सर्वाना कांदा बटाटा पोहे परिचित असतीलच. त्याचंच हे भावंडं आहे.
माझी आई बेळगावची. आजोळी नाश्त्याच्या पदार्थांची खूप विविधता होती. तर हा खास बेळगावी पदार्थ म्हणायला हरकत नाही. माझ्या सासरी हे पोहे माहीत नव्हते. कदाचित इथेही बऱ्याच जणांना माहीत नसेल तर ही रेसिपी देते आहे.
१. मसाले पोहे ह्या नावावरून कळलंच असेल की ह्यात गोड/काळा मसाला वापरला आहे. चांगला घमघमीत २ चमचे मसाला लागणार आहे.
२. २-३ वाट्या (साधारण चौघांना पुरतील इतके) जाडे पोहे नेहमीप्रमाणे धुवून थोडावेळ भिजवून ठेवायाचे
३. आता बाकीची तयारी करायची. २ मोठे कांदे, १ बटाटा, १०-१२ तोंडली, १ वांगे चित्रात दाखवल्याप्रमाणे चिरून घ्यायचे. (कोणी ते नाक मुरडलं बरं? पोह्यात आणि तोंडली,वांग? छया बॉ आम्ही नाही घालणार. तर त्या सर्वाना सांगते की घालून बघाच. मग बोला आणि मुरडा तुमचे नाक.)
४. कढईत जरा नेहमीपेक्षा जास्तच तेल घ्यायचे. मी काय म्हणते जरा खाऊया की घमघमीत आणि चमचमीत.
५. मोहरी, हिंग, कढीपता याची दणदणीत फोडणी द्यायची. दणदणीत म्हणजे आजूबाजूला वास दरवळला पाहिजे.
६. त्यात कांदा घालायचा. थोडासा परतला की भाज्या घालायच्या. हलवून वर एक झाकण ठेवायचे. पाणी अजिबात वापरायचे नाही.
७. अंदाजे पाच एक मिनिटांनी झाकण काढून घ्यायचे. मग कढईत आणि पोह्यांवर एकाच वेळी पाव चमचा हळद, अर्धा चमचा तिखट (जास्त तिखट हवे असल्यास प्रमाण वाढवू शकता), एक चमचा मसाला, अर्धा चमचा साखर आणि चवी प्रमाणे मीठ घालायचे. अर्धा चमचा चिंचेचा कोळ घालायचा.

८. कढईतील भाज्यांना नीट परतवून पुन्हा झाकण ठेवायचे. पोह्यांना नीट सर्व मसाला लावून घ्यायचा. नंतर हात धुवून घ्यायचे हे सांगायला नकोच.
९. अंदाजे पाच मिनिटांनी झाकण काढून कढईत पोहे घालून नीट ढवळून परत झाकण ठेवून मस्त वाफ काढायची. झाले आपले पोहे तयार! वाढताना खोबरे आणि कोथिंबीर यांनी सजवायचे.
- उल्का कडले
वाचने
19614
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा प्रकार कधी पाह्यला नव्हता.
प्लस वन
In reply to हा प्रकार कधी पाह्यला नव्हता. by किसन शिंदे
भा हा री ही ही!
भारी.
"वांगी पोहे" प्रकार हाच का?
थोडे णविण...
कोलंबी
आहाहा!
In reply to कोलंबी by नीळा
धन्यवाद!
तोंडली, वांगी आवडत नाहित हो.
In reply to धन्यवाद! by उल्का
+१
In reply to तोंडली, वांगी आवडत नाहित हो. by प्रचेतस
तोंडलं वगळून करायला हरकत नाही
वा ! करुन बघायला पाहीजे.
हो छान लागतात
उल्कातैकडले पोहे मस्त दिसतायत
पहिला फोटो एकदम मस्त दिसत आहे
ही पाककृती तीन चार
आमच्या साबा ह्याचीच एक वेगळचे
UK पाककृती बघितली. आवडेल का
त्रिवेणी, आमची ओरिजिनल रेसिपी
मी कुठ म्हंटल टी बघून दिली.
बाप रे
In reply to मी कुठ म्हंटल टी बघून दिली. by त्रिवेणी
उल्काताई, मसाला पोहे एकदा
करुन बघणार नक्की.
वेगळी पाकॄ,
पाककृती आवडली.जेवण ऐवजी करता
छान प्रकार आहे. एक वेळच्या
छान वेगळाच प्रकार आहे. करून
वेगळाच प्रकार!
बरं बरं
पोह्यांची बिर्याणी आयडीया
In reply to बरं बरं by इरसाल
हे कॉम्बो मस्तच लागते.
In reply to बरं बरं by इरसाल
बराचसा पुलाव्/मसालेभाताच्या
उद्याच्या कट्ट्याला याचे
हाहाहा
In reply to उद्याच्या कट्ट्याला याचे by कंजूस
मुंबईत कुठे तरी भुजिंग मिळते....
मुंबईत कुठे तरी भुजिंग मिळते....