हजारो रूपये डोळ्यासमोरून धडाघडा जाताना पाहण्याचे भाग्य (?) कपाऴी आले!!!
मित्रांनो, खालील धागा वाचला आणि मला माझ्या विदेशातील प्रवासात बसलेला हिसका आठवला...! Bank account मधुन पैसे परस्पर काढ्ले गेलेत.. आणि माझ्या जीवनातील हरवलेल्या गोष्टींत या कथानकाची भर पडली! आता काळ जखमाभरून काढणारे 'मलम' म्हणतात ते खरे आहे याची प्रचीती आली. पण आज 'पैसै परस्पर काढले गेले' हा धागा वाचला आणि त्या जखमेची खपली निघाली आणि आता ती कहानी सादर करायचे ठरवले असो. त्याचे झाले असे की मी पत्नीसह अमेरिकेची सफर करायला गेल्या वर्षी उत्साहाने निघालो. इस्ट कोस्ट संपवून वेस्ट कोस्टसाठी जेएफके विमानतळावर जायसाठी निघालो. तेथील नातलगांनी तिथे पोहोचायला बरेचदा तारांबळ उडते असा अनुभव सांगितल्याने सकाळची फ्लाईट असेल तर त्या विमानतळाच्या आसपास आदल्यादिवशी रात्री पोहोचावे असा सल्ला दिला. तो मानून आम्ही आदल्या रात्री न्यूजर्सी भागातून ट्रेनने पेन स्टेशनात उतरून एका टॅक्सीने 'जेएफके इन' नावाच्या हॉटेलात उतरलो. नंतर ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी विमानातून 8 तासाचा एक हॉल्ट करत करत सॅन फ्रँन्सिस्कोला उतरलो आणि नातलगाच्या गाडीतून मिलपिटास येथील ग्रेट मॉल जवळच्या त्याच्या घरी पोहोचलो. आधी ठरल्याप्रमाणे आम्ही एक दिवस सोडून लगेच एल-ए, लास वेगास, ग्रेट कॅनियन वगैरे साठी 7-8 दिवसासाठी जाण्याची तयारी करून होतो. भाचा विनय करमरकरने आम्हाला जवळच्या साऊथ इंडियन रेस्टॉरंटमधे नेऊन तो रात्र पाळीला निघून गेला. आम्ही दुसऱ्यादिवशी आरामात उठून लंच खायला पुन्हा इडली-डोश्याचा समाचार घेऊन क्रेडिटकार्डाने तेथील बिल चुकते केले व परतलो. तोवर मी वायफाय एक्टिव्हेट करून मोबाईलशी चाळे करत होतो. मेसेज आल्याच्या घंटा टऩटनायला लागल्या म्हणून कोणी कोणी मला आठवले ते पहायला उत्सुकतेने न्याहाळायला लागलो. पैकी एक मी आदल्यादिवशीपासून केलेल्या क्रेडिटकार्डाच्या उलाढालींचे एसएमएस एकामागून एक येताना पाहून माझे डोळे गरगरायला लागले. डॉलरची राशी हा हा म्हणता कमी कमी होत होत ती फक्त 2 डॉलर व काही सेंट्स उरलेली पाहून माझ्या दिल की धडकने वाढली. थंड वातानुकूलित हवेत घामाची जाणीव झाली. डोळ्यासमोरून हजारो पैसे काढल्याचे पहाण्याचे भाग्य भाळी आले...! आणि डोशांच्या बिलाने सांगता होऊन 'लक्षाधीशाचा भिक्षाधीश' झाल्याचे लक्षात यायला फार वेळ लागला नाही. मी पुन्हा पुन्हा क्रेडिट कार्ड खिशातून काढून पाहिले. तरीही डॉलर कसे काय पळवले गेले? असा माझ्याशी मीच बोलत होतो... अन मग माझ्यातला 'कमांडर' जागा झाला... पैसे परत मिळाले की नाही? भाग 2 चालू...
वाचने
3116
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
सविस्तर माहिती
आता आमची धडकन किती दिवस रोखून
धक धक करने लगा?
In reply to आता आमची धडकन किती दिवस रोखून by कंजूस
अमेरिकेत हे सहज शक्य आहे.
बरोबर आहे
In reply to अमेरिकेत हे सहज शक्य आहे. by डॉ सुहास म्हात्रे
काय छपरी लोक आहेत! असं का
In reply to अमेरिकेत हे सहज शक्य आहे. by डॉ सुहास म्हात्रे
नंतरच्या घटनातून
In reply to काय छपरी लोक आहेत! असं का by आदूबाळ
horrible experience, loosing
नाहीतर हातात कटोरा घेऊन फिरायची वेळ आली असती
In reply to horrible experience, loosing by mahesh d
पुढचा भाग जरा लवकर टाका...
+१११११
In reply to पुढचा भाग जरा लवकर टाका... by मुक्त विहारि
जबरदस्त अनुभव
धन्यवाद
In reply to जबरदस्त अनुभव by अनिरुद्ध प