✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी...

स
सुहास झेले यांनी
Fri, 11/23/2012 - 16:30  ·  लेख
लेख
१९७३ मध्ये मार्टीन कूपरने मोबाईलचा शोध लावला. तेव्हा त्याने कल्पनादेखील केली नसेल की, हे तंत्रज्ञान इतकं झटपट प्रगत होऊ शकेल. सुरुवातीला मोठ्या लोकांची वापरायची गोष्ट म्हणून मोबाईल ओळखले जायचे. कोणाला फोन करायचा तर १५-१६ रुपये मिनिटाला द्यावे लागायचे. आज निव्वळ भारताचा विचार केला तर, लोकसंखेच्या जवळजवळ ६५ ते ७० टक्के लोकांकडे मोबाईल आहेत. ही आकडेवारी अजून मोठ्या प्रमाणात वाढली असेलच, कारण ही २०१० च्या वार्षिक अहवालानुसार केलेली पाहणी होती. असो मोबाईलच्या इतिहासावर जास्त बोलायचे नाही. आज आपण मोबाईलचा आत्मा...ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल थोडे जाणून घेणार आहोत. घाबरू नका... काही लेक्चर वगैरे देत नाही. फक्त हल्ली रोजच्या वापरातली अ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी, काही उपयुक्त गोष्टी जाणून घेणार आहोत. जसजसे नवीन तंत्रज्ञान आले, तसे मोबाईल प्रगत होत गेले. मोबाईल्स आता स्मार्ट फोन्स किंवा टॅब्लेट पीसी झाले. लोकांच्या गरजा बघून त्यात रोज काही ना काही बदल घडत गेले आणि त्यासाठी अनेक डेव्हलपर्स दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सुरुवातीच्या काळात करवंदाची (Blackberry) ओढ असायची लोकांना, ती आजही आहे म्हणा....पण त्यांच्या डेटा सर्व्हर्सवरून झालेला वाद बघता, काही कंपन्यांनी सुरक्षेच्यादृष्टीने करवंद हद्दपार करत, स्मार्टफोन्स दिले. आता थोडी माहिती ह्या स्मार्टफोन्सला स्मार्ट बनवणाऱ्या प्रणालीची. अ‍ॅन्ड्रॉईड (Android)- इंटरनेट जगतात एकहाती वर्चस्व असणाऱ्या गुगलचा सध्याचा हुकुमाचा एक्का. गुगल सर्च, जीमेल, यु ट्यूब, ऑर्कुट, बझ्झ, अश्या एकसोएक सोयी (व्यसनं) देणाऱ्या गुगलने, २००५ साली अ‍ॅन्ड्रॉईड ही कंपनी विकत घेतली. संपूर्णतः लिनक्सवर आधारीत ही प्रणाली, खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली. सध्या अ‍ॅन्ड्रॉईडची प्रणाली जेली बिन (Jelly Bean) व्हर्जन ४.१ ग्राहकांसाठी उपलब्ध आहे आणि पुढील व्हर्जनसाठी काजू कतली हे नाव देण्यासाठी कँपेन जोरदार सुरु आहे. अ‍ॅन्ड्रॉईड प्रणाली वापरायला अतिशय सोप्पी आणि ह्या प्रणालीसोबत वापरण्यास लाखो ऍप्लिकेशन्स गुगल स्टोरवर ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत
अ‍ॅन्ड्रॉईडच्या आधी सिंम्बिअन (Symbian) ही प्रणाली अनेक फोन्समध्ये वापरली जायची आणि अजूनही वापरली जाते म्हणा. पण नोकीयाने सिंम्बिअनसोबत असलेला आपला करार गेल्यावर्षी मोडीत काढला आणि त्यांनी मायक्रोसॉफ्ट प्रणाली देण्यास सुरुवात केली. तरी काही नवीन फोन्समध्ये नोकीया सिंम्बिअन देत आहेच. कारण ही प्रणाली हाताळायला सोपी आणि विविध प्रकारचे ऍप्लिकेशन्स फार कमी वेळात सिंम्बिअनसाठी उपलब्ध झाले होते. नोकीया अजून तरी एक वर्ष ही प्रणाली ग्राहकांना देणार आहे आणि त्यानंतर ते पूर्णतः विंडोज बेस्ड फोन देणार आहेत. ह्याला कारण म्हणजे अ‍ॅन्ड्रॉईड आणि सफरचंदाचे (Apple) झपाट्याने वाढणारे मार्केट. विशेषतः अ‍ॅन्ड्रॉईड, कारण ऍपल उपकरणांची किंमत तुलनेने भारतात खूप आहे, त्यामुळे खिश्याच्या दृष्टीने अ‍ॅन्ड्रॉईड परवडेबल आहे. अगदी ८--९ हजारापासून ४० हजारापर्यंत अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन्स मिळतात. फार कमी वेळात गुगलने ह्या क्षेत्रात मुसंडी मारली आणि त्यामुळे सिंम्बिअनची लोकप्रियता घटू लागली. त्यामुळेच नोकियाने दुश्मन का दुश्मन दोस्त, ह्या तत्वावर सिंम्बिअन बरोबर आपला करार मोडीत काढून मायक्रोसॉफ्टशी हात मिळवणी केली. (बातमी) सध्या मायक्रोसॉफ्ट विंडोज ८.० आणि मायक्रोसॉफ्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टोर वर तुफान काम करत आहेत. तज्ञांचे मत जाणून घ्याल तर, पुढील एका वर्षात गुगलच्या तोडीसतोड ऍप्लिकेशन स्टोर बनवण्याचा त्यांनी चंग बांधलाय. ऍपलचे मार्केट स्टोर सुद्धा खूप मोठे आहे, पण तुलनेने त्यांची ग्राहकसंख्या भारतात कमी आहे. तरीसुद्धा अनेक क्रियेटीव्ह ऍप्लिकेशन्समुळे, त्यांनी त्यांचा वेगळेपणा स्मार्टफोन्स जगतात ठसवला आहे. (अवांतर - मी तर पंखा आहे स्टीव्ह जॉब्सचा आणि त्याच्या कंपनीच्या विविध प्रोडक्ट्सचा, पण खिश्याने दगा दिला.... असो !!) आता पुढे जे होईल ते होईल, पण तूर्तास आपण काही प्रसिद्ध अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट ऍप्लिकेशन्सची माहिती करून घेऊ. मी Samsung Galaxy S II हा फोन वापरतोय. तुम्ही वापरलेल्या ऍप्लिकेशन्सची माहिती लेखाच्या प्रतिसादात द्या, आणि कुठले फीचर्स तुम्हाला आवडले वगैरे सांगितले तर उत्तम. १. WhatsApp Messenger - सुरुवातीला गरीबांचा बीबीएम (BBM - BlackBerry Messanger) म्हणून अनेकांनी ह्या ऍप्लिकेशनची थट्टा उडवली, पण आज सर्वात जास्त वापरले जाणारे ऍप्लिकेशन म्हणून ह्याची नोंद आहे. हे ऍप तुम्ही सिंम्बिअन, ब्लॅकबेरी, ऍपल आणि अ‍ॅन्ड्रॉईड अश्या सर्व प्रणालीवर वापरता येते. इंटरनेटच्या सहाय्याने तुमचा मोबाईल नंबर वापरून तुम्ही जगात कोणाशीही संवाद साधू शकता आणि तेही फुकट. २. M-Indicator - मुंबईकरांसाठी हे सर्वात महत्त्वाचे ऍप. लोकल ट्रेन्सचं टाईमटेबल, मेगा ब्लॉकचे डायरेक्ट अपडेट्स, बेस्ट बसेसची माहिती, रिक्षा आणि काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे दर पत्रक, मराठी नाटक आणि सिनेमांची माहिती, हिंदी सिनेमांची माहिती, भारतीय रेल्वेच्या PNR स्टेटस जाणून घेण्याची सुविधा अश्या अनेक लोकोपयोगी सुविधांमुळे हे ऍप प्रसिद्ध आहे आणि सर्वप्रकारच्या प्रणालीवर वापरता येते. ३. NewsHunt - अपडेटेड बातम्या तुम्हाला ह्या ऍपमुळे मिळू शकतील. मराठीतील सकाळ, लोकसत्ता, सामना, लोकमत आणि पुढारी ही वृत्तपत्रे तुम्ही वाचू शकता. इतर अनेक भाषांतील वृत्तपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत. ४. Smart App Protector - तुम्ही वापरत असलेल्या कुठल्याही ऍप्लिकेशन्स परवलीचा शब्द लावून सुरक्षित करू शकता. ५. Wattpad - Free Books & Stories - भरपूर ई-बुक्स आणि कथा संग्रहाचा खजिना. तुम्ही पुस्तके डाऊनलोडसुद्धा करू शकता आणि ऑफलाईन वाचू शकता. ६. मराठीत टाईप करण्यासाठी - अ) GO Keyboard आणि देवनागरी प्लगईन ब) PaniniKeypad Marathi IME क) AnySoftKeyBoard - Devanagari ड) Lipikaar Hindi Keyboard Free मी चारही प्रकारच्या IME मी वापरून बघितल्या आहेत. त्यातल्यात्यात लिपिकार आणि गो कीबोर्ड आवडले. ७. Hide It Pro - तुमची प्रायव्हसी जपण्यासाठी हा एक प्रकारचा सिक्युरिटी व्हॉल्ट आहे. जिथे तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स ठेवू शकता. ह्यालाही पासवर्ड असतो. ८. Truecaller - Global directory - नावाप्रमाणे ही एक डिरेक्टरी आहे, पण हे ऍप ऑनलाईन रजिस्टर केलेले फोन नंबर्सचा डेटा वापरते. जसे तुम्ही तुमचा नंबर सोशल साईटवर देता, हे असा डेटा जमा करतात. तसेच इंटरनेटवर स्पॅम केलेले नंबर्स दाखवून, तुम्ही त्यांना परस्पर ब्लॉक करू शकता. ९. Scan - आजवर उपलब्ध असलेला सर्वात जलद क्यूआर कोड (QR Code) स्कॅनर. १०. Justdial - ही पण एक प्रकारची लोक डिरेक्टरी, ज्यात तुम्ही आपल्या जवळपास असलेली हॉटेल्स, मॉल्स, डॉक्टर, हॉस्पिटल्स वगैरे माहिती पत्त्यासकट शोधू शकता. ११. Instagram - फोटो शेअरिंगसाठी अतिशय उपयुक्त. १२. Autodesk SketchBook Mobile - ह्या ऍपची माहिती अनलिमिटेड भटकंती करणाऱ्या पंकजने दिली. उत्तम ट्रेकर आणि फोटोग्राफर असणाऱ्या पंकजला ह्या ऍपमुळे डूडल्स रेखाटनाचासुद्धा छंद लागला. बाळासाहेब ठाकरे जेव्हा गेले, तेव्हा १० मिनिटात ह्याने श्रद्धांजली म्हणून एक डूडल काढले, जे खूप प्रसिद्ध झाले. काही डूडल्स इथे बघू शकता. १३. Misalpav - आपल्या लाडक्या मिपाचेही ऍप उपलब्ध आहे बरं :) १४. TED - Ideas worth spreading :) :) बाकी जीमेल, गुगल मॅप्स, फेसबुक, स्काईप ही नेहमीची ऍप्लिकेशन्स आहेतच, पण तुम्हाला माहित असलेली आणि तुम्ही स्वत: वापरलेली ऍप्लिकेशन्स जाणून घ्यायला आवडतील. तुमचे अनुभव नक्की शेअर करा. - सुझे !!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
447152 वाचन

💬 प्रतिसाद (716)

प्रतिक्रिया

Walnut Money Manager

नया है वह
Tue, 05/17/2016 - 11:28 नवीन
Walnut | Get Bank Balances. Track Expenses. Get Bank Balances. छान अ‍ॅप!
  • Log in or register to post comments

Moto x play - I want "sound' with open wifi notification

arun jaykar
Sun, 06/19/2016 - 22:00 नवीन
I am having moto x play with marshmallow version. My phone gives sound notification for sms, WhatsApp message , etc. Phone is OK in all the manner. Mobile is also giving notification for open wifi in text. But there is "NO SOUND with OPEN WiFi NOTIFICATION" . And I want sound with wifi notification. By which app or system or settings, I can get it ? Will you please guide me? On e-mail address - arunjaykar@gmail.com
  • Log in or register to post comments

बघा जमतं काय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/20/2016 - 07:43 नवीन
नवीन वायफाय कुठे सापडलं तर (डिफॉल्ट तुम्ही जर वापरात असाल त्याचा आवाज येणार नै) आवाज येतो. नसेल तर येत तर तुम्हीसेटींग > साउंड अ‍ॅण्ड नोटीफिकेशन मधे जाऊन सर्व प्रकारचे साउंड्स ऑन केले आहेत काय ? ते नसतील तर ते ऑन करा. नैच जमलं तर इथेच लिहा. मदत नक्की करतो. हाय काय अन नाय काय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arun jaykar

Moto x play - I want "sound' with open wifi notification

arun jaykar
गुरुवार, 06/23/2016 - 15:39 नवीन
बिरुटेसाहेब नमस्कार, त्वरित प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व सेटिंग्स करुन पाहिलेले आहेत. परंतू काहीही फायदा झाला नाही. माझ्याकडे याआधी एक मायक्रोम्याक्स कँनव्हास A - 116 होता. त्यामधे ओपन वायफायच्या रेंजमधे आलो की फोन मधून आपोआप आवाज येत असे.परंतू त्यामधे लॉलीपॉप ऑपरेटींग सिस्टीम होती. परंतु या नव्यामोटो एक्स प्ले मधे मात्र मार्शमँलो आहे. मला वाटते प्रॉब्लम येथे च आहे. कृपया मदत करावी.
  • Log in or register to post comments

हम्म

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/23/2016 - 19:18 नवीन
Ok पाहुन सांगतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arun jaykar

मोटो जी फर्स्ट जनरेशन करता

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 06/23/2016 - 16:58 नवीन
मोटो जी फर्स्ट जनरेशन करता सॉफ्टवेअर अपडेट आहेत का?? किटकॅट ला मार्शमेलो मध्ये अपग्रेड करण्यात फायदा तोटा काय असेल? सॉ अपडेट कुठे मिळतील ?? माझी सिस्टिम तरी सॉफ्टवेअर अपडेट म्हणते आहे पण व्हर्जन किटकॅटच दाखवते आहे धन्यवाद.
  • Log in or register to post comments

ओव्हर द एयर अपग्रेड पेक्षा

आनंदी गोपाळ
Fri, 06/24/2016 - 08:05 नवीन
ओव्हर द एयर अपग्रेड पेक्षा शोरूममधे न्या अन तिथून करून घ्या. डोक्याला ताण रहात नाही. ओटीएला अनेकदा बग्ज येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

Ok डॉक्टर साहेब! आपला अत्यंत

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 06/25/2016 - 09:15 नवीन
Ok डॉक्टर साहेब! आपला अत्यंत आभारी आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

LeEcoच्या नवीन फोनात ( ३०ह) 3

कंजूस
Sat, 06/25/2016 - 09:13 नवीन
LeEcoच्या नवीन फोनात ( ३०ह) 3.5mm headphone jack काढून टाकलाय आणि "USB type C port "चार्जींग आणि हेडफोनसाठी दिलंय.नेहमीच्या हेडफोन वायरी चालणार नाहीत.अर्थात चार्जिंग करताना हेडफोन वापरता येणार नाहीत.
  • Log in or register to post comments

हॉट स्पॉट बद्दल माहिती हवी आहे

nandan
Sun, 07/10/2016 - 16:14 नवीन
मला मोबाईल हॉट स्पॉट चे कनेक्शन मर्यादित ठेवायचे आहेत ..ते मी कसे करू शकतो? कारण हॉट स्पॉट चालू केले कि माझे बाकीचे फोन आणि टबलेट कनेक्ट होतात . माझे बाकीचे फोन कनेक्ट नको व्हावेत असं करता येईल का ? किन्वा कनेक्ट झालेले फोन मला डीसकनेक्ट करता येतील का ?
  • Log in or register to post comments

सोपं आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/10/2016 - 18:30 नवीन
मर्यादेत ठेवता येते. सेटिंग मध्ये गेले की थेटरिंग, त्यात कन्फेगर मोबाईल हॉटस्पॉट असा पर्याय येतो त्यात सेक्युरिटी असा पर्याय आहे त्यात आपण 'नन' असं केलं आहे त्यामुळे आपल्या सौजन्याने सर्वांना मोफत वाय फाय मिळत आहे तिथे wpa2esk हा पर्याय निवडा आणि त्या खाली पासवर्ड टाका. म्हणजे मर्यादेत त्याचा वापर होईल. नाही जमलं तर् पुन्हा विचारा. उगाच हो ला हो करू नका मी पूर्ण मदत करेन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nandan

हॉट स्पॉट बद्दल माहिती हवी आहे

nandan
Tue, 07/12/2016 - 08:58 नवीन
मी wpa2esk हाच पर्याय निवडला आहे पण ते बाय डीफोल्ट सगळ्यांना अक्सेस देते . मला अक्सेस काही लीमिटेड devices नाच द्यायचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पासवर्ड

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 07/12/2016 - 10:10 नवीन
पासवर्ड ऑप्शन दिसत नाही का ? आज घरी गेलो की फोटो टाकतो किंवा तुम्ही टाका, म्हणजे गडबड कुठे होत आहे हे लक्षात येईल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nandan

शाम शुंगसाठी नवा कस्टम रोम हाय का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/24/2016 - 14:01 नवीन
Samsung j ७ साठी कोणी कस्टम रोम टाकला आहे का ? कसाय अनुभव. कस्टम रोम टाकून मला डिव्हाइसच्या मेमरीवरील एप्लिकेशन एस डी कार्डवर टाकायची आहेत. शामशुंगचा हा मला मोठाच प्रॉब्लम वाटतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

फोन रुट केलेला असेल....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/16/2016 - 20:41 नवीन
आणि ज्यांना स्टॉक रोम टाकता येते अशांनी शामशुंग जे ७ (२०१५) साठीचे हे कश्टम रोम टाकून पाहावेत. मल्टी विंडोज, मिनीमाईज, आणि भरपूर फिचर्सचा आनंद घ्या. ( आपला फोन मेल्यास मी जवाबदार राहणार नाही) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Android Kitkar (Micromax) वर

मराठी कथालेखक
गुरुवार, 11/17/2016 - 17:31 नवीन
Android Kitkar (Micromax) वर stock ROM flush करण्याची आहे. याची procedure मिळू शकेल काय ? काय काळजी घ्यावी लागेल ?
  • Log in or register to post comments

डॅाक्टरांनी android फोनावर

कंजूस
Sat, 11/19/2016 - 05:53 नवीन
डॅाक्टरांनी android फोनावर बरीच तपश्चर्या केलेली दिसतेय."नोट्स" चे असे अॅप आहे का androidवर ज्यामध्ये offline बरीच मोठी नोट (५-१०हजार शब्द अथवा अधिक)हळूहळू वेळ मिळेल तशी लिहून सेव करता येईल. नंतर "copy all"बटण वापरून झटक्यात कॅापी झाले पाहिजे लेखन. (माझ्या विंडोजवरचे "Nimbus Note Web " एवढे पावरफुल आहे पण "copy all" ची सोय नसल्याने स्क्रोल-सिलेक्ट-कॅापी असे करावे लागते.लेख लिहिण्यास उपयुक्त सोय.
  • Log in or register to post comments

Samusung notes

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/20/2016 - 09:05 नवीन
Samsung जे ७ ला 'स्यामसंग नोट्स' म्हणून एप्लिकेशन आहे, थोड़े थोड़े लेखन करून साठवता येते. सलेक्ट ऑल सेकंदात होते. लेखन चोप्य पस्ते करता येते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

नोट्स साठी अँड्रॉइडवर गुगलचे

विशाल कुलकर्णी
Sat, 12/03/2016 - 08:33 नवीन
नोट्स साठी अँड्रॉइडवर गुगलचे Keep म्हणून एक ऍप आहे, जे या कामासाठी वापरता येते. त्यावर तुम्ही जे काही टाईप कराल ते आपोआप स्टोअर होते, सेव्ह करत बसायची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

//जे काही टाईप कराल ते आपोआप

कंजूस
Sat, 12/03/2016 - 10:27 नवीन
//जे काही टाईप कराल ते आपोआप स्टोअर होते, सेव्ह करत बसायची गरज नाही.// असे बय्राच अॅपमध्ये होते. १)लिखाणावर मर्यादा - नोट हे नाव सार्थकी लावतात. दोन चारशे शब्दांवर हँग होतात. २)५-६ हजार शब्दांवर सेव होऊन नंतर "कॅापी ओल" बटण असणारे अॅप एकच डॅाक्टरांनी दिलय पण माझ्याकडे अॅन्डाराइड/शामसंग नाही ही अडचण आहे॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

धन्यवाद । ते फक्त स्यामसंगलाच

कंजूस
Sun, 11/20/2016 - 09:45 नवीन
धन्यवाद । ते फक्त स्यामसंगलाच असावे.तरी उपयुक्तच.
  • Log in or register to post comments

ट्राय करा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/20/2016 - 10:05 नवीन
प्ले स्टोअरवर 'नोट्स' नावाचे एप्लिकेशन दिसतात, त्यातलं ट्राय करा. माझ्याजवळ असता तुम्ही तर 'शेअर इट' ने सेंड केलं असतं. मेल करतो, नाय तर....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

आपली ओएस वेगळी आहे पण असे

कंजूस
Sun, 11/20/2016 - 19:32 नवीन
आपली ओएस वेगळी आहे पण असे काही कॅापी ओल वाले नोट्सअॅप आहे हे वाचून बरं वाटलं. विंडोजवरची सर्व तपासून झाली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Android N चा कोणाला अनुभव ?

मदनबाण
Sun, 11/20/2016 - 12:51 नवीन
Android N चा कोणाला अनुभव ? आजची स्वाक्षरी :- नशे सी चढ़ गयी ओय कुड़ी नशे सी चढ़ गई... पतंग सी लड़ गई ओये कुड़ी पतंग सी लड़ गई... ;) :- Befikre
  • Log in or register to post comments

सरकारी अ‍ॅप्स

निनाद
Tue, 11/29/2016 - 07:11 नवीन
येथे काही भारतीय सरकारी अ‍ॅप्स आहेत ते ही उपयुक्त असावेत. जसे अ‍ॅग्री मार्केट किसान सुवीधा इ प्रमाण खोया पाया ट्रॅक युवर पोस्ट रोड सेन्स स्कॉलर्शिप्स https://apps.mgov.gov.in/index.jsp मी वापरून पाहिले नाहीत. पन नुभव वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments

माझ्याकडे सॅमसंग duos GT

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 12/01/2016 - 12:05 नवीन
माझ्याकडे सॅमसंग duos GT-S7562 android version is 4.0.4 ice cream sandwich आहे त्यावर युपीआय अ‍ॅप चालत नाही. अ‍ॅन्डॉईड व्हर्जन पुढचे हवे असल्यास काय करावे? मोबाईल दुकानदार म्हणतो त्याची अपडेट क्शमता संपली आहे. नवीन व्हर्जन लोड होणार नाही. आम्ही रुट करीत नाही. त्यात मोठी रिस्क असते. काय करावे?
  • Log in or register to post comments

एकच पर्याय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 12/01/2016 - 16:02 नवीन
एकच पर्याय मोबाइल विकुन टाका. दुसरं असं की रुट केल्यावर व्हर्जन अपडेट होत नाही. फार तर ओएस (ऑपरेटिंग सिस्टीम) बदलता येते. -दिलीप बीरूटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

अपडेट

अमोल मेंढे
Sat, 12/03/2016 - 21:10 नवीन
रूट केल्यावर अपडेट करायचा असल्यास अपडेट झिप फाइल डाउनलोड करा व मॅन्युअल अपडेट करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोबाईल बराच जूना आहे असं

मराठी कथालेखक
गुरुवार, 12/01/2016 - 16:54 नवीन
मोबाईल बराच जूना आहे असं दिसतंय. त्याची बाकी क्षमता (रॅम, रॉम , प्रोसेसर ई) सुद्धा आजच्या काळातील अ‍ॅप्स चालवण्यासाठी कमीच पडेल. अशा परिस्थितीत मोबाईल बदलणेच योग्य. रुट करुन दूसर्‍या ओ एस टाकता येतात का बघा. पण रिस्क आहे.. मोबाईल गेला तर गेला..शेवटचा प्रयत्न तर करु असा विचार करुन प्रयत्न करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

या निमित्तानु युपिआइ न

कंजूस
Sat, 12/03/2016 - 05:50 नवीन
या निमित्तानु युपिआइ न चालण्याची कारणे काय असतात? रॅम कमी पडते?
  • Log in or register to post comments

मोटो जी (प्रथम पिढी) लॉलीपॉप

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 12/05/2016 - 16:21 नवीन
मोटो जी (प्रथम पिढी) लॉलीपॉप अपडेट केलाय, नोटिफिकेश टोन कस्टम टाकायची आहे, कसे साधावे. पार एफएक्स फाइल एक्स्प्लोरर मधून शोधले पण नोटिफिकेशन फोल्डरर सापडले नाही. आता कसं करावं??
  • Log in or register to post comments

Com. android. phone process

रातराणी
Mon, 12/05/2016 - 16:53 नवीन
Com. android. phone process has stopped ही एरर कशी घालवायची? Online सापडलेले बरेच उपाय करून पाहिले पण नो लक :( factory reset करायचा नाहीये कारण खूप फोटो बेक अप नाही केलेले. बेक अप घ्यायचा प्रयत्न केला तर device not recognized असा मेसेज येतो आहे. काय करू? Factory reset नंतर उडालेला डेटा रिकव्हर करता येईल का?
  • Log in or register to post comments

कोणता फोन आहे हो ?

मराठी कथालेखक
Mon, 12/05/2016 - 19:05 नवीन
कोणता फोन आहे हो ? माझ्या फोनला (micromax) अशी error (किंवा अशा प्रकारच्या errors) येत होती. त्या errors घालवण्याचा खूप खटाटोप केला. factory reset पण होत नव्हते, factory reset केल्यावर फोन फक्त reboot व्हायचा. शेवटी boot व्हायचाही बंद झाला. service center ला दिला software टाकण्यासाठी. पण ते ही झाले नाही. service center ने चार दिवस ठेवून फोन परत केला. अखेर फोनचे अकाली निधन झाले हे मान्य करुन , दुखवटा उरकून नवीन फोन घेतला. अर्थात तुम्ही धीर सोडू नका :) factory reset होत असेल तर करुन टाका. फोन वाचेल बहूधा. factory reset नंतर डेटा रिकवर करण्यासाठी काही मार्ग शोधता येतील (जसे format केलेल्या hard disk वरुन recover करता येतो). पण रिकवर नाही होणार असे धरुन चला हवं तर आणि फोन वाचवण्याचा प्रयत्न करा असंच मी सुचवेन. तुमचा फोन वाचावा याकरिता शुभेच्छा.. !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

गॅलक्सि स6 आहे :(

रातराणी
Tue, 12/06/2016 - 11:42 नवीन
गॅलक्सि स6 आहे :( डेटा डिलिट झाला तर होणारे नुकसानाची कल्पना पण करू शकत नाही :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

कठीण आहे. सर्विस सेंटर वाले

मराठी कथालेखक
Tue, 12/06/2016 - 12:18 नवीन
कठीण आहे. सर्विस सेंटर वाले काय म्हणत आहेत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

एक सुचवतो-

कंजूस
Tue, 12/06/2016 - 12:20 नवीन
एक सुचवतो- डेटा मेमरी कार्डवर असला तर फोन स्विचओफ करून मेमरी कार्ड काढा॥ ते कार्ड एका जुन्या सॅमसंग फोनमध्येच टाका. ( दुसय्रा ब्रांडच्या फोनमध्ये बहुधा "? format memory card?" मेसेज झळकेल)जर हा फॅार्मॅट कार्ड?? हा मेसेज आला नाही तर मेमरी कार्डातल्या फाइल्स ब्लुटुथने दुसरीकडे पाठवून काढू शकाल.त्या पाठवल्यावर डिलीट करा. हे झाल्यावर एकेक अॅप्स डिलिट करा. आता परत मेमरी कार्ड मूळ फोनमध्ये टाका. काम होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

त्या़ंचा डेटा मेमरी कार्डवर

मराठी कथालेखक
Tue, 12/06/2016 - 12:22 नवीन
त्या़ंचा डेटा मेमरी कार्डवर नसेल हो... नाहीतर त्यांनी उगाच टेन्शन घेतलं नसतं !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

फॅक्टरी रीसेट करून फोन सुरु

रातराणी
Tue, 12/06/2016 - 13:56 नवीन
फॅक्टरी रीसेट करून फोन सुरु केला. मेमरी कार्ड घातलं नव्हतं, काँटॅक्टस सुद्धा फोनच्या मेमरीमधेच सेव केले होते , जीमेल बरोबर सिंक ऑपशन बंद करून ठेवल्या मुळे आता नव्या कोऱ्या फोन सारखा फोन आहे . त्याला नवा कोरा म्हणावं का डबा हा प्रश्न पडलाय :( :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

कोणतेतरी अॅप लुडबुड करत असावे

कंजूस
Tue, 12/06/2016 - 14:35 नवीन
कोणतेतरी अॅप लुडबुड करत असावे ते निघून गेल्याने प्रश्न सुटला असणार. फोन नवीन विकत घेतल्यावर सेटिंग्जमधले पहिले प्रिसेट ओप्शन नोंद करून एका जागी लिहून ठेवले तर फॅक्ट्री रिसेटऐवजी एकेक फिक्स करता येतात.कॅान्टॅक्ट बॅकपचे कोणतेच अॅप वापरत धाही. ते कधीकधी लुपमध्ये फिरत राहातात व फोन स्लो होतो. सर्व सिन्क ओपरेशन बंदच ठेवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

जे झालं ते झालंच पण...

मराठी कथालेखक
Tue, 12/06/2016 - 15:08 नवीन
कोणत्याही यंत्रावर फार विश्वास ठेवू नये. बॅकअप घेत रहाणं योग्य, galaxy s6 म्हणजे ३ GB RAM , Octa Core processor. म्हणजे sync मुळे फोन स्लो होण्याचं कारण नाही. Internal Storage : 32 GB असल्याने वेगळा मेमरी कार्ड न घेणं समजू शकतो. पण मग महत्वाचे फोटोज /फाईल्स कॉम्प्युटरवर नियमितपणे घ्याव्यात. sms चे सुद्धा ऑटो बॅकअप घेणारे अ‍ॅप मिळतात. मी एखाद्या महत्वाच्या भेटीकरता जात असेल तर ज्याला भेटायचे आहे त्या व्यक्तीचा फोन क्रमांक एका चिठ्ठीवर लिहून सोबत ठेवतो :) बाकी "recover data from factory reset phone" हे टाकून गुगल करत रहा.. कदाचित डेटा पुन्हा मिळेलही.,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

रिसेट करू नका.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 12/06/2016 - 16:22 नवीन
एस डी कार्ड मधे फोटो सेव्ह केलेले असतील तर मग काही अड़चन नाही. रिसेट मधे वाट्सपचे फोटो ब-याचदा डिलीट होतात तेव्हा त्यातले हवे असलेले सलेक्ट करून मेमरी कार्ड ( एस डी कार्ड मधे घ्या) आपली सर्व एप्लिकेशन एस डी कार्डवर इंस्टॉल होतात असे समजतो. प्ले स्टोअर वरुन sms ब्याकप नावाचे एप्लिकेशन इंस्टॉल करून कॉन्टेक्ट्स, एसमेस, कॉल लॉग, मोबाइलवरची एप्लिकेशनचा ब्याकप घेता येतो. आणि मग आवश्यक असेलच तर रिसेट करा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

सर्विससेंटरवाले फक्त फ्लॅश

कंजूस
Mon, 12/05/2016 - 21:03 नवीन
सर्विससेंटरवाले फक्त फ्लॅश करून देतात ,त्यांना कोणत्या ओप्शनमुळे काय घडतं/नाही घडत हे अजिबात कळत नाही.
  • Log in or register to post comments

च्याय्ला!

आनंदी गोपाळ
Mon, 12/05/2016 - 21:32 नवीन
च्याय्ला! ह एमाययूआय नामक प्रकार भलताच इरिटेटिंग आहे. बिरुटे गुर्जी, रेडमी नोट ३ रूट्ला का तुम्ही? ऑफिशिअल रूट करायला चायनावरून पर्मिशन आणाया लागतेय म्हणे? बूटलोडर अनलॉकलाच जास्तीची प्रोटेक्शन्स आहेत म्हणे?
  • Log in or register to post comments

नाय हो...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 12/06/2016 - 16:33 नवीन
पण तुमचा फोन असा रुट होऊ शकतो. https://devs-lab.com/root-xiaomi-redmi-note-3.html मी सध्या शामशुंग जे ७ ला कस्टम रोम टाकू टाकू फोनचा पार चौथा केलाय सध्या. तरी मला समाधान नैच. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

मोटो

vcdatrange
Mon, 12/05/2016 - 21:36 नवीन
मार्शमेलो अपडेट केल्यानंतर मोटो G4 Plus सारखा hang होतोय. कधी call केल्यावर screen black होते.... मधेच स्पिकर चा hissss sound येतो. Call center सल्यानुसार format करुनही तोच issue आहे. Service centre फक्त पुण्यात आहेत..... काय करु?
  • Log in or register to post comments

मार्शमेलो अपडेट केल्यानंतर

कंजूस
Tue, 12/06/2016 - 12:25 नवीन
मार्शमेलो अपडेट केल्यानंतर मोटो G4 Plus--- हा फोन मार्शमेलो ओएस वर्शनवरच आहे ना?
  • Log in or register to post comments

नाही

vcdatrange
Sat, 12/10/2016 - 17:37 नवीन
मला मिळाल्यानंतर update केला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

आजचे अ‍ॅप...Sleep Orbit:

मदनबाण
Fri, 12/09/2016 - 11:11 नवीन
आजचे अ‍ॅप... Sleep Orbit: Relaxing 3D Sound< हे अ‍ॅप सध्या ट्राय मारत आहे, यात तुम्ही तुमचा आवडता साउंड ट्रॅक तयार करु शकता, कस्टमाईझ करण्यासाठी वेगवेगळे साउंड प्रिसेट यात दिलेले आहेत. ज्यांचे विवध काँबिनेशन्स तयार करुन तुम्ही तुम्हाला हवा तसा साउंड ट्रॅक जनरेट करु शकता. ३डी ऑडियो हे याचे वैशिष्ठ ठरले असुन तुम्ही निवडलेला साउंड ट्रॅकचा आवाज हवा तसा कानाच्या जवळ किंवा लांब नेउ शकता. :) Image removed. वरील फोटोत जी वर्तुळे दिसत आहेत, ती त्या साउंड ट्रॅकची आहेत, बोटाने ही वर्तुळे छोटी मोठी करता येतात ज्यामुळे त्या साउंडचा तुम्हाला हवा असलेला परिणाम साध्य करता येतो. :) एकदा ट्राय मारुन पहाच... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- DJ Snake (ft. Justin Bieber) - Let Me Love You | Tum Hi Ho (Vidya Vox Mashup Cover)
  • Log in or register to post comments

झोप येण्यासाठी अॅप आहे वाटतं!

कंजूस
Fri, 12/09/2016 - 11:39 नवीन
झोप येण्यासाठी अॅप आहे वाटतं!
  • Log in or register to post comments

तसं तर आहेच, पण त्याबरोबरच

मदनबाण
Sun, 12/11/2016 - 08:50 नवीन
तसं तर आहेच, पण त्याबरोबरच Binaural Beats, relaxation आणि थोडासा { अगदी थोडासाच } ASMR चा अनुभव घेण्यासाठी हे अ‍ॅप ट्राय मारु शकता. व्हर्चुअल बार्बर काही काळापूर्वी ज्यांनी ऐकलं असेल त्यांना हा अनुभव नक्कीच आवडेल. :) अवांतर :- ये ASMR क्या हय ? :- Autonomous sensory meridian response माझे आवडते २ ASMR व्हिडियो इथे देउन जातो... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kiiara - Gold (Official Video)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
  • «
  • ‹
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा