Skip to main content

विचित्र वागणूक: उपाय

लेखक अर्जुन
Published on बुधवार, 29/06/2016
आमच्या एक नातेवाइकासंदर्भात आपली मदत हवी आहे. अमावस्या व पोर्णिमेला तो फार विचित्र वागतो. कोणालाही शिव्या देतो, मारावयास धावतो. सर्वाशीं भांडण करतो.त्याला त्यामुळे अशा वेळेस कोंडुन ठेवावे लागते. दोन, तिन दिवसांनी एकदम नॉर्मल होतो. त्याला मानसोपचारही केले. पण तो औषधे नियमित घेत नाही. त्याच्यामूळे घरातील सतत तणावात रहातात. त्याचे वय बत्तीस वर्ष आहे. कोणताही कामधंदा करत नाही. लोकांमधे मिसळत नाही. बाहेरची बाधा असल्याचा घरच्यांना संशय आहे. क्रुपया मदत करा.

वाचन संख्या 15178
प्रतिक्रिया 47

प्रतिक्रिया

अनुक्रमे: यनावाला मांत्रीक उर्फ पुरोहित विवेक ठाकूर (नवीन अवतारात) असतील तर त्या नावे. पिंकबहाद्दर दादुमियॉं उर्फ मुग्धा गोडे (तेल) यनावाला समर्थक (उघड्,गुप्त आणि सुप्तही) अनिसप्रेमी (आग्रही) पण पुजा कर(व)णारे बुवा =================================== सदर व्यक्ती बरी (नॉर्मल) व्हावी हीच सदीच्छा पण बिन त्रासाचा ऊपाय सांगीतला जाईल की नाही (वैज्ञानीकांच्या मांदीयाळीमुळे जी या धाग्यावर आणि अध्यात्माच्या धाग्यावर पलिकडून धावत येतात) या बद्दल साशंक आहे. अश्रद्ध की सश्रद्ध अश्या फुकाच्या (पोकळचर्चा) गोष्टींपासून लाब असलेला नाखु संसारी

In reply to by नाखु

काय नाखुन काका दुत्त दुत्त , आम्हाला विसरलात काय =)))) पण अहो आजकाल मिपावर प्रतिसाद द्यायची सोय राहिली नाहीये , मत मतांतरे चर्चा मुद्द्यांवर न होता मत मांडणार्‍यांविषयीच होतात, लोकं प्रतिसाद सोडुन प्रतिसाददात्याविषयी चर्चा सुरु करतात , मग त्यांच्याशी प्रो कबड्डी लीग खेळण्याची मजा येते पण धागा पाण्यात जातो =)))) तथापि आम्ही आमच्या दुसर्‍या एका गुरुदेवांनी दिला असता तो सल्ला देतो आहोत : सदर व्यक्ती समोस्या सोबत कोणती चटनी खाते ? बहुतेक लाल चटनी खात असावेत , समोश्या सोबत हरी चटणी खायला सुरुवात केल्यास कृपा आनी शुरु हो जायेगी . शुभेच्छा :)

@दोन, तिन दिवसांनी एकदम नॉर्मल होतो. >> होणारच. फार हुशार आहे तो. @त्याला मानसोपचारही केले. पण तो औषधे नियमित घेत नाही.>> घेणारंही नाही!.कारण त्याला 'उगीच औषधं घ्यायला लागल्यानी काहि झालं तर काय करा?' अशी भिती स्वाभाविकच वाटते आहे. मुळात तो ठणठणीत बरा आहे.(पण कमालीचा चलाख आहे.) @ त्याच्यामूळे घरातील सतत तणावात रहातात. त्याचे वय बत्तीस वर्ष आहे. कोणताही कामधंदा करत नाही.>> नाहिच करणार कामधंदा. @लोकांमधे मिसळत नाही>>> बरोबरच आहे. त्याशिवाय अ‍ॅबनॉर्मल असल्याचं प्रूव्ह कसं करणार ना सगळ्यांसमोर..?आणि ते ही सारखं सारखं! @बाहेरची बाधा असल्याचा घरच्यांना संशय आहे. >> हेच तर त्याला हवं आहे. एकदा का घरच्यांना हे काहीतरी बाहेरची बाधा वगैरे तत्सम प्रकरण आहे ,असं वाटायला लागलं..की याचं रिकामटेकडेपण/आयतेपण संरक्षित होइल. @क्रुपया मदत करा. >>> अंनिस कडे जा. प्रकरण यथायोग्यरित्या हताळालं जाइल.

In reply to by अत्रुप्त आत्मा

@आत्मबंध - तुम्ही म्हणत आहात तसे असण्याची शक्यता असली तरी तसं असेलच असं नाही. किंबहूना त्यांनी दिलेल्या चार पाच वाक्यांच्या माहितीवरुन असा निष्कर्ष काढणे अतिशय चुकीचे आहे. @अर्जुन - संबंधित व्यक्तीच्या वागण्याबद्दल ज्या मानसोपचार तज्ञांकडून उपचार घेतले त्यांच्याशी सविस्तर चर्चा करा, आजाराचे स्वरुप समजून घ्या आणि त्यानुसार कृती करा.

In reply to by सतिश गावडे

आत्मुबुवांशी सहमत व्हावे लागतेय, पण नाइलाज आहे. चंद्र आणि मानसिक आजारांचा तसा काही संबंध नाही असे संशोधन सांगते. त्यामुळे आत्मुबुवांच्या एका गृहितकाशी मी सहमत आहे, बर्‍याच वेळेस सहानुभूती मिळाल्यास मानसिक आजार वाढतात (किंबहुना बर्‍याच वेळेस मानसिक रोगी सहानुभूतीसाठीच असे आजार वाढवतो) तेव्हा साम दाम दंड भेद सगळे वापरून सदर व्यक्तीला तुला आमची सहानुभूती अजिबात नाही असे दाखवून दिल्यास ते आटोक्यात येतात. समोर पाहिलेल्या उदाहरणावरून सांगतोय. आणि अजून एक, याला जर वेळीच पायबंद घातला नाही तर अजून १० वर्षांनी हे व्यक्ती तुमच्या पूर्ण घराला वेठीस धरूओ शकते.. १. शारिरिक कष्टांची कामे हा एक उपाय होऊ शकतो, पण अमानवी कष्ट नव्हे. २. चांगले वागण्याचे आजारी असण्यापेक्षा अधिक फायदे आहेत हे सदर व्यक्तीला कृतीमधून पटवून देता आले तर बघा. त्यासाठी थोडे कठोर व्हावे लागेल, पण त्याला इलाज नाही.

In reply to by आनन्दा

मी प्रतिसाद देताना चंद्र, अमावस्या आणि पोर्णिमा या गोष्टी विचारात घेतल्या नव्हत्या. त्याची गरजही वाटली नाही. ज्या गोष्टीला "आळस" असे नाव देऊन बाधित व्यक्तीला प्रतिसादांमधून धोपटले जात आहे, तो "आळस"सुद्धा गंभीर भावनिक आरोग्यविषयक समस्येचे दृश्य लक्षण असू शकते. अशा व्यक्तीला सहानुभूती दाखवून, तिचा विश्वास संपादन करुन तिला मानसोपचार घेण्यास तयार करणे हाच यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे.

In reply to by सतिश गावडे

असेच म्हणतो! डॉक्टर साहेब सांगू शकतील डिटेल्स पण मलाही वाटते की एक्सट्रीम आळस हा पण एक मानसिक रोगाचे लक्षण असावा, बहुतेक डिप्रेशन, मी स्वतः एकेकाळी डिप्रेशनचा पेशंट होतो, हे कबूल करण्यात लाज नसावी, देवाच्या दयेने मला पालकांचा खंबीर पाठिंबा मिळाला अन अडनिड्या वयात आलेल्या डिप्रेशन मधून मी बाहेर पडलो सुखरूप, त्याकाळी मला अंधार आवडत असे, प्रकाश अगदी कोवळे ऊन सुद्धा नकोसा होई, संध्याकाळी तिन्हीसांजेला अंधारल्यावर मी अंधारात बसून राहत असे दिवा सुद्धा नकोसा होई, नशीबाने 35 वर्षे विद्यार्थ्यांत घालवलेल्या वडिलांच्या तीक्ष्ण नजरेला ते वेळेत पडले अन त्यांनी मला सावरले, चांगली पुस्तके दिली, चांगले विचार दिले, माझ्यात असलेल्या गुणांची उजळणी करायला मला मदत केली, अन एक वेगळे करिअर करायला मला उद्युक्त केले, मला बाह्य औषधांची (मेडिकेशन) गरज पडली नाही हेच नशीब समजायला हवे माझे, मी काही वैद्यकीय तज्ञ नाहीये पण मी स्वतः ह्या फेज मधून गेलोय, उद्वेग अतिरेकी राग, उदासपणा ही आंदोलने मी भोगली अन दुर्दैवाने सहा सात महिने परिवारास सुद्धा भोगावी लागली, But I learned one thing and that is depression shouldnt be ridiculed off and talking about it helps a lot. माझे अनुभव कोणाच्या कामी आले तर आनंद होईल.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सगा आणि बापू दोघांशीपण सहमत. समुपदेशन हाच अश्या गोष्टींवरचा प्रमुख उपाय आहे. अवांतर - तुम्हाला बाहेरची बाधा वगैरेची खात्री करून घ्यायची असेल तर पोर्णिमेला सदर व्यक्तीला नृसिंहवाडी किंवा गाणगापूरला घेऊन जा. या जागांनाअ भुते घाबरतात असे ऐकून आहे, त्यामुळे जर तिथे नीट वागला तर मानसिक आजार नाही हे नक्की होईल. भूतबाधा आहे की नाही हा विषय वेगळा.

In reply to by आनन्दा

या व इतर सर्व प्रतिसादांशी सहमत . कमी अधिक प्रमाणात हे सर्व उपाय उपयोगी आहेत हेच सांगणार होतो . बाकी त्याचे लहानपण , एखादी मनात बसलेली घटना , अ‍ॅलर्जी हे सर्व तपासावे .

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्मबंध ह्यांचे निदान बरोबर वाटते. सदर व्यक्तीचे पोर्णिमा अमावस्येला विचित्र वागणे व घरच्यांना बाहेरची बाधा असल्याचा संशय ह्यामुळे आत्मबंध ह्यांनी अनिसकडे जाण्याच्या सल्ला दिला तो योग्यच आहे.

समजा, काहीतरी करून त्या व्यक्तीला पौर्णिमा आहे की अमावस्या हे समजलं नाही, तर तो त्या दिवशी असाच वागेल का?

त्या कार्यकर्त्याचं जेवण खाण बंद करुन शरीराच्या योग्य भागावर लाथ मारुन घरातून हाकलुन द्यावे. ३२ वय असलेली व्यक्ती कमावत नसेल तर बासच! हातोसा घेतलेला आहे त्याने बाकी काही नाही. असल्या माणसाकडून पालकांनी तरी काय अपेक्षा कराव्यात? त्यापेक्षा असलं अपत्य नाहीच्चे असं मानून काय ते पुढचं धोरण आखावं.

त्याला मानसोपचाराची औषधं घे नाहीतर हाॅस्पिटलला टाकू सांगा.घरातील एकाने लक्ष ठेवुन औषधं द्यावी. बाहेर बिहेरचं काही नसतं हो.एकतर मेंदुतला केमिकल लोचा किंवा खरोखरच आळशीपणा. अमावास्या पौर्णिमा उगाच लोक भरवुन देत असणार.मग तसेच वाटत असेल.एखाद्या पौर्णिमेला दुसरीकडे न्या त्याला. सांगुच नका.बघा काय करतो ते.

एक सूचना करावीशी वाटते एखाद्या माणसाला २-३ दिवस कोंडून ठेवायला लागते हे आपल्याला गंभीर वाटत नाही? ३२ वयाच्या कोणत्याही माणसाला २ तास कोंडून ठेवा तो आकांडतांडव करील की नाही? अत्यंत त्रोटक माहितीवरून काही नक्की सांगणे फार कठीण आहे परंतु आपल्या वर्णनावरून ही व्यक्ती मनोरुग्ण असावी असे वाटते. borderline psychosis सारखा प्रकार असेल तर ती व्यक्ती काही वेळेस व्यवस्थित आणि इतर वेळेस विचित्र वागताना आढळते. त्यांच्या मनोविकार तज्ञाला भेटून नीट माहिती घेणे आणि उपचार सतत चालू ठेवणे हाच रोगावर इलाज असतो. धरसोड वृत्तीमुळे रोग बळावण्याची शक्यता वाढते किंवा आटोक्यात आणणे कठीण जाते. जर ती व्यक्ती मनोरुग्ण असेल तर ती स्वतःहून औषध वेळेवर घेणे कठीण असते अशा वेळेस कुटुंबातील जबाबदार व्यक्तीला ती जबाबदारी घ्यावी लागते. हे "बाहेरची बाधा असल्याचा घरच्यांना संशय आहे" अशा अंधश्रद्धे मुळे उपचारात हयगय होऊ शकते

आदूबाळ, आपण चंद्राला झाकून ठेऊ शकत नाही. आपण कीतीही प्रयत्न केला तरी पौर्णिमा/अमावस्या लपवणे शक्य होत नाही, कारण ज्याला त्रास आहे तो पौर्णिमा/अमावस्येकडे लक्क्ष ठेऊन असते. अजया, मानसोपचार तज्ञांना दाखवले होते. उपचार चालू केल्यानंतर तो औषधे नियमित घेत होत, पण त्याला इतके शाररिक त्रास होऊ लागले की, लोकमान्य हॉस्पिटल[पुणे]मधे दाखल करावे लागले होते. तेव्हापासुन तो औषधे नियमित घेत नाही. आत्मबंध, तु म्ही सांगितलेला सल्ला पटत नाही. कारण जो माणूस दर पौर्णिमा/अमावस्येला, व पुढील दोन, तीन दिवस काम करु शकत नाही,अश्या व्यक्तीस कोण कामास ठेवेल, घरातील कामे तो नॉर्मल असतांना व्यवस्तीत करतो. हा त्रास चालू होण्याआधी नौकरीपण करत होता.

In reply to by अर्जुन

एका चाणाक्ष माणसाला दिवसात कसे गंडवता येईल. दोन दिवस झोपेचे औषध देऊन कॅलेंडर बदलणे, मोबाईल डेट्स बदलणे, वारांचे स्केड्युल बदलणे, त्याला लोकसंपर्कात येऊ न देणे, टीव्ही पाहू न देणे, ढगाळ हवामान असणे, म्हणजे चन्द्र दर्शन नकोच. बराच ब्रेन वोश खेळ करावा लागल, . . बेटर वे घालू दे गोंधळ अमावसया पौर्णिमेला.

In reply to by अर्जुन

एका चाणाक्ष माणसाला दिवसात कसे गंडवता येईल. दोन दिवस झोपेचे औषध देऊन कॅलेंडर बदलणे, मोबाईल डेट्स बदलणे, वारांचे स्केड्युल बदलणे, त्याला लोकसंपर्कात येऊ न देणे, टीव्ही पाहू न देणे, ढगाळ हवामान असणे, म्हणजे चन्द्र दर्शन नकोच. बराच ब्रेन वोश खेळ करावा लागल, . . बेटर वे घालू दे गोंधळ अमावसया पौर्णिमेला.

In reply to by अर्जुन

ढगाळ वातावरणात कळणार नाहीं एक पुस्तक आहे त्यात नायकाच्या व आईच्या अंगात येत असे, त्यातून नायक (बहुधा चव्हाण) ठरवून कसा बाहेर पडतो ही कथा आहे. हे पुस्तक या मुलास देणे, आत्मबल व आत्मभान व आत्मबोध यानी निश्चित मात करता येईल. एकदा बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु झाली की त्याला धीर द्या, कामाला पाठवण्यापेक्षा त्याला आवडीचे काही घरीच गुंतवता आले तर पहावे.

In reply to by अर्जुन

ढगाळ वातावरणात कळणार नाहीं एक पुस्तक आहे त्यात नायकाच्या व आईच्या अंगात येत असे, त्यातून नायक (बहुधा चव्हाण) ठरवून कसा बाहेर पडतो ही कथा आहे. हे पुस्तक या मुलास देणे, आत्मबल व आत्मभान व आत्मबोध यानी निश्चित मात करता येईल. एकदा बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु झाली की त्याला धीर द्या, कामाला पाठवण्यापेक्षा त्याला आवडीचे काही घरीच गुंतवता आले तर पहावे.

आपल्या नातेवाइकाच्या गंभीर आजाराविषयी सहानुभुती वाटते. आपली त्यांना मदत करण्याची कळकळही मान्य आहे. म्हणून म्हणतो सल्ला मागण्यासाठी अत्यंत चुकीचा फोरम तुम्ही निवडलाय. तुम्हाला उपायापेक्षा मनस्ताप जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा फोरम टाळा इतकाच सल्ला देतो..

औषधांबरोबर काउन्सेलिंगवर भर देणारा चांगला मानसोपचार तज्ञ गाठा. असे आजारी लोक हे सगळे त्यांच्याही नकळत बरेचदा करतात. आपल्यामुळे कोणाला त्रास होतो आहे हे त्याना सांगूनही कळत नसते कारण ते हे मुद्दाम करत नसतात. भुते बिते काय बघायचे असेल तर बघा, पण दुसर्‍या एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ञाला पुन्हा दाखवून उपचार सुरू ठेवा. काही औषधांचे वेगवेगळे साईड इफेक्ट्स येतात. पण चिकाटीने उपचार चालू ठेवावे लागतात. कारण अशा आजारांवर "घे क्रोसिन की ताप गेला" असे उपचार नसतात. दीर्घकाळ, कधी कधी आयुष्यभर उपचार घेत रहावे लागते. तर त्या व्यक्तीची आयुष्य बर्‍यापैकी नॉर्मल होऊ शकते. तुम्हाला आणि आजारी व्यक्तीला मनःपूर्वक शुभेच्छा.

In reply to by पैसा

धाग्यात लिहिलेल्या समस्येसंदर्भातील अतिशय नेमका प्रतिसाद. धागाकर्त्याच्या प्रश्नाला सामान्य वाचकांकडून यापेक्षा अधिक योग्य उत्तर असेल असे वाटत नाही.

अर्जुन, घरातल्यांना पौर्णिमा आणि अमावास्येच्या दोन दिवस आधी व नंतर (त्रयोदशी ते द्वितीया) श्री गुरुदेव दत्त हा नामजप मनातल्या मनात करायला सांगा. हा उपाय रुग्णावर करायचा नाहीये त्यामुळे सहज अंमलात आणता येईल. जर सदर रुग्ण त्या कालावधीत ठीकठाक वागला तर बाहेरचा त्रास आहे हे सिद्ध होईल. मग पुढील उपचारांस दिशा मिळेल. आ.न., -गा.पै.

हार्मोन्स आणि इतर न्यूट्रिशन्स च्या तपासण्या के ल्या आहेत का? पोटाचे काही विकार? जंत? हे सगळे पाहणे आवश्यक आहे. एखादे चांगले आयुर्वेदिक वैद्य नाडी तापासूनही नक्की काय ते सांगू शकतील. या व्यक्तीला पित्तकारक आहार देणे टाळायला हवाय. शिवाय डोके शांत राहण्यासाठी चांगल्या ठिकाणी शिरोधारा हा उपाय करून घ्या.

is wrong.. you should not say this without really evaluating (and evaluate if you are an expert). Its because of people who LABEL without verifying, people who are facing mental issues (small or big) do not get necessary help. Mental health is equally important, so please don't label!

जाधवांच्या भरताचे श्रीमंत दामोदरपंत नाटक (पिक्चर नका दाखवू) दाखवा. पहा काय फरक पडतो का.

वर एका प्रतिसादात म्हंटले तसे अमावस्या , पौर्णिमा त्याला माहीत नाही पडणार असे बघा. हे अशक्य नाही. तो तसाहि लोकात मिसळत नाहीच. घरी असलेले कॅलेंडर , वर्तमानपत्र , पंचांग यांतूनच त्याला अमावस्या पौर्णिमेचे ज्ञान होते आहे. तेव्हा अमावस्या-पौर्णिमा यांची माहिती देणारे कॅलेंडर घरी ठेवू नका, वर्तमानपत्रही अशी माहिती देणारे नसेल हे बघा. गरज पडल्यास टीवी बंद ठेवा (DTH चे पैसे भरायचे राहून गेले अशी सबब देत बंद ठेवू शकता). बाकी सध्याच्या ढगाळ हवामानात प्रत्यक्ष चंद्रदर्शन करुन तो अमावस्या , पौर्णिमा जाणून घेवू शकणार नाहीच. घरात कुणीच काही बोलू नका अमावस्या , पौर्णिमा यांबद्दल. निदान एक-दोन महिने हे करुन बघावे. मानसोपचाराबाबत तो औषधे घेत होता हे तुम्ही सांगितले पण नेमके निदान काय होते ? तो तज्ञ समस्येच्या मुळाशी खरच पोहोचू शकला होता का ? नाहीतर दुसर्‍या तज्ञाशी चर्चा करा. मुळात हा त्रास नेमका कधीपासून आणि का चालू झाला हे शोधणे महत्वाचे आहे. मिपावरील एका धाग्यात कुणीतरी 'हिप्नॉटिजमसदृष्य उपचाराबद्दल' लिहले होते. (मी त्या धाग्याचा दुवा शोधून देतो). अशा काही उपचार पद्धतीतून समस्येचे मूळ कारण शोधता येईल का याची चर्चा मानसोपचार तज्ञाशी करा.

माझ्या नातेवाईकाला वैद्यकिय उपाय गेले दोन वर्ष चालु आहेत [अनियमित्]. इतरही पर्याय तपासत आहे. माझ्या प्र्श्णाला काही अध्यामिक किंवा तांत्रिक उपाय आहेत का ? कोणी मार्गदर्शन करु शकेल का?

In reply to by अर्जुन

उपाय नियमितच हवेतच! आध्यात्मिक उपाय किंवा इतर गोष्टी शक्यतो व्यवस्थित चौकशी करुन च कराव्यात. त्यात खोटेपणा शक्यतो जास्त असतो. आर्थिक लाभाची अपेक्षा असणारांकडे जाऊ नये.

"श्रीरामचरितमानसमधील काही संकटनिवारक मंत्र" (संबंधित लेख हा कॉपीराईट केलेला असुन त्याची कुठेही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कॉपी केलेली आढळल्यास किंवा इतरत्र दिसल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी) © व्यवहारात वावरताना अनेकदा काही अनाकलनीय संकटे, त्रास व अडचणी अचानक आ वासून समोर उभ्या रहातात.... अशावेळी आपली बुध्दी काम करेनाशी होते... अडचणीत चटकन धावून येणारंही कुणी नसतं.... अशावेळी श्रेष्ठ रामभक्त श्रीतुलसीदासांनी रचलेल्या "श्रीरामचरितमानस"मधील काही मंत्र अक्षरश: चमत्कारी ठरतात...वरदायक असतात असा अनुभव आहे. पीडा किंवा संकटकाळात खालील मंत्रांपैकी कोणत्याही मंत्राचा जप आपण रोज सकाळ-संध्याकाळ १०८ वेळा करावा, त्याचप्रमाणे दिवसभरातही अधुनमधुन करीत रहावा. श्रीरामांचे स्मरण-चिंतन करावे, त्यांना या संकटातून बाहेर काढण्याची कळकळीची विनंती करावी. हे मंत्र हे उत्तरप्रदेशीय लहेजातील हिंदीमिश्रीत असल्याने शब्दांचे उच्चारही तसेच करावेत, ते शुध्द हिंदीत करु नयेत...उदा. लछमन हा शब्द म्हणजे मुळ लक्ष्मण असला तरी त्याचा उच्चार करताना लछमन असाच करावा ही विनंती...मंत्रजपकाळात साधकांनी मांसाहार, मद्यपान पूर्णत: वर्ज्य करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुमच्या निवासस्थानाजवळ एखादे राममंदीर असेल तर तिथे जमेल तेव्हा आवर्जून दर्शनास जावे. मंदिरातही मंत्रजप करावा....सकाळी एखादी सुगंधी अगरबत्ती लावून जप करावा, व अगरबत्तीचा साठलेला अंगारा (राख) एका स्वच्छ डबीत ठेवुन रोज मस्तकी लावावी....मंत्रावर व आराध्य दैवत असलेल्या श्रीरामांवर पूर्ण श्रध्दा ठेवावी. सकारात्मक विचार करावेत... मी आपल्या सोयीसाठी अनेक मंत्र दिले आहेत त्यापैकी एकच सोयिस्कर आणि उच्चाराला जमेल असा मंत्र जप करावा. सर्व मंत्रांचा इफेक्ट सारखाच आहे, कोणताही कमीजास्त प्रभावी नाही हे लक्षात घ्या... संकट मोठं असेल तर घरातील सर्व मंडळींनी किंवा ज्यांना जमणार आहे अशांनी सामुदायिकपणे किंवा प्रत्येकाने निरनिराळ्या वेळी जप केला तरी चालेल, जप सुरु झाल्यावर वर सांगितलेली बंधने प्रत्येकाला पाळावीच लागतील....जप करताना आपल्याहातून कळत नकळतपणे झालेल्या चूकांचा साक्षात्कार झाला तर त्वरित त्याची माफी श्रीरामांकडे मागावी...व पुनश्च त्या चुका होणार नाहीत याचे वचनही द्यावे.... मंत्र:- १) राजिवनयन धरें धनु सायक। भगत विपति भंजन सुखदायक॥ (अचानक व अनपेक्षितपणे आलेल्या संकटासाठी वरील मंत्राचा जप करावा) २)जौं प्रभु दीन दयालु कहावा। आरति हरन बेद जसु गावा॥ (संकटनाशक मंत्र) ३) जपहिं नामु जन आरत भारी। मिटहिं कुसंकट होहिं सुखारी॥ (संकटनाशक मंत्र) ४) दीन दयाल बिरिदु संभारी। हरहु नाथ मम संकट भारी॥ (संकटनाशक मंत्र) ५)हरन कठिन कलि कलशु कलेसु। महामोह निसि दलन दिनेसू॥ (कठीण क्लेशनाशासाठीचा मंत्र) ६)जे सकाम नर सुनहिं जे गाबहिं। सुख सम्पत्ति नाना बिधि पाबहिं॥ (आर्थिक स्वरुपाची संकटे नाश होण्यसाठीचा मंत्र) ७)भव भेषज रघुनाथ जसु सुनहिं जे नर अरु नारि। तिन्ह कर सकल मनोरथ सिध्द करहिं त्रिसिरारि॥ (आरोग्यविषयक संकटांचा नाश होऊन, मनोरथ सिध्दीसाठी) ....वाचकांनी आणि साधकांनी चिंतामुक्त होण्यासाठी वरीलपैकी एका मंत्राचा जप श्रध्देने व सातत्याने करीत राहील्यास त्याचा त्यांना निश्चितच लाभ होईल यात वाद नाही, शंका तर मुळीच नाही. श्रध्दा, मंत्रजपातील सातत्य व इष्टदेवतेवरील भाव याच्या जोरावर अनेक संकटांचा मुकाबला करता येतो. ज्यांनी रावणासारख्या बलाढ्य़ राक्षसाशी मुकाबला करुन त्याला यमसदनी धाडला त्या श्रीरामांच्या नुसत्या स्मरणाने संकटांचा नाश होतो हे विसरु नका...आनंदी रहा, सश्रध्द रहा, सन्मार्गाने जगा.... ॥ जय श्रीराम ॥ लेखक---- -सचिन मधुकर परांजपे (पालघर) © माझ्या अल्पज्ञानानुसार माझा सल्ला असा की रुग्ण व्यक्तिने किंवा जवळच्या एखाद्या नातेवाईकाने रोज किमान एकदा अर्थासकट रामरक्षा मोठ्याने वाचावी . वाचते समयी 1-2 अगरबत्या लावून अगरबत्तीचा साठलेला अंगारा (राख) रूग्णाच्या मस्तकी लावावा . मांसाहार करु नये . हेतुपुर्वक कलेलं नाटक असेल तर या उपायाचा फायदा होण्याची काही शक्यता नाही . पण रूग्णाचं मन दुर्बल झालेलं असल्यास या उपायाचा निश्चितच फायदा होईल . व खरोखरच बाहेरची बाधा असेल तर ती 100 % दूर होईल . रुग्णाने स्वतः रामरक्षा वाचल्यास अधिक उत्तम . शिवाय परांजपे यांनी दिलेले रामचरितमानस मधील मंत्रही फायदेशीर ठरु शकतात . गाणगापुरास नेल्यास तिथे पौर्णिमा अमावस्येच्या वर्तनात फरक दिसून आल्यास बाहेरची बाधा आहे कि मानसिक प्रॉब्लेम आहे हे समजेल . मानसिक आहे अशी खात्री झाली तर औषधांपेक्षा एखाद्या कुशल मानसोपचर तज्ञाकडून प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत समुपदेशन घेत राहणे फायदेशीर ठरेल .

meditation ani yoga chalu Kara.. Manshanti labhel

https://mr.m.wikisource.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE

सुंदर प्रतिसाद! झोपायच्या वेळी रामरक्षा म्हटली, अंगारा लावला की मुलांना शांत झोप लागते हा अनुभव आहेच. तसेच हनुमान चालिसा प्रभावी आहे किंवा अगदी 'भूतपिशाच निकट नहीं आवे। महाबीर जब नाम सुनावे'या एक ओळीच्या पठणाने सुध्धा भीती नाहीशी होते. मनाचा कमकुवतपणा कमी होतो.

माझ्या नातेवाईकाला वैद्यकिय अर्जुन - Sat, 02/07/2016 - 21:54 नवीन माझ्या नातेवाईकाला वैद्यकिय उपाय गेले दोन वर्ष चालु आहेत [अनियमित्]. इतरही पर्याय तपासत आहे. माझ्या प्र्श्णाला काही अध्यामिक किंवा तांत्रिक उपाय आहेत का ? कोणी मार्गदर्शन करु शकेल का?
आपणास कोणत्या पद्धतीची चर्चा घडवायची आहे तो हेतू लक्षात आला आहे,त्यामुळे पास!! धनंजय मानेंचा पहिला प्रतिसाद योग्य आहे या धाग्याकरिता.

खालीमुंडी पाताळधुंडी, त्या व्यक्तीचे वडील शेतकरी आहेत.आई वारलेली आहे.पौर्णिमा/अमावस्येच्या दोन/ तिन दिवस आधी पासुन तो बडबड चालू करतो.वडलांना शेतात जाऊ देत नाही. सध्या शेतीची कामे जोरात चालू आहे. अश्या वेळेस तिन दिवस शेतात न गेल्यास वर्षाचे नुकसान होऊ शकते. इतर वेळेसही तिन दिवस पीकास पाणी न दिल्यास पीक जळु शकते. शेतकरी आधीच नुकसानीत आहे. त्यात असे संकट, महाग औषधी, मानसिक ताण यांचे परीणाम कीबोर्डवर विचार न करता खरडण्यासारखे सोपे नसतात. मरता क्या न करता या नियमाप्रमाणे सर्व पर्याय तपासत आहे.आपल्याला एखाद्या गोष्टीबद्द्ल माहिती नसेल तर शांत रहावे, ही विनंती !!

अर्जुनराव, वर ज्या लोकांनी निंदा केली आहे त्याकडे दुर्लक्ष करा, शेवटी का्य, ज्याच जळत त्यालाच ते कळत. आशा करतो की तुमचे नातेवाईक यातून लवकरच सहीसलामत बाहेर पडतील.