✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

.....माझा शेतकरी राजा.....

B — Bhagyashri satish vasane, Sun, 06/26/2016 - 22:35
शेतामध्ये राबतो माझा शेतकरी राजा मन त्याचे साधेभोळे, नाही कुणाचा हेवा मनाच्या गाभार्यात शोधता नाव त्याचेच सापडे अशी कशी वेडी मी त्याच्या वरी प्रेम करे माझ्या सुखासाठी तो रात्रंदिस झरे असा माझा साधाभोळा शेतकरी राजा मन जीवन कोरे पान माझे त्यावरी नाव त्याचे मी लिहिले माझे सौभाग्य त्याचे अर्धांगिणी मी झाले सात जन्मांची साथ आमची जगा सांगुणही न कळे प्रीती त्याची त्याच्या वेदनांना औषध माझ्या प्रेमाचे काट्यांच्या वाटेवर गाव त्याचे लागते मन माझे त्या काट्यांच्या वाटेवरही त्यालाच शोधते, शोधते मन जिथे तो नसतो माझा हा वेडेपणा पाहून आरसा माझ्यावर हसतो, एकटी माझी सावली प्रश्न मला करते होता जो सोबतीला आता कुठे हरवला.......! भावार्थ- "माझा शेतकरी राजा" ह्या कवीतेत एका स्रिच भावनाविश्व सामावलेल आहे समाजातील प्रस्थापित बंधनना झुगारुन नायिका लग्न करते त्यांचा संसार सुखाचा असतो...पण त्याच्या एकाएकी जाण्याने तिच्यावर दुखा:चा डोंगर कोसळतो... असा तिच्या आयुष्याचा आढावा कवितातेत घेतलेला आहे....

प्रतिक्रिया द्या
2853 वाचन

💬 प्रतिसाद (3)

बास्स बास ....

भोळा भाबडा
Sun, 06/26/2016 - 22:48 नवीन
बास्स बास .... डोल्यातनं पाणी आलं ना!!!
  • Log in or register to post comments

प्रामाणिकपणे लिहीताय,

जव्हेरगंज
Sun, 06/26/2016 - 23:06 नवीन
प्रामाणिकपणे लिहीताय, आवडलं!!! आणखीन पाहिजे!!! कथा वगैरे लिहा ना!
  • Log in or register to post comments

नव्या

चांदणे संदीप
Mon, 06/27/2016 - 09:22 नवीन
ब्याट्सम्न कडन लै राव अपेक्षा तुमच्या!! आपली करा की आधी सेंचुरीची सेंचुरी!! रच्याकने, क्विता लै आवडली! :) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा