मिपा लंडन कट्टा सालाबाद प्रअमाणे ठरला
एकदा कट्टा करायचे ठरले की ठरले. मिपाकर अडचणींकडे क्षुल्लक महणून पहातात.
कट्टा करायचे ठरले मात्र स्थळ ठरत नव्हते. वर्हाडी जमा झाले मात्र कार्यालयाचा पत्ता ठाउक नाही असे काहीसे सुरवातीला झाले.
त्याचे काय झाले. विजुभाउ लंडन मधे आले याची आदुबाळाला कुणकुण लागली. त्याने व्यनीफीनी तुन फोनाफोनी करुन विजुभाऊना सम्पर्क केला. आणि कट्टा करायचअ घात घातला. स्वाती राजेश या अनाहिता मधील जबरदस्त सदस्यानी ती आयडिया उचलून धरली. आदू बाळ आणि अस्वस्थामा ने कुठे कुठे जायचे याची चर्चा करत जुने मध्य लंडन नेहमीच बघतो राणीचा राजवाडा , राजाची बाग , ती कसलीशी घंटा आणि रोज मोडणारा लंडन ब्रीज , यांचे अस्सल मिपाकराला कसले आले कौतूक. खरा मिपाकर हा गप्पा नवी माहिती , खादाडी आणि देशी इतिहासात रमतो. जगात तो कुठेही असू द्या मनाने तो शिवरायाच्या महाराष्ट्रातच असतो. गप्पा मारता मारता असे कळाले की इथे लंडन मधे एक सुवर्णदूर्ग नावाचा किल्ला आहे. साहेबाने त्याचे नाव सोवेनदुर्ग असे मोडले आहे . पण ते असो. सुवर्णदूर्गाच्या आठवणीत रमायचे म्हणून त्याचे नाव तसे ठेवले गेले अशी एक माहिती उडत उडत कानावर आली. झाले ठिकान मुक्रर झाले. तारीखही पक्की झाली.
थेम्स काठावरील ग्रीनीच जवळ हा किल्ला आहे. शनिवारी जमायचे ठरले. त्यानुसार लअंडन मधील मिपाकराना निरोप गेले. वाचनमात्र असणारे एक सदसय श्री लोथार यानी कटट्याला जायचे म्हणून धावपळ करून सदस्यत्व घेतले. त्याना अस्सल मिपाकर पहायचे होते.
स्वपनील ( अस्वस्थामा ) बाथ जवळच्या एका गावाहुन येणार होते.आदूबाळ स्लाव मधून , स्वाती राजेश सनबरी हुन तर विजुभाऊ फेल्टम हुन येणार होते.
सर्वाना सोयीचे व्हावे म्हणून स्थळ मुक्रर झाल्यानंतर ते पुन्हा एकदा बदलण्यात आले. पण त्यातही अडचणी होत्याच. बर्याच चर्चेनंतर ते पुनः मूळ ठिकाणावर आले.
त्यानुसार ग्रीनीच ला जमा झाले, ट्यूब ने ओव्हरग्राउंडने , गाडी ने ,बस ने, बोटीने अशा वेगवेगळ्या वहानानी प्रवास करत एककेक जण जमा झाले.
ग्रीनीच म्हणजे शून्य रेखाम्शाचे ठिकाण. येथून जगाची वेळ ठरवली जाते. शाळेत शिकलो होतो तो भूगोल आता प्रत्यक्ष अनुभवायला मिळत होता. ग्रीनीच रेखांश आणि जगाची वेळ यांचे जवळचे नाते आहे.
इथे घड्याळी वेळ स्थानीक वेळ आणि जागतीक वेळ अशा अनेक वेळांची संगती लागते. नौवहनासाठी सोय व्हावी म्हणूउन जागतीक वेळ ही संकल्पना आली. त्यावरून ठिकाण निश्चित करण्यासाठी अक्षांश रेखांश या संकल्पना कशा आल्या याचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा केला जातो.
मिपाकर या माहितीचा आनंद घेत होते , इथली वेधशाळा , विल्यम हर्शेलची दुर्बीण आणि वेळ मोजण्याच्या विवीध पद्धती विवीध यंत्रे यांची भरभरून माहिती मिळत होती. मिपाच्या या कट्ट्यावर अशी माहितीची खादाडी चालू होती. त्या गडबडीत
जेवण बीवण करायचे कोणाच्याच लक्षात आले नाही.
त्यातच गप्पाना ही रंग भरला. जुने नवे लेख आठवले. रामदास काका, आनंदयात्री , तात्या , डयांबीस काका , बयाटमयान,
प्रचेतस , वल्ली , ट का , आदिती, गणपा, जेनी, क्लिंटन सर्वांचे ले़ख पुन्हा पुन्हा वर आले.
गप्पांचा मस्त फड जमला. मधेच धमाल मुलाने फोनवर हजेरी लावली.
आपण कोणाला पहिल्यांदाच भेटतोय असे वाटतच नव्हते.
कट्टा पुन्हा करायचा. पुढच्या वेळेस लंडन बाहेर बाथ ला कट्टा करुया असे भरघोस आमंत्रण सौ व श्री अस्वस्थामा यानी दिलय.
##### नाही म्हणायला थोडिशी खादाडी झालीच. आदुबाळाने " गव्हाची बीयर " या प्रकारची ओळख करुन दिली. त्या बद्दल पुन्हा कधीतरी.
"मल्हार आदुबाळ " या नव्या भन्नाट अफलातून आईनस्टाईन दोस्ताची मात्र झकास जानपहचान झाली. त्याबद्दल ही सविस्तर पुन्हा कधीतरी.
डावीकडून उजवीकडे:
मल्हार, चैत्रबन, प्रश्नलंका, अस्वस्थामा, लोथार मथायस, विजुभाऊ, आदूबाळ
विजुभाऊ आणि बेल्जियन गव्हाची बियर
ग्रीनिचचा रेखांश आणि मुंबईचा अक्षांश
डावीकडून उजवीकडे:
मल्हार, चैत्रबन, प्रश्नलंका, अस्वस्थामा, लोथार मथायस, विजुभाऊ, आदूबाळ
विजुभाऊ आणि बेल्जियन गव्हाची बियर
ग्रीनिचचा रेखांश आणि मुंबईचा अक्षांश
वाचने
12976
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
येतहे शून्य रेखांश रेशेवर उभे
फोटोतल्या लाइनीपासले पाय
In reply to येतहे शून्य रेखांश रेशेवर उभे by विजुभाऊ
अभ्या भो
In reply to फोटोतल्या लाइनीपासले पाय by अभ्या..
एलिमेण्टरी डॉ. भिडस्त. ;)
In reply to अभ्या भो by भीडस्त
शून्यरेखांश स्थळ (मेरिडियन मॉन्युमेंट)
In reply to येतहे शून्य रेखांश रेशेवर उभे by विजुभाऊ
व्रुत्तान्त छान. या वेळी नाही
लंडन कट्टा
ऑं.. लंडनकर लांब वगैरे काय
In reply to लंडन कट्टा by अनिवासि
Foto??
+१
In reply to Foto?? by पिलीयन रायडर
एवढ्या बहुचर्चित कट्टयाचा
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वृत्तांत फर्मास...पण फटू नैत
फोटो शिवायचा वृत्तांत आवडला...
https://s32.postimg.org
अरे वा? अता ओळख परेड द्या
In reply to https://s32.postimg.org by आदूबाळ
वा! फारच छान! मिपाकरांना
सर्व शंकासुरांनी फटू बघून
दिसंना झालाय.
In reply to सर्व शंकासुरांनी फटू बघून by आदूबाळ
काका मस्त वृतान्त
मस्त झाला कट्टा पण जायला
मस्तं!
मस्त झाला कट्टा
लंडनकर सगळे मिपाकर हँडसम आहेत
:))
In reply to लंडनकर सगळे मिपाकर हँडसम आहेत by अभ्या..
आयायायाया
In reply to :)) by अस्वस्थामा
मस्त!
क्षमस्व
आता बाथच्या कट्ट्याला या.
In reply to क्षमस्व by पीशिम्पी
एखादा बाथकट्टा पुण्यात करायला
In reply to आता बाथच्या कट्ट्याला या. by आदूबाळ
होऊन जाऊ द्या एखादा कट्टा आता
In reply to एखादा बाथकट्टा पुण्यात करायला by अभ्या..
आम्ही कसा पुण्याच्या धाग्याचा
In reply to होऊन जाऊ द्या एखादा कट्टा आता by महासंग्राम
वा..
वा, दीवस कट्ट्याचे दीसतायत...
विजूभौंनी खूप कंजूसी केली
वा, वा ! मस्तं झालेला दिसतोय
वृत्तांत आवडला
=))
In reply to वृत्तांत आवडला by श्रीरंग_जोशी
धन्य !!
In reply to वृत्तांत आवडला by श्रीरंग_जोशी
खिक्क....
In reply to वृत्तांत आवडला by श्रीरंग_जोशी
कहर! पंपाने हवा भरणारे
In reply to वृत्तांत आवडला by श्रीरंग_जोशी
हा हा हा!! =)) =))
In reply to वृत्तांत आवडला by श्रीरंग_जोशी
हा हा हा भारीच
In reply to वृत्तांत आवडला by श्रीरंग_जोशी
=))
In reply to वृत्तांत आवडला by श्रीरंग_जोशी
:)
In reply to वृत्तांत आवडला by श्रीरंग_जोशी
डिट्टो!
In reply to वृत्तांत आवडला by श्रीरंग_जोशी
हा हा हा.
In reply to वृत्तांत आवडला by श्रीरंग_जोशी
भारी !!!
हायला आदुबाळ मी तुम्हाला ५०
तो फोटो मॉर्फ करून माझ्याजागी
छानच....
बघा जरा सर.
In reply to छानच.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मराठवाडा पुण्यात सामील.
In reply to बघा जरा सर. by अभ्या..
चार पाच वेळा मराठवाड्यात
In reply to मराठवाडा पुण्यात सामील. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आजकाल
In reply to चार पाच वेळा मराठवाड्यात by प्रचेतस
असोस्थामा तुम नाम बदल दिए का?
तरी म्हट्लंच कोणी कसं नै
In reply to असोस्थामा तुम नाम बदल दिए का? by धनंजय माने
वृत्तांत आवडला!
अस्वस्थामा हॅण्डसम दिसतोस!!!!