✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा लंडन कट्टा- ग्रिनीच

व
विजुभाऊ यांनी
गुरुवार, 06/23/2016 - 03:11  ·  लेख
लेख
मिपा लंडन कट्टा सालाबाद प्रअमाणे ठरला एकदा कट्टा करायचे ठरले की ठरले. मिपाकर अडचणींकडे क्षुल्लक महणून पहातात. कट्टा करायचे ठरले मात्र स्थळ ठरत नव्हते. वर्‍हाडी जमा झाले मात्र कार्यालयाचा पत्ता ठाउक नाही असे काहीसे सुरवातीला झाले. त्याचे काय झाले. विजुभाउ लंडन मधे आले याची आदुबाळाला कुणकुण लागली. त्याने व्यनीफीनी तुन फोनाफोनी करुन विजुभाऊना सम्पर्क केला. आणि कट्टा करायचअ घात घातला. स्वाती राजेश या अनाहिता मधील जबरदस्त सदस्यानी ती आयडिया उचलून धरली. आदू बाळ आणि अस्वस्थामा ने कुठे कुठे जायचे याची चर्चा करत जुने मध्य लंडन नेहमीच बघतो राणीचा राजवाडा , राजाची बाग , ती कसलीशी घंटा आणि रोज मोडणारा लंडन ब्रीज , यांचे अस्सल मिपाकराला कसले आले कौतूक. खरा मिपाकर हा गप्पा नवी माहिती , खादाडी आणि देशी इतिहासात रमतो. जगात तो कुठेही असू द्या मनाने तो शिवरायाच्या महाराष्ट्रातच असतो. गप्पा मारता मारता असे कळाले की इथे लंडन मधे एक सुवर्णदूर्ग नावाचा किल्ला आहे. साहेबाने त्याचे नाव सोवेनदुर्ग असे मोडले आहे . पण ते असो. सुवर्णदूर्गाच्या आठवणीत रमायचे म्हणून त्याचे नाव तसे ठेवले गेले अशी एक माहिती उडत उडत कानावर आली. झाले ठिकान मुक्रर झाले. तारीखही पक्की झाली. थेम्स काठावरील ग्रीनीच जवळ हा किल्ला आहे. शनिवारी जमायचे ठरले. त्यानुसार लअंडन मधील मिपाकराना निरोप गेले. वाचनमात्र असणारे एक सदसय श्री लोथार यानी कटट्याला जायचे म्हणून धावपळ करून सदस्यत्व घेतले. त्याना अस्सल मिपाकर पहायचे होते. स्वपनील ( अस्वस्थामा ) बाथ जवळच्या एका गावाहुन येणार होते.आदूबाळ स्लाव मधून , स्वाती राजेश सनबरी हुन तर विजुभाऊ फेल्टम हुन येणार होते. सर्वाना सोयीचे व्हावे म्हणून स्थळ मुक्रर झाल्यानंतर ते पुन्हा एकदा बदलण्यात आले. पण त्यातही अडचणी होत्याच. बर्‍याच चर्चेनंतर ते पुनः मूळ ठिकाणावर आले. त्यानुसार ग्रीनीच ला जमा झाले, ट्यूब ने ओव्हरग्राउंडने , गाडी ने ,बस ने, बोटीने अशा वेगवेगळ्या वहानानी प्रवास करत एककेक जण जमा झाले. ग्रीनीच म्हणजे शून्य रेखाम्शाचे ठिकाण. येथून जगाची वेळ ठरवली जाते. शाळेत शिकलो होतो तो भूगोल आता प्रत्यक्ष अनुभवायला मिळत होता. ग्रीनीच रेखांश आणि जगाची वेळ यांचे जवळचे नाते आहे. इथे घड्याळी वेळ स्थानीक वेळ आणि जागतीक वेळ अशा अनेक वेळांची संगती लागते. नौवहनासाठी सोय व्हावी म्हणूउन जागतीक वेळ ही संकल्पना आली. त्यावरून ठिकाण निश्चित करण्यासाठी अक्षांश रेखांश या संकल्पना कशा आल्या याचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा केला जातो. मिपाकर या माहितीचा आनंद घेत होते , इथली वेधशाळा , विल्यम हर्शेलची दुर्बीण आणि वेळ मोजण्याच्या विवीध पद्धती विवीध यंत्रे यांची भरभरून माहिती मिळत होती. मिपाच्या या कट्ट्यावर अशी माहितीची खादाडी चालू होती. त्या गडबडीत जेवण बीवण करायचे कोणाच्याच लक्षात आले नाही. त्यातच गप्पाना ही रंग भरला. जुने नवे लेख आठवले. रामदास काका, आनंदयात्री , तात्या , डयांबीस काका , बयाटमयान, प्रचेतस , वल्ली , ट का , आदिती, गणपा, जेनी, क्लिंटन सर्वांचे ले़ख पुन्हा पुन्हा वर आले. गप्पांचा मस्त फड जमला. मधेच धमाल मुलाने फोनवर हजेरी लावली. आपण कोणाला पहिल्यांदाच भेटतोय असे वाटतच नव्हते. कट्टा पुन्हा करायचा. पुढच्या वेळेस लंडन बाहेर बाथ ला कट्टा करुया असे भरघोस आमंत्रण सौ व श्री अस्वस्थामा यानी दिलय. ##### नाही म्हणायला थोडिशी खादाडी झालीच. आदुबाळाने " गव्हाची बीयर " या प्रकारची ओळख करुन दिली. त्या बद्दल पुन्हा कधीतरी. "मल्हार आदुबाळ " या नव्या भन्नाट अफलातून आईनस्टाईन दोस्ताची मात्र झकास जानपहचान झाली. त्याबद्दल ही सविस्तर पुन्हा कधीतरी. a डावीकडून उजवीकडे: मल्हार, चैत्रबन, प्रश्नलंका, अस्वस्थामा, लोथार मथायस, विजुभाऊ, आदूबाळ vb विजुभाऊ आणि बेल्जियन गव्हाची बियर nnn ग्रीनिचचा रेखांश आणि मुंबईचा अक्षांश
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
12865 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

छानच....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/24/2016 - 14:09 नवीन
वृत्तांतात फोटो टाकल्याबद्दल आभारी आहे. असवस्थामा भारी पर्सन्यालिटी वाटली. आदुबाळ यांना तिशीतले समजत होतो, ते पन्नास प्लस वाटतात.;) विजूभौ मित्र असल्यामुळे ते अजूनही सात आठ वर्षापासून २७ चेच आहेत. लोथार पण भारी. मल्हार आणि मंडळीही छानच. चला, कधी पोचलोच लंडनला तर आपलं खरं गणगोत हेच. सर्वांना भेटून आनंद झाला. मिपा कट्टा केलात एकमेकांना भेटलात खान पान केलं छान वाट्लं. कट्टा एक दोन तासाचा असतो पण त्यासाठी व्यक्तिगत नियोजन करावा लागतो. वेळ काढावा लागतो. म्हणून सर्वांचं कौतुक आहे. सर्वांचं मन:पूर्वक अभिनंदन. जगभर मिपाकराचे कट्टे झाले पाहिजेत ही श्रींची इच्छा... ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

बघा जरा सर.

अभ्या..
Fri, 06/24/2016 - 14:17 नवीन
बघा जरा सर. नुसते छान छान म्हणत बसू नकात.
जगभर मिपाकराचे कट्टे झाले पाहिजेत ही श्रींची इच्छा... !
मराठवाडा शांत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठवाडा पुण्यात सामील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/24/2016 - 17:07 नवीन
मराठवाड्यातील कट्टयाची लवकरच उद्घोषना करण्यात येईल. मिपाजाळं अजून मराठवाड्यात तसं फोफावलं नाही. मिपाचा मराठवाड्यात एकदा चांगला प्रचार प्रसार करून झाला की कट्टर मिपाकर तयार झाले की मग स्पेशल मराठवाडा कट्टा करू. -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

चार पाच वेळा मराठवाड्यात

प्रचेतस
Fri, 06/24/2016 - 18:16 नवीन
चार पाच वेळा मराठवाड्यात कट्टे झालेत की सर. आता एकदा प्रतिष्ठानात केला की मी डोळे मिटायला मोकळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजकाल

नाखु
Mon, 06/27/2016 - 09:22 नवीन
रा रा श्री श्री वल्ली सर आजकाल आपले कधी डावा उजवा असे वारंवार डोळे मिटू लागले आहेत.(किंवा तसे वाटु लागले असावे) याकडे आमची बारीक नजर आहे. अर्थात औरंगाबाद कट्ट्याबाबत सहमत आहे. आप्ला विनम्र सक्रीय पाठिंबा कार्यकर्ता बिरुटे सर मित्रमंडळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

असोस्थामा तुम नाम बदल दिए का?

धनंजय माने
Fri, 06/24/2016 - 14:48 नवीन
असोस्थामा तुम नाम बदल दिए का? स्वप्निल कधीपासून म्हणे? कट्टयाची खादाड़ि न दिसल्याने बरे वाटले.
  • Log in or register to post comments

तरी म्हट्लंच कोणी कसं नै

अस्वस्थामा
Fri, 06/24/2016 - 16:17 नवीन
तरी म्हट्लंच कोणी कसं नै बोल्ल ते.. ;) ती विजूभाऊंची टायपो मिश्टेक आहे राव. शेपरेट विचारू शकता त्यांना. कळ्ळं का "बनवा बनवी"वाले माने ? का इंग्रजीत सांगू ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

वृत्तांत आवडला!

जुइ
Sat, 06/25/2016 - 00:17 नवीन
छोटेखाणी वृत्तांत आणि फोटो आवडले.
  • Log in or register to post comments

अस्वस्थामा हॅण्डसम दिसतोस!!!!

खालीमुंडी पाताळधुंडी
Sat, 06/25/2016 - 12:57 नवीन
अस्वस्थामा हॅण्डसम दिसतोस!!!! नाव तेवढं बदला ते "मदनाचा पुतळा" वगैरे करून घ्या.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा