✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मला अतिशय आवडलेले इंग्रजी सिनेमे भाग ३, Columbus Circle

म
मुक्त विहारि यांनी
Sun, 05/29/2016 - 07:12  ·  लेख
लेख
मुळात आपल्याकडे सशक्त कथा, त्या कथेला न्याय देणारे कलाकार आणि त्या कलाकारांकडून कथेला साजेल असा अभिनय करून घेणारे दिग्दर्शक फार कमी.त्यातूनही "नायिकाप्रधान" सिनेमे फारच कमी, कधी-कधी एखादा "कहानी" किंवा "निरजा" (हा मात्र मी टॉकीज मध्ये बघीतला आणि ते पण टिमार्णी नावच्या गावांत.आमच्यासाठी खास शो होता.कारण प्रेक्षक म्हणून फक्त मी, माझी बायको आणि माझी बहीण, असे ३च जण.असो....) नायिका प्रधान सिनेमे, नेहमीच वेग-वेगळ्या विषयांना हात घालतात.मग तो खामोशी असो किंवा मदर इंडिया किंवा मेमदिदी (https://www.youtube.com/watch?v=hVI7cLHX-Tk) आणि म्हणूनच मला तरी ते बघावेसे वाटतात. असाच मग कधी-कधी जालावर शोध घेता-घेता, एखादा सिनेमा मिळतो देखील.हा (कोलंबस सर्कल) पण असाच मिळाला आणि लगेच बघून झाला.सिनेमा आवडल्या नंतर तो बायको बरोबर परत बघणे क्रमप्राप्तच होते आणि तिला पण तो आवडला. काही काही सिनेमे दृश्यापासून पकड घेतात, तर काही काही थीम पासून, हा सिनेमा मात्र श्रेयनामावली पासूनच मनावर पकड घेतो तो सिनेमा संपल्यावर पण २-३ तास ती पकड काही सूटत नाही. आता थोडक्यात सिनेमाची कथा... ============================================ अमेरिकेतलेच एक कोलंबस सर्कल नावाचे अपार्टमेंट.त्यात रहात असलेल्या एका वृद्ध महिलेचा अपघाती मृत्यू होतो.त्या वृद्ध महिलेच्या बाजूच्याच फ्लॅट मध्ये एक तरूणी (अ‍ॅबिगेल) रहात असते.गेली सुमारे २० वर्षे ती तरूणी घराबाहेर पडलेली नसते. त्या मृत वृद्ध महिलेच्या जागेत भाड्याने रहायला एक जोडपे (लिलियन आणि चार्ली) येते.चार्ली एक दिवस दारू पिवून लिलियनला मारहाण करतो आणि तिचे रडणे ऐकून अ‍ॅबिगेल तिला आपल्या घरात घेते. अ‍ॅबिगेल आणि लिलियनची मैत्री होते आणि लिलियनच्या मदतीने अ‍ॅबिगेल परत बाहेरच्या जगात पाय ठेवते. =========================================== आता मुळात हा अतिशय साधा आणि सरळ सिनेमा आहे, पण लक्षात राहतो तो, सेलेमा ब्लेयर आणि अ‍ॅमी स्मार्टचा अभिनय. विशेषतः सेलेमा ब्लेयरने वठवलेली "अ‍ॅबिगेल"ची भुमिका आणि अ‍ॅबिगेलचा "सुरवंट ते फुलपाखरू" असा होणारा प्रवास.

Book traversal links for मला अतिशय आवडलेले इंग्रजी सिनेमे भाग ३, Columbus Circle

  • ‹ मला अतिशय आवडलेले इंग्रजी सिनेमे भाग २, Million Dollar Baby.........
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
2346 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

आज आनंदच आनंद आहे

देशपांडे विनायक
Sun, 05/29/2016 - 10:21 नवीन
आज आनंदच आनंद आहे १] मेम दिदी हाती आला २] ipl ३] ipl match पाहण्यासाठी बोलावलेले सारे मित्र येणार ४] match पाहताना लागणारी पेये कालच आणून ठेवली त्यामुळे आज बाहेर जायचे कारण नाही ५] सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सात मिनिटांनी होणार आहे मेम दिदी बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

मेम दीदी

महामाया
Sun, 05/29/2016 - 21:38 नवीन
ललिता पवार, डेविड, जयंत वाला।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देशपांडे विनायक

तुम्हाला ओळखण्यात कमी पडलो तुम्ही तर फार भारी निघाले !

मारवा
Sun, 05/29/2016 - 11:28 नवीन
आणि ते पण टिमार्णी नावच्या गावांत.आमच्यासाठी खास शो होता.कारण प्रेक्षक म्हणून फक्त मी, माझी बायको आणि माझी बहीण, असे ३च जण.असो....) ते शराबी त अमिताभ शोची सगळी तिकीटे विकत घेऊन घेतो त्याची आठवण झाली. तुमचा साखर कारखाना वगैरे आहे का हो ?
  • Log in or register to post comments

सेल्मा ब्लेअर

बोका-ए-आझम
Sun, 05/29/2016 - 12:23 नवीन
म्हणजे अँगर मॅनेजमेंट मधली? मग तर हा बघायलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments

अँगर मॅनेजमेंट...ही टी.व्ही. सिरियल आहे का?

मुक्त विहारि
Sun, 05/29/2016 - 12:38 नवीन
https://en.wikipedia.org/wiki/Anger_Management_(TV_series) सिरियल बद्दल बोलत असाल तर, Dr. Kate Walesची भूमिका करणारी म्हणजेच सेलमा ब्लेयर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा