✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

..तुझे टाळतो मी अताशा शहर..

क — कानडाऊ योगेशु, Sat, 06/04/2016 - 22:00
++तुझे टाळतो मी अताशा शहर++ --------------------------------------------------- सुशोभीत केली जुनीशी कबर.! स्वतः मीच केली स्वतःची कदर. जसा बोललो आरश्याशी जुन्या तशी घेतली मी स्वतःची खबर! किती जीव घेतील शस्त्रे तुझी कधी ओढणी वा कधी तो पदर म्हणे फार होती पवित्र अधी तिची मग बनवलीच नंतर गटर ठरवताच पार्टी मनाने कधी तिथे सर्व दु:खे सुखेही हजर तसा तोच रस्ता जवळचा तरिहि तुझे टाळतो मी अताशा शहर दवा बनुनी येताच मृत्यु असा उतरते तिथे जीवनाचे जहर कळाली तुझी मज खुशाली जशी किती छान आला मनाला बहर तुझे रुप आहे तसे देखणे. तुझे हास्य त्याहुनि तौबा कहर + कानडाऊ योगेशु

प्रतिक्रिया द्या
1455 वाचन

💬 प्रतिसाद (5)

लय भारी.

प्रचेतस
Sun, 06/05/2016 - 09:59 नवीन
लय भारी.
  • Log in or register to post comments

धन्यवाद वल्लीसेठ!

कानडाऊ योगेशु
Sun, 06/05/2016 - 15:50 नवीन
धन्यवाद वल्लीसेठ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खयाल सुरेख आहेत.

सांजसंध्या
Sun, 06/05/2016 - 14:29 नवीन
खयाल सुरेख आहेत. पहिल्या शेरात जुनीशी हा शब्द बदलता येईल का ? स्वतः मी हे पण खटकते किंचितसे. सुशोभीत केली जुनी मी कबर.! स्वतःचीच केली स्वतः मी कदर साधारण असा शेर चालेल का ? ( वृत्ताचे नाव काय आहे ह्या ? भुजंगप्रयातात एक गा कमी आहे)
  • Log in or register to post comments

सांजसंध्या,

कानडाऊ योगेशु
Sun, 06/05/2016 - 15:44 नवीन
सांजसंध्या, जुनीशी च्या आधी पुरानी असा शब्द योजला होता. पण मराठीत पुराणी म्हणावे लागले असते आणि पुरानी (हवेली,कोठी इ.इ.) हा हिंदी शब्द इतका रुळला आहे कि तोच (मराठीत) योग्य नसुन योग्य वाटतो म्हणुन जुनीशीच ठेवला. स्वतः मीच च्या ऐवजी स्वतः चीच हा ही योग्य बदल आहे. एकुण तुम्ही सुचवलेले बदल चपखल आहेत. आवडेश. वृत्त ठरवुन निवडले नाही. पण प्रत्येक ओळीत पहील्या ओळीतील मात्रा सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांजसंध्या

सुंदर खयाल

महासंग्राम
Mon, 06/06/2016 - 13:53 नवीन
वाह खूप सुंदर खयाल
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा