माझी जंगलची सैर
काल घरी काहीच काम नव्हत, म्हणुन म्हटल चला आज जंगलात फिरुन येऊ, सोबत माझा मित्र अमित पण होता. आम्ही बाईक वरुन जंगलात जायला निघालो तसा जंगलात जाणारा रस्ता हा काही एवढा खास नव्हता पण बैलगाड्यांच्या जाण्यायेण्याने बऱ्यापैकी गाढ रस्ता तयार झाला होता.
बंधाऱ्याच्या पिचींग वरुन जातांना खाली बघतांना खुप मस्त वाटत होत. बंधाऱ्यात थोडसच पाणी होत . काही मुले त्यात मासे पकडत होते. काही पाण्यात पोहोण्याचा मनसोक्त आनंद लुटत होते.,
आमच्या गावाकडच्या जंगलात रानातील आंबे खायला खुप मजा येते. त्या रानआंब्यांच्या चवेची सर या बाजारातील हापुस , ना कलम ना राजापुरी ना केशरी ला पन नाही येणार .. अस मला तरी वाटत .
थोड्याच वेळात आम्ही जंगल्याच्या जवळ येऊन पोहोचलो.
बाईक जांभळीच्या झाडाखाली लावुन आम्ही जंगलात ऊतरलो पण या वर्षी निसर्गाने साथ न दिल्यामुळे थोडेफारच आंबे आले होते .
समोरच्या एका आंब्याच्या झाडावर आंबे आम्हाला दिसले ..
अमित पटकन त्यावर सरसर चढला .मोजुन तिन चार पिकलेले आंबे सापडले ते रसाळ आंबे आम्ही चवीचवीने खाल्ले.
मग आम्ही आणखी पुढे चालायला निघालो जंगलात एका ठिकाणी एक छोटासा पाण्याचा झिरा आहे त्यातील पाणी मडक्यातील पाण्यासारखे थंड लागते .
भर ऊन्हाळ्यात देखील हे पाणी कधी आटत नाही .
जंगलात गेलेली माणसे नेहमी ईथे पाणी पितात आम्ही पण ते थंडगार पाणी पळसाच्या पानाचा द्रोण करुन पोटभर पिले.
पाणी पिऊन आम्ही खाली उतरलो. गप्पा मारत मारत मी आणि अमित चाललो होतो . एवढ्यात माझ लक्ष बाजुला गेले तिथे एक माणुस ओढ्याजवळ बसला होता त्याच्या हातात धारदार कुऱ्हाड होती. मी अमित ला शांत होण्याचा ईशारा केला . काही वेळ असाच शांततेत गेला .मग आम्ही समोरच्या आंब्याच्या झाडाकडे गेलो थोड्याच वेळात तो माणुस रागीट नजरेने बघत निघुन गेला. तो निघुन जाताच अमित पुन्हा तिथल्या झाडावर चढला या वेळेस आम्हाला पिकलेले आंबे खुप मिळाले आम्ही खुप आंबे खाल्ले बाकी राहिले ते पिशवीत घेऊन आलो. बाईक जवळ येऊन आम्ही सोबत आणलेली पाण्याची बाटली डिकीतुन काढली . मी घरुन येतांना भाकरी व लसणात ठेचलेली लाल मिरची आणली होती. मस्तपैकी आम्ही त्या शिदोरी वर ताव मारला त्या निसर्गरम्य वातावरणात ती मिरची भाकर पण पंचपक्वाना पेक्षा गोड लागत होती.
भाकरी खाऊन होताच आम्ही . आजुबाजुच्या दृश्यांचे फोटो मोबाईल मध्ये काढले. जंगलातील कोकीळेचा आवाज पण रिकॉर्ड केला .
आता खुप वेळ झाला होता .म्हनुन आम्ही बाईक वर बसुन गाढ रस्त्याने घरी निघालो. कारण त्याच्या येण्याची वेळ झाली होती......... वाघोबा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कसलंच भारी!!!!!!!!
मावशी मोजींची ना?
=))
जरा बिझी होतो राव...
हरकत नाही
=)) हे विनाशी कोण?
हे घ्या
खिक्क!
हा. तेच म्हणायला आलो होतो.
वेलकम ब्याक
पांडू मोड अॉनबरं मग!?
फोटु मिळाले ना ते धुवून झाले
छान
नाही हो
खूप आंबे खाल्ले