✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भारतीय आणि नग्नता

अ
अनाहूत यांनी
Mon, 05/23/2016 - 11:03  ·  लेख
लेख
आपल्याकडे नग्नता या शब्दाकडे आणि विषयाकडे अशा काही नजरेने पाहिले जाते कि अगदी काही गुन्हा किंवा पाप केलेले आहे . बाकी प्रत्येक जणच जन्माला येताना बिना कपड्यांचाच जन्माला येतो पण काही लोकांचा आक्षेप असू शकतो कि जन्माला येताना तर कुणाला बोलायला आणि चालायला आणि इतरही अनेक गोष्टी येत नाहीत पण त्या पुढे तो शिकतो ना मग या बाबतीतही तस का नाही . बाकी या बाबतीत कपडे नक्की का घालावे आणि का नाही हाही एक मुद्दा असू शकतो अगदी लज्जा रक्षण , injury पासून बचाव , ऊन थंडी यापासून बचाव आणि अशी अनेक कारणे दिली जाऊ शकतात . हि कारणे मान्य पण खरच अस आहे का कि आपण शरीर रक्षणासाठी कपडे घालतो असे तर वाटत नाही . आपण भारतीय उपमहाद्विपीय प्रदेशातील वातावरण आणि इथला पोशाख पहिला तर अस नक्कीच नाही वाटत कि हे शरीरसाठी केल जातंय पूर्वीचे पोशाख म्हणजे धोतर किंवा स्रीयांमध्ये साडी हे पोशाख असे होते अस एकवेळ आपण म्हणू शकतो पण टाईट जीन्स आणि तसाच टाईट शर्ट हे कसे शरीर रक्षण करणार आहेत ? त्या टाईट जीन्समुळेतर genitals ला कोणत्याही प्रकारे हवा पोहोचत नाही . या उलट धोतर किंवा साडी यामधून काही प्रमाणात का होईना वायुविजन नक्की होत . बाकी genitals च तापमान इतर शरीरापेक्षा काहीस जास्त असत आणि त्यांचे तापमान नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते . याच कारणासाठी पुरुषांचे वृषण शरीरापासून काही अंतरावर असतात . काही जीन्स ज्या टाईट फिट किंवा टच स्कीन असतात त्यात वृषणचकाय पण पेनिससाठीही पुरेशी जागा असते किंवा नाही हे सांगणे अवघड आहे . बाकी आपल्या संपूर्ण आयुष्यात अगदी कोणत्याही वयात सार्वजनिक ठिकाणीही ज्याचे कधीही erection झाले नाही असा पुरुष सापडणे अवघड आहे . आता ज्या जीन्समध्ये normal penis लाही जागा नसते तिथे अशा position मध्ये या महत्वाच्या भागाची काय हालत होत असेल हे सांगायलाच नको . या प्रायवेट पार्टसला इतक तुच्छ का लेखल जात हे खरच न कळणार आहे . हे भागच स्त्री पुरुषांना त्यांच्या उमेदीच्या काळात सर्वोच्च सुख आणि आयुष्यभर आणखी एक महत्वाचे काम करतात . ते किती महत्वाचे आहे हे ज्यांना कधी लघवी अडली गेली आहे व ती होत नाही तेंव्हा कळते . कोणी म्हणेल याचा संबंध आतील भागाशी आणि या पार्टस आधी असलेल्या पार्टसशी संबंधित आहे पण त्या पार्टसमध्ये काही बिघाड नसताना हे काम हा भाग इमाने-इतबारे करत असतो . आणि इथली infections तर काय त्रास देतात ते सांगायलाही नको पण असे असूनही या भागाची काहीही काळजी घेतली जात नाही . अजिबात जागा नसलेल्या कोंदट ठिकाणी एव्हढ्या जास्त तापमानात हे private part शिजून निघत असतात पण आपल्याला आपल्या स्टाईलच पडलेलं असत . या उलट धोतर साडी हे तस पाहायला गेले तर खालून उघडेच असतात आपल सेमी-नग्नतेशी नात सांगत आपल्या शरीराची मदतच करत असतात . आता कोणी म्हणेल कि कोर्पोरेट ऑफिसमध्ये धोतर घालून जावे काय ? आणि आपण गेलो तरी त्याला परवानगी मिळेल का ? यावर उपाय आपल्यालाच शोधायला हवा . अगदी साडीही परिधान करताना पोट आणि पाठ काही प्रमाणात उघडे राहतात आणि हेच काम करतात . काही हॉलीवूड अभिनेत्री बेअर चेस्ट सीन करतात त्या उलट भारतीय अभिनेत्री कधी असे सीन करताना दिसत नाही (काही अपवाद वगळता ) . याला काय कारण असावे ? काही अभिनेत्री या डाएट आणि झिरो फिगरच्या अशा मागे लागतात कि त्यांच्या ब्रेस्टची पुरेशी वाढही होत नाही ( काही सन्माननीय अपवाद वगळून ) . मग ब्रेस्टला बाहेरून सपोर्ट वापरले जातात जेणेकरून ते योग्य प्रमाणात दिसावेत . आता बेअर सीनमध्ये या गोष्टीतर वापरता येणार नाहीत त्यामुळे सत्य समोर येऊ शकते . इथे कुणी असे सीन द्यावे अशी अपेक्षा नाही पण या कारणासाठी त्यांना हे करायला लागू नये असे वाटते . बाकी सस्तन प्राण्यांमध्ये स्री बाळाला स्तनपान करवते आणि पुरुषाला असे काही काम नसले तरीही त्याचे चेस्ट सपाट पोट आणि बरगड्याचा भाग या पेक्षा बरेच डेवलप असतात याला काही कारण नक्कीच असेल ना . कारण शरीर संबंधामध्ये जर स्रीचे स्तन आणि पुरुषाची काही प्रमाणात का असेन आपण मेद असलेली छाती कुशनसारखे काम करते . जर ते नसते तर एकमेकांच्या वजनाने आणि आवेगाच्या आलिंगनाने गुदमरण्याची स्थिती होऊ शकते . इकडे सनी लिओनि आणि तत्सम नट्या आपले सुडौल शरीर दाखवत असतात . इथे म्हणण्याचा उद्देश हा नाही कि कोणी शरीर प्रदर्शन करावे किंवा कोणी ते करू नये . हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि ते त्यानेच ठरवावे . त्याचा तो हक्क आहे . बाकी याचा कोणावर काही आणि कसा परिणाम होईल याबाबत असे आहे कि बरेचसे किशोरवयीन याच मार्गाने आपले कुतूहल याच मार्गे शमवत आहेत . हा मार्ग चूक किंवा बरोबर हे ठरवण्याआधी याला दुसरा काही पर्याय आहे का हेही सुचवावे . अनेक ठिकाणी लैंगिक शिक्षणाला सरळ सरळ विरोध केला जातो आणि मग अशा मार्गे हे लोक आपल्याला आवश्यक माहिती मिळवतात . असे किती लोक आहेत जे समुपदेशनाच्या मार्गाने जाऊ शकतात . बाकी अंघोळ करताना सगळे कपडे काढून ( दुर्दैवाने अनेकांना हे सुख मिळत नाही . बर्याच लोकांना एकतर उघड्यावरच अंघोळ करावी लागते किंवा इतकी चांगली सोय नसते कि सर्व कपडे काढावे , त्यांना अंतर्वस्त्रांसोबत अंघोळ करावी लागते आणि जमेल तसे private पार्टस clean करावे लागतात ) जेव्हा आपण नैसर्गिक अवस्थेत असतो तेंव्हा वाटणारी मोकळीक , relax वाटणे याला काय कारण असू शकते ? एका अभिनेत्रीने मला घरात नैसर्गिक अवस्थेत राहायला आवडते असे म्हटले होते . अगदी हे जाहीर करावेच असे नाही पण किमान काही प्रमाणात तसे राहून आनंद मिळवणे चांगलेच . तुम्हालाही असा आनंद जाणवतो का ? हा असाच आनंद इतरही बाबतीत नग्नता ( मोकळीक ) ठेवली तर नक्की मिळेल .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
12205 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

अरे केहना क्या चाहते हो ?

चिनार
Mon, 05/23/2016 - 11:11 नवीन
अरे केहना क्या चाहते हो ?
  • Log in or register to post comments

तस खूप काही सांगायचं आहे आणि

अनाहूत
Mon, 05/23/2016 - 11:51 नवीन
तस खूप काही सांगायचं आहे आणि तस काहीच नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

ह्म्म... बोल्ड आहे, अश्लील

आनन्दा
Mon, 05/23/2016 - 11:14 नवीन
ह्म्म... बोल्ड आहे, अश्लील नाही. बाकी मतप्रदर्शन करण्यास असमर्थ.
  • Log in or register to post comments

या मतप्रदर्शनासाठी आभार .

अनाहूत
Mon, 05/23/2016 - 11:57 नवीन
या मतप्रदर्शनासाठी आभार .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

शिव शिव शिव...क्काय हे..

टवाळ कार्टा
Mon, 05/23/2016 - 11:20 नवीन
शिव शिव शिव...क्काय हे...मिपावर असे चाल्ते का
  • Log in or register to post comments

बाकी मी तर म्हणतो...अख्ख्या

टवाळ कार्टा
Mon, 05/23/2016 - 11:20 नवीन
बाकी मी तर म्हणतो...अख्ख्या भारतात लुंगी हा कॉर्पोरेट पोषाख असावा... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

दुसऱ्या आयडीने लॉग इन करायला

रातराणी
Mon, 05/23/2016 - 11:26 नवीन
दुसऱ्या आयडीने लॉग इन करायला विसरला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मी कोण काय म्हणेल याची फार

अनाहूत
Mon, 05/23/2016 - 11:54 नवीन
मी कोण काय म्हणेल याची फार चिंता नाही करत ; जे पटत , वाटत ते लिहितो त्यामुळे मला दुसऱ्या आयडीची गरज नाही भासत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

नाही

स्वप्नज
Mon, 05/23/2016 - 12:52 नवीन
माझा प्रतिसाद टका ला होता, तुम्हाला नव्हता अनाहूतजी... अवांतर- काहीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनाहूत

Ohh माझा उगा चूकीचा गैरसमज

अनाहूत
Mon, 05/23/2016 - 13:48 नवीन
Ohh माझा उगा चूकीचा गैरसमज झाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नज

बरोबर अस्लेल्या गैरसमजाला काय

अभ्या..
Mon, 05/23/2016 - 13:52 नवीन
बरोबर अस्लेल्या गैरसमजाला काय म्हंतेत तुमच्यात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनाहूत

ते मुद्दामच लिहीलय . बाकी

अनाहूत
Mon, 05/23/2016 - 14:35 नवीन
ते मुद्दामच लिहीलय . बाकी बरोबर असलेल्या गैरसमजाला समज म्हणाव की गैरसमज ते नाही सांगाता यायच . व्याकरण पंडित सांगू शकतील .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

प्रतिसाद तर 'रातराणी' यांनी

एस
Mon, 05/23/2016 - 14:15 नवीन
प्रतिसाद तर 'रातराणी' यांनी दिला होता ना हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नज

:-)

अनाहूत
Mon, 05/23/2016 - 14:36 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

बहुतेक

सस्नेह
Mon, 05/23/2016 - 14:40 नवीन
त्या स्वत:च्या आयडीने लॉगीन करायला विसरल्या वाटतं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

फारच सोज्वळ हैत त्या... =))

टवाळ कार्टा
Mon, 05/23/2016 - 14:55 नवीन
फारच सोज्वळ हैत त्या... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

ल्ल्ल्लुऊऊऊऊ

रातराणी
Mon, 05/23/2016 - 22:51 नवीन
ल्ल्ल्लुऊऊऊऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कळले हो... ;-)

एस
Mon, 05/23/2016 - 23:54 नवीन
http://www.misalpav.com/comment/769446#comment-769446
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

आयडीघातकी प्रतिसाद?!!!!

प्रीत-मोहर
Mon, 05/23/2016 - 15:08 नवीन
आयडीघातकी प्रतिसाद?!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नज

दुसरा आयडी!!

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 05/23/2016 - 14:53 नवीन
<<मला दुसऱ्या आयडीची गरज नाही भासत .>> तसेही अनाहूत नावावरुन तुमची ओळख कुठे पटते? त्यामुळे डु. आयडी वापरायची गरजच काय? असो. मला हाफ चड्डी (मराठीत शॉर्टस ) वापरायला फार आवडते. आणि आपण लेखात सांगितलेले सगळे फायदे त्यामुळे मला मिळतात.वरती बनियन घालावा किंवा उघडेच राहावे याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे. शिवाय ऑफिसमध्येही तसेच फायदे मिळवण्यासाठी काय वापरावे हे ही सांगावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनाहूत

छे हो मी कोण पामर काही

अनाहूत
Mon, 05/23/2016 - 16:16 नवीन
छे हो मी कोण पामर काही सुचवणारा , बाकी काय परिधान करायच नी काय हे ज्याच त्यान ठरवाव . शक्यतो स्वतःला comfortable वाटेल अस काही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

चांगल आहे , ऑफिसात करा सजेस्ट

अनाहूत
Mon, 05/23/2016 - 11:56 नवीन
चांगल आहे , ऑफिसात करा सजेस्ट .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मुवी लक्ष्यात

नाखु
Mon, 05/23/2016 - 11:55 नवीन
आहे माझ्या अता सांगून्च सोडतो बघा बाबा काय म्हणतात ते :

"नाही निर्मळ मन काय करील साबण"

बाबांचा परात्पकारी शिष्य नाखु
  • Log in or register to post comments

Recusrive ?

मराठी कथालेखक
Mon, 05/23/2016 - 12:20 नवीन
हे काय ओ ? कार्तिक कॉलिंग कार्तिक का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

काहीतरी चुकीचा प्रतिसाद गेला.

मराठी कथालेखक
Mon, 05/23/2016 - 12:21 नवीन
काहीतरी चुकीचा प्रतिसाद गेला. please ignore..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

मुवी लक्ष्यात

नाखु
Mon, 05/23/2016 - 11:56 नवीन
आहे माझ्या अता सांगून्च सोडतो बघा बाबा काय म्हणतात ते :

"नाही निर्मळ मन काय करील साबण"

बाबांचा परात्पकारी शिष्य नाखु
  • Log in or register to post comments

हुश्श...धागा उडण्याआधी वाचून

मराठी कथालेखक
Mon, 05/23/2016 - 12:20 नवीन
हुश्श...धागा उडण्याआधी वाचून घेतला... बाकी धाग्यात शेवटी एक प्रश्न विचारलाय..
तुम्हालाही असा आनंद जाणवतो का ?
कोण कोण उत्तर देणार बरे याचं ?? :) चला मी देतो... खरं तर हा खूप व्यक्तिगत प्रश्न आहे. पण माझं उत्तर नकरार्थी आहे (आणि म्हणूनच सहज सांगू शकलो का ?).. मला वाटतंय नग्नता न आवडणारे लोक नग्नतेच्या प्रसंगांकडे 'नाईलाज' म्हणून पाहतात. कुणी मानसशास्त्रज्ञ अधिक प्रकाश टाकू शकतील काय ?
  • Log in or register to post comments

हो!

चलत मुसाफिर
Mon, 05/23/2016 - 20:04 नवीन
नक्कीच जाणवतो. वारंवार जाणवतो! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

मोकळे व्हा. लेखकानं आपल्या

रमेश भिडे
Mon, 05/23/2016 - 12:22 नवीन
मोकळे व्हा. लेखकानं आपल्या अडचणी सांगून, वाचकांनी आपलं मत मांडून, कपडे काढून सर्वार्थाने मोकळे व्हा....
  • Log in or register to post comments

चांगलं लिहिलय राव.

अभ्या..
Mon, 05/23/2016 - 13:28 नवीन
चांगलं लिहिलय राव. निदान मनात येते ते तरी खुल्लम खुल्ला लिहिलेय. ह्या धाडसाबद्दल अभिनंदन. पण काय आहे की... इकडची फरशी अजून ओली आहे हो. ;)
  • Log in or register to post comments

प्रतिसादाबद्दल आभारी आहे .

अनाहूत
Mon, 05/23/2016 - 13:53 नवीन
प्रतिसादाबद्दल आभारी आहे . हळूहळू का होईना इकडची फरशी वाळावी म्हणून माझा आपला छोटासा प्रयत्न .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तुमचे मुद्दे एकदम वेगळे आहेत.

बोका-ए-आझम
Mon, 05/23/2016 - 14:13 नवीन
शीर्षक वाचून माझा कलेच्या क्षेत्रातली नग्नता यावर काही असेल - खजुराहो वगैरे - असा गैरसमज झाला होता. पण या धाग्यावर तुम्ही काही अत्यंत समर्पक प्रश्न विचारलेले आहेत. उदाहरणार्थ tight jeans बद्दलचे. मला वाटतं आपल्या आयुष्यातल्या फार थोड्या गोष्टी आपण भारतीय लोक स्वतःसाठी करतो. लोक्स अजून पूर्णपणे व्यक्तिवादी (individualistic) झालेले नाहीयेत. समाज काय म्हणेल या भीतीपोटी अनेक गोष्टी केल्या जातात किंवा नाहीत. त्यात कपड्यांसारख्या निरूपद्रवी गोष्टींपासून हुंड्यासारख्या महाउपद्रवी गोष्टीही येतात. अभिनेत्रींनी bare scenes न देण्यामागे हे एक कारण असू शकेल. अभिनेत्री सोनू वालियाने आकर्षण नावाच्या चित्रपटात काही बोल्ड सीन दिले होते. आणि ते सीन्स पाहात असताना तिचे आईवडिल थिएटरमधून उठून गेल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं आणि हे सांगत असताना तिचे डोळे भरून आले होते. तो अभिनय नसावा. तेवढा अभिनय तिला आला असता तर ती अभिनयसम्राज्ञी झाली असती. म्हणजे एकेकाळी मिस इंडिया वगैरे असणाऱ्या अभिनेत्रीलाही असल्या गोष्टी बघाव्या लागलेल्या आहेत. शिवाय आपल्याकडे स्वघोषित संस्कृतीरक्षक दंडुके घेऊन तयार असतातच. एआयबीचं प्रकरण सर्वांना माहित असेलच. त्यावर तर मिपावरही चर्चा झाली होती.
  • Log in or register to post comments

बोका ए आझम आपण आपला याबाबतचा

अनाहूत
Mon, 05/23/2016 - 16:35 नवीन
बोका ए आझम आपण आपला याबाबतचा दृष्टिकोन मांडला हे फार चांगल केल , या विषयाला अनेक पैलू असू शकतात त्यामुळ उत्तरही भिन्न भिन्न असू शकतात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

:'(

भोळा भाबडा
Mon, 05/23/2016 - 15:10 नवीन
बरोबर आहे. अंघोळ ही पूर्णपणे नग्न होऊनच करण्याची गोष्ट आहे. तसाही मानव हा एक प्राणीच आहे, फक्त त्याची बौद्धिक पातळी ही सर्वोच्च असल्याने त्याला तीव्र भावना असतात आणि त्यापैकीच एक म्हणजे "लज्जा" घरामध्ये ज्याला जसं कम्फर्ट वाटतं तसं रहावं,बाहेर मात्र असले माकडचाळे टाळावेत.
  • Log in or register to post comments

ज्याला जसं कम्फर्ट वाटतं तसं

अनाहूत
Mon, 05/23/2016 - 16:39 नवीन
ज्याला जसं कम्फर्ट वाटतं तसं रहाव>>> हाच तर मूळ मुद्दा आहे अनेकांना अनेक कारणांमुळे स्वतःला कम्फर्ट वाटत तस राहाता येत नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोळा भाबडा

सभ्य भाषेतील लेख आवडला

प्रियाजी
Mon, 05/23/2016 - 16:12 नवीन
अशा अवघड विषयावरील अतिशय सभ्य भाषेत लिहिलेला लेख आवडला. याच लेखात भारतातील जुन्या देवळांच्या आत व बाहेर असलेल्या नग्न/ अर्ध्ननग्न शिल्पांचा उल्लेख वा त्यावरील टिपण्णी अपेक्षित होती.
  • Log in or register to post comments

प्रतिसादाबद्दल आभारी आहे .

अनाहूत
Mon, 05/23/2016 - 16:42 नवीन
प्रतिसादाबद्दल आभारी आहे . यात अनेक मुद्दे थोडक्यात घेतले आहेत त्यांचा विस्तार करण्याची इच्छा आहे . ते लिहीताना आपण सुचविलेले मुद्दे उपयोगी पडतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाजी

धाडसाचा आव

महेश_कुलकर्णी
Mon, 05/23/2016 - 16:45 नवीन
नमस्कार, आपण "धाडसाने" हा विषय मांडण्याचा आव आणला आहे परंतु ते करताना देखील जिथे जिथे धाडसी शब्द वापरायचे तिथे इंग्रजी शब्दांचा वापर केला आहे... उदा: बेअर चेस्ट सीन (ऊत्तान वक्ष) Penis erection थोडक्यात तुम्ही पुन्हा एकदा मानसिकता दाखवत आहात की हे विषय आम्ही आमच्या भाषेत उच्चारात सुद्धा नाही... :)
  • Log in or register to post comments

मातृभाषेत हे फारच झणझणीत झाल

अनाहूत
Mon, 05/23/2016 - 17:06 नवीन
मातृभाषेत हे फारच झणझणीत झाल असत , ते सोसवेल या पातळीवर आणण्यासाठी हा प्रयत्न . बाकी धाडस वगेरे काही नाही यात . ख-या आयुष्यात घडलेल्या घटनेवरून यावर विचार करावा वाटल इतकच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश_कुलकर्णी

परकीयांनी लादलेली सोवळी बंधने

चलत मुसाफिर
Mon, 05/23/2016 - 17:02 नवीन
नग्नता ही लैंगिक/अलैंगिक या दोन्ही संदर्भातील असू शकते. एकेकाळी लिंगव्यवहार हा विषय निर्मळतेने आणि मुक्त-निरोगी मनाने हाताळण्याची क्षमता असलेली भारतीय संस्कृती दुर्दैवाने परकीय आक्रमण/प्रभाव यांच्या हिंस्र कचाट्यात सापडून पूर्णपणे स्वयंभीरू होऊन गेली. स्वतःच्या शरीराची लाज बाळगणे आणि ते शक्यतो झाकून ठेवणे योग्य, हे आपल्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या शिकवले जाऊ लागले. पण हळूहळू हे चित्र बदलेल (आणि आता ती वेळ येऊ घातली आहे) अशी आशा वाटते.
  • Log in or register to post comments

नक्कीच

अनाहूत
Mon, 05/23/2016 - 17:08 नवीन
नक्कीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

नक्की काय झालंय?

सूड
Mon, 05/23/2016 - 17:14 नवीन
नक्की काय झालंय?
  • Log in or register to post comments

फार काही नाही नेहमीचच पण

अनाहूत
Tue, 05/24/2016 - 07:01 नवीन
फार काही नाही नेहमीचच पण विचार करायला लाऊन गेलं , लिहीन त्याबद्दल सविस्तर .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

लेखाचा विषय वेगळा म्हणुन उत्सुकतेने वाचला

मारवा
Mon, 05/23/2016 - 19:32 नवीन
पण...काही जमल नाही. असो.
  • Log in or register to post comments

ही थोडीशी पूर्वकल्पना किंवा

अनाहूत
Tue, 05/24/2016 - 07:03 नवीन
ही थोडीशी पूर्वकल्पना किंवा टिजर आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

धागा विचार करण्या सारखा आहे.

विवेकपटाईत
Mon, 05/23/2016 - 20:14 नवीन
धागा विचार करण्या सारखा आहे. अपन पश्चिमी पोशाखला महत्व देतो आहे. सभ्य दिसण्यासाठी. माननीय चिदंबरम लुंगी घालूनच मंत्रालयात येत होते. मल्याळी लोक लुंगी घालण्यात कमी पण वाटून घेत नाही. आपल्या वातावरणाला योग्य कपडे आपण ५०-६० वर्षांपूर्वी घालत होतो. पण शिक्षण वाढले आणि कपडे हि बदलले. सभ्य सुशिक्षित दिसण्याची किंमत पण मोजावीच लागते.
  • Log in or register to post comments

विचार करण्यासारखी गोष्ट आहे

अनाहूत
Tue, 05/24/2016 - 07:09 नवीन
विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना एक मंत्री मंत्रालयात आणि कधीकधी परदेशातही असा भारतीय पोषाख घालू शकतात पण इतर लोक साध ऑफिसमध्ये पण अस नाही करू शकत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

दिगंबर

नमकिन
Mon, 05/23/2016 - 20:28 नवीन
अवस्था होता मोकळे होउुन धर्म बुडत नाहीं तोही भारतात हे तर आपण से रे जाणतोच. अंतर्वस्त्रासाठी पण एकाने (उडीया) हा प्रश्न विचारला होता मला एकदा, बाहेरच्या कपड्याना प्रोटेक्शन असे मी म्हटले होते. परदेशात न्युड बीचेस, न्यूड क्लब असतात जिथे सर्व व्यवहार मोकळा-ढाकळा (बीभत्सता टाळून) निसर्ग सान्निध्यात व्यतीत करतात. तुनळीवर सापडेल. ब्राझील कार्निवल तरळला, असो.
  • Log in or register to post comments

लेख पटला... उद्यापासून

उगा काहितरीच
Mon, 05/23/2016 - 20:30 नवीन
लेख पटला... उद्यापासून अॉफिसमधे ३/४ !
  • Log in or register to post comments

अशी धडाडी हवी . बाकी त्यावर

अनाहूत
Tue, 05/24/2016 - 07:13 नवीन
अशी धडाडी हवी . बाकी त्यावर मिळालेल्या प्रतिक्रियाही इथे शेअर करा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा