Skip to main content

सल्ला

लेखक अनाहूत यांनी शनिवार, 28/05/2016 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
" हे बघ चंदू " " चंदू ? " " बर बंडू " " बंडू ? " " अरे काय चंदू आणि बंडू मध्ये अडकून पडलाय ? पुढे काय सांगतो आहे ते ऐक ना . " " बर बर सांगा " " मग काय ते चंदू का बंडू " " ते राहूद्या हो काय सांगणार होता ते सांगा . " " तर बायकोला अगदी धाकात ठेवायच . उठ म्हटलं की उठली पाहीजे बस म्हटलं की बसली पाहिजे . ते प्रेम प्रेम म्हणून तुम्ही फार जपायला जाता पण तस नाही तो जो काय कंट्रोल आहे तो सुरूवातीपासून ठेवायचा मग बघ बायको कशी रहाते धाकात . आपल किती प्रेम आहे ते कधी दाखवायच नाही , दाखवल म्हणजे अगदी सारख सिद्ध कराव लागत . आणि आपली कमाई किती तेही कधी सांगायच नाही . नाहीतर त्याच्यावरच्या सीमेवर आणि त्याच्याही बाहेर खर्च सुरू झाला म्हणून समज . " " अहो कस शक्य आहे ते ? " " कस म्हणजे ? काय अवघड आहे त्यात ? हे जमलच पाहिजे ? " " अहो आपल्याच बायकोसमोर प्रेम व्यक्त करायच नाही , मग कुणापुढे व्यक्त करायचं ? " " अरे अगदी तस नाही प्रेम ही आपली कमजोरी वाटू द्यायची नाही . " " अहो पण ... " " अहो पण काय अहो पण हीच खरी पुरूषाची निशाणी , हाच खरा पुरूषार्थ . " " म्हणजे बायकोसमोर दादागिरी , हा पुरूषार्थ ? " " दादागिरी काय दादागिरी ? बायकोच्या बाबतीत हा शब्द येतोच कसा ? " " नाही म्हणजे ते आपल तिच्या पुढे कशाला ना अशी दमदाटी ? " " दमदाटी कसली ? तुझी बायको आहे ती आणि हा तुझा हक्क आहे आणि याला धाकात ठेवण म्हणतात . " " बर आणि नाही ऐकल तिने तर ? " " नाही ऐकत ? कशी नाही ऐकत ? नाही ऐकलं की इकडच मुस्काट तिकडं करायचं अगदी . " " म्हणजे मारायचं ? " " मग काय तर ? " " छे हो जीव नाही होणार तिला मारायला . आता कुठे ' तु माझी आणि मी तुझा ' चे दिवस सुरू आहेत . आणि अस काही म्हणजे अती होईल . " " इथेच इथेच मार खातात पुरूष . आधी गुंततात आणि मग काहीच करता येत नाही . " " हो गुंततो आहे मी तिच्यात . " " सावध हो " ते जोरात ओरडले तसे डोळ्यातले बदाम क्षणभर पळालेच पण लगेच फिरून परतून आले . ते बोलत होते पण मला फारस काही ऐकू येत नव्हत मी माझ्याच विचारात होतो . तेव्हढ्यात एक आवाज जोरदार कडाडला , " अहो काय करताय तिकडे इकडे या . " त्या आवाजासरशी मघापासून तावातावाने बोलणारे आजोबा ताडकन उठून उभे राहिले आणि " आलो आलो " म्हणत निघालेही . जाताजाता क्षणभर थांबले आणि माग वळून म्हणाले " आणि मी सांगत होतो तस नाही केल की मग हे अस होत . "
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2313
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

:) मस्त.. कोणत्या काळातलं आहे..?

शेवटचं उघड उघड स्पष्टीकरण देणारे वाक्य नको होते. त्याच्या आधीच्या वाक्यातच कथा संपवायला पाहिजे होती! बाकी जोरदार & कडक! मजेशीर!!

आणि थेट (घरोघरी मातीच्या चुली) प्रत्ययी.

:)