✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

....विश्वाची उलगड होते.....

क — कानडाऊ योगेशु, Mon, 05/16/2016 - 12:07
....विश्वाची उलगड होते..... केसांस झटकता सखये,ह्रदयाची पडझड होते.. केसांत माळता गजरा,ह्रदयाची फुलझड होते.. पंखांस विसरतो जेव्हा,(तू) सदनाचा पत्ता देते. मी ऊंच भरारी घेतो,पंखांची फडफड होते. तू कविता बनूनी भिनता,श्वासांचे ध्रुपद होते! मी गीत लिहाया बसतो,शब्दांची गडबड होते. मी चाळली किति समिकरणे,पण गुढ उकलले नाही तव मिठित सखये अवघ्या,विश्वाची उलगड होते.** असतेस जवळि तू जेव्हा..जगण्याचे गाणे होते... नसतेस जवळि तू तेव्हा....जगण्याची तडफड होते धग ती नव्हतीच वणव्याची,होळीची ऊब असावी. निद्रेत सुखाने शिरता..स्वप्नांतहि धुळवड होते... सर्वस्व अर्पूनि मजला,तू मज ईश्वरसम करते मी तुझा पुजारी बनतो...पूजाही काकड होते - कानडाऊ योगेशु ** : प.पू घासुगुर्जींना समर्पित. ;)

प्रतिक्रिया द्या
3336 वाचन

💬 प्रतिसाद (15)

मस्तच.

प्रचेतस
Mon, 05/16/2016 - 12:09 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments

आजकाल

चांदणे संदीप
Mon, 05/16/2016 - 12:14 नवीन
कविता म्हटले की तुमचा पैला परतिसाद...कूच तो गडबड हय दया! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

चांगलं ते चांगलंच :)

प्रचेतस
Mon, 05/16/2016 - 12:40 नवीन
चांगलं ते चांगलंच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

कविता म्हटलं की माझ्या

सतिश गावडे
Tue, 05/17/2016 - 11:27 नवीन
कविता म्हटलं की माझ्या हृदयाच्या तारा झंकारतात स्तब्ध होतात क्षणभर अन श्वास माझे जणू हूंकारतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मस्त!

चांदणे संदीप
Mon, 05/16/2016 - 12:18 नवीन
खर...निवांत अड्डा जमवून मैफिलीत दोस्तमंडळीबरोबर हातात जाम घेवून माहोल करावा असेच निवांत वाचून पुन्हा प्रतिसाद देईन! Sandy
  • Log in or register to post comments

धन्यवाद वल्लीसेठ आणि संदीप्भौ

कानडाऊ योगेशु
Mon, 05/16/2016 - 15:02 नवीन
धन्यवाद वल्लीसेठ आणि संदीप्भौ!
  • Log in or register to post comments

छान कविता!

एस
Mon, 05/16/2016 - 15:57 नवीन
छान कविता!
  • Log in or register to post comments

मस्तच ! खुप आवडली !

पथिक
Tue, 05/17/2016 - 10:34 नवीन
मस्तच ! खुप आवडली !
  • Log in or register to post comments

झकास

स्पा
Tue, 05/17/2016 - 11:13 नवीन
झकास
  • Log in or register to post comments

वाह... मस्त. कविता आवडली.

सतिश गावडे
Tue, 05/17/2016 - 11:24 नवीन
वाह... मस्त. कविता आवडली.
  • Log in or register to post comments

सुरेख!

रातराणी
Tue, 05/17/2016 - 11:47 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

धन्यवाद एस (हे नाव एखाद्या

कानडाऊ योगेशु
Tue, 05/17/2016 - 15:44 नवीन
धन्यवाद एस (हे नाव एखाद्या बॉलिवुडी विलन सारखे वाटते आह०,),स्पांडु,पथिक,गावडे साहेब आणि रातराणी!
  • Log in or register to post comments

खरयं

कर्नलतपस्वी
Mon, 04/07/2025 - 09:08 नवीन
बोरकरांची " तू गेल्यावर फिके चांदणे,घर परसूही सुनेसूने",किंवा संदिप खरे यांची "नसतेस घरी तू जेंव्हा,जीव तुटका फुटका होतो" मस्त भावना व्यक्त केल्यात.
  • Log in or register to post comments

क्या बात है

प्रसाद गोडबोले
Tue, 04/08/2025 - 00:15 नवीन
क्या बात है
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

विवेकपटाईत
Mon, 04/14/2025 - 17:01 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा