पुर्ण लांबीच्या चित्रपटांची एक आपली मजा आहे. काही कथानक असे असते की त्याला तीन तासही अपुरे पडतात. हिन्दी चित्रपट साधारण २ ते अडिच तास कधी त्याहुन जास्त लांबीचे असतात. इंग्रजी चित्रपट सहसा त्याहुन कमी वेळ घेतात. तर अजुन एक चांगला फ़ॉर्म शॉर्ट फ़िल्म्स चा आहे. या फ़ारच लहान जास्तीत जास्त १५-२० मिनीटांच्याच. एकदम आटोपशीर मामला. म्हणजे २०-२० मॅचेस सारख्या शॉर्ट अॅन्ड स्वीट. फ़ारच कमी वेळ असल्याने दिग्दर्शका समोरील सर्जनशीलतेचे आव्हान अधिकच तीव्र होऊन जाते. त्याला प्रतिसाद देतांना एखादी कथा घटना इतक्या कमी वेळात बसवतांना शॉर्ट फ़िल्म्स च्या दिग्दर्शकाचा जाहीरातकारांसारखाच कस लागतो. जितका दिग्दर्शक कुशल, सर्जनशील, संवेदनशील तितका तो या शॉर्ट फ़िल्म मध्येही कधी कधी पुर्ण लांबीची तीन तासांची फ़िल्म देणार नाही असा एक झणझणीत अनुभव देतो. या शॉर्ट फ़िल्म पाहायला कंटाळा येत नाही कारण सहसा कमी वेळ असल्याने यांची वेगवान आणि इन्टेन्स हाताळणी असते . शॉर्ट फ़िल्म उलट पुर्ण एकाग्रतेने एका दमात बघितली व अनुभवली जाते. हीच शॉर्ट फ़िल्मस ची मजा असते. सहसा फ़िल्म इन्स्टीट्युट चे ताज्या दमाचे वि्द्यार्थी, , मोठ्या चित्रपटासाठी जे आर्थिक पाठबळ लागते ते उपलब्ध नसणारे, कधी काही अनुराग कश्यप सारखे दिग्गज आवडीने जाणीवपुर्वक , किंवा एखाद्या कॉज साठी कार्यकर्ते इ. सहसा सर्वसाधारणपणे शॉर्ट फ़िल्म्स बनवतात. सध्या इंटरनेटचा प्लॅटफ़ॉर्म सहज उपलब्ध असल्याने व तांत्रिक प्रगतीमुळे हव्या त्या विषयावर वेगाने कमी खर्चात शॉर्ट फ़िल्म बनवली जाते. व प्रसारीतही करता येते.
तर अशा पैकी काही शॉर्ट फ़िल्म्स खरोखर अत्यंत दर्जेदार सुंदर व प्रगल्भ अशा आहेत. या धाग्याचा हेतु इतकाच की अशा शॉर्ट फ़िल्म्स इथे शेअर केल्या जाव्यात त्यावर चर्चा व्हावी लिंका पुरवाव्या जेणेकरुन एक या फ़ॉर्म ची मजा घेण्याची संधी वाढेल. विवीध भन्नाट शॉर्ट फ़िल्म्स एका ठीकाणी सापडायला चर्चायला जागा होइल म्हणून हा धागा प्रपंच.
आपण कृपया आपल्याला आवडलेल्या शॉर्ट फ़िल्म्स विषयी इथे शॉर्ट मध्येच लिहावे ( थोड ही जास्त लिहील तर शॉर्ट फ़िल्मची मजाच संपुन जाइल म्हणुन ) तसेच जमल्यास लिंका द्याव्यात ही नम्र विनंती. सुरुवात मी करतो. खालील एकही फ़िल्म १५ मिनीटांपेक्षा जास्त नाही व सर्व यु ट्युब वर उपलब्ध आहेत. अगोदर बघितल्या नसतील तर एकबार जरुर आजमाईयेगा.
१- Teaspoon -(हिन्दी)
एक गृहीणी घरात ९० वर्षांचा. आजारी, अंथरुणाला खिळलेला सासरा ज्याची दिवसभर ती रोज सक्तीची सेवा करत राहते, व त्याने प्रचंड वैतागलेली असते, घरात मुलबाळ नाही नवरा कामावर गेला की सासरा सतत टक टक टक टक चमचा वाजवुन तिला बोलवत राहतो ( बोलता येत नाही ) व सारखा खायला मागत असतो. एक दिवस एक घटना घडते............ , अत्यंत प्रगल्भ अनेक अर्थ प्रश्न निर्माण करणारी फ़िल्म अनेक अवार्डने सम्मानित. गृहीणीचे काम केलेल्या अभिनेत्रीचा अद्वितीय अभिनय
https://www.youtube.com/watch?v=ZmVPCnxN-1A
२-Ahalya (बंगाली-इंग्रजी सबटायटल्स)
सुजॉय घोषची ही थ्रीलर शॉर्ट फ़िल्म बंगालीत आहे मात्र सबटायटल इंग्रजीत व थोडे लक्षपुर्वक बघितल्याने अगदी सहज कळते भाषेचा काहीच अडथळा येत नाही. यात एक म्हातारा शिल्पकार त्याची तरुण सेक्सी बायको राधिका आपटे, घरी एक दिवस सकाळी एक इन्स्पेक्टर येतो , एक तरुण मॉडेल महीन्यापासुन बेपत्ता आहे त्याचा तपास करण्यासाठी..............
पुढे प्रचंड धक्कादायक कथा........ एक अक्षरही सांगितल तर मजा जाईल. निव्वळ जबर कथा जबर अभिनय.
https://www.youtube.com/watch?v=Ff82XtV78xo
३-बायपास (मुक फ़िल्म)
एक नवाजउद्दीन सिद्दीकी व त्याचा एक डेंजर मुका सहाय्यक, एक वाळवंटी वैराण प्रदेशात, मोठा दगड घेऊन एका कारवर नेम धरुन मारतो................ड्रायव्हर ठार.... हाच धंदा..........एक इन्स्पेक्टर इरफ़ान खान येतो....... पुर्ण फ़िल्म मध्ये संवाद शुन्य ..........हिल्स हॅव आइज सारख भयावह वातावरण..........गतिमान कथा .. पुढे काय होते ? अंगावर येणारी फ़िल्म
https://www.youtube.com/watch?v=NCRBY9ss-58
४-That day after every day (हिन्दी)
अनुराग कश्यप दिग्दर्शीत. फ़िल्म... तिन सामान्य वर्कींग वुमेन... त्यातली एक राधिका आपटे..... कामावर जातांना मोहल्ल्यातल्या गुंडांचा भयंकर त्रास, छेडखानी...........जीना हराम.........नवरा इंटरेस्टींग कॅरेक्टर.... सुरुवातीला केवळ त्याचा आवाज व रटाळ डरपोक उपदेश ऐकु येत राहतो व वैतागलेली राधिका कामावर जाण्यास तयार होतेय....पुढे काही घटना घडते व मग शेवट बघण्यासारखाच..
जबर फ़िल्म महत्वाचा विषय वेगळीच हाताळणी व भारीच कलाटणी..
https://www.youtube.com/watch?v=U6sIlphLMFU
५-सॉल्ट अॅन्ड पीपर (हिन्दी)
पुन्हा नवाजउद्दीन सिद्दीकी व तेजस्वीनी कोल्हापुरे ( ही पदमिनीची मुलगी असावी एक अंदाज ) तरुण मुलगी प्रेमात ठोकर खाल्लेली आहे व आत्महत्येसाठी फ़ासावर लटकायला निघालीय .......नवाज नेमका तेव्हाच घरात शिरतो......म्हणतो मला फ़ार भुक लागली होती दोन दिवसांचा उपाशी आहे....... मग पुढे थोडी प्रेडीक्टेबल होऊन जाते फ़िल्म तरी एकवार बघण्यासारखी
https://www.youtube.com/watch?v=AQR6cB1DXzY
६- आय लव्ह यु टु (हिन्दी)
एक प्रेमी स्वत:शी बोलतोय....स्वगत अंगावर येत आहे......इरादा नेक नाही....... मर्डर चा प्लॅन डोक्यात घोळतोय...... जबर सायकीक फ़िल्म......देखोगे तो जानोगे....
https://www.youtube.com/watch?v=ohNswbR3Rag
७- सेल्फ़ी (हिन्दी)
या फ़िल्म विषयी खर म्हणजे काहीच सांगावस वाटत नाही तुम्ही बघा फ़क्त.......जबर एकदम
https://www.youtube.com/watch?v=xfM9VubbfJc
तर मित्रांनो आपल्या आवडत्या शॉर्ट फ़िल्स्म्स इथे शेअर कराव्यात ही पुन्हा एकदा विनंती.
वाचने
41793
प्रतिक्रिया
114
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचनखुण साठवतो..
+७८६ वाचनखूण
In reply to वाचनखुण साठवतो.. by जेपी
Ahalya बघितली आहे...फिल्म आणि
वाखुसा.
हुँ.
अहल्या बघितलंय
मनोज वाजपेयीची 'कृती' ही
शिरिष कुंद्रूने नेपाळी
In reply to मनोज वाजपेयीची 'कृती' ही by पुंबा
बोंबला..!!! काही तरी ओरीजिनल
In reply to शिरिष कुंद्रूने नेपाळी by अनुप ढेरे
कृती बघितली...इतकी काही खास
In reply to मनोज वाजपेयीची 'कृती' ही by पुंबा
PS
मंदार जी
In reply to PS by महासंग्राम
प्रत्येक नात्यामध्ये काळजी
In reply to मंदार जी by मारवा
मंदार जी
In reply to PS by महासंग्राम
मंदार जी
In reply to PS by महासंग्राम
माझा लाडका विषय.
उल्का जी सुंदर सुचवणीसाठी धन्यवाद !
In reply to माझा लाडका विषय. by उल्का
आफ्टर ग्लो बघितली
In reply to माझा लाडका विषय. by उल्का
डम डम डिगा डिगा.
In reply to माझा लाडका विषय. by उल्का
मस्तं धागा. वाचन खूण केली आहे
वाचनखुण ?
In reply to मस्तं धागा. वाचन खूण केली आहे by पद्मावति
एकूणातच शॉर्टफिल्म्स मध्ये
मारवाजी, 'कृती' नक्की पहा..
कृती जस्ट बघितली
In reply to मारवाजी, 'कृती' नक्की पहा.. by पुंबा
दुर्दैवाने ही चोरी निघाली.
In reply to कृती जस्ट बघितली by मारवा
नक्की कुणी उचलली आहे ते सांगता येणं कठीण आहे
In reply to दुर्दैवाने ही चोरी निघाली. by पुंबा
सम मोअर
धन्यवाद
नुकताच अमाहितामध्ये हा विषय
तुम्ही लिस्ट केलेल्या सगळ्या
बादवे , त्या अभिनेत्रीचं नाव
In reply to तुम्ही लिस्ट केलेल्या सगळ्या by स्रुजा
या सगळ्या शाॅर्टफिल्म
क्रिती मला मनोज वाजपेयी च्या
In reply to या सगळ्या शाॅर्टफिल्म by किसन शिंदे
चांगला धागा.
मस्त धागा..
व्हाट्सपवर पाहिली आहे.
In reply to मस्त धागा.. by रुपी
द अदर पेअर पाहिली आत्ताच.
In reply to मस्त धागा.. by रुपी
एक ही वाक्य नसलेली पण आशयाने
In reply to मस्त धागा.. by रुपी
Short Films च्याच बरोबरीने documentaries
अरे वा बोकोबा लिंक द्या लौकर लौकर
In reply to Short Films च्याच बरोबरीने documentaries by बोका-ए-आझम
MITID FILMS
बायपास
पुन्हा नवाजउद्दीन सिद्दीकी व
जबरदस्त लेख आणि धागा!
छान माहिती
BUS-44
TOO FUNNY!!
फुटलो
In reply to TOO FUNNY!! by जव्हेरगंज
ALARM
माझी शनिवारची सकाळ =))
In reply to ALARM by जव्हेरगंज
DIG
Explain please!
In reply to DIG by जव्हेरगंज
मलापण नाही समजली !!
In reply to Explain please! by पिलीयन रायडर
Farm
TAANDAV
The gunfighter
आरारा...लैच म्हन्जे लैच जब्रा
In reply to The gunfighter by जव्हेरगंज
Ek number!
In reply to The gunfighter by जव्हेरगंज
बाब्बौ =))
In reply to Ek number! by पिलीयन रायडर
खल्लास प्रकार!
In reply to The gunfighter by जव्हेरगंज
ऑफिसमध्ये व्हिडिओज बॅन आहेत.
1 minute time machine
वाचनखुण साठवतो.. मी पण
जव्हेरगंज धन्यवाद
मारवा साहेब तुमची सॉल्ट अँड
वन टाईम मशीन द्वारेच "क्लिक"
In reply to मारवा साहेब तुमची सॉल्ट अँड by प्रमोद देर्देकर
मारवा साहेब तुमची सॉल्ट अँड
सॉरी प्रमोद साहेब गलतीसे मिस्टेक हो गयी
In reply to मारवा साहेब तुमची सॉल्ट अँड by प्रमोद देर्देकर
गुत्थी, द कॉलर या पण मस्त
हीच ना गुत्थी तुम्ही म्हणताय ती
In reply to गुत्थी, द कॉलर या पण मस्त by Maharani