तरंगत, धुंदीत असण्याची अवस्था खूप सुंदर असेल. असे ट्रांस मध्ये जगणे बेकार अॅडिक्टिव्ह असेल हे नक्की.
'संसार की हर शय का इतना ही फ़साना है, एक धुँध से आना है, एक धुँध में जाना है.'
चिट्टा वे
चिट्टा वे
जिसने वी एनन्नू लित्ता वे
जित्ता वे
जित्ता वे
कुंडी नशे वाली खोल के देख..
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
डिस्क्लेमर:
* अठरा वर्षांखालील मुले मिपा वाचत नसावेत असा अंदाज आहे, त्यामुळे लेख वाचून कोणाच्या बालमनावर वाईट
परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.
* अठरा वर्षांवरील लोक सुजाण, सज्ञान मानले जातात, त्यातही मिपाचे वाचक अधिक सूज्ञ वर्गात मोडत असल्याने
त्यांच्यावर लेखाचा कुठल्याही प्रकारे परिणाम होऊन कुणालाही नशेचे व्यसन लागण्याची शक्यता दिसून येत नाही.
* धाग्यात अंमली पदार्थ, नशा करण्याचे कुठल्याही प्रकारे समर्थन वा उदात्तीकरण नाही, तो धाग्याचा उद्देश्यही नाही,
केवळ याविषयी माहिती करून घेणे हा हेतू आहे.
**** वरीलपैकी कोणतेही पदार्थ पुण्यात, पेठेत कुठे आणि किती भावाने मिळू शकतात कोणी सांगू शकेल?
:)
वर्गीकरण
वाचन संख्या
3624
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
डीप मेडिटेशन नंतर येणारे
हे दोन्हीही करून पाह्यलेय काय
In reply to डीप मेडिटेशन नंतर येणारे by किसन शिंदे
छान लिहिलंय.
पुढच्या ओळीदेखील छान आहेत.
चिट्टा हा कोकेनसाठी वापरला जाणारा सांकेतिक शब्द आहे.
अगदी अगदी
In reply to चिट्टा हा कोकेनसाठी वापरला जाणारा सांकेतिक शब्द आहे. by बोका-ए-आझम
वरीलपैकी कोणतेही पदार्थ
मंडईत चिंगुमल गेलाराम शोधाआता यांच्या कडे मिळतात
हम्म. काहे?
डिप मेडीटेशन मंजे काय?
समाधी लागण्यासाठी ना ध्यानाची
In reply to डिप मेडीटेशन मंजे काय? by जेपी
मला एखाद पुस्तक आवडल तर सलग
In reply to डिप मेडीटेशन मंजे काय? by जेपी
अहो डांगे सर, इतक्यात खाली
In reply to मला एखाद पुस्तक आवडल तर सलग by संदीप डांगे
आधी डिप मेडीटेशन मंजे समाधी
In reply to मला एखाद पुस्तक आवडल तर सलग by संदीप डांगे
डीप मेडिटेशन ही एक कमर्शियल
In reply to आधी डिप मेडीटेशन मंजे समाधी by जेपी
कमर्शियल?
In reply to डीप मेडिटेशन ही एक कमर्शियल by संदीप डांगे
+1 मला टोटल लागली नाही..
In reply to कमर्शियल? by बोका-ए-आझम
डीप मेडिटेशन म्हणजे काय?
:-))
In reply to डीप मेडिटेशन म्हणजे काय? by संदीप डांगे
पुस्तक वाचणे, संगित ऐकणे,