शेवटी बाप हाय म्या-3
तुला बुलट घिवुन द्यायची आपली ऐपत नवती अण एवढंच काय हे बी कबुल हई म्या तुला कधी खेळायची मोटर बी नै घिउ शकलो. पर तु आठीव अतापोस्तवर तुला कदी बी शाळाची वाट सोडुन रानाची वाट धरा लावली नाय. दोन घास कमी खाल्लं पर तोहया पुस्तकाची सोय लावली.
तु बारवी झालास तवापासुण त्याट छाती काडुन गावात फिरायचु. आपुण लावलेलं झाड़ आता गार गार सावली देणार म्हणायचु.
मस लोकं मनली, तोहं पोरगं कालेज सोडुन गावांत उंडरतय, पाटलाच्या लेकिवर् उडतय. पर आपला भरुसा होता. म्या म्हणायचु, आपलं रघत हाय फुकट जाणार नाय. पर महा शिक्का खोटा निघला. म्या पिरमात आंधळा झालतु. तेव प्रिंसदादा दारात यिवुन सांगुन गिलता पर माहिच अक्कल शेन खायला गिलती.
पर तु त् शिकला सवरला हुतास ना?
अरं! पाटलाच्या पोरिवर उडायच्या आधी इच्चार त् करायचा आपल्या भैनिचा?
तोहया वह्या पुस्तकासटि, स्वत्ताच्या शाळावर् पाणी फिरून लोकायाच्या रानायनि बिनचपलीचं फिरलं ते लेकरु. तेच्या पायाला आलेल्या फोडाचा त् इचार करायचास.
"महा भौ मोटा हाफिसर झाल्याव माहं लगीन लए मोठ्या घरात करुन देणार हाई" म्हणायचं ते लेकरु. आता तेच लेकरु तोहयामुळं लगीन होईना मनुन गोधड़ित मुंडकं खुपसुन ढसा ढसा रडतय. काय गुना होता रं त्या कवळ्या लेकराचा? तरी बी तुला उलशिक बी दूषणं देत नै. "आये, महा दादा कुठं झोपत आसन गं?" रातच्याला झोपताना रोज मइला इचारतय ते लेकरु. ते खरं पिरेम. पर आमालाच आता कळालै. ज्याला शिकुन मोठं करायचं तेला आमी उनातानाचं रानात धाडलं अण जेला नै तेला गावात उंडरायला सोडलं.
उनातानाचं माय-बाप राबलं नै त् सांच्याला घरातली चुल पेटत नै हे त् तुह्या ध्यानात यायला पैजी हुतं.
चाळीस हजार पगार घरात आल्यार, नवा कोरा फिलाट घेतल्यार तरी तुला घासलेटची चिमनी लवून पत्र्याच्या खोलीत झोपणाऱ्या मई-बापाचं ध्यान व्हायला पाहिजी होतं. निदान वयात आलेली भैन उघड्यावर नहायला बसती अण आपुण पाटलाच्या पोरिला फुलागत ठिवतुया असलं त् कै तरी तुह्या डोसक्यात यायला पायजी हुतं. पिरेम करुन अण पळून लगीन करुन तु जिकलास पर माघ्ं आपल्या घरादाराचं काय झालं हे एक रूपड्याचा फोन लाउन इचारायचं काळीज बी तुह्याजवळ नै राहिलं अण मंग तु कसला रं पिरेम करणारा माणुस? तु मतलबी निघलास.
तेव पाटिल आपल्या खानदानावर कसा अण कुठून कुठून उडल याचा एकदा तरी इचार तुह्या डोसक्यात आलता का रं?
आलता त् मंग खरं सांग परश्या, तोही कवळी भैण त्या पाटलाम्हवरं हात जोडून आक्रोश करताना नई का दिसली तुला?
...आज पहायला येणाऱ्या पोराने दुकानावर फोन करुन, पोरिचा भाऊ काय करतो असं परश्याच्या बापाला विचारलं. बाप पुढं बोललाच नाही. पोरगा समजून गेला. आपलं जमणार नाही बोलला.
दारात काढलेली रांगोळी स्वतःच्या पायाने विसकटुन 'तो' लाल साडित नटुन बसलेल्या कोवळ्या पोरिला कवटाळून ढोरागत रडू लागला.
कमुन हेव भोग माह्या लेकिच्या वाट्याला आला?
तिचा काय गुन्हा झाला?
पिरेम करायची खाज त् तुला हुती रे परश्या!
सल्ल्या धावतच आला. अंगणात लेकीची समजूत काढत बसलेल्या बापाकड़ पाहुन मोठ्याने ओरडला;
"परश्याला अण आर्चीला कुणीतरी मारून टाकले. पोलिस बोड़या घिउन बाजरतळाला बसलेत. पाटिल ओळख दाखिना. तुमी तरी चला"
बापाला आवंढा बी गिळता आला नाही. तसाच आ वासुन पडला.
सल्ल्याने पाणी मारल्यावर थरथरत्या अंगाने बाजारतळला आला.
दोन चार पोलिस सोडले तर कुत्रं बी तिथं उभा नव्हतं.
लेकाला पाहुन बापाचं अवसान गळालं. प्रेत बांधलेल्या गठुड्याला आवळून त्यानं हंबरडा फोडला.
"देवा, माह्या लेकानी गुना केला पर एवढी सजा नवती रे त्या गुन्याची. म्या दोनच लेकराचा बाप है. पर तु त् साऱ्या जगाचा हैस ना? मंग कावुन असला न्याव केलास?"
रडून रडून गार पडलेला बाप दुसऱ्या गठुड्याकड़े पाहुन ताटकण उठला. छाती बड़विणाऱ्या बायकुच्या गळ्याताला मंगळसूत्र तोड़ला आणि नीट कापडाच्या दुकाणात गेला. लालजरित डोळे अण शुन्यात नजर.
"शेटजी, आधी एक हिरी साड़ी अन चोळी दया. एकदम नवी कोरी. म्या तिला बेवारस पडु देणार नै. कोरया साडी चोळीत सजिन अण स्वत्ता मह्या हातानी अग्नि देईन. शेवटी कई बी झालं त् म्या एक बाप हाय अन ति सुन हाय माही"
प्रतिक्रिया
कथा खूप आवडली. शेवटले वाक्य..
वाचताना परश्याचे वडील (सिनेमा
___/\___
सुरेखच जमलंय..
सुंदर ......
लैच भारी जमलंय आनंदाभाऊ. एकदम
छाणच
'ते' राहिले ना.
छे आप्लया सारख्या सिद्ध असली
तुम्ही भांडताय का? भांडू नका
नाय ना प्यारेकाका. आम्ही
दु दु अभ्या..
...
नका राव रडवू
जब्राट. दंडवत स्वीकारावा! आता
+११११
__/\__ ....
+1
हे अगदी जबरी झालय...
जबरी लिहीलंय !!!
आवडले.
सर्वच मनोगते
अस्सल
:( सगळ्यात आवडलेला भाग हाच.
छान लिहलय,शंकाच नाही