मला ना तुझ्या प्रेमाचं गणितच कळत नाही,
काल जुनी अडगळ साफ करताना कॉलेज मध्ये असताना ट ला ट जोडून लिहिलेली कविता सापडली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि रात्री ४ वाजेपर्यंत बायकोशी गप्पा मारत बसलो. सहज तुमच्याशी शेअर करावी वाटली म्हणून इथे टंकली.
पहिली कविता मी लिहिलेली, माझ्या बायकोला (तेव्हा गर्लफ्रेंड होती) एका साध्या कागदावर लिहून गुलाबा सोबत दिलेली. तिने तो कागद अजून जपून ठेवला आहे.
मला ना तुझ्या प्रेमाचं गणितच कळत नाही
तुझी प्रेम करण्याची रीत मला कळत नाही
सांगता येत नाही कधी रुसशील
आणि कुठल्या गोष्टीवरून खुदकन हसशील
हसता हसता माझ्यात हरवून जाशील
हरून सुद्धा सगळ जिंकून जाशील
माझ्यासाठी कोणाशी भांडशील
याचा काही भरोसा नाही
मला ना तुझ्या प्रेमाचं गणितच कळत नाही
माझ्या आयुष्यातील क्षण मला आठवत नाहीत
पण तू तर त्या क्षणांची तारीख पण विसरत नाहीस
सगळ्या गोष्टी तुला काल घडल्यासारख्या आठवतात
माझ्यापुढे स्वतःच्या अस्तित्वाचा विचारही करत नाहीस
खर सांगतो मला ना तुझ्या प्रेमाचं गणितच कळत नाही
याला उत्तर म्हणून तिने देखील जे सुचल ते लिहून मला दिलं होत.
कधीतरी पहाटे
एखाद्या भयानक स्वप्नातून जाग यावी
आणि दचकून उठताना
तुझी मिठी अजूनच घट्ट व्हावी
यासारख सुख ते काय……
कधीतरी भांडताना एखादी गोष्ट
तू नकळत बोलून जावी
आणि ती छोटी जखम
दिवसभर छळत राहावी
यासारख दुःख ते काय……
कधीतरी रविवारी
सगळ घर पसरलेलं
आणि दुपार नुसती पडून
आळसात घालवावी
यासारखी मजा ती काय……
कधीतरी रडताना
तू एखाद वाक्य बोलाव
आणि मी रडता रडता हसले
कि पटकन कवेत घ्याव
यासारखा आधार तो काय……
कधीतरी लढताना
सगळे माझ्या विरुद्ध
आणि तुझ्याकडे आशेने पाहिल्यावर
एका नजरेत समर्थन मिळाव
यासारख बळ ते काय ……
कधीतरी चुकताना
मला तू वेळोवेळी बजावाव
आणि तू सांगूनही मी चुकल्यावर
पुन्हा एकदा समजून सांगाव
यासारख प्रेम ते काय…….
कधीतरी हसताना
तुझ्या डोळ्यात पहावं
आणि आज पर्यंतच्या सर्व कष्टांच
सार्थक झाल अस वाटावं
यासारख समाधान ते काय …….
कधीतरी कातरवेळी
जुन्या आठवणींना जागवाव
आणि जे हव ते सर्व तू दिलस
अस म्हणता याव
यासारख आयुष्य ते काय …….
जगप्रवासी
लेखनविषय:
याद्या
5762
प्रतिक्रिया
23
काव्यरस
मिसळपाव
अरेवा,
सुंदर!!
+१
In reply to सुंदर!! by पद्मावति
तुमच्या मिशेशची कविता जास्त विशेश आहे.+१मस्त
सर्वात सुंदर
सुरेख लिहिलंय.
छान... दूसरी कविता जास्त
बायकोची कविता जास्त आवडली.
एकदम छान
दोन्ही कविता आवडला. बाकी
लग्नाला आमच्या फक्त १.५ वर्ष झालंय
In reply to दोन्ही कविता आवडला. बाकी by विवेकपटाईत
दुसर्या कवितेचा आशय वाचुन ती
In reply to लग्नाला आमच्या फक्त १.५ वर्ष झालंय by जगप्रवासी
मस्तय
सर्वांचे धन्यवाद
दूसरी कविता अप्रतिम आहे!
दुसरी कविता जास्त आवडली ……
हा..... थोडा अती होईल
In reply to दुसरी कविता जास्त आवडली …… by विअर्ड विक्स
त्यांनाच का नाही बोलवत इथे?
In reply to हा..... थोडा अती होईल by जगप्रवासी
वपाकृष्णा, वपासूदना
In reply to त्यांनाच का नाही बोलवत इथे? by वपाडाव
+१
In reply to दुसरी कविता जास्त आवडली …… by विअर्ड विक्स
दोघांच्या कविता छानच ..
दोन्ही कविता तोडीस तोड आहेत.
अगदी आमचीच ष्टुरी लिहिलीयं