साधारणपणे १९८९-९० ची गोष्ट. खरे कुटुंबीयांकडे राहायचो मी बोरिवलीत. राहत्या घराजवळून ३ बिल्डींग्सच्या अंतरावर. सकाळी काका अमोल (माझा वर्ग मित्र) त्याचा मोठा भाऊ, खरे काका, सर्वांची घाई आपापल्या कामाला बाहेर पडायची.
माझ्या तोंडात ब्रश… बेसिन जवळ उभा, त्यात पोटात जरा आवाज येऊ लागला, ‘हुरडा’ पडण्याची वेळ झाली होती माझ्या लक्षात आले!
ओ_ओ असा काही चेहरा झालेला माझा
पण आत आधीच अमोल गेलेला…मनात म्हणालो… हम्म अजून ५मिनट तरी तग धरावा लागेलच!
आणि तो दुर्दैवी क्षण… ती शिंकं
काय पाप केलेले काय माहीत, असली भयानक अवस्था विचारू नका! तोंडात ब्रश… तो सफेद झाग उडू नये त्या सुंदर परिसरात म्हणून झालेले अतोनात प्रयत्न आणि त्या प्रयत्नामुळे जो काय प्रसंग जाहला चड्डीत!
बास रे बास!
काही क्षण आयुष्यात का येतात असा तो क्षण आणि… ती शिंकं!
#सशुश्रीके
वाचने
2270
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हणून मिपावर असे लेख पडतात
म्हणून मिपावर असे लेख पडतात काय तुमचे
आत्ता कारण समजले
एक नम्र विनंती
अशा जिलब्या पाडून नका स्वतःच हसं करून घेऊ. लिखाण बर्यापैकी जमतं तुम्हाला हे आधीच्या काही लेखांवरून कळलंय. पण कुठल्याही 'पाद्रट' घटनेचा लेख करून थोडंफार कमावलेलंही गमवून बसाल.
लिखाणातला संयम हा उत्तम लेखक होण्याची पहिली पायरी आहे.
सहमत
In reply to एक नम्र विनंती by आदिजोशी
+१.
-दिलीप बिरुटे
+१
In reply to एक नम्र विनंती by आदिजोशी
+१
जे झाले ते लिहिले.......
In reply to एक नम्र विनंती by आदिजोशी
जे झाले ते लिहिले, पण घाणेरडा वास तुमच्या प्रतिसादा च्या बाजूने का येतोय?
अरे वा!! नवीन आयडी का?
In reply to जे झाले ते लिहिले....... by राजा मनाचा
अरे वा!! नवीन आयडी का? अभिनंदन.
=))
=))
आता थांबलं का असं व्हायचं ?
आता थांबलं का असं व्हायचं ?
तुमचे सुरुवातीचे काही लेख बरे
तुमचे सुरुवातीचे काही लेख बरे वाटले होते. पण या जिल्ब्या नकोश्या वाटताहेत. स्प्ष्टोक्तीबद्दल दिलगीर आहे पण तुम्ही थोडा विचार करुन लेख पाडलेत तर तुमच्या उपजत लेखनप्रतिभेला योग्य तो न्याय मिळेल आणि वाचकांकडुन देखील योग्य ते प्रतिसाद मिळतील.