Skip to main content

जागो ग्राहक जागो....

लेखक मोदक यांनी मंगळवार, 09/12/2014 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
गृहकर्जाबाबत बँकेचे नियम यावरून या धाग्याची कल्पना सुचली.. आपण रोज अनेक ठिकाणी ग्राहक म्हणून वावरत असतो.. बँका / वित्तीय संस्था, डॉक्टर्स, विमानसेवा, मोबाईल / इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर आणि सर्व प्रकारची दुकाने... या ठिकाणी आलेले वाईट अनुभव आणि त्याविरोधात आपण कसा लढा दिलात हे येथे लिहूया.. यातून सर्व मिपाकरांना अनेक नवीन गोष्टी नक्की कळतील.. माझे [ सध्या लगेच आठवणारे ;) ] दोन अनुभव.. ***************************************************************** लै लै लै भारी समजली जाणारी अत्यंत हुच्चभ्रू अशी बँक. स्थळ: पुण्यापासून ३५० किमी दूर - महाराष्ट्रातच. दिवस: बुधवार - कोणताही पब्लीक हॉलीडे नाही. वेळ: दुपारी १:०० मी ज्या पार्टीसोबत होतो त्यांचे या बँकेत व्यावसायीक करंट अकाऊंट आहे आणि त्यावर नेहमी भरभक्कम व्यवहार होतात. "Any Branch Banking" हा टॅगही असल्याने त्या बँकेच्या कोणत्याही बँकेत कितीही रकमेचे व्यवहार विनासायास होतात. अर्थात मोठी रक्कम काढावयाची असेल तर बँकेला आधी पूर्वसूचना देणे आवश्यक असते मात्र हा व्यवहार पैसे खात्यात भरावयाचा होता. बँकेत प्रवेश करून कॅशीयरच्या लाईनीत उभारणे, त्या दरम्यान नोटांचे विवरण तयार करणे व डिपॉझीट स्लिप भरणे वगैरे सोपस्कार पार पडले. कॅशीयर : तुमचे इथले अकाऊंट नाहीये.. थांबा साहेबांना विचारतो.. साहेब (असिस्टंट मॅनेजर) : तुमची कॅश स्वीकारता येणार नाही. मी : कारण कळेल का..? असिस्टंट मॅनेजर : तुमचे इथले अकाऊंट नाहीये. मी : हरकत नाही साहेब.. एनी ब्रँच बँकींग आहे. असिस्टंट मॅनेजर : तरीपण घेवू शकत नाही. मी : तुमच्या मॅनेजरला बोलवा. असिस्टंट मॅनेजर : साहेब रजेवर आहेत. मीच मॅनेजर आहे आज. कॅश घेता येणार नाही. मी : नियम बघा.. घेता येते. मी महाराष्ट्रात सगळीकडे भरतो. व्यवहार बघा तुमच्या सिस्टीममध्ये.. आणि गावांची नावे बघा. असिस्टंट मॅनेजर : नाही घेणार. (आम्ही एकदम गोंधळून गेलो होतो) आता सोबतच्याने रिंगणात प्रवेश केला.. अहो साहेब.. आमचेच अकाऊंट आहे... सगळीकडे कॅश घेतात... असिस्टंट मॅनेजर : (बोलणे मध्येच तोडून आणि अत्यंत उद्धट सुरात..) अहो तुम्हाला सांगीतले आहे ते कळतेय का..? कॅश घेणार नाही.. आता दोघांचेही फ्युज गेले.. मी : ओ भाषा सुधारा.. सोबतचा : ओ तुम्हाला हे जड जाईल.. लेखी द्या कॅश देत नाही म्हणून. असिस्टंट मॅनेजर : लेखी देणार नाही. काय करायचे ते करा. मग आम्ही क्यू सोडला. आमच्याकडच्या एका कागदावर सगळा प्रसंग लिहून काढला आणि यावर अ‍ॅक्नॉलेजमेंटची सही द्या अन्यथा आमच्या अकाऊंटला एक रिलेशनशिप मॅनेजर असाईन्ड आहे त्याला कॉल करतो असा दम दिला. तो मॅनेजर सही देईल याची खात्री नव्हती कारण तशी सही देणे म्हणजे त्याने स्वत:च्या पंचनाम्यावर सही करण्यासारखे होते. पण साहेबांनी सही दिली. आम्ही धावपळ करून दुसरी ब्रँच शोधली व पैसे भरले. नंतर हे सगळे प्रकरण आणि त्या पत्राची प्रत cgmcsd@rbi.org.in या रिझर्व बँकेच्या ओम्बुड्समन \ कस्टमर केअरला पाठवली. बँकेने विनाअट त्वरीत लेखी माफी मागीतली व त्या असिस्टंट मॅनेजर साहेबांची त्याठिकाणाहून २५० किमी दूर एका ब्रँचमध्ये "बॅक ऑफिस" ला बदली केली. आता त्या ठिकाणी आमचे पैसे विनातक्रार स्वीकारतात. ***************************************************************** ऑफिसमध्ये कामात बुडलेल्या अवस्थेत असताना अचानक फोन वाजला.. टेलीकॉलर -(मंजुळ सुरात..) मोदक सर बोलताय का..? मी: हो. टेलीकॉलर : मी ** सर्विसमधून बोलत आहे.. तुम्हाला कार घ्यायची आहे का..? तुमचे XXXX बँकेसोबत होम लोन आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला चांगले इंटरेस्ट रेट देवू शकतो आणि अशी अशी ऑफर आहे.. तुम्हाला इंटरेस्ट आहे का..? (हे सगळे एका दमात) मी : (मनातल्य मनात) $%#^& हिला कसे कळाले माझे होम लोन आहे आणि ते पण या बँकेत..!!!! मी: (तिला घोळात घेत) मॅडम मला SX4 घ्यायची आहे. बोला.. आणि साधारणपणे १५ मिनीटांच्या चर्चेनंतर मला हवी ती माहिती कळाली. त्या सेल्सवालीचे नांव, तिच्या मॅनेजरचे नांव आणि सर्वात महत्वाचे बँकेच्या ज्या मॅनेजरने ही माहिती दिली त्याचे नांव. मग एक सुस्पष्ट असा मेल लिहिला. Subject: Complaint - Sharing Personal Details with Third Party. Hello, This is मोदक - My customer ID is १२३४५६७८९. Today morning I got a call from a Maruti Automobile dealer "***" from Fugewadi Pune, asking for any requirement for Auto Loan. I was assured lucrative interest rate since I am a prevailed customer of XXXX Bank. I was shocked to know that caller (Ms. XXXX from number +91-00000 00000) was referring to my home loan and my association with XXXX Bank. After demanding more information on 'my details available at their end' I got to know that "XXXX Has provided these details to her supervisor, Mr XXXX " and they have got data set for around 200 XXXX Home Loan customers. Therefore I would like to know, Is it legitimate to share Loan details / Personal details / Contact number with third party..? If not - I request a thorough investigation as to "Why personal details were made available to third party" I am really disappointed that such incident have taken place even after my contact number is registered for DND. Please feel free to revert in case any information required from my side. Regards, मोदक. नंतर त्या बँक मॅनेजरचा फोन आला.. त्यांनी असे फोन परत येणार नाहीत याची खात्री दिली आणि तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल दिलगीर आहोत अशी माफी मागितली मारूतीच्या शोरूममधून ज्या मुलीने फोन केला तिने माफी मागावी अशी अपेक्षा आहे का..? असेही विचारले या गोष्टीस मी नकार दिला कारण माझे काम झालेले होते. मला आजतागायत पुन्हा त्या शोरूम मधून किंवा कोणत्याही ठिकाणाहून Home Loan च्या रेफरन्सने फोन आलेले नाहीत. ***************************************************************** या ठिकाणी आलेले वाईट अनुभव आणि त्याविरोधात आपण कसा लढा दिलात हे येथे लिहूया.. यातून सर्व मिपाकरांना अनेक नवीन गोष्टी नक्की कळतील.. *****************************************************************

वाचने 70115
प्रतिक्रिया 107

प्रतिक्रिया

In reply to by मोदक

"आर्मर जॅकेट" असे असेल तर अत्यंत रद्दड क्वालिटीचे असते असा स्नॅपडीलचा अनुभव आहे . शक्यतो पैसे परत मिळाले तर उत्तम

In reply to by मोदक

मित्राला फ्लिपकार्टचा एक गंडका अनुभव आहे. डेलचा चार्जर मागवलेला. कार्ट्यांनी शामसिंगचा चार्जर पाठवला. त्यावर डेलचं स्टीकर होतं. ल्याप्टॉपला पीन बसेना म्हणल्यावर मग साधी स्टीकर उचकटून पाहीली तर खाली वेगळाच ब्रँन्ड.(दिल्लीच्या चोर बाजाराच पत्ता होता बॉक्सवर) फोन केल्यावर कस्टमर केअरची बै अक्कल काढायला लागली. फोटो वगैरे काढून पाठवल्यानंतर म्हणले रिफंड देणार नाही, रिप्लेसमेंट देतो. पैशासाठीच अडून बसल्यानंतर त्यांनी वॉलेट मध्ये पैसे टाकले. ते प्रॉडक्ट नंतर साईट वरून काढून टाकलं. अ‍ॅमेझॉनचा माझा एक हेडफोन सव्वामहीन्यात गंडला. जेबीएलवाले म्हणाले की ऑनलाईनला आम्ही वॉरंटी देत नाही. अ‍ॅमेझॉननं परत घेतला, संपूर्ण किमतीचा चेक दिला. ई रिटेलर्स कडचे वॉरंटीचे नियम नेमके काय आहेत? काही कंपन्यांनी ऑनलाईन खरेदीला वॉरंटी देणार नाही असं डीक्लीअर केलेलं आहे. तरीही त्यांचे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. नेमकं काय आहे हे? त्या वेळेला अ‍ॅमेझॉननं काम केलं म्हणल्यावर मी खोदकाम करत बसलो नाही. कोणाला माहीत असेल तर सांगणेचे करावे. Here’s what Lenovo, Dell, HP, Toshiba, Asus, Nikon have said about e-commerce offers & warranties in India Lenovo: Flipkart, Snapdeal and Amazon not our authorized resellers Snapdeal, Flipkart not our authorised resellers: Lenovo

Dear Sir , My name is *** . I am from Mumbai. I had taken two cards ***and ***I am using them and paying the bills also since last few months. But since last one month I am getting calls from you that I have one more connection *** They are asking me the pending bill which was initially 701 and now gone to 901. This card is not mine. Your agent ***hadgiven me only two cards. This third card is not mine. Kindly stop this number *** and please ddon't harass me. Your agent who gave me two card is *** His number is . *** Thanking you. *** महिनाभर सारख फोन येत होते.. कार्ड तुमचेच आह . बिल भरा.. मी शेवटी कंटाळुन फेसबुकवर टाकले.. फेसबूकावर मेसेज केल्यावर चमत्कार्‍ झाला. दोन तासाट एज्म्तचा फोण आला. म्हणाला .. माझा जॉब जाइल. त्याने स्वता पैसे भरून सिम ब्म्द केले

In reply to by hitesh

हे तिसरे कार्ड नाना किंवा माइंनी वापरले असेल का ? :)

मी परवा असाच सिंहगड रोडवरच्या एका प्रसिद्ध वडापावच्या दुकानात वडापाव खायला गेलो. तिथे नेहमीप्रमाणे वडापाव घेण्यासाठी रांग होती. वडापाव बरोबर त्यांनी मला चिंचेची चटणी दिली. माझं टाळकंच सणकलं. म्हटलं तुम्ही ही अशी वडापाव बरोबर चिंचेची चटणी देता आणि मग मुंबईकरांना (डोंबोलीकरांना टु बी स्पेचिफिक) पुणेकरांना बदनाम करण्याची संधी मिळते. ते वडापाववाले ही पुणेकरच असल्यामुळे आणि मी उपरा पुणेकर असल्यामुळे आमच्यात खडाजंगी झाली. शेवटी मी जिंकणार नाही असे लक्षात येताच (खरे तर आपण अजून पुण्यात तसे नविन आहोत याची जाणिव होताच) मी त्या वडापाववाल्यांना ग्राहक मंचाकडे जायची (पोकळ) धमकी दिली आणि घेतलेला वडापाव खाऊन तिथून सटकलो.

In reply to by सतिश गावडे

क्यारे....कुच कामधंदा नै तेरेकू... वडापाव के सात चिंच का चटणी दिया तो लगेच (इथे "च" "चु..." मधला :) ) भांडण करनेका?

In reply to by अनुप ढेरे

एकदा हिरवी चटणी + सुक्की लसूण चटणी घातलेला वडापाव मीठ लावून फ्राय केलेल्या हिरव्या मिरचीबरोबर खाऊन बघा vaDaapaav

येत्या 24 तारखेला राष्ट्रीय ग्राहक दीन आहे तस्मात ईथल्या सर्व हौशागौशानौशांनी आपली हौस भागवून घ्यावी.

In reply to by सस्नेह

इतर दिवशी केवळ राज्यस्तरीय पातळीवरचा ग्राहक दीन असतो आणि २४ तारखेला राष्ट्रीय ग्राहकही दीन असणार आहे, असे काही आहे का?

काही वेळा पूर्वीच . . चक्क रिजर्व बँक चे गवर्नर रघुराम राजन यांच्या नावाने एक मेल आला . . मेल ला डोमेन सुद्धा बँक चा होता . . मेल चा सारांश पुढील प्रमाणे . . " ब्रिटीश सरकार आणि रिजर्व बँक यांच्यात झालेल्या एका करार नुसार तुम्ही ५००००० ब्रिटीश पौंड जिंकला आहात . तरी आमच्या अबक खात्यावर १५००० रुपये जमा करा . आणि आपलं नाव गाव बँक चे नंबर इत्यादी सगळं पाठवून द्या . " लगेच रिजर्व बँक च्या साईट वर कम्प्लेंट लॉक केली . आणि अपेक्षे प्रमाणेच हे सगळं खोटं असल्याचा रिप्लाय आला . .

In reply to by अद्द्या

मलापण एक फोन आला होता. सांगत होते की तुमचा क्रेडीट्कार्ड्चा व्याजदर खूप जास्त आहे. आमचे बँकेबरोबर टायअप आहे. डीटेल्स द्या, व्याजदर कमी करून देतो. बॅंकेत फोन केला तेव्हा कळाले की बोगस फोन आहेत.

मी फार फार मागे एल आय सी हाउसिंग फायनान्स मधून होम लोन घेतलय. ( त्यांच्याकडून होम लोप्न घेण्याची घोडचूक केली आहे. ) सुरुवातीचे तीन वर्ष व्याज ८.९ टक्के दराने फिक्स्ड होतं. त्यानंतर फ्लोटिंग होणार होतं. हे फ्लोतिंग म्हणजे वित्त संस्थेचा जो काही जहिर बेस रेट असेल, त्याच्याशी निगडित असते. अर्धा एक टक्का मागे पुढे. तीन वर्षे संपल्यानंतर मला तब्बल साडे अकरा, बारा असे कै च्या कै दराने व्याज आकारले जात आहे. ( ह्याच दराने घ्यायचे असेल तर पर्सनल लोन सुद्धा काय वाईट आहे ? ) . . मी त्यांच्या हापिसात जाउन " व्याजाचा दर बेस रेटशी लिंक्ड करुन हवा आहे. त्याची काय प्रोसेस आहे ती सांगता का " असे म्हणत विचारणा केली. "आमच्याकडे असे काहीही होत नाही" असे म्हणत त्यांनी मला घालवले. अर्थात ही सर्व विचारणा तोंडीच केलेली आहे, लेखी नाही. शिवाय त्यांचे उत्तर चुकीचे वाटत असले तरी त्यांनी शांअतपणे व नम्रपणेच दिलेले आहे. पण नवीन सर्व ग्राहक एल आय सी हाउसिंग फायनान्स कडून फ्लोटिंग दराने दहा सव्वा दहा टक्क्याच्या आसपास लोन मिळवू शकतात. अशा जाहिराती सर्वत्र आहेत. मग जुन्या ग्राहकास दहा सव्वा दहा फ्लोटिंग , किम्वा बेस रेटशी निगडित फ्लोटिंग नाकारला जाउ शकतो का ? . . आय सी आय सी आय, व इतर कित्येक बँकाबाबत मला खात्री आहे. रिझर्व्ह ब्यांकेने रेपो रेट वगैरे कमी केल्यास, आणि आपण ब्याअंकेस सुधारित दर लावण्याची विनंती केल्यास काही शे किंवा हजार रुपयांची प्रोसेसिंग फीस घेउन नवा दर आकारला जातो. . अ, पण सुधारित दर लावा; अशी भूमिका घेणे रास्त आहे; हा माझा अंदाज. . . . मला सल्ला हवा आहे. माझा अंदाज योग्य आहे का. . . गृह कर्ज दुसर्‍या ब्यांकेत हलवणे मला सध्या शक्य नाही. कागद पत्रांची पूर्तता वगैरे करणे जिकिरीएचे वाटते. सग्ध्या बर्राच व्यग्र आहे. त्यामुळे तूर्तास तरी ह्यांनीच जरा शहाण्यासारखा दर लावावा ही अपेक्षा आहे. . .

In reply to by मन१

मनोबा.. तुझ्याकडे एकच ऑप्शन आहे तो म्हणजे काही प्रोसेसींग फी भरून व्याजदर बदलता / दुसर्‍या फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट करता येतो का ते पाहणे. (दुसरा ऑप्शन म्हणजे लोन शिफ्ट करणे असा आहे.. पण तो तुला नको आहे!)

In reply to by मन१

एकदा लोन सँक्शन झाले की काही मोठी कागदपत्रे लागत नाहीत. तुझी सॅलरी ज्या बॅंकेत जमा होते तिथे जाऊन आपले लोन टेक ओव्हर करा म्हणून सांग. तेच सगळे करतील.

In reply to by मन१

रुवातीचे तीन वर्ष व्याज ८.९ टक्के दराने फिक्स्ड होतं. त्यानंतर फ्लोटिंग होणार होतं.
असं लोन अ‍ॅग्रीमेंटमध्ये लिहिलं आहे का? ते कोणत्या कॉव्हेनंट्सवर (अटींवर) अवलंबून आहे का?

गेले ८ महिने एअरटेल सोबत वाद सुरू आहे. त्यांचे इंटरनेट कनेक्शन घेताना सेल्सवाला येवून डेमो देवून गेला व त्या स्पीडचे नेटवर्क पुन्हा मिळाले नाही. एअरटेल वाल्यांकडे भरपूर तक्रारी केल्या व त्याचे उत्तर म्हणून वेगवेगळ्या टीमचे भरपूर लोक्स येवून "हो येथे नेटवर्क प्रॉब्लेम आहे" असे सांगून गेले. एअरटेलवाल्यांनी मला, "तुमच्या येथे टॉवर लावायला पाहिजे, त्याला वेळ लागेल", "टॉवर लावण्यास जागा शोधून द्या" येथेपर्यंत मेलामेली केली. (हा विनोद नाही माझ्याकडे या गोष्टींचे मेल आहेत..!!) काल संध्याकाळी सगळे उचलून मा. मंत्री रवीशंकर प्रसाद आणि ट्रायला पाठवले. आज दुपारी त्यांनी एअरटेलला "For resolving the grievance please" असे बोल्ड अक्षरात लिहून पाठवले व मला CC मध्ये ठेवले आहे. बघू काय होते आहे ते...

आज दुपारी त्यांनी एअरटेलला "For resolving the grievance please" असे बोल्ड अक्षरात लिहून पाठवले व मला CC मध्ये ठेवले आहे. क्या बात है !

मला कुठलीही माहिती किवा नोटीस न देता ICICI ने account मधून पैसे काढून घेतले "Low Balance " च्या नावावर . नाही तेव्हा नवीन policy, scheme, advertisement यांचे शेकडो sms, email फुकटचे पाठवतात. पण customer ला साधी माहिती सुद्धा देत नाही कि तुमच्या account चा balance कमी होत आहे, या दिवसानंतर आम्ही पैसे कापून घेऊ. Deduction वाचवायचं असेल तर इतके पैसे या कालावधीत भरा. आपलं जाम डोकं सरकलं…. एक खरमरीत email लिहिला…CEO ते सगळे Managing director, VP, AVP....जेवढे दिसले त्यांच्या email वर सगळ्यांना पाठवला… Hello, This is XXXX holding aaccount in ICICI bank from last 5 years. I did number of transactions with ICICI bank. Recently Rs XXXX has been deducted from my account before prior intimation. Reason was below quarterly balance. I have been told by customer service that, this is as per your policy. I agree, you can craft your policies as per your wish and benefits . But you shall consider customer and his track record with your bank. I have requested that the ICICI should inform customers beforehand if they see the balance below mark and shall advice them. If the customer can replenish the advised amount within certain time-frame, then he need not pay any charge. ICICI sending number of promotional, advertisement etc emails but why can't ICICI implement a simple system to check customer quarterly balance and advice him accordingly? Is it very difficult for you to implement ? or you wish to suck customer money with your policies and loose faith. If you are advertising as a customer oriented bank then you should implement system which really helps customer. If you still want to continue like this, then I may not keep an account with ICICI bank. -- Thanks and Regards एका आठवड्यामध्ये कापलेले पैश्याचं खात्यामध्ये पुनरागमन झालं….

In reply to by राहुल०८

झकास.. अभिनंदन.!! मी गेले काही महिने क्रेडीट कार्डच्या लिमीटपेक्षा जास्त खर्च केला; म्हणून मला ओव्हरलिमीट चार्जेस + सर्वीस टॅक्स वैग्रै वैग्रै असा ५७२/- रूपये दंड लावला. चूक माझी होती; तरीही मी त्यांना मेल लिहिला की तुम्ही मला असे चार्जेस फोन करून कळवले नाहीत आणि कस्टमरला या कारणासाठी दंड लावणे योग्य नाही (This is not fair टाईप्स!!) तिसर्‍या दिवशी त्यांचा "In appreciation of your relationship, we have arranged to reverse the mentioned charges levied on the card account" असा मेल आला. :)

मला एक प्रश्न पडलेला आहे. पण तो नक्की ग्राहक कॅटेगरीत येतो की नाही हे नक्की माहिती नाही. तरीही इथे विचारत आहे. माझ्या मुलाला मागच्या वर्षी "ट्रिहाऊस कर्वेनगर" इथे प्रवेश घेऊन दिला. तेव्हा अ‍ॅडमिन फीस म्हणुन ३०हजार अधिकचे भरले होते. ह्या वर्षी रोल ओव्हर अ‍ॅडमिशन म्हणुन फिसचा पहिला हप्ता - १६ हजार रुपये भरले. शाळा नेहमी ३ टप्प्यांमध्ये फीस मागते. त्यानुसार पहिला जानेवारीचा हप्ता आम्ही दिला. पुढचा जुन आणि नोव्हेंबर मध्ये असतो. एप्रिल मध्ये आमचे एक वर्षासाठी अमेरिकेला जायचे ठरल्याने मी मुलाच्या अ‍ॅडमिशनचे कसे हे विचारण्यास प्रिन्सिपलकडे गेले. तेव्हा संपुर्ण फिस भरावी लागेल असे कळाले. त्या बदल्यात मुलगा "ऑनलाईन स्टूडंट" म्हणुन रोल वर राहिल आणि दर महिन्याला आम्हाला मंथली प्लानर पाठवले जाईल असे सांगितले. ह्यासंदर्भात अजुन चौकशी करण्यास आणि आवश्यक अर्ज देण्यास मी शाळेत अ‍ॅडमिनला परत भेटले. तेव्हा असे कळाले की १. मुलगा शाळेत येणार नसुनही "अ‍ॅक्टिव्हिटी आणि स्पोर्ट्स फी" कमी करता येणार नाही. २. मध्येच अ‍ॅडमिशन कॅन्सल केल्यास फक्त ट्युशन फिस परत दिली जाईल. ती सुद्धा जेवढे दिवस शाळेत होतात त्या हिशोबाने कापुन. एकंदरीत विचार करता आणि शाळेत ज्या पद्धतीने मुलाला शिकवले जात आहे ते पहाता मला ह्या शाळेत मुलाला ठेवु नये असे वाटल्याने मी दुसर्‍याच दिवशी शाळेत अ‍ॅडमिशन कॅन्सल करायला गेले. तेव्हा तिथे परत प्रिन्सिपल भेटल्या. त्या भेटीत नव्या गोष्टी अशा कळाल्या की:- १. फीस कोणतीही परत मिळणार नाही कारण एकही दिवस शाळेत आला असाल तर त्या टर्मची फीस द्यावी लागेल. २. ह्या संबंधात शाळेचे धोरण लिखित स्वरुपात दाखवा अशी मागणी केल्यावर आउटलुक मधला एक मेल दाखवण्यात आला. मी ह्यावर "पहिला हप्ता भरलेला आहे. दुसर्‍या हप्त्याआधीच कॅन्सलेशन असल्याने पुढची फीस भरण्याचा प्रश्नच येत नाही, तेव्हा काही रक्कम परत न देता केवळ कॅन्सल करा आणि बोनाफाईड द्या" अशी मागणी केली. त्याला होकार मिळाला. पण ३ दिवसांनी फोन आला की "६०% रक्कम भरल्याशिवाय बोनाफाईड मिळणार नाही." मी परत जाउन प्रिन्सिपलला भेटले. तेव्हाही "हीच शाळेची पॉलीसी आहे" असे उत्तर मिळाले. तेव्हा माझे अनुत्तरित राहिलेले प्रश्नः- १. अ‍ॅडमिशन फॉर्म काढुन पाहिला असता शाळेने माझी कुठेही अशा धोरणांवर सही घेतलेली नाही. शाळेकडे असे मुळात लिखित धोरणच नाही. खरं तर "फीस आणि अ‍ॅडमिशन पॉलीसि" असणे आवश्यक नाही का? २. शाळेने कधीही टर्म प्रमाणे फीस मागितलेली नाही. नेहमी इन्स्टॉलमेंट मध्येच मागितली आहे. मग अशावेळी कॅन्सल करताना टर्म प्रमाणे फीस शाळा घेऊ शकते का? आणि ६० हा आकडा कसा काढला हे उत्तर देणे त्यांना बंधनकारक आहे का? आज पुन्हा चौकशी केली असता, डायरेक्टर मॅडमनेही हेच सांगितले आहे असे उत्तर मिळाले. वास्तविक बानोफाईड काही माझ्या मुलाला अत्यावश्यक नाही. मी परत आल्यावरही त्याला कुठेही प्रवेश मिळेलच. पण प्रश्न तत्वाचा आहे. अशी अडवणुक शाळा करु शकते का? मी ग्राहक म्हणुन इथे दाद मागु शकते का? शाळा खाजगी असल्याने कितीही आणि कशीही फिस घेऊ शकतात. पण एक पालक म्हणुन माझी संमती घेणे आवश्यक नाही का? किमान एक ठरलेले धोरण असणे आवश्यक नाही का?

In reply to by पिलीयन रायडर

हे सर्व मुद्दे लिहुन मी शाळेच्या डायरेक्टरला मेल केला. साईट्वर जे जे मेल आयडी सापडले त्या सगळ्यांवर हा मेल पाठवला. आज मला मुलाचे बोनाफाईड घेउन जा म्हणुन मेल आला आणि शाळेत गेल्यावर लगेच बोनाफाईड दिलेही गेले. :)

दुकान दारी करायची म्हटले की हे असे होते, कुठूनही पराया माल अपना. पुढचे पैसे टप्पा टप्पा घेत होते तेच निवडलेत ते ठीक अन्यथा एकरकमी ची सवलत मिळवताना पुढचे गमावुन बसला असतात. आमच्या सौ मुळे आम्हालाही या "झाडाची" सावली लाभली हिरवे चलन खर्च करुन.

सावकाश वाचून कमेंट देइन

दोनेक महिन्यापूर्वी एक कॉल आला. कुणी अश्विनी नामक पुण्यातील sbi एजंटने मला sbi क्रेडिट कार्ड घ्यायचे आहे का विचारले. मी कार्डच्या चार्जेस आणि बेनिफिटस बद्दल माहिती विचारली. त्यवर तिने sbi सिम्प्ली सेव्हर नावाच्या कार्डाची माहिती दिली, ती अशी. sbi सिम्प्ली सेव्हर कार्ड हे पहिल्या वर्षी फ्री असून दुसऱ्या वर्षापासून रु. ४९९ प्रतिवर्ष चार्जेस. रु. २००० एक महिन्यात खर्च केल्यास अमुक इतके पॉईंट्स वगैरे. माझ्या दृष्टीने फायदेशीर ऑफर अशी होती की पेट्रोल खरेदीवर २ टक्के सूट. मला महिन्याला साधारण ४५०० रु. चे पेट्रोल लागते आणि ते डेबिट कार्डावर घेतल्यास त्यावर ३ टक्के सरचार्ज. म्हणजे क्रेडिट कार्डचे २ आणि डेबिट कार्डचे ३ असे ५ टक्के वाचले असते. या एकाच कारणासाठी मी सिम्प्ली सेव्हर कार्ड घ्यायचे ठरवले आणि त्या बाईला संमती दिली. तिने माझे कागदपत्र मागितले ते पाठवले आणि व्हेरिफिकेशन कॉल येईल म्हणून सांगितले. काही दिवसांनी sbiच्या दिल्ली ऑफिसकडून कॉल आला. मात्र त्यांनी मला सांगितले की माझ्या कागदपत्रांवरून मी सिम्पली सेव्हर ऐवजी प्लॅटिनम कार्डसाठी इलिजिबल असून मला प्लॅटिनम कार्ड घ्यायचे आहे काय ? मी त्या कार्डच्या टर्म्स विचारल्यावर सांगितले गेले की प्रतिवर्ष रु. ३००० चार्जेस असून डीपार्टमेंटल स्टोर खरेदीवर बरेचसे पॉईंट्स वगैरे जादाचे बेनिफिट्स आहेत. शिवाय कार्ड अ‍ॅक्टिव्हेशननंतर लगेचच रु. ३००० ची गिफ्ट व्हाऊचर्स फ्री. मला विचार करण्यासाठी वेळ हवा म्हणून सांगितल्यानंतर कन्फर्मेशनसाठी सेकंड कॉल करण्यात येईल असे सांगितले गेले. त्यानंतर मी ऑनलाईन माहिती घेतली तेव्हा असे समजले की रु. ३००० ची गिफ्ट व्हाउचर्स यात्रा, बाटा इ. कंपन्यांची आहेत, ज्यांची मला सध्या काहीच आवश्यकता नव्हती. सो मी सिम्पली सेव्हरच घ्यायचे ठरवले. पण यानंतर सेकंड कॉल आलाच नाही. मात्र माझ्या मोबाईलवर मेसेज आला की आपले प्लॅटिनम कार्ड डिस्पॅच झाले असून लवकरच ते आपल्याला मिले. त्यानंतर अ‍ॅक्टिव्हेशन करा इ. मला धक्काच बसला. मी अजुनी संमती दिली नसताना कार्ड कसे डिस्पॅच केले ? मी अश्विनीबाईंना पुन्हा फोन केला आणि सांगितले की मी कन्फर्मेशन दिलेले नसतानाही मला प्लॅटिनम कार्ड का दिले गेले ? अश्विनीबाईनी सांगितले की त्या पुण्यात असून दिल्लीला कागदपत्र पाठवले की त्यांचा संबंध संपला. मी तिला सांगितले की मला सिम्पली सेव्हरच हवे असून प्लॅटिनम कार्ड दिल्यास मी ग्राहक कोर्टात जाईन. त्यावर तिने दिल्लीस संपर्क साधून सेकंड कॉल करण्यास सांगते असे सांगितले. यानंतर दोन दिवसांनी सेकंड कॉल आला. त्यावर मी सांगितले की मला प्लॅटिनम कार्ड नको आहे आणि सिम्ल्पली सेव्हर हवे आहे. दिल्लीवाल्यांनी ओके म्हणून सांगितले. पुन्हा दोन दिवसांनी मला एका कुरिअरवाल्याचा फोन आला की तुमचे क्रेडिट कार्ड आले आहे आणि घ्यायला कुठे येऊ ? मी विचारले की कसले कार्ड आहे ? त्यावर त्याने प्लॅटिनम कार्ड असे सांगितले. तेव्हा मी त्याला सांगितले की ते कॅन्सल झाले असून दुसरे सिम्पली सेव्हर नावाचे कार्ड आल्यानंतर मला द्यावे. कुरिअरवाल्याने ते परत sbi ला पाठवले. यानंतर चार दिवसांनी मला मेसेज आला की आपले प्लॅटिनम कार्ड चे अ‍ॅक्टिव्हेशन झाले असून रु. ३००० ताबडतोब जवळच्या sbi शाखेमध्ये भरा. मी अश्विनीबाईना पुन्हा फोन केला. त्यावर तिने सांगितले की सेकंड कॉल नंतर तिची जबाबदारी संपली असून यानंतर मी दिल्ली येथे संपर्क साधावा किंवा ईमेल करावा. मग मी तिने दिलेल्या ईमेलआयडीवर ईमेल केला. यावर उत्तर काहीच आले नाही पण चार दिवसांनी मला माझ्या पोस्टल पत्त्यावर एक जाडजूड पाकीट आले, ज्यात प्लॅटिनम कार्डसाठीच चार्जेस रु. ३०००, लेट चार्जेस रु. ११०० आणि इतर सटरफटर काहीतरी असे मिळून रु. ५१०० मला बिल लावून ते माझ्या नावावर डेबिट टाकले होते. आता मात्र मी खवळले. मिपाकर मोदक याचा फोनवर सल्ला घेतला. त्याप्रमाणे sbiचे जालावरील ऑफिशियल कम्प्लेंट सेंटर feedback@sbicard.com शोधून काढले आणि रीतसर तक्रार दिली. Feedback वरून उत्तर आले की तुम्ही प्लॅटिनम कार्डसाठीच अ‍ॅप्लाय केले होते व ते तुम्हाला देण्यात आले आहे. व तुमचे कार्ड अ‍ॅप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला फी भरावीच लागते. ती न भरल्यास लेट फी व इंटरेस्ट ही भरावा लागतो. तुम्हाला अद्याप कार्ड मिळाले नसल्यास पत्ता द्या, आम्ही पुन्हा पाठवू व लेट फी रद्द करू. मी चाट पडले. पुन्हा उत्तर दिले की मी कसलेही अ‍ॅप्लीकेशन केले नसून तुमच्या एजंटने मला सिम्पली सेव्हर नावाचे कार्ड ऑफर केले होते व ती ऑफर अ‍ॅक्सेप्ट करून मी त्यासाठी पेपर्स पाठवले होते. तुम्ही दिलेले प्लॅटिनम कार्ड मला नको असून माझ्या अकौंटवर लावलेले सर्व चार्जेस काढून टाकावेत. यावर उत्तर आले की आम्ही लेट फी मधून टाकली असून तुम्ही सिम्पली सेव्हर कार्ड अ‍ॅक्टिव्हेशन केल्यानंतर प्लॅटिनम कार्डचे चार्जेस आम्ही withdraw करू. हे म्हणजे ब्लॅकमेलच झाले की ! आता मात्र मी इतकी वैतागले की sbiचे कुठलेही कार्ड नको, असे ठरवून टाकले. पुन्हा मोदकचा सल्ला घेतला. त्याचे म्हणणे पडले की पहिले सिम्पली सेव्हर घेऊन सगळे चार्जेस withdraw करून घ्यावेत. आणि नंतर ते सिम्पली सेव्हर हवे असल्यास ठेवावे नाहीतर परत करावे. मग त्याप्रमाणे त्यांना कळवले. त्यावर त्यांनी वेगवेगळ्या कार्ड्सची माहिती असलेली एक लिंक दिली. ती पाहिल्यानंतर त्यात उन्नाटी नावाचे एक कार्ड आढळले, ज्यात पाच वर्षपर्यंत कोणतेही चार्जेस नव्हते. शिवाय इतर बेनिफिट्स सिम्पली सेव्हरसारखेच. मी बारकाईने पहिले की काही छुपे चार्जेस तर नाहीत. पण वेगवेगळ्या पेजेसचे सर्फिंग करूनही इतर काहीच चार्जेस दिसले नाहीत. मग काय, Feedback वाल्यांना कळवले की उन्नाटी कार्ड मला चालेल. त्यावर त्यांनी उत्तर दिले की त्यासाठी मला रु. २५००० इतके फिक्स डिपॉझिट sbi कडे भरावे लागेल. मला धक्काच बसला ! हा काय चावटपणा ? अशी काही कंडीशन असेल तर वेबसाईटवर का नाही दिली ? मी पुन्हा काळजीपूर्वक जालावर शोधले. कुठेही या फिक्स डिपॉझिटवाल्या कंडीशनचा उल्लेख नव्हता. मग मी feedback वाल्यांना एक खरमरीत उत्तर लिहिले. की, २५००० रु. फिक्स डिपॉझिट हे वेबसाईटवर कुठेही लिहिलेले नसताना तुम्ही कसे काय मागत आहात ? हे चुकीचे असून हा प्रकार अतिशय खेदजनक आहे आणि मला आता sbi कडून कुठल्याही प्रकारचे क्रेडीट कार्ड नको आहे. तसेच माझ्या खात्यावरील सर्व चार्जेस जर ताबडतोब withdraw केले नाहीत तर मला नाईलाजाने आता कन्झ्युमर कोर्टात तक्रार द्यावी लागेल. या ईमेलची कॉपी मी nodalofficer@sbi.com यांना पारित केली. यानंतर दोनच दिवसात nodalofficer यांचेकडून उत्तर आले की आपल्या विनंतीप्रमाणे आपल्या नावावरील सर्व क्रेडीट कार्डे रद्द केली असून आपल्या खात्यावरील सर्व चार्जेस withdraw केले गेले आहेत. भविष्यात आपल्याला sbi कार्ड हवे असल्यास कृपया संपर्क साधा इ. इ. ....आता sbiची कुठलीही सर्व्हिस घेण्यापूर्वी नक्कीच दहावेळा विचार करण्यात येईल !!!

या महिन्यात वेगवेगळ्या कंपन्यांशी फोनाफोनी सुरू आहे... ***** ओरल बी चा सहा महिन्यांपूर्वी घेतलेला एक ऑटोमेटिक टूथब्रश खराब होऊ लागला. त्याच्या ग्रिपवर फंगस तयार झाले. (हेड दोनदा बदलल्याने हेड चांगले होते) मग ओरल बी ला मेल केला. लगेच रिप्लाय आला आणि त्यांनी फोटो बघून नक्की काय झाले आहे ते बघितले आणि पुढील अ‍ॅनालिसीससाठी प्रॉडक्ट परत मागितले - त्याबदल्यात त्याच किंमतीची बिग बझार व्हाऊचर्स पोस्टाने घरी आली. ***** अमुलची बासुंदी एका अमुल स्टोअर मधून घेतली. दुसर्‍याच दिवशी टेट्रापॅकमधील बासुंदी खराब झाली आणि त्यात गॅस तयार होऊ लागला. पुन्हा कस्टमर केअरशी फोनाफोनी. अमुलच्या कस्टमर केअरने फोन उचलला नाही. मग फॅक्टरीला फोन केला. त्यांनी प्रॉब्लेम विचारला आणि शहर विचारले. थोड्या वेळाने पुणे ऑफिसमधून फोन, पुन्हा प्रॉब्लेम विचारला आणि नेमक्या कोणत्या दुकानातून बासुंदी घेतली ते विचारले. थोड्या वेळाने आणखी एकाचा फोन. या साहेबांनी "दुकानदाराशी बोललो आहे, प्रॉडक्ट तेथे जमा करा आणि त्याच किंमतीचे काहीतरी घेऊन जा किंवा पैसे परत घेऊन जा" म्हणून सांगितले. ***** आता तनिश्कसोबत मेलामेली सुरू करायची आहे. एक दागिना फॉल्टी लागला आहे आणि गेले दीड वर्षात पाच वेळा दुरूस्त करून घेतला आहे.