Skip to main content

संतश्रेष्ठ (देवद्वार छंद)

लेखक संदीप चित्रे यांनी शनिवार, 24/01/2009 02:22 या दिवशी प्रकाशित केले.
'देवद्वार' छंदाची ओळख करून दिल्याबद्दल धोंडोपंतांचे आभार ! ----------------------------------------------------- ज्ञानियाचा राजा त्याची ज्ञानेश्वरी या भव सागरी नौका होई तुकोबा तो सांगे आम्ही देऊ छाटी नाठाळाला काठी हाणू माथी एकनाथ गाती रचूनी भारूड लोकांसी गारूड झाले ऐसे नामा म्हणे देवा म्हणतो अभंग तुझी भक्ती दंग करितसे लिहिणे हे काव्य केवढा आनंद साथ देई छंद देवद्वार
लेखनविषय:

वाचने 2710
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

वाहवा :) खूप छान. संतांचे वर्णन मला तसेही आवडतेच. पण तुम्ही खरेच छान लिहिलेत! शुभेच्छा!! मुमुक्षु

राम राम मंडळी... 'देवद्वार'छंदातील माझ्या पहिल्या प्रयत्नाचे कौतुक केल्याबद्दल धन्स :)

संदीप, देवद्वार छंद माहीत नाही, पण वाचायला अतिशय चांगली वाटली.