Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्वामी संकेतानंद on Fri, 05/27/2016 - 08:57
विस्तारभयास्तव मी स्वप्नांची लांबीरुंदी कमी केली गजराची धारदार कात्री वापरून काटछाट केलेली ती स्वप्ने गळत असतात पापण्यांमधून विस्तारभयास्तव कंटाळवाणा प्रवास टाळत गेलो हा अधिकचा प्रवास दिला साठवून आता प्रवास शक्य होत नाही विस्ताराचे अजिबात भय नसून विस्तारभयास्तव कितीतरी विचारांना दिली जन्मठेप काही पॅरोलवर सुटले कैदेतून मी परत त्यांना कैदेत टाकतो सावधगिरीचा उपाय म्हणून विस्तारभयास्तव घराला भिंतीमध्ये बंद केले कहर केले त्याला छप्पर देऊन आता खिडकीतून पाहत बसतो वादळवारागारापाऊसऊन ----////-----------////------- Self-censored:- विस्तारभयास्तव कविता लिहताना मात्रा मोजल्या कादंबऱ्या लघुकथेत कोंबल्या संपादकाच्या उत्तराची वाट कधी पाहिली नाही स्वतःच लिहीले की अधिक खोलात जात नाही विस्तारभयास्तव -- स्वामी संकेतानंद

Submitted by चाणक्य on Fri, 05/27/2016 - 09:43

Permalink

जबरा

भारी झालीये. पहिल्या दोन ओळींनी जी पकड घेतली ती शेवटपर्यंत.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 05/27/2016 - 10:01

Permalink

+१

विस्तारभयास्तव कितीतरी विचारांना दिली जन्मठेप काही पॅरोलवर सुटले कैदेतून मी परत त्यांना कैदेत टाकतो सावधगिरीचा उपाय म्हणून
हे ज्याम पटले विचारभयास्तव कितीतरी प्रतिसादांना दिली सुटका काही नजरेतून सुटले अलगद, मी परत त्यांना शोधत नसतो न्युनगंडाला अपाय (नको)म्हणून. स्वामी (चा) नजरबंदी नाखुस
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Fri, 05/27/2016 - 10:11

Permalink

वाह !!!

वाह !!!
  • Log in or register to post comments

Submitted by नाईकांचा बहिर्जी on Fri, 05/27/2016 - 10:42

Permalink

खरंच अप्रतिम कविता करता

खरंच अप्रतिम कविता करता तुम्ही स्वामीजी ___/\___
  • Log in or register to post comments

Submitted by भरत्_पलुसकर on Fri, 05/27/2016 - 11:02

Permalink

वा!

वा!
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Fri, 05/27/2016 - 11:11

Permalink

स्वामीजी, क्या बात है!

स्वामीजी, क्या बात है!
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Fri, 05/27/2016 - 11:32

Permalink

वा!

सुरेख! _/\_ -रंगा
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 05/27/2016 - 12:13

Permalink

स्वामीज्जी की महान रचनाएं!

स्वामीज्जी की महान रचनाएं!
  • Log in or register to post comments

Submitted by घाटी फ्लेमिंगो on Fri, 05/27/2016 - 12:17

Permalink

Self-censored

शेवटचं सुद्धा भारी आहे की रं स्वामी...!!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वामी संकेतानंद on Sat, 05/28/2016 - 21:32

In reply to Self-censored by घाटी फ्लेमिंगो

Permalink

धन्यवाद! ते कडवे पण कवितेचाच

धन्यवाद! ते कडवे पण कवितेचाच भाग आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Fri, 05/27/2016 - 14:16

Permalink

जबरी कविता.

जबरी कविता.
  • Log in or register to post comments

Submitted by रमेश भिडे on Fri, 05/27/2016 - 15:38

Permalink

बेष्ट कविता. स्वामी चं नाव

बेष्ट कविता. स्वामी चं नाव दिसलं की वाचलं जातं आणि बऱ्याच वेळा आवडतं.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 05/27/2016 - 16:43

Permalink

स्वामी. मुक्तक आवडले.

स्वामी. मुक्तक आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by शिव कन्या on Sat, 05/28/2016 - 11:21

Permalink

मस्त

भयाचा विस्तार झाला कि विस्तारभय निर्माण होते! आवडली कविता.
  • Log in or register to post comments

Submitted by Anand More on Sat, 05/28/2016 - 18:59

Permalink

खूप सुंदर …. विस्तारभयास्तव

खूप सुंदर …. विस्तारभयास्तव अजून काही लिहित नाही
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 05/28/2016 - 20:18

Permalink

क्लास!

क्लास!
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2346 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com