Skip to main content

संग सगेली

लेखक जेपी यांनी सोमवार, 06/06/2016 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
कर्नाटक प्रांतात केली जाणारा हा पदार्थ. संग म्हणजे सफरचंद.बाकी कुळकथा ठावुक नै. साहित्यः- १)भेंडी पाव किलो. एका बाजुने उभी चिरावी. २)एक मध्यम आकाराचे सफरचंद. मध्य्म आकाराचे तुकडे करावे. ३)२ चमचे लिबांचा रस ( किंवा एका लिंबांचा ) ४)१ चमचा जिरे ५) २ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन घ्याव्या. ६) ४ चमचे शेंगदाणा कुट. ७)१ चमचा काळा मसाला किंवा गरम मसाला. ८)मिठ चविनुसार , ९) १ चमचा जिरे पुड.. १०)हळद पाव चमचा. ११) तेल कृती ;- १) जिरे पुड,शेंगदाण्याचे कुट.काळा मसाला .एकत्र करुन उभ्या चिरलेल्या भेंडीत भरुन घ्या. २) कढईत तेल गरम करुन त्यात अनुक्रमे जिरे,हिरवी मिरची, हळद आणी भेंडी टाका. ३) एक वाफ आल्यावर सफरचंदाच्या फोडी,मीठ आणी लिंबाचा रस टाकुन आणखीन एक वाफ येऊ द्या. ४) आवड असल्यास कोथिंबिर टाकुन सर्व करा. समाप्त. - टोनी

वाचने 9263
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

फोटो टाकले असते पण तेवढ्यासाठी हा पदार्थ खाण्याची माझी तयारी नाही. बाकी हा पदार्थ कर्नाटक प्रांती विजापुर परीसरात कुठल्याही हुच्चभ्रु हॉटेलात मिळेल. -क.लो.अ. --टोनी aka जेपी

In reply to by अजया

आवडलेल्या पदार्थांच्याच पाकृ टाकाव्यात असा लूल आहे का?

In reply to by यशोधरा

खरंच केलीस का यशो? घरात सफरचंद लोळताएत दोन.चांगली लागत असेल तर करून पाहीन.

मला सुचलेले काही विकल्प - १) सफरचंदाऐवजी अननस वापरणे २) भेंड्यांऐवजी वांगी वापरणे ३) अंडे घालून पाकृ बनवणे (ऑल टाइम मिपा फेवरेट)

जुने जाणते मिपाकर असं नवोदित बल्लवांना नाउमेद करत आहेत हे बघून एक मिपाकर म्हणून....

माझया मते हळद आणि मसाला कॅन्सल केल्यास भाजी चांगली लागेल. भेंडी क्रिस्प होऊ द्यायची आणि सफरचंद आंबट हवे. अवांतर - साध्या जिरेपूड घातलेल्या भाज्यांमदह्ये आणि बिन कांद्याच्या सॅलेड मध्ये सफरचंद छान लागते.