येत्या जेष्ठ शुद्ध त्रयोदशी ला अर्थातच १८ जुन दरवर्षीप्रमाणे स्वराज्य राजधानी किल्ले श्री रायगडावर श्रीशिवराज्याभिषेकदिन साजरा होणार आहे. त्यासाठी मी हि जाणार आहे. तर आपल्या मिपाकरांपैकी कोणी येणार आहेत काय? असल्यास भेटता येइल, यासाठी हा लेखन प्रपंच.......
वाचने
2825
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला गर्दी सहन होत नसल्याने मी
मला गर्दी सहन होत नसल्याने मी येणार नै.
हेच म्हणतो मी
In reply to मला गर्दी सहन होत नसल्याने मी by प्रचेतस
हेच म्हणतो मी
+१
In reply to मला गर्दी सहन होत नसल्याने मी by प्रचेतस
हेच म्हणतो मी.
रायगड गर्दीविना, म्हणजे अगदीच चुकार ५-१० लोक गडावर, असा बघीतला असल्याने भयंकर गर्दीच्या जत्रेला जाववत नाही, तस्मात आमचा पास.
तुम्ही जा आणी आम्हाला फोटो शेअर करा.
मलाही असं वाटतं;
In reply to मला गर्दी सहन होत नसल्याने मी by प्रचेतस
मलाही असं वाटतं, पण तो जो माहोल तयार होत असेल, जो ऐकलाय, फोटोतून पाहिलाय, तो विनागर्दीचा मिळायचाच नाही. त्यामुळे एकदा ते वातावरण अनुभवायला का होईना, जायचंय राज्याभिषेकाला.
'सहन न होण्या'कडे कंपू चे
In reply to मला गर्दी सहन होत नसल्याने मी by प्रचेतस
'सहन न होण्या'कडे कंपू चे लक्ष गेलेलं दिसत नाही.
नेमकं काय होतं ओ गर्दी सहन होत नाही म्हणजे ? ;)
मी आहे ६ जुन व १८ जुन ला पन
मी आहे ६ जुन व १८ जुन ला पन
चला....
In reply to मी आहे ६ जुन व १८ जुन ला पन by रोहन अजय संसारे
कुणीतरी येत आहे......रोहनराव भेटु आपण....
जाऊन आल्यावर इथे तुमच्या
जाऊन आल्यावर इथे तुमच्या अनुभवावर लेख आणि मुख्य म्हणजे भरपूर फोटो जरूर टाका !
मुख्य म्हणजे भरपूर फोटो जरूर
In reply to जाऊन आल्यावर इथे तुमच्या by डॉ सुहास म्हात्रे
मुख्य म्हणजे भरपूर फोटो जरूर टाका ! >> गडाचे फोटो.
हाहाहाहा...
In reply to मुख्य म्हणजे भरपूर फोटो जरूर by यशोधरा
जरुर लेख लिहीन.....गडाच्या फोटोंसह.......
गडाचे फोटो हे महत्त्वाचं!!
In reply to मुख्य म्हणजे भरपूर फोटो जरूर by यशोधरा
गडाचे फोटो हे महत्त्वाचं!!
मागील ३ वर्ष
योग येतोय.
या वर्षी माझ्या छकुलीसोबत जायचा विचार आहे.
बघू या भेट झाली तर, आम्ही नीलमकडे थांबतो गडावर.
नमकीन........
अवश्य भेटु आपण...
भेट
निर्विघ्न पार पडला .
पावसानेही काही व्यत्यय आणला नाहीं. सहकुटुंब अनुभव घेतला. मुलीचे (४ वर्ष) ९ वारी, फेटा या पेहरावात सर्व शिवभक्तांनी आवर्जुन छायाचित्र घेतली , इतके की शेवटी तिला कडेवर घेऊन फिरावे लागले.
पुढील वर्ष महत्त्वाचे जसे ५०० कोटी मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्यावर परिस्थिति अजुन सुधारेल.
समितीच्या कार्यकर्ता यांचे अनंत आभार!