Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जयनीत on Sun, 06/12/2016 - 13:16
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सेठजींनी पदार्पण केले एका नव्या कर्यक्षेत्रात मनोरंजनाच्या उद्योगात मोठं नव्हतं नाव त्यांच ह्या नव्या व्यवसायात तारखा मिळेनात त्यांना बड्या तारे, तारका, दिग्दर्शकांच्या पण मागे हटणे नव्हतेच सेठजींच्या स्वभावात त्यानी निर्णय घेतला सिरीयल बनवण्याचा अनुभव प्राप्त करण्याचा उद्देश तर होताच ह्या क्षेत्रातही संधी दडल्या होत्या व्यवसायाच्या अपरिमीत समस्या आलीच त्यांना इथेही बड्या दिग्दर्शक, तारे, तारकांच्या तारखांची पण थांबले ते सेठजी कसले त्यांनी सुरवात केली हाती धरून एका नव्या दिग्दर्शकाला मालिकेची सुरुवात होती आश्वस्त करणारी एकसुरी मालिकांच्या गजबजाटात एक नवा प्रयोग एक नवा दृष्टीकोन विषयाची हाताळणी नव्या प्रकारची म्हणून मालिकेची चांगलीच दखल घेतली गेली समिक्षक अन प्रेक्षकांकडून अताबट्ट्य़ाचा व्यवहार नव्हता निश्चितच तरीही खुपत होता सेठजींच्या डोळ्यात बेंलेन्सशीट मधील आकडा मालिकेवरील गुंतवणुकीवरील परतावा कमीच दिसत होता त्यांना त्यांच्या इतर व्यवसायांच्या तुलनेत परतावा म्हणजे त्यांचा जीव की प्राण परतावा म्हणजे? किंमत त्यांच्या वेळेची, श्रमाची, पैश्याची अल्पसंतुष्टीला थारा नव्हता सेठजींच्या मनात कधीच! उपजत उर्मी होती त्यांच्यात यशाची नवनवी शिखरे गाठण्याची जी वेगळं करायची त्यांना सर्वसामान्यनां हून नेहमीच तेच होते गमक त्यांच्या आजवरच्या यशाचे निर्णय घेतला सेठजींनी मोबदला वाढवण्याचा त्यांच्या श्रम अन वेळेचा त्यांनी गरज ओळखली मार्केटिंगची त्यात तर त्यांचा हातखंडा धडाका लावला त्यांनी प्रमोशन, जाहिरात ह्यांचा लढवल्या निरनिराळ्या कल्पना तरीही येईना प्रतिसाद मनासारखा वाढतच नव्हती प्रेक्षकांची संख्या एका प्रमाणा बाहेर मनस्वी चीड होती सेठजींना अल्पयशाची हा बट्टा होता आजवरच्या त्यांच्या कारकीर्दीवर त्यांनी घेतली सूत्रे स्वत:च्या हाती दिगदर्शक अजूनही होता नवखा अनिभिज्ञ व्यावसायीक क्लुप्र्त्या, बारकावे ह्यापासून अजूनही बाकी होता त्याच्यात बराचसा पीळ आदर्श, तत्व इत्यादींचा दिग्दर्शकाला सहन होईना हस्तक्षेप अन सेठजींना अल्पयश मार्ग वेगळे झाले दोघांचेही सेठजींनी आणले एका नावाजलेल्या दिग्दर्शकाला मोठी किम्मत मोजुन हमखास यशाची हमी दिली दिग्दर्शकाने हस्तक्षेप न होण्याच्या अटी वर मालिकेला यशस्वी करण्याच्या ईर्ष्येने लागला तो कामाला केले मनाजोगते फेरफार कठोरतेने हळूहळू सर्वकाही होऊ लागले व्यवस्थित केला वापर त्याने सर्वच प्रचलीत माल मसाल्याचा मुक्तहस्ते दिसु लागली कमाल बड्या दिग्दर्शकाच्या विख्यात परिसस्पर्शाची गुणवत्ता जसजशी घटु लागली टी. आर. पी. तसतशी वाढु लागली.
  • Log in or register to post comments
  • 1807 views

प्रतिक्रिया

Submitted by बोलघेवडा on Sun, 06/12/2016 - 16:35

Permalink

मस्तच फार गोष्ट

मस्तच फार गोष्ट छान आहे तुमची उभे वेगळेच काव्यछंद तुम्ही केले. लावली अशीच वाट विरामचिन्हांची.
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Sun, 06/12/2016 - 16:38

Permalink

जयनीत जी

हे नक्की काय आहे ? म्हणजे प्रामाणिकपणे विचारत आहे उपहासाने नाही आपण कुठल्या वाहीनीपासुन प्रेरणा घेतलेली आहे ते सांगितले तर बरे वाटेल. म्हणजे आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे कळलेले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by जयनीत on Fri, 06/17/2016 - 13:50

Permalink

मारवाजी प्रश्ना साठी धन्यवाद.

मारवाजी प्रश्ना साठी धन्यवाद. विशेष काही नाही. कुठल्याही एका सिरीयल वरुन हे सुचलेलं नाही. चित्रपट असो किंवा छोटा पडदा चांगल्या स्क्रिप्ट्स अन कंपोझर्स, गीतकार इत्यादीची कमतरता असतेच असं नाही, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन वेगवेगळ्या काळात त्या काळातील चलनी नाण्यांचाच उपयोग केला जातो. चुक अन अपयशाच्या भीतीने नवनिर्मीती होत नाही. फक्त कुठुनही मिळालेल्या यशस्वी प्रयोगाची नक्कलच फक्त कुठल्याही क्षेत्रात तत्काळ नफा हाच एकभेव हेतु ठेवणा-यां कडुन होतो इतकंच मांडायच होतं.  विषय बरोबर पोहचवण्यात नक्कीच कमी पडलो अन फाॅर्म मधेही कथा फसली हे मान्य आहे. बोलघेवडा ह्यांचा आक्षेपही मान्यच आहे. प्रश्नास उत्तर देण्यास उशीर करण्याचे एकमेव कारण आपला प्रश्न जेव्हा आला तेव्हा कथेचे वाचन फारसे झाले नव्हते. कथा फसली आहे अन पुर्ण पणे नाकारल्या जाईल हे तेव्हाच जाणवले असले तरीही त्या आधीच स्पष्टीकरण करणे म्हणजे बचावाचे अन अपयश नाकारण्या सारखे होईल अन ते योग्य होणार नाही असे वाटले इतकेच.
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Fri, 06/17/2016 - 15:12

In reply to मारवाजी प्रश्ना साठी धन्यवाद. by जयनीत

Permalink

नै नै..थे जाऊद्या थुमी..पण हे

नै नै..थे जाऊद्या थुमी..पण हे जे काय लिवलंय थे...सुखकर्ता दुखाकर्ताच्या चालीवर वाचायचं की मन उधाण वाऱ्याचे च्या चालीवर ?
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com