Skip to main content

स्मॉल इज ब्युटीफुल

लेखक मारवा यांनी सोमवार, 27/06/2016 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्ण लांबीच्या चित्रपटांची एक आपली मजा आहे. काही कथानक असे असते की त्याला तीन तासही अपुरे पडतात. हिन्दी चित्रपट साधारण २ ते अडिच तास कधी त्याहुन जास्त लांबीचे असतात. इंग्रजी चित्रपट सहसा त्याहुन कमी वेळ घेतात. तर अजुन एक चांगला फ़ॉर्म शॉर्ट फ़िल्म्स चा आहे. या फ़ारच लहान जास्तीत जास्त १५-२० मिनीटांच्याच. एकदम आटोपशीर मामला. म्हणजे २०-२० मॅचेस सारख्या शॉर्ट अ‍ॅन्ड स्वीट. फ़ारच कमी वेळ असल्याने दिग्दर्शका समोरील सर्जनशीलतेचे आव्हान अधिकच तीव्र होऊन जाते. त्याला प्रतिसाद देतांना एखादी कथा घटना इतक्या कमी वेळात बसवतांना शॉर्ट फ़िल्म्स च्या दिग्दर्शकाचा जाहीरातकारांसारखाच कस लागतो. जितका दिग्दर्शक कुशल, सर्जनशील, संवेदनशील तितका तो या शॉर्ट फ़िल्म मध्येही कधी कधी पुर्ण लांबीची तीन तासांची फ़िल्म देणार नाही असा एक झणझणीत अनुभव देतो. या शॉर्ट फ़िल्म पाहायला कंटाळा येत नाही कारण सहसा कमी वेळ असल्याने यांची वेगवान आणि इन्टेन्स हाताळणी असते . शॉर्ट फ़िल्म उलट पुर्ण एकाग्रतेने एका दमात बघितली व अनुभवली जाते. हीच शॉर्ट फ़िल्मस ची मजा असते. सहसा फ़िल्म इन्स्टीट्युट चे ताज्या दमाचे वि्द्यार्थी, , मोठ्या चित्रपटासाठी जे आर्थिक पाठबळ लागते ते उपलब्ध नसणारे, कधी काही अनुराग कश्यप सारखे दिग्गज आवडीने जाणीवपुर्वक , किंवा एखाद्या कॉज साठी कार्यकर्ते इ. सहसा सर्वसाधारणपणे शॉर्ट फ़िल्म्स बनवतात. सध्या इंटरनेटचा प्लॅटफ़ॉर्म सहज उपलब्ध असल्याने व तांत्रिक प्रगतीमुळे हव्या त्या विषयावर वेगाने कमी खर्चात शॉर्ट फ़िल्म बनवली जाते. व प्रसारीतही करता येते. तर अशा पैकी काही शॉर्ट फ़िल्म्स खरोखर अत्यंत दर्जेदार सुंदर व प्रगल्भ अशा आहेत. या धाग्याचा हेतु इतकाच की अशा शॉर्ट फ़िल्म्स इथे शेअर केल्या जाव्यात त्यावर चर्चा व्हावी लिंका पुरवाव्या जेणेकरुन एक या फ़ॉर्म ची मजा घेण्याची संधी वाढेल. विवीध भन्नाट शॉर्ट फ़िल्म्स एका ठीकाणी सापडायला चर्चायला जागा होइल म्हणून हा धागा प्रपंच. आपण कृपया आपल्याला आवडलेल्या शॉर्ट फ़िल्म्स विषयी इथे शॉर्ट मध्येच लिहावे ( थोड ही जास्त लिहील तर शॉर्ट फ़िल्मची मजाच संपुन जाइल म्हणुन ) तसेच जमल्यास लिंका द्याव्यात ही नम्र विनंती. सुरुवात मी करतो. खालील एकही फ़िल्म १५ मिनीटांपेक्षा जास्त नाही व सर्व यु ट्युब वर उपलब्ध आहेत. अगोदर बघितल्या नसतील तर एकबार जरुर आजमाईयेगा. १- Teaspoon -(हिन्दी) एक गृहीणी घरात ९० वर्षांचा. आजारी, अंथरुणाला खिळलेला सासरा ज्याची दिवसभर ती रोज सक्तीची सेवा करत राहते, व त्याने प्रचंड वैतागलेली असते, घरात मुलबाळ नाही नवरा कामावर गेला की सासरा सतत टक टक टक टक चमचा वाजवुन तिला बोलवत राहतो ( बोलता येत नाही ) व सारखा खायला मागत असतो. एक दिवस एक घटना घडते............ , अत्यंत प्रगल्भ अनेक अर्थ प्रश्न निर्माण करणारी फ़िल्म अनेक अवार्डने सम्मानित. गृहीणीचे काम केलेल्या अभिनेत्रीचा अद्वितीय अभिनय https://www.youtube.com/watch?v=ZmVPCnxN-1A २-Ahalya (बंगाली-इंग्रजी सबटायटल्स) सुजॉय घोषची ही थ्रीलर शॉर्ट फ़िल्म बंगालीत आहे मात्र सबटायटल इंग्रजीत व थोडे लक्षपुर्वक बघितल्याने अगदी सहज कळते भाषेचा काहीच अडथळा येत नाही. यात एक म्हातारा शिल्पकार त्याची तरुण सेक्सी बायको राधिका आपटे, घरी एक दिवस सकाळी एक इन्स्पेक्टर येतो , एक तरुण मॉडेल महीन्यापासुन बेपत्ता आहे त्याचा तपास करण्यासाठी.............. पुढे प्रचंड धक्कादायक कथा........ एक अक्षरही सांगितल तर मजा जाईल. निव्वळ जबर कथा जबर अभिनय. https://www.youtube.com/watch?v=Ff82XtV78xo ३-बायपास (मुक फ़िल्म) एक नवाजउद्दीन सिद्दीकी व त्याचा एक डेंजर मुका सहाय्यक, एक वाळवंटी वैराण प्रदेशात, मोठा दगड घेऊन एका कारवर नेम धरुन मारतो................ड्रायव्हर ठार.... हाच धंदा..........एक इन्स्पेक्टर इरफ़ान खान येतो....... पुर्ण फ़िल्म मध्ये संवाद शुन्य ..........हिल्स हॅव आइज सारख भयावह वातावरण..........गतिमान कथा .. पुढे काय होते ? अंगावर येणारी फ़िल्म https://www.youtube.com/watch?v=NCRBY9ss-58 ४-That day after every day (हिन्दी) अनुराग कश्यप दिग्दर्शीत. फ़िल्म... तिन सामान्य वर्कींग वुमेन... त्यातली एक राधिका आपटे..... कामावर जातांना मोहल्ल्यातल्या गुंडांचा भयंकर त्रास, छेडखानी...........जीना हराम.........नवरा इंटरेस्टींग कॅरेक्टर.... सुरुवातीला केवळ त्याचा आवाज व रटाळ डरपोक उपदेश ऐकु येत राहतो व वैतागलेली राधिका कामावर जाण्यास तयार होतेय....पुढे काही घटना घडते व मग शेवट बघण्यासारखाच.. जबर फ़िल्म महत्वाचा विषय वेगळीच हाताळणी व भारीच कलाटणी.. https://www.youtube.com/watch?v=U6sIlphLMFU ५-सॉल्ट अ‍ॅन्ड पीपर (हिन्दी) पुन्हा नवाजउद्दीन सिद्दीकी व तेजस्वीनी कोल्हापुरे ( ही पदमिनीची मुलगी असावी एक अंदाज ) तरुण मुलगी प्रेमात ठोकर खाल्लेली आहे व आत्महत्येसाठी फ़ासावर लटकायला निघालीय .......नवाज नेमका तेव्हाच घरात शिरतो......म्हणतो मला फ़ार भुक लागली होती दोन दिवसांचा उपाशी आहे....... मग पुढे थोडी प्रेडीक्टेबल होऊन जाते फ़िल्म तरी एकवार बघण्यासारखी https://www.youtube.com/watch?v=AQR6cB1DXzY ६- आय लव्ह यु टु (हिन्दी) एक प्रेमी स्वत:शी बोलतोय....स्वगत अंगावर येत आहे......इरादा नेक नाही....... मर्डर चा प्लॅन डोक्यात घोळतोय...... जबर सायकीक फ़िल्म......देखोगे तो जानोगे.... https://www.youtube.com/watch?v=ohNswbR3Rag ७- सेल्फ़ी (हिन्दी) या फ़िल्म विषयी खर म्हणजे काहीच सांगावस वाटत नाही तुम्ही बघा फ़क्त.......जबर एकदम https://www.youtube.com/watch?v=xfM9VubbfJc तर मित्रांनो आपल्या आवडत्या शॉर्ट फ़िल्स्म्स इथे शेअर कराव्यात ही पुन्हा एकदा विनंती.

वाचने 41793
प्रतिक्रिया 114

प्रतिक्रिया

मारवासाहेब, खूप सुन्दर धागा. पहिल्या चार फिल्म पाहिलया. धन्यवाद.

क्रितीच्या चोरीबद्दलच्या बातम्या वाचताना आणखी वीस शॉर्ट फिल्मची एकत्रित माहिती मिळाली. त्यातल्या काही इथे आलेल्याच आहेत. ही लिंक.

In reply to by रुपी

ह्या चोरट्यांना कही तरी शिक्षा व्हायला पाहीजे. असंच मोकळं सोडलं तर असाच दुसर्याच्या कलाक्रुतीवर डल्ला मारुन मलीदा खातील हे पैशेवाले चोर..

In reply to by अनुप ढेरे

यूट्यूबवरून काढली ते ठीकच परंतू कायदेशीर कारवाई व्हावी आणि त्या मूळ सर्जकाला व्यवस्थीत श्रेय मिळेल असा माफीनामा त्या कुन्द्रूकडून घ्यावा.

That day after every day आणि सेल्फि पाह्यल्या. दोन्ही आवडल्या. सेल्फि फापटपसारा न मांडता बरंच काही बोलून जाते.

माझिही एक भर, छोटीसी, काही महिन्यांपूर्वी एक ओरिया शॉर्ट फिल्म पाहिली होती, चांगली कथा, उत्तम अभिनय, अ रिव्हर फ्लोस, बहुदा झी तॉकिज वर ही दाखवली होती लाइटहाउस मधे, एकदा तरी पहाच! अनिरुद्ध....

In reply to by मारवा

खरतर हाच प्रोब्लेम झाला आहे कि ही शॉर्ट फिल्म जाला वर सापडतच नाही आहे, अजुन एक त्याला इंग्रजी सबटायटल्स आहेत. झी टॉकिझ च्या साइट वर आहे. पण प्ले होत नाही आहे, लिन्कः http://www.zeetalkies.com/lighthouse/videos/light-house-episode-no-5-pa…

गितांजली राव दिग्दर्शीत "चाय" काहीशी वेगळी शॉर्टफिल्म फार आवडली रीअलीस्टीक सिनेमॅटोग्राफी व मोनोलॉग्ज दोन्ही आवडलीत. श्रीकांत रेड्डी ची पीके-२ पण भन्नाट मस्तच.

सर्व सहभागी प्रतिसादकांचे मनापासुन धन्यवाद !

काय भारी धागा! आता निवांत एकेक बघतो. मारवाजी, धन्यवाद. एक सुचवणी: व्हिडीयो एम्बेड करणं टाळलं तर बरं होईल. पान 'जमायला' वेळ लागतोय.

धन्यवाद या धाग्याबद्दल, अहल्या पाहिली होती आणि आवडली होती. इतरही पाहतो आता.

खूपच छान धागा. शॉर्ट फिल्म हा प्रकार माहित होता पण आवर्जून कधी बघितला नव्हता. या धाग्यामुळे छान शॉर्टफिल्म बघता आल्या.

धागा जरी शॉर्ट फिल्म चा असला तरी इथल्या सगळ्या लिंका बघण्या साठी बराच वेळ काढावा लागणार आहे. मिपावरच रमताराम यांनी परिचय करुन दिलेली एक शॉर्ट फिल्म अली अ‍ॅन्ड द बॉल जरुर बघा. ती बघण्या आधी ररांनी केलेले जबरदस्त सुरेख परिक्षण वाचायला इथे क्लीक करा. आतापर्यंत अहल्या, टि स्पुन आणि बायपास बघितल्या. तीनही जबरदस्त आहेत. बायपास तर अंगावर आली. अहल्या मधे राधिका आपटेला पाहुन सुखद धक्का बसला. ती चांगली अभिनेत्री आहे. टीस्पुन मधल्या अभिनेत्रीने सुध्दा अतिशय सुरेख काम केले आहे. बाकिच्याही वेळ काढुन बघतोच पैजारबुवा,

आजच बघितली जी ए च्या कथेवर आधारीत आहे. यात जुन्या कोकणातले जे वातावरण निर्माण केले ते निव्वळ अप्रतिम आहे. https://www.youtube.com/watch?v=6HARYeqw5I8

Six short stories that explore the extremities of human behavior involving people in distress. 'वाईल्ड टेल्स' सहा लघुपट असलेला हा डार्क काॅमेडी अर्जेटिंयन चित्रपट आहे. IMDB वर तब्बल ८.1/10 ची रेटिंग आहे. चित्रपट दोन तास पूर्णपणे खिळवून ठेवतो. टीप: कुटुंबासोबत पाहता येणार नाही. Source: torrent http://m.imdb.com/title/tt3011894/

एक जबराट , भुंगाट धागा , बोकोबाच्या कृपेने परत बघता आला , काही शॉर्ट फिल्म्स बघून एकदम हादरलो , अजून काही बघायच्या आहे वा खु साठी एक पक्का धागा

शॉर्ट फिल्म्स पाहायला पहिल्यापासून फारच आवडतं.. वरील बऱ्याच फिल्म्स पूर्वी पाहिलेल्यांपैकी अगदी अप्रतिम अश्याच आहेत.. धाग्याच्या निमित्ताने आणखी काही नवीन आणि तितक्याच दर्जेदार शॉर्ट फिल्म्स पाहायला मिळाल्या....

वरील बऱ्याच शॉर्ट फिल्म्स इंग्रजी किंवा हिंदी होत्या, एखादा स्वतंत्र धागा मराठी शॉर्ट फिल्म्स वरती करता आला तर? किंवा इथेच तश्या कुणाला लिंक्स माहित असतील तर देता आल्या तर आनंद होईल. मला माहित असलेल्या काही मस्त मराठी शॉर्ट फिल्म्स.... १. https://www.youtube.com/watch?v=ZhhGkqjCNsM २. https://www.youtube.com/watch?v=Sjjuu-Mqd88 ३. https://www.youtube.com/watch?v=UxgLoBHuMtI ४. https://www.youtube.com/watch?v=Ddgm8k1CRPQ ५. https://www.youtube.com/watch?v=pdI5LKGSHF8

In reply to by पुंबा

"चटनी" मस्त आहे. तिचीच "छुरी" ही शॉर्टफिल्म आली आहे एवढ्यात, तीपण छान आहे. सध्या चित्रपट पाहण्याएवढा वेळ/संयम नसतो त्यामुळे बर्‍याचदा शॉर्टफिल्म्स बघते.. त्यातल्या काही आवडलेल्या इथे देते - मराठी - फाटा आणि हिंदी बटवा या दोन्हींतून चांगला संदेश दिलाय. "प्रेशर कूकर"पण मस्त आहे. पल्लवी जोशीने एका मध्यमवर्गीय गृहिणीची भूमिका छान केलीये.

In reply to by रुपी

'प्रेशर कुकर' पाहिली. सुंदरच आहे. 'छुरी', 'चटणी'एवढी नाही आवडली. फार सरधोपट वाटली. मी अश्यात शेफाली शाहची 'ज्युस', जॅकी श्रॉफ, नीना गुप्ताची 'खुजली' राधीका आपटेची 'दॅट डे आफ्टर एव्हरीडे' या तीन शॉर्ट फिल्म्स पाहिल्या. तिन्हीही खुप आवडल्या. 'ज्युस' विशेष आवडली. नक्की पहा.

सिग्नंल ही शॉर्ट फिल्म नक्कीच नाही आहे, अगदी १.३०+ मिनिट ची आहे. आवर्जून पहा जर साय-फाय मध्ये आवड असेल तर. https://www.youtube.com/watch?v=UHlxQD7zLP0

हल्लीच मी काही शॉर्ट फिल्म पाहिल्या... त्यातल्या दोन इथे देतो. Mumbai Varanasi Express :- https://www.youtube.com/watch?v=N1R6Fyf5V6M Nayantara's Necklace :- https://www.youtube.com/watch?v=L1TTNOBbN2k

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sophia Loren Mambo Italiano