अनिला
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आज जेल मध्ये पोचल्या पोचल्या एक वेगळीच केस हाताळावी लागली. एक चाळीशी उलटून गेलेला माणूस समोर अपराधी म्हणून बसला होता. त्याचा अपराध म्हणजे चोरी आणि लबाडी.
एका सुप्रसिद्ध हॉटेल मध्ये तो शेफ म्हणून नोकरीला होता. महिन्याला तीस हजार पगार होता. पण हाव फार वाईट गोष्ट असते. मालकाचा विश्वास संपादन करून एक दिवस त्याने हॉटेल मधला माल लंपास करायला सुरुवात केली. त्या मालाला विकून त्यातून मिळालेल्या पैश्याने स्वताची व्यसनावर झालेली उधारी मिटवली. त्याचे नावे अनिल परचुरे. हॉटेल व्ययसाय मधील पदवी घेतलेला आणि बरीच वर्ष परदेश मध्ये नोकरी करून परत आलेला. मला फारच उत्सुकता होती ह्या केस बद्दल म्हणून मी हळू हळू सगळी चौकशी करायला घेतली. जेव्हा त्याची सर्व पार्श्वभूमी कळली तेव्हा मात्र मला खूप राग आला त्याचा.
दोन ते तीन दिवसांनी सुनावणी झाली आणि त्याला ७ दिवस जेल ची हवा आणि ७०००0 रुपये दंड अशी शिक्षा झाली. जेल चे दिवस नको असतील तर वर १००००० रुपये भरणे अपेक्षित होते. ह्या सर्व कालावधीत त्याला भेटायला फक्त एक वयस्कर बाई येत असत. त्यांच्या बोलण्यावरून कळले कि ती त्याची आई आहे. दिसायला एकदम सोज्वळ आणि एकाद्या खानदानी घरातल्या, कोकणस्थ घरातल्या. त्यांचा चेहरा एवढा शांत पण तेवढा चिंता ग्रस्त आणि काळजी ने भरलेला.
माझी उत्सुकता आजून वाढली कि काय असेल ह्या बाई ची कहाणी आणि ह्यांचा मुलगा असा कसा.
त्यांनी १७०००० भरून मुलाची सुटका केली आणि ते प्रकरण तिथेच संपले. मीही काळाच्या ओघात सगळे विसरून गेलो. २-३ वर्षांनी एकदा रविवार च्या बातमी पत्र मध्ये ह्याच बाईंचा फोटो बघून परत आठवण झाली. माझी मावशी तेव्हा माझ्या कडेच होती आणि तिने फोटो बघून म्हटले, "अरे ही तर आमची सुशीला गोडसे"... मी म्हणालो, "अग मावशी हे नाव वेगळे आहे - अनिला परचुरे"
क्रमश....
प्रतिक्रिया
दोन ते तीन दिवसांनी सुनावणी झाली
नावे
मुलाचे नाव अनिल , आईचे अनिला
त्याला ७ दिवस जेल ची हवा आणि
त्याला ७ दिवस जेल ची हवा आणि ७०००0 रुपये दंड अशी शिक्षा झाली. जेल चे दिवस नको असतील तर वर १००००० रुपये भरणे अपेक्षित होते.काय झेपलं नाय ब्वॉ!पुभाप्र.
भाग २ : अनिला