Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रणवजोशी on Tue, 05/31/2016 - 19:37
लेखनविषय (Tags)
जीवनमान
उद्या आपल्या लाडया राणीचा वाढादिवस. गेली ८०+वर्षे सेवा देणारी ही राणी अपवादात्मक परिस्थिती वगळता नेहमीच धावली आहे. मधे रेल्वेने हिचा डायनर कार डबा काढल्यावर लोक संतापली पण आता पुन्हा जोडलाय डबा. बाकी राणीची शान हल्ली जरा झाकोळलेली वाटते आता राणीला नव्हे तिच्या मालकांना राणीवर जाहिराती लावुन पैसे कमवायची दुर्बुद्धी झाल्ये. असो.तर महत्वाच हे की ऊद्या पुणे येथे सकाळी ७ वाजता राणीचा वाढदिवस साजरा होणार आहे.तसाच सोहळा छशिट येथेही आसतो का हे विचारणे हा आहे.जाणकारांच्या मताच्या प्रतिक्षेत. टिप- हा लेख केवळ जिलबी टाकावी म्हणुन लिहलेला नाही.
  • Log in or register to post comments
  • 2377 views

प्रतिक्रिया

Submitted by मी-सौरभ on Tue, 05/31/2016 - 19:47

Permalink

काय माहित नाय ब्वॉ

आमी कधीच डेक्कन क्विन ने प्रवास केलेला नाही. आम्च्या लाडक्या गाड्या म्हणजे सह्याद्री आणि कोयना तळेगावकर, सौरभ
  • Log in or register to post comments

Submitted by प्रणवजोशी on Tue, 05/31/2016 - 19:57

Permalink

बर

आहो मी पण माझ्या गेल्या २५ ळर्षाच्या आयुष्यात फक्त २ वेळा प्रवास केलाय डेक्कन क्विनने.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Tue, 05/31/2016 - 20:16

Permalink

गाडी सारखी गाडी.. तिचं काय

गाडी सारखी गाडी.. तिचं काय बरं इतकं कौतूक.. हे वाचा
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Tue, 05/31/2016 - 22:43

Permalink

लाड्या राणी म्हणजेच डेक्कन

लाड्या राणी म्हणजेच डेक्कन क्वीन हे आताच कळले. आपण मराठी लोकांनी छत्रपति शिवाजी टर्मिनस असा पूर्ण उल्लेख करावा असं आपलं वैयक्तिक मत...
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Tue, 05/31/2016 - 23:22

Permalink

राणीची ऐट बघण्यासारखी

प्रणवजोशी, राणीची ऐट बघण्यासारखी असते. मी ठाण्याचा. ठाण्याहून माथेरानला सकाळी जाऊन संध्याकाळी परत येता येतं. संध्याकाळी पाचला वरून निघालं की साडेसहाच्या सुमारास नेरळच्या जवळ यायला व्हायचं, तेव्हा बरोब्बर राणी कर्जतकडे डौलदारपणे सळसळत जातांना दिसायची. बाकी राणी म्हणजे रोजच्या प्रवाशांचं दुसरं घरच असल्यासारखं होतं. माझ्या ओळखीतले एक आहेत. ते दररोज पुणे मुंबई करायचे. डेक्कन-टू-डेक्कन काम करायचे. सरकारी कचेरी असल्याने चालून गेले. खाजगी कामकरी एखाददोन रात्री लॉजवर काढायचे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिकेत वैद्य on Wed, 06/01/2016 - 10:11

Permalink

छशिट येथेही आसतो

छशिट येथेही आसतो दुपारी साधारण ४:३० च्या सुमारास छशिट येथे फलाट क्र. ९ किन्वा ११ वर असा सोहाळा असतो. जरूर जा आणि फोटो काढून येथे लावा.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Wed, 06/01/2016 - 12:37

Permalink

प्रतिसादातुन कळले. लेखातुन

प्रतिसादातुन कळले. लेखातुन "लाडया राणी" म्हणजे कोण हे कळले नव्हते.
  • Log in or register to post comments

Submitted by परिंदा on Wed, 06/01/2016 - 19:00

Permalink

पासधारकांची "राणी"

या डेक्कन क्वीन मधले पासधारक माजोरडे असतात. कितीही लवकर जाऊन जागा पटकवा, हे लोक टोळक्याने येऊन जोरजबरदस्ती करुन उठवतात.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com