✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एक संवाद

अ
अनाहूत यांनी
Tue, 05/31/2016 - 11:07  ·  लेख
लेख
" अरे भाई काय मग कस काय ? दिसला नाय दोन दिवस ? " " काय नाय रे ते जरा दोन दिवस जेलमध्ये होतो ." " का भाई ? तुमाला आणि जेलमध्ये ? अस काय केल तुम्ही ? " " अरे काय नाय रे जरा भुक लागली होती आणि दुधाच पातेल कट्ट्यावरच होत . मग काय घातल तोंड आणि पित होतो . आणि मी काय सगळं संपवणार नव्हतो काय त्याला ठेवणार होतो ना . पण नाय साला कायतरी फेकून मारल डायरेक्ट पेकाटातच बसल ना आणि पाठीमागून वार केला ना . हिंमत आहे तर समोरून करायचा ना वार मग सांगितलं असत अपुन काय चीज आहे ते . चांगल बोचकारल असत आणि चावलो पण असतो . मग फिरत बसला असता इंजक्शन शोधत . चल ते सोड आपली सोना नाय बघितली दोन दिवस . " " कोण भाई ? अरे ती नाय का बाजूच्या बिल्डिंगमधली ." " ती काळा शेपटावाली ? " " हं " " एकदम आयटम आहे भाई . " " अबे भाभी है तेरी . आयटम काय बोलतोस ? " " सॉरी भाई सॉरी चूकून मिस्टेक झाली . " " हां परत लक्षात ठेव . " " ओके भाई . " " आणि काय मॅटर . " " हो भाई दोन बेघर मांजरी त्यांची पिल्ल घेऊन आस-याला एका ठिकाणी गेल्या होत्या तिथल्या माणसाने जाम कटकट केली . " " त्यांना काय दुखापत वगैरे . " " नाय नाय तस काय नाय . तस झाल असत तर गल्लीतले सगळे बोके घेऊन गेलो असतो न चांगला धडा शिकविला असता . " " बर आता कस आहे त्यांच ? " " तात्पुरत्या शिफ्ट झाल्यात त्या . " " म्हणजे आपणच माघार घेतली ना ? या मांजरीपण अशा असतात ना , पिल्ल झाली की आपल्याला जवळ करत नाहीत अंगावर धाऊन येतात पण माणसाच्या बाबतीत का माघार घेतात काय माहीत ? अरे यार हा माणूस पण काय प्राणी आहे ? शेपूट नाही त्याला . अरे ज्याला शेपूट नाही त्याला कसली आलीये किंमत ? " " आणि ते म्हणे कपडे घालून फिरतात किती वल्गर दिसत ते . सो चीप . " " जाऊदे रे बिचारा प्राणी आहे तो . त्याला अंगावर साधे केसही नसतात . आपले बघ कसे मस्त केस आहेत ते ." " हो ना भाई एक नंबर . " " अरे मग रोज काळजी घेतो त्याची रोज चाटून पुसून साफ करतो , उगाच काय ? अरे तू कॅटबुक वर आहेस का ? " " नाय भाई . " " अरे ये लौकर . काल फॉरेनच्या मांजरी पहात होतो काय होती एकएक काय ते डोळे काय ती फिगर आणि केस म्हणाव का फर असा प्रश्न पडतो . " " काय भाई भाभीला विसरला काय ? " " नाय रे बाकी की बिल्लीयाँ आनी जानी है सोना तो मन की रानी है . सिंपल आहे रे ती . अगदी क्लास . बाकीच्या मांजरींसारखी कुठ भटकत फिरत नाही . सकाळी देवळात जाते तेव्हढच . आणि तिची नजर , तिनं नुसत बघिटलं तरी काळजाचं नुसतं पाणी पाणी होतं . " " हाय हाय भाई तो एकदम सेंटी हो गया . " " हळवा कप्पा आहे तो हार्टचा . बर जास्त इमोशनल नको व्हायला . " " भाई जेवला का नाय तुमी ? " " हो मी जेवलो . आणि तुझं जेवण झालं का ? " " आपल्याकडे जेवणाची काही आबाळ नसते . मटण , चिकन , मासे झालच तर फ्रेश उंदिरपण ." " हो काय ? मजा आहे मग तुझी . " " मग काय भाई . भाई ते राहिलच त्या माणसाच काय करायच ? त्याच्या नावाची पाल देऊया का ? " " काय गरज नाय त्याची त्यांच्यातलेच लोक 'त्याच काय करायच ' म्हणून धागे टाकतात . ते बघून घेतील . " " बाकी भाई पाल काय सगळ्यांच्या आवाक्यातली गोष्ट नाही . ब-याच जणांना ती लागते . " " हं बाकी आपल्याला पालीच्या शेपटीचही व्यसन नाही . " " हो ना भाई " " बाकी गल्लीत अजून काही नविन ." " हा भाई एक नविन बोका आलाय गल्लीत . मग घेतला का नाय त्याचा क्लास . " " नाय भाई एकदम बिल्डर आहे . दोघा चौघाला पण नाय ऐकणार . " " मग असूदे त्याच्याकडे बघू नंतर . आता जाऊ जरा मांजरी बघून येऊ . "
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
3092 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

हाहा! मांजरविश्व चांगलंय...

खेडूत
Tue, 05/31/2016 - 11:20 नवीन
हाहा! मांजरविश्व चांगलंय...
  • Log in or register to post comments

आभारी आहे मांजर विश्वला भेट

अनाहूत
Tue, 05/31/2016 - 12:09 नवीन
आभारी आहे मांजर विश्वला भेट दिल्याबद्दल
  • Log in or register to post comments

छान

मराठी कथालेखक
Tue, 05/31/2016 - 13:27 नवीन
थोडं जव्हेरगंज शैलीतलं वाटलं.. बाकी मनी माऊचं राहूदया तिकडे थोडं मंजूचं बघा बरं आधी...
  • Log in or register to post comments

तुमच्यामुळे लिहायला छान वाटत

अनाहूत
Wed, 06/01/2016 - 20:37 नवीन
तुमच्यामुळे लिहायला छान वाटत , बाकी पुढचा भाग लिहीला आहे , उद्या प्रकाशित करतो आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

म्हणजे काय तर.. मी आहे

मराठी कथालेखक
गुरुवार, 06/02/2016 - 11:32 नवीन
म्हणजे काय तर.. मी Image removed. आहे तुमच्या शृंगारचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनाहूत

मस्त

कविता१९७८
Tue, 05/31/2016 - 13:37 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अनाहूत
Wed, 06/01/2016 - 20:38 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

=))

जव्हेरगंज
Tue, 05/31/2016 - 19:37 नवीन
वंटास रे भिडू! बोलेतो रापचिक!!
  • Log in or register to post comments

धन्स भिडू

अनाहूत
Wed, 06/01/2016 - 20:39 नवीन
धन्स भिडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

...

अनाहूत
Wed, 06/08/2016 - 21:42 नवीन
...
  • Log in or register to post comments

....

अनाहूत
गुरुवार, 06/09/2016 - 21:48 नवीन
....
  • Log in or register to post comments

तुम्ही असही लिहीता ?

राहूल.
Wed, 06/15/2016 - 20:30 नवीन
तुम्ही असही लिहीता ?
  • Log in or register to post comments

हो म्हटल बघाव जमतय का .

अनाहूत
गुरुवार, 06/16/2016 - 19:53 नवीन
हो म्हटल बघाव जमतय का .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राहूल.

खिक्क...मस्त

टवाळ कार्टा
गुरुवार, 06/16/2016 - 11:28 नवीन
खिक्क...मस्त
  • Log in or register to post comments

:-)

अनाहूत
गुरुवार, 06/16/2016 - 19:50 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

एकदम म्यांव लिहिलंय भाई

वेल्लाभट
गुरुवार, 06/16/2016 - 11:37 नवीन
एकदम म्यांव लिहिलंय भाई
  • Log in or register to post comments

धन्स

अनाहूत
गुरुवार, 06/16/2016 - 19:51 नवीन
धन्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा