✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

..कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले..

क — कानडाऊ योगेशु, Wed, 05/18/2016 - 20:52
..कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले.. हातात हात आले,ह्रदयात नाम झाले ती सोबतीस आली,कामात काम झाले शिकवण समान होती,त्यांची जरी तरी ती.. कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले.. ऐटीत कार गेली,मंत्रीमहोदयांची.. शिस्तीत चालणारे,ट्राफिक जाम झाले.. सारेच चोर होते,पण एकला पळाला त्याच्या फरार नावे,नंतर इनाम झाले रावण नको म्हणुनि,ज्यांना पसंत केले ते ही पुढे परंतु,पुरते हराम झाले त्यांचीच सर्व दु:खे,त्यांनाच छान विकली पाहुनि खूश तेव्हा,पब्लिक तमाम झाले शेजारुनि निघाली,अवखळ बदाम राणी खिडकित त्वरित गोळा,सारे गुलाम झाले रस्ते अरूंद झाले,शेतात फ्लॅट आले, गुत्तेहि बार झाले,विकसित ग्राम झाले + कानडाऊ योगेशु

प्रतिक्रिया द्या
2436 वाचन

💬 प्रतिसाद (15)

वा ये बात!

आदूबाळ
Wed, 05/18/2016 - 20:53 नवीन
वा ये बात!
  • Log in or register to post comments

रावण नको म्हणुनि,ज्यांना पसंत

ईश्वरसर्वसाक्षी
Wed, 05/18/2016 - 21:26 नवीन
रावण नको म्हणुनि,ज्यांना पसंत केले ते ही पुढे परंतु,पुरते हराम झाले ____/\____
  • Log in or register to post comments

शेजारुनि निघाली,अवखळ बदाम

बोका-ए-आझम
Wed, 05/18/2016 - 23:27 नवीन
शेजारुनि निघाली,अवखळ बदाम राणी खिडकित त्वरित गोळा,सारे गुलाम झाले
हे मस्तच!
  • Log in or register to post comments

छान!

चांदणे संदीप
Wed, 05/18/2016 - 23:29 नवीन
सुटे सुटे केले तर भारीच झालेत शेर. Sandy
  • Log in or register to post comments

मस्त.

खेडूत
गुरुवार, 05/19/2016 - 06:55 नवीन
मस्त. भाऊसाहेब पाट्णकरांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

+1111

मोदक
गुरुवार, 05/19/2016 - 07:08 नवीन
+1111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

ग़ज़ल आवडलीय

वेल्लाभट
गुरुवार, 05/19/2016 - 07:33 नवीन
आयुष्य मानवांचे त्या बेलगाम झाले कोणी कसाब झाले कोणी कलाम झाले छायेत रामयांच्या रावणही निपजला वस्तीत रावणांच्या ऐसेही राम झाले
  • Log in or register to post comments

आयुष्य मानवांचे त्या बेलगाम

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 05/19/2016 - 09:47 नवीन
आयुष्य मानवांचे त्या बेलगाम झाले कोणी कसाब झाले कोणी कलाम झाले
मतला बेस्टच.
छायेत रामयांच्या रावणही निपजला वस्तीत रावणांच्या ऐसेही राम झाले
हे ही सुंदरच पण रामयांच्या ऐवजी राघवांच्या जास्त गेय वाटते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

क्या बात है.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 05/19/2016 - 07:39 नवीन
आवडली गझल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

भारी लिहीले आहे.

सतिश गावडे
गुरुवार, 05/19/2016 - 07:47 नवीन
भारी लिहीले आहे.
  • Log in or register to post comments

जबरी

नाखु
गुरुवार, 05/19/2016 - 08:39 नवीन
लिहिले आहे
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलंय.

आतिवास
गुरुवार, 05/19/2016 - 09:03 नवीन
मस्त लिहिलंय. कसाब - कलाम अगदी पटलं.
  • Log in or register to post comments

लई भारी!

भंकस बाबा
गुरुवार, 05/19/2016 - 09:34 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

लय भारी

स्पा
गुरुवार, 05/19/2016 - 09:36 नवीन
लय भारी
  • Log in or register to post comments

प्रतिसाद देणार्या सर्वांन्ना

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 05/19/2016 - 09:45 नवीन
प्रतिसाद देणार्या सर्वांन्ना धन्यवाद!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा