मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ठाण्यातला पाचू - गजबजाटात वसलेली गर्द हरितसंपदा

वेल्लाभट · · मिपा कलादालन
कंजूस यांच्या या धाग्यात सदर उद्यानाबद्दल वाचल्यापासून इथे भेट द्यायची होती. तो मुहूर्त यायला हा वीकांत उजाडला. पण भेट अतिशय सुखद होती. शहराच्या मधोमध इतकी घनदाट (असंच म्हणायला हवं) बाग आहे यावर विश्वास बसत नाही पटकन. तरी आत्ता उन्हाळा आहे; पावसाळ्यात तर बघायला नको. आत्ता इथे जितके फुलांचे प्रकार बघायला मिळाले त्याच्या तिप्पट नक्की होतील पावसाळा उन्हाळ्यात. वॉचमनशी बोलल्यावर कळलं की आता नवीन झाडं आणून लावली जातील. पावसाळ्याआधी. सो पावसाळ्याच्या भेटीची फार उत्सुकता आहे, तूर्तास या भेटीतील काही निवडक फोटो मिपाकरांकरता खास. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13

वाचने 7784 वाचनखूण प्रतिक्रिया 32

कंजूस Mon, 05/16/2016 - 08:07
छान! या बागेत ते तरातरा चालणारे येत नाहीत हे फार आवडले.वाटेवर त्यांच्यामध्ये कोणी आले की फार संतापतात.ते सर्व शेजारच्या सर्वोदय गार्डनला जातात.

In reply to by कंजूस

वेल्लाभट Mon, 05/16/2016 - 10:35
असं काही नाही बरं का. एक दोन दिसले तसेही. एक गुज्जु ग्रूपही दिसला (कलकलाट न करणारा). मी सहज गप्पा मारायला गेलो तर 'भाय यहां मराठी बोलनेवाला कोई नही है' असं म्हणाला एक जण. 'हो की काय!? कठीण आहे' असं म्हणून काढता पाय घेतला मी. एक फोटो काढत होतो तर एकदम मागून ओ.......... असा कोरस आला. दोन सेकंदांनी कळलं ग्रूप ओंकार चालू होता. मग एक रमत गमत चालत मोबाईलवर मोठ्या आवाजात लताचं कुठलं तरी गाणं लावून चाललेले काका क्रॉस झाले. धावायला, व्यायाम करायला आलेले तीन नवतरूण दिसले. परत जाताना वॉचमन ला या गोष्टी सांगून आलो. की ब्वा हिरवळीबरोबर शांतताही राहील असं बघा. हे मोबाईल वाजवणारे, किंवा तत्सम न्यूसन्स करणारे वेळीच आवरा.

खटपट्या Mon, 05/16/2016 - 10:09
खूप छान फोटो. आम्ही या भागाला बारा बंगला भाग म्हणतो. हा भाग पुर्वीपासून हीरवागार आणि निसर्गसंपन्न आहे. स्वातंत्रोत्तर काळात गोरे ऑफीसर येथील बंगल्यात रहात असत. आता हे बंगले मोठ्या अधिकार्‍यांना दीलेत...

In reply to by खटपट्या

वेल्लाभट Mon, 05/16/2016 - 10:36
आम्हीही या भागाला बारा बंगलाच म्हणतो. पण व्यापक दृष्टीने हा भाग कोपरीत आहे. आणि बारा बंगला हा त्याच्या बाजूच्या गल्लीपासून सुरू होतो.

In reply to by सूड

वेल्लाभट Mon, 05/16/2016 - 15:20
दिसतायत की! मलापण आणि अर्थातच प्रतिसाद आले त्या अर्थी दिसत असावीत. तरीही पाठवतो जी आहेत ती.

स्पा Tue, 05/17/2016 - 12:22
अहा डोळे निवले एकदम शांत वाटले फोटो पाहून