....तेव्हा तू मला फार फार आवडतेस....प्रवास ५
अशाच एका कमपॉप्युलर हिल स्टेशनच्या
कमविख्यात्/कमकुविख्यात
सुसाईड पॉईंटवर
आपण दोघेच असताना
त्याच्या अगदी टोकावरुन
भणाणत्या वार्यात
खाली वाकुन बघत असताना
मी मस्करीने तुझा केसांचा विळखा
तुला नकळत
नाजुकपणे
सोडवतो..अलगद..
तू चपापतेस...
तुझे केस अगदी चोहोदिशांनी उधाणलेल्या लाटांसारखे उसळी घेतात.
तु वळुन प्रथम व्याकुळ
व मग क्रुध्द नजरेन
माझ्याकडे पाहतेस!
मला समजते
अब
तो
मै
गया.!!!
मग तू पर्समधुन
बगळ्याच्या अणुकुचीदार चोचीसारखे दिसणारे
काळेभोर क्लचर काढतेस व
दुमडलेल्या ओठात पकडुन
दोन्ही हातांनी,
भणाणत्या वार्यात भिरभिरणार्या
तुझ्या केसांना सावरण्यासाठी
मानेला मोहक झटके देत
तू ताब्यात घेत असताना
मला समजते...
धिस इज नॉट द "केस" ऑफ ओन्ली समथिंग बीईंग टोटली वेंट राँग..
यु हॅव अॅक्चुअली स्पॉईल्ड "द केस"
बीकॉज यु हॅव अॅक्चुअली स्पॉईल्ड "हर केस"
यु
आर
अबाऊट
टू
फिनिश..!
सिचुएशन कंट्रोल करण्याच्या हेतुने मी कसाबसा एक पी.जे मारतो..!
तसाही मी तुझ्यावर मरतोच आहे गं पण समजा
मी आता इथुन खाली उडी मारुन आत्महत्या केली,
तर तू काय करशील..?????
एव्हाना तुझे भिरभिरणारे केस तुझ्या ताब्यात आलेले असतात.
तु त्यांना एक दोन नाजुक वेलांट्या देत
पुन्हा मागे घेत..
पुन्हा मानेला मोहक झटके देत..
तुझे ते दुमडलेल्या ओठांत पकडलेले
बगळ्याच्या अणुकुचीदार चोचीसारखे दिसणारे
काळेभोर क्लचर
तिथुन काढत
ह्रदयात एखादी धारदार सुरी खुपसावी तसे
एखाद्या सराईत खुन्याच्या सफाईने
व्यवस्थित केलेल्या केसांत खोचत
काहीही वेळ न दवडता म्हणतेस...!
....
....
दुसरे लग्न...!
.
.
नाऊ आय एम फिनिश्ड टोटली..!!!
इन एनी "केस" यु हॅव टू जंप नाऊ!!!!
"केस" क्लोज्ड!!!
.
.
पुढच्या एकदोन साईट सिईंग मध्ये
तु तुझे टिपिकल मौनअस्त्र काढुन फक्त हम्म.. हम्म.. चेच वार करत असतेस..
रात्री थंडगार आल्हाददायक रूममध्येही
एकाच बेडवर झोपताना
तू दोघांमध्ये उशी ठेवुन
माझ्याकडे पाठ करुन झोपतेस..
मी ही कुस बदलतो..
मग मी बराच वेळ,
जंगलात मचाणावर,
वाघाची वाट पाहत असणार्या शिकार्याप्रमाणे
तुझ्या प्रत्येक हालचालीचा कानोसा घेत असताना
अचानक
मागच्या एखाद्या फांदीवरुन
एखाद्या अजगराने
त्या शिकार्याची मान पकडावी तसा
तुझ्या हाताचा विळखा....मागुन, माझ्या मानेला बसतो...
सावध..तरीही गाफिल असा मी काही किंचाळ्णार इतक्यात
तुझी बोटे त्या अजगराच्या जीभेप्रमाणे माझ्या ओठांवरुन फिरतात..
....श्शश श्श्श...
तुझा आवाज येतो अगदी जवळुन..
मचाणावर वाघच स्वतः आला कि काय असा फिल येतो....
मी डोक्याखाली घेतलेला माझा दुमडलेला हात सोडवत..
दोघांमधे ठेवलेली उशी काढुन माझ्या डोक्याखाली देत..
मला आपल्याकडे वळवत तू म्हणतेस..
"
तू किंचाळणार हे मला माहीतच होते.
घाबरट...
साधी एक उशी ओलांडायचे तुला जमले नाही..
आणि म्हणे.. आत्महत्या केली तर...
"
मला माहीती आहे
तुला जेव्हा मला मी अगदीच फालतु आहे हे दाखवायचे असते ना?
तेव्हा तू हमखास अहो जाहो वरुन अरे तुरे वर येतेस....
बिनधास्त..
माझ्या नुकत्याच भादरलेल्या केसात
बोटे माळत..
गंभीरपणे म्हणतेस..
"
तुम्हाला साधी उशी ओलांडायचे जमले नाही...
पण....
मी ओलांडली..!!!!
"
मेसेज इज क्लिअर..!
तू वरुन परत तुम्ही वर...
पुन्हा फालतु वरुन..
यु आर द मोस्ट इंपोर्टंट वन वर...
फुल्टु फिदा..
पण खरं सांगु..
तु मला जेव्हा फालतु समजतेस ना..!
तेव्हा एकतर तू एकतर्फी प्रेम करणार्या आशिकाला
बिलकुल भाव न देणार्या प्रेयसीप्रमाणे
खूप खूप सुंदर दिसतेस..!!!
आणि दुसरे जेव्हा तू अशी खूप खूप सुंदर दिसतेस ना
तेव्हा....
.
.
.
.
.
.
तू
मला
फार फार
आवडतेस....!
+ कानडाऊ योगेशु
आधीची प्रवासवर्णने
..तेव्हा मला तू फार फार आवडतेस..प्रवास ४
..तेव्हा मला तू फार फार आवडतेस..प्रवास ३
..तेव्हा मला तू फार फार आवडतेस..प्रवास २
..तेव्हा मला तू फार फार आवडतेस..प्रवास १
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3320
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
आहा....! जबरी झालंय.
जरा जास्तच लांबलीय !
आवडली. २-४ ठोके चुकले काळजाचे
अचानक
आयडी तरी बदला किंवा प्रतिसाद
In reply to अचानक by बाबा योगीराज
प्रत्यक्षात भेटल्यावर नावाचा
In reply to आयडी तरी बदला किंवा प्रतिसाद by रमेश भिडे
जमली बरं कविता
In reply to प्रत्यक्षात भेटल्यावर नावाचा by बाबा योगिराज
वरडा!
चालून दे.
काय सर, तुम्ही पण?
In reply to चालून दे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
In reply to काय सर, तुम्ही पण? by प्रचेतस
आपापल्या पुस्तकांची पानं
In reply to चालून दे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसाद देणार्या सर्वांना
व फक्त कविता वाचुन
जरा मोठी झालीये एवढंच बाकी
मस्त
क्या ब्बात है ! एखादा पेग
टांगा पलटी एकदम भारी :)