Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वटवट on Tue, 06/28/2016 - 16:50
कर…! काजळलेल्या राती.. पाजळलेली स्वप्नं.. कातरवेळी डोळ्यामधुनी.. पाझरलेली रत्नं.. मग, रत्नांच्या त्या गर्दीमध्ये.. गुरफटलेली धुंदी.. तू मी असता दुःख गं कसलं??... सारे काही आनंदी.. तू असताना दुःख सुद्धा गं रूप बदलते राणी.. वणव्याच्याही ओठी फुलती.. नाजूक फुलांची गाणी.. ऐक गं राणी, फुले सुद्धा ही नाहीत अगदी साधी… ह्याच फुलांनी बरी होते, शतजन्मांची व्याधी… शतजन्माची माझी व्याधी, बरी कराया ये ना… नक्षत्रांवर आपुली नावे, कोराया ये ना… चंद्र चंद्र मी.. रात्र रात्र तू.. होऊन होऊन जाशील… रोज सकाळी .. संध्याकाळी ... माझी कविता गाशील… ये ये माझी कविता गाण्यासाठी… माझी होऊन जाण्यासाठी… दोघे मिळून बांधून टाकू… पुढील शतजन्माच्या गाठी… सार्थक होईल ह्या जगण्याचे... तुझ्या गं राणी अस्तित्वाने… प्रश्न पडतो पदरी माझ्या, खरंच पडतील एवढी दाने??? भगवंतालाच आता साकडे.... "देवा.... इतुके माझ्यासाठी कर…!" आयुष्यभर करीन चुकता… "अगदी जो जो म्हणशील तो तो कर...!" . . . आयुष्यभर करीन चुकता… "अगदी जो जो म्हणशील तो तो कर...!" -चेतन दीक्षित

Submitted by निश on Tue, 06/28/2016 - 22:37

Permalink

मस्त ...अजुन येउ द्या.

मस्त ...अजुन येउ द्या.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 06/28/2016 - 22:39

Permalink

ते कर शब्दाचे दोनतीन अर्थ

ते कर शब्दाचे दोनतीन अर्थ होतात ना म्हणून शेवटचं जरा कंफ्युज झालं. बाकी कविता उत्तम.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 06/28/2016 - 22:41

In reply to ते कर शब्दाचे दोनतीन अर्थ by अभ्या..

Permalink

तुम्ही बार्शीकर का हो?

तुम्ही बार्शीकर का हो?
  • Log in or register to post comments

Submitted by वटवट on Sun, 07/10/2016 - 15:14

In reply to तुम्ही बार्शीकर का हो? by अभ्या..

Permalink

होय...

होय...
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sun, 07/10/2016 - 15:51

In reply to होय... by वटवट

Permalink

ह्ये जिगर, मिलाओ हाथ. मी पण

ह्ये जिगर, मिलाओ हाथ. मी पण बार्शीकर :) आता मिसळपाव लीगच्या मॅचेस होतील तेव्हा आपली सोलापूर लेखकटीम मजबूत पायजेल. तुम्ही आहेत भारी झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by एकप्रवासी on Wed, 06/29/2016 - 17:42

Permalink

आवडली

आवडली कविता ...
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 1408 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com