सध्या आम्ही भाषेशी, खास करून उच्चारांशी संबंधित खेळ खेळतोय. मागे कधीतरी लेकीने आणि खेळायला घरी आलेल्या भाचे मंडळींनी “कंटाळा आला”चं पालुपद सुरू केलं. मग त्यांना म्हटलं, हे वाक्य सलग दहा वेळा म्हणून दाखवायचं... न चुकता... म्हणा... A good cook, could cook good.
हं. करा सुरूवात.
झालं. सगळ्यांनी उत्साहात सुरूवात केली आणि मग पहिल्या दुसऱ्या, तिसऱ्या प्रयत्नात सगळ्यांचं गुड-गुड-गुड ऐकू येऊ लागलं आणि खिदळायला सुरूवात...
आई/मावशी अजून सांग ना...
सांगते. पण आधी याचा सराव करा.
थोडा वेळ त्यांचे प्रयत्न सुरू राहिले. मोठी भाची सातव्या इयत्तेत. भाचा आणि लेक, दोघंही दुसऱ्या इयत्तेत. मातृभाषा मराठी असली तरी शिक्षणाची भाषा इंग्रजी. घरात बोलणं प्रामुख्याने मराठीत.
अगदी दहा-पंधरा मिनिटात तिघांनाही जमलं. मग वेगळ्या ओळी...
A sailor went to sea, to see what he could see and all that he could see, was sea, sea and sea
हे मात्र लगेच जमलं.... आता..
आता मराठी...
काळे राळे गोरे राळे, राळ्यात राळे मिसळले...
बच्चे मंडळी एकाच वेळी खुश झाली आणि गडबडली सुद्धा..
या ओळीने मात्र बराच वेळ घेतला...
त्यानंतरची ओळ, थोडी आणखी क्लिष्ट..
फडकं पण मळकं, मडकं पण मळकं, फडक्याचा मळ मडक्याला, मडक्याचा मळ फडक्याला...
झालं... आता आणखी धमाल...
अशा काही ओळी झाल्यानंतर बाराखडीच घेतली खेळायला. याचं बरचंसं श्रेय स्वरतज्ञ डॉ. अशोक रानडेंना..
क पासून सुरूवात.. क ला र जोडायचा. मग क्र ची बाराखडी...
प ला म जोडायचा. मग प्म ची बाराखडी...
वैविध्य आणि काठिण्यपातळी वाढवत न्यायची. खूप रमतात मुलं या खेळात, हा स्वानुभव. हे जमलं की च’कारी भाषा, प्म’कारी भाषा शिकणं आणखी सोपं होऊन जातं. असे आणखी काही भाषिक खेळ, वाक्य असतील तर नक्की सांगा... आमची बच्चे मंडळी उत्सुक आहेत असं आणखी काही शिकायला...
वाचने
9131
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
=))
हे..हे भारी!
आम्ही अजून ही एखाद्या समोर या भाषेत बोलतो.
In reply to हे..हे भारी! by चांदणे संदीप
:) खूपच मस्तं!
A good cook, could cook good.
कच्चा पापड पक्का पापड ....
आणिक काही
काकुने काकाचे कामाचे कागद
आम्ही मुंडा रुपयाच्या भाषेत
ही भाषा...
In reply to आम्ही मुंडा रुपयाच्या भाषेत by भाग्यश्री कुलकर्णी
म्हणजे कसं?
In reply to आम्ही मुंडा रुपयाच्या भाषेत by भाग्यश्री कुलकर्णी
१. चटई टाचणी टचकण टोचली
दुसरा शब्द
In reply to १. चटई टाचणी टचकण टोचली by शित्रेउमेश
उच्चाराचं माहित नाही..पण वेळ
ही भाषा..
वरचा प्रतिसाद...
In reply to ही भाषा.. by माधुरी विनायक
http://www.kididdles.com
In reply to वरचा प्रतिसाद... by माधुरी विनायक
गमतीशीर आहे.
गमतीशीर आहे.
गमतीशीर आहे.