प्रतिक्रिया वाचुन थोडासा प्रकाश पडला. पण प्रश्न अवघड होता. फुल फोकस ची गरज होती. गाडीने जाता जाता विद्याविहार ला रेल्वेचा 'उपरी उपस्कर कार्यशाळा' चा फलक बघितला. बघुया का ह्याचा उपयोग करुन असा विचार आला. 'उपरी उपस्कर कार्यशाळा' म्हणजे वरवरचे मेंटेनन्स.
घरी आलो. बघतो तर काय, महिला मंडळ जमलेले. बायकोच्या निपाणी वरुन शाळे पासुनच्या दोन मैत्रीणी आलेल्या. लग्नानंतर पहिल्यांदाच घरी आलेल्या. त्यातल्या एकीने तर सायकॉलॉजी मधे एम्.ए. केलेले. ग्रहदशा वाईट असली की असेच होते. ह्या बाईने एकदा बायकोकडे फोनवर 'तुझा नवरा कसा झोपतो' अशी विचारणा केली होती. 'झोपतो' म्हणजे, उजव्या की डाव्या कुशीवर. पोटावर की पाठीवर किंवा फिटल पोझिशन मधे. ह्यावर माणसाचा स्वभाव कळतो असे बायकोला सांगत होती. मी तर बाबा सर्व प्रकाराने झोपतो. तुला माहित नाही का? मग माझा स्वभाव ही कशी ठरवणार. असे म्हणुन विषय संपवला होता. नमस्कार,चमत्कार झाले. टी पॉय वर 'फेमिना' होते. मुखपृषठावर 'चोपडा' कुलोत्पन्न प्रियांका चा फोटो. आणि मोठ्या अक्षरात 'आपके पती आपसे कुछ छुपा रहे है क्या' असे हेडींग. तुमचे चालु द्या म्हणुन मी काढता पाय घेतला. ब्रिटीश बरोबर २ तास आनंदात गेले.
घरी येता येता आता प्रश्न भिजत ठेवता कामा नये असे ठरवले. खास मैत्रीणी येउन गेल्यानंतर नाहीच नाही. गृहसौख्यावर मंदीचे ढग जमा होताना दिसले.
प्रश्न अवघड असेल तर बेसिक कडे वळावे.
प्रश्नाचा मुळ श्रोत ध्यानात घ्यावा.
दलदलीत सापडल्यावर जास्त हालचाल (शानपती)करु नये.
माकड आणि पाचर ह्यांचे जुने नाते आहे.
पाचरीतुन लवकर सुटका केल्याने शेपटीला जास्त इजा होत नाही.
डोळा लागता लागता वरील गृहितके आठवली.
मंदी मधे संधी साधावी. मग कायमची चांदी असा निर्धार करुन झोपी गेलो.
संधी मिळाली की हो.
सकाळी कॉलेजला जाताना चिरंजीवानी प्रॅक्टीकल कोट ची मागणी केली.
मी त्याला लगेच विचारले, काय, रे प्रॅक्टीकलला डॅमॉन्स्ट्रेटर ने प्रॅक्टीकल समजवल्यावर ते प्रॅक्टीकल न करता एकदम परिक्षेत करायला तुला जमेल का?
हो.-चिरंजीव
कसे काय बॉ. (थोडी ढील दीली)
काय बाबा, आमच्याकडे डेमॉन्स्ट्रेटर पण पी.एच्.डी असतात. व्यवस्थीत एक्स्प्लेन करतात. लक्ष दीले की काहीही अवघड नसते. -चिरंजीव. नकळत का होइना चिरंजीवाने पांग फेडले.
तो कॉलेजला गेल्यावर मीच सुरुवात केली.
'तुझ्या प्रश्नाचे उत्तर कालच देणार होतो' पण तुझ्या सख्या आल्या होत्या म्हणुन तुला डीस्टर्ब केले नाही.
"नशिब माझे. मला वाटले त्यांच्यासमोरच सुरु होता की काय"- बायको
त्याचे असे आहे, माझे साहेब पी.ए़च्.डी होते पब्लिक हेल्थ चे. त्यांच्याबरोबर दर शनिवारी नेरळ ला जात असे. तेंव्हा ते एका हातात 'कॅप्स्टन ची सिगारेट' बेबी वोक्स वॅगनचा १२० चा स्पीड व माझा 'लोकशिक्षणाचा' तास अशी गंमत चाले. त्यात विषेश असे काही नसते. नेहेमीचे २१ प्रश्न असतात. त्यांची शिकवण्याची हातोटी खुप चांगली होती. के.इ.एम ला विषय नसलेले डॉक्टर पण त्यांच्या लेक्चरला येउन बसायचे. आणि माझ्यासाठी खास पद्धत वापरायचे. त्यांचा मी फार लाडका होतो. पेशंट बनुन प्रश्न परत विचारायचे. उत्तर चुकले की परत सांगायचे. असा कारभार होता. म्हणुनच मला 'यंगेस्ट मोटीवेटर' चे पदक पण मिळाले होते. अग ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या डोक्यावर नुसता हात ठेवल्याने रेड्याने वेद म्हटले.
ह्या ज्ञानेश्वराचा हात सतत सात वर्ष माझ्या डोक्यावर हात होता. त्यामुळेच मला 'प्रॅक्टीकल 'ची कधीही गरज लागली नाही.
बायको पण सेंटीमेंटल झाली 'गुरुशिष्य पुराण' कानावर पडल्यामुळे.
आणि सर्व काही सुरळीत झाले. सरळ झाले.
जाता जाता: आजपासुन 'उजव्या' कुशीवर झोपणार आहे. बरे असते असे बायकोची मैत्रीण म्हणते. मरे ना का ते शास्त्र. पाचरीतुन शेपटी सुटली हे महत्वाचे.
वाचने
6691
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
चला उजवी
दशराथ राजा आणि कैकयी
अंगरखे
In reply to दशराथ राजा आणि कैकयी by सर्वसाक्षी
वा वा गोचीदार अनुभव कथन!
In reply to दशराथ राजा आणि कैकयी by सर्वसाक्षी
स्टंट
In reply to वा वा गोचीदार अनुभव कथन! by चतुरंग
आजपासुन
पाचरीतुन
"सत्यकथन"
मस्त अनुभव..
+१
In reply to मस्त अनुभव.. by प्राजु
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
चला, बरं झालं!!
उपरी उपस्कर कार्यशाळा'
In reply to चला, बरं झालं!! by पिवळा डांबिस
ब्रिटीश
In reply to चला, बरं झालं!! by पिवळा डांबिस
अरे वा, सुटका झाली का? छान!
अनुभव लक्षात ठेवतो..
ऑल इज वेल
अनुभव
आमच्या
In reply to अनुभव by विनायक प्रभू
घरी आलो.
मस्त
शन्का :