..किती लौकरच आज उजाडलं बाई..
सजणाच्या मिठीमध्ये कळालच नाही
किती लौकरच आज उजाडलं बाई...
सजणाच्या प्रेमाला ह्या नाही वेळ काळ
झोपलयं पहा कसं कुक्कुलसं बाळ..
झोपमोड त्याची मला करवत नाही..
चांदण्यात न्हालो दोघे काल पुरी रात्र..
अमृताने तृप्त झाली,हर एक गात्र..
वाटे सकाळच कधी उगवणार नाही..!
तसा आहे आज छान रविवार सुस्त..
घ्यावी गडे अजुनिया..झोप थोडी मस्त...
लावले मी दूर त्याला पिटाळुन बाई..
सजणाच्या प्रेमालाही काळवेळ नाही...
किती लौकरच आज उजाडलं बाई
+ कानडाऊ योगेशु
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2808
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
खी खी खी!
यात खी खी करण्यासारखे काय आहे
In reply to खी खी खी! by रातराणी
सगळंच कसं इस्क्टुन सांगायच तै
In reply to यात खी खी करण्यासारखे काय आहे by सस्नेह
=))
धन्यवाद प्रचेतस... तुम्ही
In reply to =)) by प्रचेतस
कायो
गपा अण्णा गपा! ;)
In reply to कायो by चांदणे संदीप
येस्स...
In reply to गपा अण्णा गपा! ;) by कानडाऊ योगेशु
कथा
धन्यवाद रातराणी,प्रचेत,चांदणे
अर्र्र ते प्रचेत च्या ऐवजी
In reply to धन्यवाद रातराणी,प्रचेत,चांदणे by कानडाऊ योगेशु