अश्याच एका पावसाळ्या रात्री .........
अश्याच एका पावसाळ्या रात्री,
जेव्हा ती मला भेटली होती
लखलखत्या काळोखात,
तेव्हा तिच्या कानातली चांदणी चमकली होती
एकुलत्या एका शेडखाली
मला खेटुन ती उभी होती
अन माझ्या नकळतच्या स्पर्शाने
तिची ओली काया शहारत होती
बाहेर रस्त्यावरती पाउस मात्र,
एकसारखा कधीचा कोसळत होता
मला वाटलं की तोही तिच्यासाठीच
आज ज़रा जास्तीचा रेंगाळत होता
वाटलं की तिला कवेत घेउन
ह्या पावसात चिंब भिजावं
मिठीत तिच्या विरघळून जावं
अन स्वता:लाही विसरावं
ढगांच्या गडगडाटांनी घाबरून
ती अशी काही मला बिलगावी की,
हि धरणीही त्याला अशी कधी भेटत नाही,
पाहून त्या पावसाचीही जिरावी
पाउस ही आता जरा
जास्तच इरेला पेटला होता
वाऱ्याला हाताशी धरुन
आता खोलवर घुसखोरी करत होता
पण त्या वेड्याला ठावूक नव्हते की,
त्याची हि घुसखोरी माझ्या पथ्यावर पडत होती
तो जेव्हढा खोलवर घुसत होता,
ती तितकीच मला जास्त उमगत होती
त्यावर तो चिडला, चवताळला, वैतागला
शेवटी थकून विसावला
तशी ती माझ्यापासून दूर झाली
अन माझ्या स्वप्नांचा डोलारा कोसळला
मी काही बोलणार न बोलणार
इतक्यात तिची पाठमोरी काया दृष्टीआड झाली होती
अन ही धुंद संधी दवडल्याबद्दल
मग त्या पावसानेही मला शिव्याचीं लाखोली वाहिली होती
अश्याच एका पावसाळ्या रात्री
जेव्हा ती मला भेटली होती........
एखादी भयकथा येऊदे आता
मी पांडुशी शमत हाय. भयकथाच
लखलखता काळोख ही उपमा-उपमेय
लखलखता काळोख??
क्षणात वीज चमकून काळोख लखलखतो
ओके.
छ्या
मिपा शारुख ?????????????
बर्यापैकी
एक पोरगी संध्याकाळी,
ह्या कवितेबद्दल थोडसं......
आवडली.