Skip to main content

५ राज्यातील विधानसभा निवडणुक - २०१६

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 20/03/2016 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातील ५ राज्यांची विधानसभा निवडणुक ४ एप्रिल ते १६ मे या कालखंडात होत आहे. मतमोजणी १९ मे रोजी आहे. या पाचही राज्यांचा निवडणुकीसाठी आढावा. ____________________________________________________________________________________ (१) पुदुचेरी (पाँडिचेरी) - सर्वात लहान राज्य. हे केंद्रशासित राज्य आहे. राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अजिबात महत्त्व नाही. लोकसभेच्या ५४३ जागातील फक्त १ जागा या राज्यात आहे. या राज्यात विधानसभेच्या ३० जागा आहेत. इतर सर्व छोट्या राज्यांप्रमाणे इथेही प्रादेशिक पक्ष प्रबळ आहेत. सध्या या राज्यात All India N R Congress (AINRC) हा पक्ष सत्तेवर असून "N R" म्हणजे Namathu Rajiyam (meaning our kingdom). या पक्षाचे संस्थापक N Rangasamy यांच्या आद्याक्षरांवरून N R बनविलेले आहे असेही मानतात. ७ फेब्रुवारी २०११ या दिवशी काँग्रेसमधून बाहेर पडून एन रंगासामी यांनी या पक्षाची स्थापना केली. सध्या एन रंगासामी हेच मुख्यमंत्री आहेत. याच पक्षाचे आर राधाकृष्णन हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पुदुचेरीतून निवडून आले होते. सध्या हा पक्ष भाजप नेतृत्वाखालील रालोआचा भागीदार आहे. पुदेचेरीत सध्या AINRC चे १६ आमदार असून काँग्रेसचे ७, अद्रमुकचे ५ व द्रमुकचे २ आमदार आहेत. भाजपला या राज्यात कणभरही स्थान नाही आणि आगामी निवडणुकीत भाजपचे तेच स्थान राहणार आहे. या राज्यातील राजकारणाची मला फारशी माहिती नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अजिबात अंदाज नाही. परंतु तिथे कोणताही पक्ष सत्तेवर असला तरी त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात कणभरही फरक पडणार नाही हे नक्की. ____________________________________________________________________________________ (२) तामिळनाडू - - देशाच्या एका कोपर्‍यात असले तरी राष्ट्रीय राजकारणात या राज्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. या राज्यात लोकसभेच्या ३९ जागा असून विधानसभेच्या २३४ जागा आहेत. गेली जवळपास ५ दशके या राज्यात दोनच प्रादेशिक पक्ष आलटून पालटून सत्तेवर येतात. भूतकाळात कामराज, मूपनार, कुमारमंगलम, वैजयंतीमाला आणि वर्तमानात जयंती नटराजन (सध्या या काँग्रेसमध्ये नाहीत), पी चिदंबरम, मणी शंकर अय्यर इ. दिग्गज नेते तामिळनाडूतून काँग्रेसला मिळाले. परंतु काँग्रेसला विशेषतः १९७७ नंतर द्रमुक किंवा अद्रमुक यांच्याबरोबर दुय्यम भागीदाराचे स्थान मान्य करावे लागत आहे. तीच गोष्ट भाजपची आहे. कॉंग्रेसची काही हक्काची मते तामिळनाडूत आहेत. परंतु भाजपला इथे फारसे स्थान नाही. भाजपला या राज्यात चेहरा नाही व नाव घेण्यासारखे प्रभावी नेतेही नाहीत. डाव्या पक्षांची थोडी मते आहेत. इतर राष्ट्रीय पक्षांना इथे काहीही महत्त्व नाही. कोणत्यातरी द्रविड पक्षाची मदत त्यांना घ्यावी लागते. तामिळनाडूतील प्रमुख स्थानिक पक्ष अद्रमुक - अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळ्घम् - (AIADMK) : प्रमुख - जयललिता द्रमुक - द्रविड मुन्नेत्र कळ्घम् - (DMK) : प्रमुख - करूणानिधी, इतर नेते - दयानिधी मारन, टी आर बालू, ए राजा, कणीमोळी, एम के स्टॅलिन डीएमडीके - देसिया मुरगोप्पू द्रविड कळ्घम् - (DMDK) : प्रमुख - अभिनेता विजयकांत एमडीएमके - मरूमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळ्घम् - (MDMK) : प्रमुख - वैको पीएमके - पट्टली मक्कल काट्ची - (PMK) : प्रमुख - माजी केंद्रीय मंत्री अंबुमणी रामदास (हा पक्ष वण्णियार या मागासलेल्या जातीचा प्रातिनिधिक पक्ष आहे) २०११ च्या विधानसभा निवडणुकीत अशी स्थिती होती. अद्रमुक+ : एकूण २०३ अद्रमुक - १५०, डीएमडीके (विजयकांत) - २९, उजवे कम्युनिस्ट - ९, डावे कम्युनिस्ट - १०, एमएनएमके - २, पीटी - २, फॉरवर्ड ब्लॉक - १ द्रमुक+ : एकूण २०३ द्रमुक - २३, काँग्रेस - ५, पीएमके - ३ भाजप व इतर पक्ष - ० २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती. एकूण जागा - ३९ अद्रमुक - ३७ (४४.३% मते), द्रमुक - ० (२३.६% मते), भाजप - १ जागा (५.५०% मते) + पीएमके - १ जागा (४.४०%) या राज्यात १९८४ पासून प्रत्येक निवडणुकीत सत्ताबदल झालेला आहे. १९८४ मध्ये अद्रमुक, १९८९ मध्ये द्रमुक, १९९१ मध्ये पुन्हा अद्रमुक, १९९६ मध्ये द्रमुक, २००१ मध्ये अद्रमुक, २००६ मध्ये पुन्हा द्रमुक आणि २०११ मध्ये पुन्हा अद्रमुक असे आलटून पालटून सत्ता मिळवित आले आहेत. या क्रमानुसार यावेळी द्रमु़कची पाळी आहे. द्रमुकचे ९१ वर्षीय करूणानिधी पुन्हा एकदा नव्या उत्साहाने निवडणुकीला सामोरे जात आहेत. या राज्यात चित्रपट तारे व तारकांचा राजकारणात जबरदस्त प्रभाव असतो. द्रमुक व अद्रमुक व्यतिरिक्त इथे विजयकांत यांचा डीएमडीके, रामदास यांचा पीएमके, वैकोंचा एमडीएमके असे अनेक प्रादेशिक द्रविड पक्ष आहेत. या प्रत्येक पक्षाची स्वतःची व्होटबँक आहे. हे पक्षसुद्धा कोणत्यातरी एका मोठ्या द्रविड पक्षाच्या वळचणीला उभे राहून राजकारण करतात. सध्याच्या अद्रमुकच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर अनेक खटल्यांची टांगती तलवार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अद्रमुकचे ३९ पैकी ३७ खासदार निवडून आले होते व तो लोकसभेतील तिसर्‍या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला होता. जयललिता मोदींविषयी अनुकूल असल्याचे बोलले जाते. परंतु अजूनपर्यंत त्यांनी भाजपला उघडउघड पाठिंबा दिलेला नाही. अत्यंत लहरी, चक्रम, बेभरवशाच्या व सूडबुद्धी स्वभावाच्या जयललितांबरोबर डील करणे हे अत्यंत अवघड काम आहे. प्राथमिक अंदाज जयललिता पुन्हा एकदा बहुमत मिळवतील असे सांगत असले तरी तामिळनाडूच्या परंपरेप्रमाणे यावेळी द्रमुकला बहुमत मिळेल असे वाटते. ही आपली शेवटची निवडणुक आहे असे भावनिक आव्हान करूणानिधींनी केले तर भावनिक लाटेवर वाहून जाणार्‍या तामिळी मतदारांवर त्याचा निश्चित प्रभाव पडेल. जयललितांना ही निवडणुक सोपी नाही. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी जयललितांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांडातील जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सात जणांची तुरुंगातून सुटका करण्यासाठी केंद्र सरकारला पुन्हा प्रस्ताव पाठवून हा मुद्दा उकरून काढला आहे. करूणानिधींना या प्रस्तावाला विरोध करता आलेला नाही. या वादामध्ये अर्थातच काँग्रेसचा या सुटकेला विरोध आहे, तर भाजप 'नरो वा कुंजरो वा' या भूमिकेत आहे. त्यामुळे या मारेकऱ्यांच्या सुटकेचा विषय यंदाच्या निवडणुकीत गाजण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातच जयललितांना झालेली अटक, चेन्नईतील पूरस्थिती हाताळण्यामध्ये झालेली ढिलाई, अनेक योजनांमध्ये झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आदी मुद्द्यांवरून जयललितांविरोधात करुणानिधी मैदानात उतरणार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जयललिता यांच्यासोबत युती करणाऱ्या विजयकांत याच्या 'डीमडीके' पक्षाला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या होत्या. पण या निवडणुकीत विजयकांत स्वतंत्र लढणार आहे. करूणानिधींच्या स्टॅलिन व अळगिरी या दोन मुलांमध्ये प्रचंड भांडण आहे. अळगिरीला पक्षातून काढून टाकण्यात आले आहे व स्टॅलिनला वारस जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे द्रमुकमध्ये अंतर्गत बंडाळी भरपूर आहे. द्रमुक आणि अण्णा द्रमुक दोघेही एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत असले तरीही दोन्ही पक्षांमधील अनेक नेत्यांची नावे विविध घोटाळ्यांच्या निमित्ताने गाजली आहेत. जयललिता यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी मध्यंतरी तुरुंगवास भोगावा लागला. 'द्रमुक'चे नेते करुणानिधी यांची कन्या आणि खासदार कनिमोळी व पक्षाचे नेते राजा हे टूजी घोटाळ्यात तुरुंगात जाऊन आले आहेत. दोन्ही पक्षांना लक्ष्य करून माजी केंद्रीय आरोग्यमंत्री अंबुमणी रामदास यांच्या पट्टली मक्कल कच्छी (पीएमके) या पक्षाने तिसरा पर्याय देण्यासाठी धडपड चालू केली आहे. मात्र हा अत्यंत छोटा पक्ष आहे. - 'ब्रँड अम्मा'च्या माध्यमातून तमिळनाडूमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेल्या योजनांचा अण्णा द्रमुकला निश्चितच फायदा होईल. स्वस्तामध्ये सुरू केलेल्या या योजनांमुळे तमिळनाडूतील सर्वसामान्य जनतेसाठी अम्मा तारणहार म्हणून पुढे आल्या आहेत. - जयललितांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा द्रमुककडून प्रचारासाठी वापरला जाणार आहे. - द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे दोन्ही पक्ष तमीळ अस्मितेचा मुद्दा प्रतिष्ठेचा करतील. - एम. करुणानिधींपुढे द्रमुकमधील बंडखोरी रोखण्याचे आव्हान असेल. स्टॅलिन यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली असली तरीही ९१ वर्षीय करुणानिधी हाच पक्षाचा प्रमुख चेहरा ठरतील. - 'नम्मकू नमे' या यात्रेच्या माध्यमातून राज्यात एम. के. स्टॅलिन यांनी जयललितांविरोधात केलेला प्रचार महत्त्वाचा ठरू शकतो. - द्रमुक व काँग्रेस युती करणार आहेत. त्यामुळे मतांची फाटाफूट टळेल. मागील निवडणुकीत विजयकांतचा डीएमडीके जयललिताबरोबर होता व त्यांनी २९ जागा जिंकून दुसर्‍या क्रमांकाचा मोठा पक्ष होता. नंतर द्रमुकला विरोधी पक्षनेतेपद मिळू नये यासाठी जयललिताने विजयकांतच्या पक्षाबरोबर दुरावा दाखवून विजयकांतला विरोधी पक्षनेतेपद मिळवून दिले होते. या निवडणुकीत डीएमडीके स्वतंत्र लढणार असल्याने अद्रमुकला तोटा होणार आहे. तामिळनाडूतील सत्ताबदलाच्या परंपरेप्रमाणे यावेळीही तसेच होऊन द्रमुकला बहुमत मिळेल असे मला वाटते. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे २ खासदार निवडून आले असले व १०% हून अधिक मते मिळाली असली तरी २०११ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त ८ लाख १९ हजार मते मिळून (२.६% मते) शून्य जागा मिळाल्या होत्या. भाजपचे पूर्वी १९९६ व २००१ च्या निवडणुकीत १-२ आमदार निवडून आले होते. यावेळीही भाजपला जास्तीत जास्त २-३ जागा मिळतील असे वाटते. ____________________________________________________________________________________ (३) केरळ केरळमध्ये लोकसभेच्या २० व विधानसभेच्या १४० जागा आहेत. तामिळनाडूप्रमाणेच इथेही प्रादेशिक पक्षांची रेलचेल आहे. परंतु इथे काँग्रेस व डावे पक्ष या दोन राष्ट्रीय पक्षांचे प्राबल्य आहे. इथे सुरवातीपासूनच दोन आघाड्या आहेत. संयुक्त लोकशाही आघाडी (संलोआ) - यात काँग्रेस व्यतिरिक्त मुस्लिम लीग, केरळ काँग्रेस (मणी गट), क्रांतिकारी समाजवादी पक्ष, संजद, केरळ काँग्रेस (जेकब गट), कम्युनिस्ट मार्क्सिस्ट पक्ष (जॉन गट), जेएसएस हे पक्ष आहेत. डावी लोकशाही आघाडी (डालोआ) - यात डावे कम्युनिस्ट, उजवे कम्युनिस्ट या दोन राष्ट्रीय पक्षांबरोबर निजद, राष्ट्रवादी काँग्रेस, केरळ काँग्रेस (थॉमस गट), समाजवादी काँग्रेस, कम्युनिस्ट मार्क्सिस्ट पक्ष, केरळ काँग्रेस (पिल्लई गट), आयएनएल हे पक्ष आहेत. गंमत अशी की केरळ काँग्रेस हे नाव असलेले ४ वेगवेगळे पक्ष असून ते वेगवेगळ्या गटांच्या नावे ओळखले जातात. दोन्ही आघाड्यात दोनदोन गट आहेत. २०११ मध्ये संलोआने १४० पैकी ७२ जागा मिळवून निसटते बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली. डालोआला ६८ जागा मिळाल्या होत्या. या दोन आघाड्यांच्या एकूण मतात १% पेक्षाही कमी फरक होता. भाजपने १३९ जागा लढवून एकही जागा मिळाली नव्हती. या राज्यात भाजपने आजतगायत खाते उघडलेले नाही. या राज्यात डावे पक्ष व भाजप/संघ यांच्यात कायम हिंसक चकमकी सुरू असतात. गेल्या काही महिन्यात भाजप/संघाच्या काही कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले होऊन त्यात एकाचा प्राण गेलेला आहे. २०११ मध्ये अशी स्थिती होती. एकूण जागा - १४० संलोआ (४५.८३% मते) - काँग्रेस (३९), मुस्लिम लीग (२०), केरळ काँग्रेस मणी गट (७), इतर चिल्लर पक्ष (७) डालोआ (४४.९% मते) - डावे कम्युनिस्ट (४४), उजवे कम्युनिस्ट (१३), निजद (४), राष्ट्रवादी काँग्रेस (२), इतर चिल्लर पक्ष (५) भाजप - ६:०३% आणि शून्य जागा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती. एकूण जागा - २० काँग्रेस - ८ (३१.१% मते) + मुस्लिम लीग - २ (४.५०% मते) + केरळ काँग्रेस - १ (२.४०% मते) सीपीआयएम - ५ (२१.६०% मते) + सीपीआय - १ (७.६०% मते) + डाव्या आघाडीने पाठिंबा दिलेले अपक्ष - २ + आरएसपी - १ भाजप - ० (१०.३० % मते) सध्या काँग्रेसचे ओमान चंडी हे मुख्यमंत्री आहेत. या राज्यात अंदाजे २६% ख्रिश्चन, १८ टक्के मुस्लिम व ५०% हून अधिक हिंदू आहेत. मात्र काँग्रेसने २००१ मध्ये ए के अँटोनी व ओमान चंडी व नंतर २०११ पासून ओमान चंडी हे दोन्ही ख्रिश्चन मुख्यमंत्री दिले आहेत. भाजपवर सातत्याने जातीयवादी, धार्मिक भेदभाव करणारा पक्ष अशी टीका करणारी काँग्रेस केरळमध्ये अनेक दशकांपासून मुस्लीम लीग या जातीयवादी पक्षासोबत युतीत आहे. मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही ओवेसीच्या एमआयएम चा काँग्रेसला पाठिंबा होता. केरळमधील अब्दुल नासीर मदानी हे वेगळेच प्रस्थ आहे. १९९२ मध्ये एका हल्ल्यात उजवा पाय गमाविलेला मदानी १९९८ मधील कोईमतूर बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी होता (त्यात लालकृष्ण अडवाणींच्या सभेपूर्वी अनेक ठिकाणी बाँबस्फोट होऊन ६० जणांचा मृत्यु झाला होता.). त्या आरोपाखाली साडेनऊ वर्षे तुरूंगात काढल्यावर त्याची पुराव्याअभावी मुक्तता झाली. सध्या तो २००८ मध्ये बंगळूरात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या मालिकेतील प्रमुख आरोपी आहे. २००७ मध्ये मदानीला जामिनावर मुक्त करावे असा ठराव तामिळनाडू विधानसभेत प्रचंड बहुमताने मंजूर झाला होता. भाजपचे १-२ आमदार वगळता सर्व द्रविड पक्ष, डावे पक्ष व काँग्रेसने ठरावाला पाठिंबा दिला होता. नंतर काही काळाने तो जामिनावर सुटल्यावर केरळमध्ये सर्व पक्षांनी त्याच्या स्वागताचे बॅनर लावले होते. हा मदानी यावेळी कोणाच्या बाजूने आहे ते अजून नक्की दिसत नाही. २०१६ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा संलोआ आणि डालोआ या दोन आघाड्यातच चुरस आहे. भाजपने वेलापल्ली नटेशन यांच्या भारत धर्म जन सेना (बीजेडीएस) या पक्षाशी युती केली आहे. यावेळी डालोआला सत्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे यावेळी प्रथमच भाजप खाते उघडून २-३ जागा मिळवेल असे वाटते. भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत १०% हून अधिक मते मिळविली होती. २०१५ मधील नगरपालिकांच्या निवडणुकीतही भाजपने बर्‍यापैकी यश मिळविले होते. बीजेडीएस हा इझवा या मागासवर्गीय जातीचे प्रतिनिधित्व करणारा पक्ष आहे. हा समाज आतापर्यंत परंपरेने डाव्या आघाडीच्या पाठीशी राहात होता. आत त्यात थोडीफार फूट अपेक्षित असल्याने जे काही संभाव्य खिंडार पडेल ते डाव्यांच्या मतपेढीलाच पडेल, असे मानले जात आहे. भाजपने विधानसभेत चंचूप्रवेश केल्यास तो एक इतिहास असेल. तामिळनाडूप्रमाणेच भाजपला या राज्यातही चेहरा नाही व नाव घेण्यासारखे प्रभावी नेतेही नाहीत. गेल्या निवडणुकीत तीन मतदारसंघात पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. माजी केंद्रीय मंत्री ओ. राजगोपाल, प्रदेशाध्यक्ष के. राजशेखरन हे पक्षाचे राज्यातील प्रमुख चेहरे असतील. भाजप आघाडी राज्यात जेवढी चालेल तेवढा फटका डाव्यांना बसेल, असा आडाखा असल्यामुळे काँग्रेस पुन्हा विजयाची खात्री देत आहे. सध्याच्या चंडी सरकारवर भ्रष्टाचाराचे (सौर ऊर्जा घोटाळा, बार परवान्यांसाठी लाच घोटाळा आदी) आरोप आहेत. मात्र, मुख्यमंत्री चंडी प्रचंड लोकप्रिय नेते आहेत; तसेच दारूबंदीच्या निर्णयामुळे महिला वर्गाचा पाठिंबा त्यांना आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास तोही एक इतिहास ठरेल, कारण प्रत्येक निवडणुकीत विरोधी आघाडीला विजयी करणे, हे केरळचे वैशिष्ट्य आहे. यंदाच्या निवडणुकीतही चंडीच यूडीएफचे नेतृत्व करतील, अशी शक्यता आहे. मात्र, पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला हे त्यांचे स्पर्धक मानले जातात. काँग्रेस सरकारविरोधातील प्रस्थापितविरोधी लाटेचा फायदा आपल्याला मिळेल, अशी आशा डाव्या आघाडीला वाटते आहे. त्याचबरोबर काँग्रेस आघाडीच भाग असलेल्या केरळ काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. हा फुटीर गट डाव्या आघाडीकडे आला आहे. त्याचबरोबर जनतीपथिया संरक्षा समिती (जेएसएस) हा छोटा पक्षही यूडीएफमधून बाहेर पडून डाव्या आघाडीकडे आला आहे. चंडी सरकारच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून डावी आघाडी प्रचारात रान उठवेल, यात शंका नाही. डाव्यांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची आहे. सध्या त्रिपुरा वगळता एकाही राज्यात डाव्यांची सत्ता नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना बांधून ठेवायचे असल्यास केरळ जिंकणे त्यांना आवश्यक आहे. मात्र, पक्षाचे नेतृत्व कोणी करायचे हा मोठा मुद्दा आहे. माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन आणि माकपचे प्रदेशाध्यक्ष पिनराई विजयन हे दोन दिग्गज नेते पक्षाकडे आहेत. अच्युतानंदन अनुभव असलेले लोकप्रिय नेते आहेत; पण त्यांचे वय ९३ वर्षे आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा भार ते कसा पेलणार, याविषयी शंकाच आहे. तरीही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचा कल अच्युतानंदन यांच्याकडेच आहे. विजयन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, मात्र त्यातून ते निर्दोष सुटले. तरीही केरळमधील कॅथलिक चर्चशी त्यांचे संबंध फारसे सलोख्याचे नाहीत. नामशेष होण्याच्या दिशेने चाललेल्या डाव्या पक्षांनी केरळ जिंकल्यास तोही एक इतिहासच ठरेल. पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांशी चुंबाचुंबी करण्याचा प्रयत्न काँग्रेस करीत आहे. त्याच्या निषेधार्थ तॄणमूल काँग्रेस केरळमधील सर्व १४० जागा लढविणार आहे. शिवसेना देखील केरळमध्ये ४५ जागा लढविणार आहे. ____________________________________________________________________________________ (४) पश्चिम बंगाल - - पश्चिम बंगालमधील प्रमुख डावे पक्ष माकप - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPIM) म्हणजेच डावे कम्युनिस्ट भाकप - भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) म्हणजेच उजवे कम्युनिस्ट फॉरवर्ड ब्लॉक (AIFB) क्रांतिकारी समाजवादी पक्ष (RSP - Revolutionary Socialist Party) २०११ च्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये खालील चित्र होते. एकूण जागा - २९४ तृणमूल काँग्रेस (१८४ जागा, ३८.९३% मते) + काँग्रेस (४२ जागा, ९.०९% मते) - एकूण २२६ जागा, ४८.०२% मते डावी आघाडी (सीपीआय, सीपीआयएम, फॉरवर्ड ब्लॉक, आरएसपी) - एकूण ६० जागा, ३९.६८% मते भाजप - शून्य जागा, ४.०६% मते बाकी इतर सर्व पक्ष या राज्यात नगण्य आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती. एकूण जागा - ४२ तृणमूल काँग्रेस - ३४ (३९.३% मते), सीपीआयएम - २ (डावी आघाडी एकूण मते - २९.५% मते), भाजप - २ जागा (१६.८% मते), काँग्रेस - ४ जागा (९.६% मते) २०११ च्या तुलनेत तॄणमूल काँग्रेस व काँग्रेसच्या एकूण मतांची टक्केवारी जवळपास तेवढीच राहिली. भाजपची १२% अधिक मते वाढली तर डाव्या आघाडीची १०% हून अधिक मते कमी झाली. डाव्या आघाडीची मते भाजपकडे गेल्याचे निदान आकडेवारीवरून तरी वाटते. डाव्या आघाडीने बंगालमध्ये १९७७ ते २०११ या काळात तब्बल ३४ वर्षे सलग राज्य केले. या काळात त्यांनी सलग ७ विधानसभा निवडणुका जिंकल्या. परंतु अनेक दशके सातत्याने डाव्या आघाडीला प्रखर विरोध करणार्‍या ममता बॅनर्जींनी २०११ मध्ये डाव्या आघाडीची मक्तेदारी संपवून सत्ता त्यांच्याकडून हिसकावून घेतली. त्यानंतर गेल्या ५ वर्षात ममतादिदींचा कारभार अत्यंत वादग्रस्त राहिलेला आहे. अत्यंत लहरी, चंचल व बेभरवशाच्या असलेल्या ममता बॅनर्जी अत्यंत लढावू वृत्तीच्या आहेत. अनेक वर्षे डाव्यांबरोबर संघर्ष करून कधी काँग्रेसबरोबर, कधी भाजपबरोबर तर कधी स्वबळावर निवडणुक लढवून त्यांनी हिंमतीने सत्ता मिळविली. गेल्या ५ वर्षात शारदा चिट फंड प्रकरण अतिशय गाजले. हजारो गुंतवणुकदारांच्या कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याचे बालंट तृणमूलच्या काही नेत्यांवर आले आहे. काही काळापूर्वीच घडलेले माल्डा जिह्यातील जातीय हिंसाचाराचे प्रकरण आणि याच आठवड्यात उघडकीला आलेले तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी पैसे घेतल्याचे स्टिंग ऑपरेशन तॄणमूलच्या अंगावर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु ममता बॅनर्जींची लोकप्रियता कायम आहे. आतापर्यंत झालेल्या बहुतेक नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने बहुमत मिळविलेले आहे. यावेळची निवडणुक वैशिष्ट्यपूर्ण आहे. आश्चर्य म्हणजे काँग्रेस व डावी आघाडी यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याने कॉंग्रेस व डावे पक्ष हे दोघेही एकमेकांना डोळा मारत आहेत. राज्यात प्रबळ विरोधक नसणे आणि सरकारविरोधी भावना बळकट नसणे ही ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेससाठी जमेची बाजू आहे. विरोधक प्रबळ नसले तरी दोन विरोधी एकत्र आले, तर मात्र ताकद वाढते. या न्यायाने डावे पक्ष आणि काँग्रेस यांची आघाडी झाली, तर मात्र ममता बॅनर्जी यांच्यासाठी निवडणूक चुरशीची होऊ शकते. केरळमध्ये काँग्रेस व डावे एकमेकांविरूद्ध लढत आहेत, पण बंगालमध्ये ते युतीची बोलणी करीत आहेत. या विसंगतीचे सोनिया गांधी व येचुरी कसे समर्थन करणार याचे कुतुहल वाटते. देशात इतरत्र हे दोन पक्ष एकमेकांविरूद्ध लढतात. पण बंगालमध्ये या दोन पक्षांची खरोखरच युती झाली तर ही विसंगत शय्यासोबत बंगालमधील मतदारांना आवडते का ते मतमोजणीच्याच दिवशी समजेल. Politics makes strange bedfellows हेच शेवटी खरं. ममता बॅनर्जी यांची गेल्या पाच वर्षांतील कारकीर्द फारशी लक्षणीय ठरली नाही. डाव्यांच्या काळात असलेला बंगाल आजही तसाच आहे. फक्त डाव्यांच्या प्रभावाखाली असलेल्या नोकरशाहीवर त्यांनी चांगली पकड बसविली हे ममता बॅनर्जी यांचे पहिले यश आहे. डाव्यांना राज्यांतून उखडताना ते पुन्हा प्रबळपणे विरोधक म्हणूनही उभे राहणार नाहीत याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. विकासाच्या पातळीवर राज्याचे ब्रँडिंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला; पण तरीही त्यांच्यातील नकारात्मक दृष्टिकोन आणि अस्थिरता कायम राहिली. सत्तेवर असताना केंद्र सरकारशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हेही त्यांना नीटपणे निश्चित करता आले नाही. त्यामुळेच केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध विशेषतः गेल्या दोन वर्षांत ताणलेले राहिले. ममता बॅनर्जी यांच्या कारकिर्दीतील सर्वांत मोठी घटना म्हणजे सारदा चिटफंड घोटाळा ही होती. गरीब लोकांचे पैसे या चिटफंडमधून हडप करण्यात आले. त्यात ममता बॅनर्जी यांच्याच जवळचे खासदार आणि नेते सहभागी होते. या घोटाळ्याने पश्चिम बंगाल हादरला होता. मात्र, असे असूनही याचा फायदा विरोधक म्हणून डाव्या पक्षांना आणि काँग्रेसलाही उठवता आला नाही. हे प्रकरण जर डाव्यांच्या सत्तेखाली घडले असते आणि त्यात डावे नेते अडकले असते, तर ममता बॅनर्जी यांनी पूर्ण राज्यात आंदोलनाचा धुरळा उडवून दिला असता. दुर्देवाने याचा फायदा उचलण्याची ताकद डाव्यांमध्ये राहिली नाही. तीच स्थिती काँग्रेसची आहे. २०११ च्या निवडणुकीत काँग्रेसने तृणमूल काँग्रेसबरोबर आघाडी करीत ४२ जागा जिंकल्या, तरी ममतांनी काँग्रेसला पुढे फारसे महत्त्व दिले नाही. सत्तेतही वाटा दिला नाही. काँग्रेसचे प्रदेश नेतृत्व अगदीच कमकुवत राहिले. त्यामुळे काँग्रेस आज डाव्यांच्या वळचणीला जाण्याचा प्रयत्न करताना दिसते. भाजपने फार पूर्वी श्यामाप्रसाद मुखर्जी जनसंघाचे अध्यक्ष असण्याच्या काळात बंगालमध्ये एका निवडणुकीत तब्बल १३ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर अशी कामगिरी त्यांना कधीही जमली नाही. यावेळीही भाजप जवळपास त्याच अवस्थेत आहे. इतर राज्यांप्रमाणेच भाजपला या राज्यातही चेहरा नाही व नाव घेण्यासारखे प्रभावी नेतेही नाहीत. भाजपने या निवडणुकीसाठी 'महाभारत' या दूरदर्शनवरील प्रसिद्ध मालिकेतील द्रौपदीची भूमिका केलेली अभिनेत्री रूपा गांगुलीला तिकिट दिले आहे. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू (grandnephew) चंद्र बोस हे भाजपच्या तिकिटावर ममता बॅनर्जींच्या विरोधात उभे राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीत जरी भाजपने जवळपास १७% मते मिळवून लोकसभेच्या २ जागा जिंकल्या तरी विधानसभेत मात्र भाजपला इतकी मते मिळण्याची शक्यता नाही. भाजप या राज्यात फारतर ३-५ जागा जिंकू शकेल. राज्यात ३५ ते ३७ टक्के मुस्लिम मते आहेत. त्यातील बहुसंख्य मते ममतांकडे आहेत. हिंदू मते तृणमूलपासून दूर जात आहेत. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी ममता बॅनर्जी यांना अजून १० ते १२ टक्के मतांची गरज लागणार आहे. काँग्रेसने जर तृणमूलशी युती केली, तरच ही मते ममतांना मिळू शकतील. ती शक्यता आता नाही. तृणमूलनेच काँग्रेसशी आघाडी न करण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसकडे डाव्यांजवळ जाण्याशिवाय पर्याय नाही. मतांच्या या गणितात डावे आणि काँग्रेस एकत्र आले, तर राज्यात चुरस होऊ शकते. या निवडणुकीत पुन्हा एकदा तॄणमूल काँग्रेस बहुमत मिळविण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस व डावी आघाडी यांची युती झाली तर निवडणुक प्रचंड चुरशीची होईल व कदाचित अधांतरी विधानसभा निर्माण होईल. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी भाजपशी छुपा समझोता करू शकतात कारण भाजपकडे किमान ५% मते आहेतच. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २ जागा जिंकताना २४ विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळविली होती. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इथे भाजप असून नसल्यासारखाच आहे. भाजप फार तर ३-५ जागा मिळवेल. ____________________________________________________________________________________ (५) आसाम आसाममधील प्रमुख पक्ष काँग्रेस, भाजप, आसाम गण परिषद, ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययुडीएफ), बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ) २०११ च्या निवडणुकीत आसाममध्ये खालील चित्र होते. एकूण जागा - १२६ काँग्रेस (७८ जागा, ३९.३९% मते), एआययुडीएफ (१८ जागा, १२.५७% मते), बीपीएफ (१२ जागा, ६.१३% मते), आसाम गण परीषद (१० जागा, १६.२९% मते), भाजप (५ जागा, ११.४७% मते), तृणमूल काँग्रेस (१ जागा, २.०५% मते), अपक्ष (२ जागा) आसाममध्ये बर्‍याच मतदारसंघात एका विशिष्ट पक्षाच्या मतांचे ध्रुवीकरण झाल्याचे दिसून येते. बीपीएफ ला फक्त ६.१३% मते मिळून सुद्धा १२ जागा मिळाल्या. पण आसाम गण परीषद (१६.२९% मते) व भाजप (११.४७% मते) यांना जास्त मते मिळूनसुद्धा कमी जागा मिळाल्या. एआययुडीएफ सुद्धा मते १२.५७% मिळाली पण जागा मात्र १८ मिळून तो दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष बनला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती. एकूण जागा - १४ काँग्रेस - ३ (२९.६०% मते), भाजप - ७ जागा (३६.५०% मते), एआययुडीएफ - ३ (१४.८०% मते), आसाम गण परीषद - ० (३.८०%), अपक्ष - १ २०११ च्या तुलनेत काँग्रेसने जवळपास १०% मते गमाविली, भाजपने जवळपास २५% मते जास्त मिळविली, एआययुडीएफने देखील २% मते जास्त मिळविली आणि आसाम गण परिषदेने १२% हून अधिक मते गमाविली. भाजपला जी जास्तीची २५% मते मिळाली आहेत ती काँग्रेस व आसाम गण परीषदेकडून आलेली दिसतात. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आसाम गण परीषद व बीपीएफ बरोबर युती केलेली आहे. परंतु सर्वच पक्षातून काही जणांनी या युतीला विरोध केलेला आहे. भाजपच्या काही स्थानिक नेत्यांच्या दाव्यानुसार आसाम गण परीषद व बीपीएफ या दोन्ही पक्षांचा प्रभाव अत्यंत कमी झाला आहे. २०१० मध्ये Bodoland territorial council च्या निवडणुकीत बीपीएफ ने ४० पैकी ३३ जागा मिळविल्या होत्या. परंतु २०१५ मध्ये त्यांना फक्त २० जागा मिळाल्या. भाजपच्या काही नेत्यांना असे वाटते की लोकसभा निवडणुकीत बोडो नसलेल्या इतर जमाती भाजपमागे उभ्या होत्या. परंतु भाजपने आता बीपीएफशी युती केल्याने ही मते भाजपपासून दूर जाण्याची शक्यता आहे. बोडो व इतर आदिवासी जमातीत काही काळापासून संघर्ष सुरू आहे. २०१२ ते २०१४ या काळात किमान १०० जणांचा मृत्यु झाला होता व ५०००० नागरिक बेघर झाले होते. डिसेंबर २०१४ मध्ये बोडो बंडखोरांनी ७० आदिवासींची हत्या केली होती. आसाम गण परीषदेला भाजपने २४ जागा दिल्याने दोन्ही पक्षात असंतोष आहे. भाजप १२६ पैकी फक्त ९० जागा लढवित असून उरलेल्या जागा मित्रपक्षांना दिलेल्या आहेत. भाजपने केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केले आहे. सोनोवाल पूर्वी आसाम गण परीषदेत होते. काँग्रेसमधून हिमंता बिस्व सर्मा व कामख्य प्रसाद तशा हे भाजपत आले आहेत. कामख्य प्रसाद तशा आता भाजपच्या तिकिटावर मुख्यमंत्री तरूण गोगोईंविरूद्ध उभे आहेत. इतर राज्यांप्रमाणे याही राज्यात भाजपकडे चेहरा व प्रभावी स्थानिक नेते नाहीत. भाजपबरोबर युती मान्य नसलेल्या आसाम गण परीषदेतील काही नेत्यांनी AGP Jatiyatabadi Mancha (AGP Regionalist Forum) हा पक्ष स्थापन केला आहे. भाजपमधील काही नेत्यांनी तॄणमूल भाजप नावाचा नवीन पक्ष स्थापन केला आहे. हे दोन्ही पक्ष भाजप+ आघाडीविरूद्ध लढणार आहेत. सत्ताधारी काँग्रेसने नव्याने स्थापन झालेल्या United People's Party या पक्षाशी युती केली आहे. या पक्षाला All Bodo Student Union या संघटनेचा पाठिंबा आहे. या पक्षाला राज्यात बर्‍यापैकी आधार आहे. या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे तो एआययुडीएफ हा पक्ष. बद्रुद्दीन अजमल या धनाढ्य उद्योगपतीने स्थापन केलेल्या या पक्षाने २०११ च्या विधानसभा निवडणुकीत १८ जागा जिंकून दुसरा क्रमांक मिळविला होता. अजमल हे परफ्युम च्या व्यवसायातील एक मोठे नाव आहे. आसाममध्ये किमान ३५ मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या ४०% ते ८०% टक्के आहे. यात अनेक बेकायदेशीर स्थलांतरीत आहेत. या ३५ मतदारसंघांवरच या पक्षाची भिस्त आहे. या पक्षात अनेक बांगलादेशी स्थलांतरितांचा समावेश आहे. आसामचा भविष्यातील मुख्यमंत्री बांगलादेशी स्थलांतरीत असण्याची भीति अनेकांना वाटते ती या पक्षामुळेच. या पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही ३ जागा जिंकल्या होत्या. राज्यात फारसे स्थान नसलेल्या संजद व राजद या दोन पक्षांनी एआययुडीएफशी युती केली आहे. जर काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर काँग्रेस या पक्षाची मदत घेऊ शकते. भाजपला सर्वाधिक संधी असेल तर ती याच राज्यात. काँग्रेस सलग १५ वर्षे सत्तेत असल्याने कॉंग्रेसला प्रस्थापितविरोधी लाटेचा फटका बसण्याची शक्यता आहे. भाजपचा लोकसभा निवडणुकीच्या यशाची पुनरावृत्ती करणे अवघड आहे. एआययुडीएफचे जबरदस्त आव्हान दोन्ही पक्षांपुढे आहे. भाजप व आसाम गणपरीषदेतील बंडखोरी भाजपला त्रासदायक ठरणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस पुन्हा एकदा बहुमताचा ६४ हा आकडा पार करण्याची शक्यता खूपच कमी आहे. भाजप आघाडी फार तर ४०-५० जागा मिळवू शकेल असे वाटते. भाजप ३०-४० जागा मिळवून सर्वाधिक मोठा पक्ष असू शकेल. एआययुडीएफ आघाडी देखील आपल्या जागा वाढविण्याची शक्यता आहे. एकंदरीत त्रिशंकू विधानसभा असण्याची शक्यता वाटते. __________________________________________________________________________________ या ५ राज्यातील निवडणुकांचे निकाल राष्ट्रीय राजकारणावर परीणाम करण्याची शक्यता शून्य आहे. या निवडणुकीत भाजपला गमवायचे काहीच नाही. सध्या सर्व राज्यात मिळून भाजपचे १० पेक्षा कमी आमदार आहेत. या निवडणुकीनंतर भाजपच्या एकूण आमदारांची संख्या ४०+ असेल. कदाचित भाजप आसाममध्ये सरकार बनविण्याच्या स्थितीत असेल. भाजप केरळमध्ये प्रथमच खाते उघडण्याची शक्यता आहे. बंगालमध्ये देखील मोठ्या कालावधीनंतर भाजप विधानसभेत प्रवेश करेल. जुलै २०१७ मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणुक आहे. या निवडणुकीत राज्यसभा व लोकसभेचे सर्व खासदार व सर्व राज्यातील आमदार मतदान करतात. या निवडणुकीनंतर भाजपच्या आमदारांची संख्या निश्चित वाढणार आहे. भाजपला त्याचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी फायदा होईल. तसेच भविष्यात आसाममधून राज्यसभेवर एखादा खासदार निवडून आणणेही शक्य होईल. काँग्रेस केरळ व आसाम गमाविण्याची शक्यता आहे. तामिळनाडूत द्रमुकबरोबर युती झाली व बंगालमध्ये डाव्या पक्षांबरोबर युती झाली तरच काँग्रेसला या दोन्ही राज्यातले अस्तित्व टिकविता येईल. डावे पक्ष केरळमध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळविण्याची शक्यता आहे. बंगालमध्ये ते स्वतंत्र लढले तर त्यांचे तिथले अस्तित्व संपून जाईल. ____________________________________________________________________________________ वरील लेखात काही तपशीलांच्या व आकडेवारीच्या चुका असण्याची शक्यता आहे. चुभूदेघे. ____________________________________________________________________________________ इति लेखनसीमा

वाचने 31072
प्रतिक्रिया 147

प्रतिक्रिया

In reply to by अर्धवटराव

घुसखोराला इतकी कागदं मिळाली तर तो इथला रहिवासी / नागरिक झाला ना ?

In reply to by mugdhagode

आणि एकदा का असं नागरीकत्व मिळालं कि खायला देणार्‍या ताटात घाण करायला मोकळे, नाहि का ?

In reply to by mugdhagode

आणि तेच निस्तरतात सुद्धा. शिवाय त्यांचा मूळ उद्देश घाण करायचा नसतो. तुम्ही खास घाण करायला आपल्या अंगावर उंदीर, कावळे, उवा पाळता का ?

In reply to by गॅरी ट्रुमन

आसाममध्ये कायमच मतदानाचे प्रमाण खूप जास्त असल्याचे दिसते. १९९६ मध्ये इतर निवडणुकांच्या तुलनेत सुमारे ३% जास्त मतदान झाले होते व त्याच निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होऊन आगप सत्तेवर आली होती. २०१६ मध्ये हाचे आकडा ८०% हून जास्त आहे. यावेळी सत्ताबदल होऊ शकतो का ते १९ मे ला कळेल.
आजपर्यंत सलग चौथी निवडणुक एकाच नेत्याच्या नेतृत्वाखाली जिंकणाऱ्या नेत्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्योती बसू आणि सिक्कीममध्ये सिक्कीम डेमॉक्रॅटिक फ्रंटचे पवनकुमार चामलिंग सोडून तिसरे नाव पटकन डोळ्यासमोर येत नाही.
ओरिसात नवीन पटनाईकांच्या नेतृत्वाखाली बिजदने २०००, २००४, २००९ व २०१४ अशा सलग ४ विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

ओरिसात नवीन पटनाईकांच्या नेतृत्वाखाली बिजदने २०००, २००४, २००९ व २०१४ अशा सलग ४ विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत.
हो. त्याबरोबरच त्रिपुराचे माणिक सरकार (१९९८, २००३, २००८ आणि २०१३) आणि अरूणाचल प्रदेशचे गेगाँग अपाँग (१९८०,१९८५,१९९०,१९९५) हे पण नेते आहेत.

निवडणूक आयोगाने बंगाल मध्ये ५ वेगळ्या वेगळ्या दिवशी मतदान ठेवले आहे तर आसाम मध्ये दोन दिवशी मतदान करून घेतले. या उलट केरल, तामिळनाडू व पुडुचेरी या तिन्ही राज्यात फक्त एकाच दिवशी मतदान घेणार आहे. ही गोष्ट त्या त्या राज्यातील कायदा व सुव्यवस्था कशी आहे या बद्दलचा निवडणूक आयोगाचा पूर्वानुभव दर्शविते.

सत्तेसाठी २ विरोधी पक्षांनी तत्वे बासनात गुंडाळून ठेवून एकमेकांच्या नेत्यांच्या भ्रष्टाचार, गुन्हेगारी कृत्याकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष करून केलेली अभद्र युती यासाठी मी "शय्यासोबत" हा शब्द कायम वापरतो. काही जण सातत्याने या शब्दावर आक्षेप घेतात. हा शब्द नेहस्मीच्या लेखनात वापरला जाणारा शब्द आहे याची मी यापूर्वी अनेक उदाहरणे दिली आहेत. अजून एक ताजे उदाहरण -
नितीशकुमार हे यांतील पुढल्या पिढीचे. वास्तविक राष्ट्रीय राजकारणात त्यांना काँग्रेससमवेत शय्यासोबत वज्र्य नाही आणि राज्याच्या राजकारणात इतके दिवस भाजपचा घरोबाही त्यांना नामंजूर नव्हता.
http://www.loksatta.com/agralekh-news/nitish-kumar-calls-for-bjp-rss-mu…

आजच बातमी आली आहे की रजनीकांतने द्रमुकला पाठिंबा जाहिर केला आहे. रजनीकांत चित्रपटसृष्टीमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे यात अजिबात शंका नाही.पण रजनीकांतने एखादा फतवा जारी केल्याचा परिणाम म्हणून लोक त्याप्रमाणे मतदान करतात हे म्हणणे मात्र चुकीचे आहे. १९९६ मध्ये रजनीकांतने म्हटले की जयललिता परत निवडून आल्यास देवही जनतेला माफ करणार नाही.त्यावेळी मिडियामध्ये असे चित्र उभे केले गेले होते की रजनीकांतमुळे द्रमुक-तामिळ मनीला कॉंग्रेस आघाडीला प्रचंड यश मिळाले होते.निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर स्वत: करूणानिधींनी रजनीकांतचे आभारही मानले होते.त्यावेळी तामिळनाडूमध्ये जबरदस्त जयललिताविरोधी लाट आली होती.त्या वाहत्या गंगेत रजनीकांतने हात धुऊन घेतले आणि लोकांचे मत होते त्याच बाजूने पाठिंबा दर्शविला.पण चित्र असे उभे करण्यात आले की रजनीकांतच द्रमुक आघाडीच्या विजयाचा शिल्पकार होता. ती गोष्ट खरी नव्हती हे नंतरच्या काळात उघडकीस आले सुध्दा. २००४ मध्ये रजनीकांतने भाजप-अण्णा द्रमुक आघाडीस पाठिंबा जाहिर केला होता.जयललितांविषयी मत त्याने बदलले होते अशातला भाग नाही. पण एन.डी.ए ने नद्या जोडायचा प्रकल्प हाती घेऊ असे जाहिरनाम्यात म्हटले होते आणि तामिळनाडूत पाण्याची समस्या खूपच जास्त असल्यामुळे या प्रकल्पामुळे राज्याला फायदा होईल म्हणून रजनीकांतने एन.डी.ए आघाडीला पाठिंबा दिला होता. इतकेच नव्हे तर पट्टाली मक्कल काची पक्षाचे सगळे उमेदवार पाडा असेही आवाहन रजनीकांतने केले होते.प्रत्यक्षात झाले काय? द्रमुक-कॉंग्रेस आघाडीने राज्यातील सर्व ३९ जागा जिंकल्या.त्याच आघाडीत असलेल्या पी.एम.के चे अर्थातच सगळे उमेदवार निवडून आले. २०१४ मध्येही रजनीकांत आणि भाजप यांच्यातील सख्य लपून राहिले नव्हते. तरीही राज्यात त्याचा भाजपला फायदा झाला नाही. एक कन्याकुमारीची जागा तेवढी पक्षाला मिळाली. अगदी २००९ मध्येही भाजपने या जागेवर ३०% च्या आसपास तशीही मिळवली होती.म्हणजे काही प्रमाणात भाजपचा जोर या भागात होताच.त्याचा फायदा पक्षाला मिळाला. तेव्हा यावेळी द्रमुक विजयी न झाल्यास रजनीकांतचा पाठिंबा हा विषय तामिळनाडूमधील निवडणुकांमधून कायमचा हद्दपार व्हावा ही अपेक्षा.

In reply to by गॅरी ट्रुमन

प्रत्येक निवडणुकीत असा काहीतरी विषय काढून किंवा एखाद्या व्यक्तीला पुढे आणून त्याला पराभवाचे किंवा विजयाचे श्रेय दिले जाते. २०१५ मधील बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या पराभवाचे खापर असेच मोहन भागवतांच्या "आरक्षणाचा फेरविचार करावा" या वाक्यावर फोडले गेले. वास्तविक पाहता २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राजद + कॉन्ग्रेस, संजद व भाजप आघाडी हे तीन गट एकमेकांविरूद्ध लढले होते. भाजप विरोधी मते विभागली गेल्याने भाजपचा मोठा विजय झाला होता. नितीशकुमारांनी हे चाणाक्षपणे ओळखून विधानसभेसाठी राजद व काँग्रेसबरोबर युती करून भाजपविरोधी मते एकत्रित केल्यामुळे भाजपचा पराभव झाला होता. २०१४ च्या निवडणुकीत या ३ पक्षांची एकत्रित मते भाजप आघाडीपेक्षा ८% ने जास्त होती व २०१५ मध्ये देखील दोघांच्या मतात तेवढेच अंतर राहिले. त्याचप्रमाणे विधानसभेतील विजयाचे श्रेय प्रशांत किशोर यांना दिले गेले. २०१४ मधील मोदींच्या विजयाचे श्रेय देखील प्रशांत किशोर यांना दिले गेले होते. वास्तविक हे खरे नव्हते. २०१४ मध्ये प्रशांत किशोर नसते तरी निकालात फरक पडला नसता. त्याच प्रमाणे २०१५ मध्ये मोहन भागवत किंवा प्रशांत किशोर नसते तरी निकालात फरक पडला नसता. २००३ मध्ये राजस्थान विधानसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय असेच प्रमोद महाजनांना दिले गेले होते. त्यांच्यावरच २००४ मधील लोकसभा निवडणुकीत उ. प्र. ची जबाबदारी दिली होती. प्रत्यक्षात उ. प्र. मध्ये भाजपचा दारूण पराभव झाला होता.

In reply to by श्रीगुरुजी

२०१४ मधील मोदींच्या विजयाचे श्रेय देखील प्रशांत किशोर यांना दिले गेले होते. वास्तविक हे खरे नव्हते.
सहमत आहे. प्रशांत किशोर हा मनुष्य बराच जास्त over-rated वाटतो. मणीशंकर अय्यरने ’चायवाला’ मोदी कॉंग्रेस अधिवेशनात चहा द्यायचे काम सोडून इतर काहीच काम करू शकणार नाहीत असे काहीसे वक्तव्य केल्यानंतर मोदींना ’चाय पे चर्चा’ ही कल्पना देणे तसेच मोदींनी नितीशकुमारांच्या डी.एन.ए मध्ये अमुकएक गोष्ट नाही असे म्हटल्यावर बिहारमधील लाखो लोकांची डी.एन.ए सॅम्पल पाठविणे अशाप्रकारच्या कल्पना प्रशांत किशोरने नक्कीच दिल्या. पण प्रशांत किशोरमुळे मोदी किंवा नितीशकुमार जिंकले हे म्हणणे अगदीच कैच्याकै झाले. २०१४ मध्ये स्पष्टपणे मोदीलाट होती. ती प्रशांत किशोर लाट नक्कीच नव्हती. आता प्रशांत किशोरपुढे उत्तर प्रदेशात आणि पंजाबात कॉंग्रेसला यश मिळवून द्यायचे मोठे आव्हान आहे. उत्तर प्रदेशात काय होईल हे सांगता येणे कठिण असले तरी पंजाबात मात्र आआप स्वीप असेल असे वाटत आहे. आणि अर्थातच उत्तर प्रदेशात कॉंग्रेसला बहुमत वगैरे मिळेल अशी अपेक्षा कोणीच करत नाही. या दोन्ही राज्यांमध्ये कॉंग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्यास प्रशांत किशोर हा पण फुगा फुटेल.

In reply to by गॅरी ट्रुमन

२०१४ मधील मोदींच्या विजयाचे श्रेय देखील प्रशांत किशोर यांना दिले गेले होते. वास्तविक हे खरे नव्हते.
असहमत! तेव्हाचा मोदींचा प्रचार हा लेजंडरी होता. अब की बार मोदी सरकार असो वा चाय पे चर्चा असो. प्रचारासाठी सोशल मिडीआचा वापर असो हे सगळं राजकीय नेत्याच्या ( अगदी मोदीसुद्धा) केपेबिलिटीमधलं होतं असं अजिबात वाटत नाही. प्रचारात धर्मिक मुद्दे ऑल्मोस्ट शून्य होते. हे अत्यंत प्रोफेशनल काम होतं. मोदींची भाषणं सुद्धा ऐकण्यासारखी होती. किंबहुना मोदींच्या रिसेंट भाषणांचा घसरता दर्जा हेच दाखवतो की तेव्हाचा प्रचार अत्यंत प्रोफेशनली मॅनेज केला होता.

In reply to by अनुप ढेरे

तीव्र सहमत. स्वतः भाजपनेही ते श्रेय नाकारले आणि इथले लोकही नाकारतच आहेत. "केलं असेल त्याने काम त्यात काय एवढं" असा अ‍ॅटीट्युड आहे. मोदीलाट विजयास कारण ठरली पण ही निर्माण कशी झाली ह्याचा कुणी विचार करेल काय. 'तो आला त्याने पाहिलं त्याने जिंकलं' टैप जो जयघोष चालू झाला विजयानंतर त्यात आधीची युद्धपातळीवरची अनेकांची मेहनत पुसुन टाकण्यात आली.

In reply to by तर्राट जोकर

मोदीलाट विजयास कारण ठरली पण ही निर्माण कशी झाली ह्याचा कुणी विचार करेल काय.
मजाच म्हणायची. प्रशांत किशोर इतके लाटा निर्माण करण्यात पॉवरफूल असते तर मग त्यांनी मोदींची लाट का बरे निर्माण केली?स्वत:ला पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहिर करून लोकसभा निवडणुका लढवायच्या ना मग. प्रशांत किशोर लाटेत इतर सगळे वाहून गेले असते. प्रशांत किशोर इतके पॉवरफूल असते तर आज भारताचे पंतप्रधान म्हणून ते असते. हाकानाका. मोदीलाट निर्माण झाली त्यात स्वतः मोदींपेक्षा इतर लोक जास्त जबाबदार होते. विशेषतः युपीए-२ सरकारने घातलेला सावळागोंधळ अगदीच अवर्णनीय होता.त्यामुळे काँग्रेसने आपली स्पेस विरोधकांसाठी आपण होऊन मोकळी केली होती.त्याचा फायदा मोदींनी अगदी व्यवस्थित उचलला.नाहीतर २जी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकीस यायच्या आधी भाजप परत कधी आयुष्यात सत्तेत येईल असे वाटत नव्हते.आणि काँग्रेसने स्वतःसाठी खड्डा खणला नसता तर आज युपीए-३ सरकार सत्तेत असते असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये.

In reply to by गॅरी ट्रुमन

मजाच म्हणायची. प्रशांत किशोर इतके लाटा निर्माण करण्यात पॉवरफूल असते तर मग त्यांनी मोदींची लाट का बरे निर्माण केली?स्वत:ला पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहिर करून लोकसभा निवडणुका लढवायच्या ना मग. प्रशांत किशोर लाटेत इतर सगळे वाहून गेले असते. प्रशांत किशोर इतके पॉवरफूल असते तर आज भारताचे पंतप्रधान म्हणून ते असते. हाकानाका.
कैच्याकै लॉजिक. मोदी होते म्हणून किशोर यशस्वी ठरले. आणि किशोर होते म्हणून मोदी यशस्वी ठरले. तेच बिहारमध्ये. याचा अर्थ असा अजिबात नाही की रा.गा बरोबर ते यशस्वी होती. प्लेइंग अ गुड हँड ग्रेट. किंवा हातातले पत्ते चांगले आहेत आणि ते खेळले देखील अप्रतीम अशी केस होती दोन्हीकडे. काँग्रेस हरणार याबद्दल कोणालाच डाउट नव्ह्ता. सर्व अंदाज NDA 240\250 पर्यंत जातील असे होते. पण तो आकडा २८२/३३५ पर्यंत नेण्यात या कँपेनचा खूप खूप मोठा वाटा होता.

In reply to by गॅरी ट्रुमन

ओके. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार जे कोणी आजवर भारताचे पंतप्रधान झाले ते खरंच पावरफूल होते हे मान्य करायला हवे. ;) मोदीलाट एकट्या किशोरने निर्माण केली हे मी कुठेच म्हटलं नाही. पण इलेक्षन कॅम्पेन मॅनेज करण्यात, नवनवीन संकल्पना लढवण्यात, सायबर-कॅम्पेन हाताळण्यात त्याने बरेच काम केले आहे. भाजपची मोहिम अनुप ढेरे यांनी म्हटल्याप्रमाणे अतिशय उच्च दर्जाच्या व्यावसायिक पातळीवरची होती. ह्या मोहिमेने अभूतपुर्व अशा गोष्टी भारतात पहिल्यांदा आणल्या. ह्याचे ज्याचे त्याला श्रेय देण्यात कसला कमीपणा? जिंकले म्हणुन मोदी हेच एकमेव कारण असे जे पुढे करण्यात आले ते साफ चुकीचे आहे. तुम्ही दुसर्‍या परिच्छेदात जी कारणे उद्धृत केलीत तीच मी टाय्पणार होतो, पण ती सगळी बाजूला करुन फक्त मोदी होते म्हणून जिंकले हा जो काही नजारा उभा केला गेला तो काय आपल्याला पटला नाही.

In reply to by अनुप ढेरे

प्रचारात धर्मिक मुद्दे ऑल्मोस्ट शून्य होते. हे अत्यंत प्रोफेशनल काम होतं.
२००७ आणि २०१२ च्या गुजरात निवडणुकांमध्येही नरेंद्र मोदींनी धार्मिक मुद्दे शून्य वापरले होते त्याचे काय? त्यावेळीपण कन्सल्टींग करायला प्रशांत किशोर बरोबर होते का?

In reply to by अनुप ढेरे

२००७ च्या विधानसभा निवडणुकांचे काय? २००५ आणि २०१० च्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने जोरदार यश मिळवले होते त्याचे काय....? मोदी गुजरातमध्ये विकासाचा मुद्दा अगदी पहिल्यापासून लावून धरत आहेत. २००३ मध्ये व्हायब्रंट गुजरात ही इन्व्हेस्टर समिट गुजरातमध्ये सर्वप्रथम आयोजित केली होती. अगदी तेव्हापासून मोदी हा मुद्दा लावून धरत आहेत. पण त्यावेळी मिडियाला, डाव्या दीडशहाण्यांना आणि सध्या अन्य एका मराठी संकेतस्थळावर वावरणार्‍या मनोवृत्तीच्या लोकांनाही गुजरात दंगली हे हाडुक चघळायला होते त्यामुळे मोदींच्या विकासाच्या मुद्द्याकडे तितके लक्ष दिले नव्हते. पण एस.आय.टी ने मोदींना क्लीन चीट दिल्यावर मात्र गुजरात दंगलींचा मुद्दा हातातून गेला. त्यामुळे मग दुसरा कोणतातरी मुद्दा चघळायला हवा ना? म्हणून मग विकासाचा दावा कसा चुकीचा असा प्रचार सुरू झाला. मोदींनी प्रवीण तोगाडियांना गुजरातमध्ये फार स्थान दिले नव्हते.त्यामुळे सुरवातीला मोदी समर्थक असलेले तोगाडिया नंतर फिरले. तेव्हा विविध निवडणुकांमध्ये मोदींनी धर्माचा मुद्दा लावून धरला नाही याचे श्रेय प्रशांत किशोरला देणे म्हणजे अगदी वडाचे साल पिंपळाला लावण्यासारखे झाले. २०१४ च्या निवडणुकांपूर्वी सुरवातीला मोदींचा प्रभाव कसा नाही, मग मोदींची लाट कशी नाही वगैरे गप्पा झाल्या.आता ते नाकारणे शक्य नसल्यामुळे मोदींची लाट प्रशांत किशोरने कशी निर्माण केली अशा गप्पा सुरू झाल्या. असो.

In reply to by गॅरी ट्रुमन

पुन्हा मांडतो मुद्दा. मोदींचं श्रेय नाही अस कोणीही म्हणत नाहीये. विकासपुरूष ही मोदींची इमेज प्रोजेक्ट केली पाहिजे हे किशोर यांनी ठरवलं असही कोणी म्हणत नाहिये. किशोर यांना हुडकून त्यांच पोटेंशिअल जाणून घेणं आणि त्यांना जबाबदारी देणं हे मोदींच स्किल नि:संशय वाखाणण्याजोगं आहे. पण निवडणुकांचा मुख्य मुद्दा विकास हाच आणि तो लाऊन धरताना जे काही करता येईल ते करणं, गुजरात बाहेर मोदींची प्रतिमा प्रोजेक्ट करणं, निवडणुकांच संभाषित भरकटून न देणं हे भाजपाचं/संघाचं श्रेय अजिबात नाही. हातात चांगले पत्ते असणं ( = नेता मोदी/निकु असणं) आणि तो हात चांगला खेळणं ( उत्कृष्ट प्रचार आणि लोकांची नस ओळखून प्रचारातले मुद्दे ठरवणं)

आपण जरा वाट पाहूया. पुढील वर्षी सुरवातीला फेब्रुवारीत उ. प्र., पंजाब व उत्तराखंडची विधानसभा निवडणुक आहे. निवडणुक स्ट्रॅटेजी ठरविण्यासाठी प्रशांत किशोर यांना उ. प्र. व पंजाबमधील विविध पक्षांनी निमंत्रण दिले आहे. पंजाबमद्ध्ये काही प्रमाणात आआपचा प्रभाव आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत १३ खासदारांपैकी ४ खासदार आआपचे होते. अकाली दल + भाजप युतीचा पराभव निश्चित आहे. काँग्रेसचा विजय निश्चित आहे. परंतु आआप किती मते मिळवेल यावर अंतिम निकाल अवलंबून राहील. आआप अकाली दल + भाजप विरोधी मते घेणार हे निश्चित. आआप जितकी जास्त मते घेईल तितका काँग्रेसला तोटा होणार. परंतु आआप स्वबळावर बहुमत मिळविणार नाही हे नक्की. त्या निवडणुकीत प्रशांत किशोर कोणत्या पक्षासाठी काम करतात व त्या पक्षाची कामगिरी कशी होते त्यावर आपण त्यांच्याबद्दलचे अंतिम मत ठरवूया. पंजाबप्रमाणेच प्रशांत किशोरांना उ. प्र. मध्येही जोरदार मागणी आहे. प्रियांका वड्राला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावे असे त्यांनी काँग्रेसला सुचविले आहे. तसे झाले तरी काँग्रेसच्या जागा फारशा वाढतील असे वाटत नाही. सध्या तिथे बसपचा जोर वाढू लागला आहे. काँग्रेस प्रियांकाला निवडणुकीत उतरविण्याचा धोका पत्करेल असे वाटत नाही. तिथेही प्रशांत किशोर ज्या पक्षाचा निवडणुक प्रचार सांभाळतील त्या पक्षाची कामगिरी बघून मगच मत ठरविता येईल. अवांतर - भारतीय राजकारणात वार्‍याची दिशा काही काळ ओळखणारे अनेक नेते होऊन गेले. १-२ निवडणुकीत त्यांचे अंदाज यशस्वी ठरले तरी नंतर ते अपयशी ठरले आहेत. याचे अजून एक उदाहरण म्हणजे जगजीवन राम. १९६९ मधील काँग्रेसच्या फुटीनंतर जगजीवन रामांनी सिंडीकेट गटाची साथ सोडून इंदिरा गांधींच्या इंडीकेट गटाला पाठिंबा दिला. १९७१ मध्ये लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींना तब्बल ३५३ जागा मिळाल्याने जगजीवन रामांचा अंदाज अचूक ठरला. नंतर १९७७ मध्ये जनभावना ओळखून जगजीवन रामांनी इंदिरांजींची साथ सोडून स्वतःचा वेगळा पक्ष काढून जनता पक्षाबरोबर युती करून प्रचंड यश मिळविले व नंतर जनता पक्षात पक्ष विलीन करून स्वतःला मानाचे स्थान प्राप्त करून घेतले. "जनभावना अचूक ओळखणारा नेता" असे त्यावेळी वृत्तपत्रांनी जगजीवन रामांचे वर्णन केले होते. परंतु नंतर १९८० मध्ये जगजीवन रामांचे अंदाज साफ चुकून जनता पक्षाला जेमतेम ३१ जागा मिळाल्या. शेवटी १९८६ साली त्यांचे पूर्णपणे दुर्लक्षित अशा अवस्थेत निधन झाले. सारांश - कोणत्याही एका व्यक्तीला सदासर्वकाळ जनभावना समजतेच असे नाही.

In reply to by श्रीगुरुजी

त्या निवडणुकीत प्रशांत किशोर कोणत्या पक्षासाठी काम करतात
माझ्या माहितीनुसार काँग्रेससाठी करतायत काम ते. पंजाब, युपी, गुजरात ते २०१९ एवढं असोसिएशन आहे अशी बातमी वाचलेली. किशोर यांची I-PAC ही नवी संस्था कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा प्रचार करत आहे.

नरेंद्र मोदींनी केरळमध्ये प्रचारसभेत बोलताना केरळमधील आदिवासी समाजातील काही सामाजिक इंडीकेटर सोमालियापेक्षाही वाईट आहेत असे विधान केले.हे विधान कितपत बरोबर आहे हे मला माहित नाही. मला केरळमधील आदिवासी समाजाचे सोशल इंडिकेटर माहित नाहीत आणि सोमालियाचे तर त्याहूनही नाही. पण निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये असे वक्तव्य करणे भाजपला महागात पडू शकते. १९८७ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान राजीव गांधींनी कलकत्त्याला "dying city" असे म्हटले तर ७३ वर्षांच्या "वृध्द" ज्योती बसूंना निवृत्त करा असेही म्हटले होते. मला वाटते की राजीव गांधींची ही वक्तव्ये काँग्रेसला महागात पडली. बंगाली लोकांचे कलकत्त्यावर किती प्रेम असते हे वेगळे सांगायलाच नको. त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा विजय वगैरे काही होणारच नव्हता. पण पक्षाला २९४ पैकी अवघ्या ४० जागा मिळाल्या इतकीही वाईट अवस्था व्हायला नको होती. मोदींच्या दुबई आणि सौदी अरेबियातील भेटीपासून भाजपला केरळमध्ये आपले खाते खोलता येईल अशी आशा निर्माण झाली होती. त्याच काळात हे सोमालिया प्रकरण झाले आहे. आपले राज्य हे इतर राज्यांपेक्षा पुढे आहे याचा अभिमान मल्याळी लोकांना असतोच. मोदी जे काही म्हणाले आहेत ते केरळमधील आदिवासी समाजात सोशल इंडिकेटर वाईट आहेत असे म्हणाले आहेत.पण मिडिया आणि विरोधी पक्ष त्याचा प्रचार "मोदींनी केरळची तुलना सोमालियाशी केली" असा करूही लागले आहेत. निवडणुकांच्या काळात आपले वक्तव्य जाणीवपूर्वक मॅनिप्युलेट केले जाणार हे मोदींच्या लक्षात आले नाही की त्यामागेही कुठचातरी राजकीय डाव आहे हे समजायला मार्ग नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

नरेंद्र मोदींनी केरळमध्ये प्रचारसभेत बोलताना केरळमधील आदिवासी समाजातील काही सामाजिक इंडीकेटर सोमालियापेक्षाही वाईट आहेत असे विधान केले.
केरळमधील अर्भकांचा मृत्युदर (इन्फंट मोर्टॅलिटी रेट) या संदर्भात ते विधान होते. असल्या विधानांचा मतदानावर परीणाम होईल असे वाटत नाही. भाजपला तसेही केरळमध्ये फारसे मतदान होत नाही. पूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेली मते ५-६ टक्क्यांच्या पुढे गेलेली नव्हती. मे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मोदींचा चेहरा समोर असल्याने भाजपला १० टक्क्यांचा आकडा ओलांडता आला होता. यावेळीही भाजपला ६ ते १० टक्क्यांच्या दरम्यानच मते मिळतील. फरक इतकाच आहे की इतिहासात भाजपला केरळ विधानसभेत कधीही एकही उमेदवार निवडून आणता आला नव्हता. यावेळी भाजपला २-३ जागा मिळण्याची आशा आहे. अशा विधांनामुळे मतदानावर परीणाम होत नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी इ. पक्षांनी महाराष्ट्र वि. गुजरात असा वाद निर्माण केला होता. परंतु त्याचा त्यांना काहीही फायदा झाला नव्हता. मोदींनी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवून नेले, महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी गुजरातला वळविले, रिझर्व्ह बँक मुंबईतून गुजरातला हलविणार, अतिरेकी प्रशिक्षण केंद्र अलिबागहून गुजरातला हलविले इ. प्रचार सातत्याने सुरू होता. कोणत्याही निवडणुकीत असे भावनिक मुद्दे आणले जातात. बिहारमधील निवडणुकीतही असेच भावनिक मुद्दे प्रचारात आणले गेले होते. तिथेही भाजपच्या मतांवर परीणाम झाला नाही. परंतु अशा मुद्द्यांचा मतदानावर परीणाम होत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

नरेंद्र मोदींनी केरळमध्ये प्रचारसभेत बोलताना केरळमधील आदिवासी समाजातील काही सामाजिक इंडीकेटर सोमालियापेक्षाही वाईट आहेत असे विधान केले.हे विधान कितपत बरोबर आहे हे मला माहित नाही. मला केरळमधील आदिवासी समाजाचे सोशल इंडिकेटर माहित नाहीत आणि सोमालियाचे तर त्याहूनही नाही. पण निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये असे वक्तव्य करणे भाजपला महागात पडू शकते.
गॅरीसाहेब, खालील पीडीएफ वाचा. http://www.jrsgis.com/articlefiles/Volume2issue123/JRSGIS12029.pdf Analyzing livelihood status of tribes in Attappady block, Kerala या नावाच्या या संशोधन ग्रंथात खालील परिच्छेद आहे. As we have taken the UNDP methodology for constructing human development indices for index of tribes in Attappady, we can compare the human development Indices of several groups with reference to the Human Development Indices of other countries which are also constructed with UNDP methodology. From this comparison, we can also information regarding the human development positions they hold and and whether they lag behind the average national human development indices or do etter than that of the national average. Further, we can place these three community's (Irula, Muduga, Kurumba) human development indices in a global scenario (Figure - 3). The HDI of tribes (0.370) is equal to the HDIs of some African countries (Ethiopia, Niger and Somalia etc.) which ranks 170 above in ranked by UNDP. The non-tribes of Kerala are far ahead in terms of HDI value (o.718) i.e., there is a wide disparity of inequality there exists in Human Development status of HDI (0.360) between tribes and non-tribes of Kerala especially in Attappady block. २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधन ग्रंथात केरळमधील अट्टापड्डी भागातील आदिवासी व गैरआदिवासी यांच्या वेगवेगळ्या विकास निर्देशांकाचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. या भागातील आदिवासीचा मानवी विकास निर्देशांक इथिओपिआ, नायजर, सोमालिआ इ. देशांच्या मानवी विकास निर्देशांकाच्या बरोबरीचा आहे असा निष्कर्ष काढलेला आहे. मानवी विकास निर्देशांकावर आधारीत क्रमवारीत हे देश २०० देशांच्या यादीत जवळपास तळाला आहेत. International Journal of Advances in Remote sensing and GIS या अजून एका संकेतस्थळावर भारताच्या वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या निर्देशांकाच्या अभ्यासावर आधारीत रिसर्च पेपर्स प्रसिद्ध केलेले आहेत. https://ipublishingjournals.wordpress.com/2015/05/ आधी दिलेल्या पीडीएफची लिंक या संकेतस्थळावर देखील आहे. ___________________________________________________________________ नरेंद्र मोदी केरळमधील सभेत जे म्हणाले ते चूक नव्हते. परंतु निवडणुकीतील प्रचार सभेत लोकांना हव्या असलेल्या मुद्द्यांवर बोलायचे असते. असले निर्देशांक व आकडेवारी मतदारांना प्रभावित करू शकत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

लोक रिसर्च पेपर वाचून मतदान करायला जात नाहीत. मोदी म्हणाले ती गोष्ट खरी असेलही. मला केरळ आणि सोमालिया या दोन्ही ठिकाणचे सोशल इंडिकेटर माहित नाहीत. मोदींनी केलेल्या या वक्तव्याचा "मोदींनी केरळची तुलना सोमालियाशी केली" असा प्रचार होणार हे अगदी अपेक्षितच आहे.त्यातून मतदानावर किती परिणाम होईल हे माहित नाही पण मुद्दामून विरोधकांना आयते कोलीत का द्यायला हवे होते?

In reply to by श्रीगुरुजी

नरेंद्र मोदी केरळमधील सभेत जे म्हणाले ते चूक नव्हते.
मोदी त्या सभेत काय बोलले? “Yahan Keral ki janjaati, janta, ST Scheduled Tribe, usmey jo child death ratio hai, Somalia se bhi sthiti khatarnaak hai… Abhi kuchh din pehle… media mein dardnaak chitra dekhney ko mila…Jo Communist party ka qila maana jaata hai, jahaan voh hamesha jeet-ti hai, us Peravoor mein Scheduled Tribe ke baalak koode ke dher mein bhojan talaash kar rahe hain, yeh media mein prakaashit hua hai,” Modi said. आदिवासी समाजातील सोशल इंडिकेटरची तुलना सोमलियाशी केली नाही. शिशू म्रुत्यु दराची तुलना सोमालियाशी केली होती. तेही केरळमधील एका आदिवासी भागातील जमतीचा उल्लेख करून. सोमालियाशीच का केली? मेळघाटातील आदिवासी शिशू म्रुत्यु दराशी का नाही केली? तुलना करायचीच होती तर संपुर्ण केरळ राज्याच्या सोशल इंडिकेटरची देशाच्या सोशल इंडिकेटरशी करायला हवी होती. सोयीचे घ्यायचे व लोकांची दिशाभूल करायची, वर त्यांच्या चूकीचे समर्थनही करायचे.

In reply to by मार्मिक गोडसे

जे मोदिवचन तुम्ही टंकलय तसच जर मोदि बोलले असतील तर त्यात आक्षेपार्ह काय आहे कळलं नाहि.

In reply to by अर्धवटराव

जे मोदिवचन तुम्ही टंकलय तसच जर मोदि बोलले असतील तर त्यात आक्षेपार्ह काय आहे कळलं नाहि.
माझ्या वरील प्रतिसादात थोडक्यात सांगितले आहे. एक तर मिडियाने छापलेल्या कुठल्याश्या एका चित्रावरून सगळे अंदाजपंचे ठोकून द्यायचे, आकडेवारीचा पत्ता नाही.तुलना करताना आकडेवारी तरी द्यायची ना? मुख्य म्हणजे केरळातील ज्या जमातीतील बालमृत्यु दर मोदींना सोमालियातील बालमृत्यु दरापेक्षा धोकादायक वाटतो तोही प्रत्यक्षात तसा नाही ही वस्तुस्थीती आहे, परंतू खोटं बोल पण रेटून बोल ही सवय सुटनार नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

एक तर मिडियाने छापलेल्या कुठल्याश्या एका चित्रावरून सगळे अंदाजपंचे ठोकून द्यायचे, आकडेवारीचा पत्ता नाही.तुलना करताना आकडेवारी तरी द्यायची ना? मुख्य म्हणजे केरळातील ज्या जमातीतील बालमृत्यु दर मोदींना सोमालियातील बालमृत्यु दरापेक्षा धोकादायक वाटतो तोही प्रत्यक्षात तसा नाही ही वस्तुस्थीती आहे, परंतू खोटं बोल पण रेटून बोल ही सवय सुटनार नाही.
मिडियाने चित्रबित्र कोठेही छापलेले नाही. संयुक्त राष्ट्रसंघ व अनेक गैरसरकारी संस्था अशा तर्‍हेचा अभ्यास व संशोधन करून निष्कर्ष काढत असतात. विद्यावाचस्पती मिळविलेले अनेक विद्यार्थी देखील आपल्या प्रबंधासाठी असा अभ्यास करतात. हे निष्कर्ष माध्यमांनी काढलेले नसून अभ्यास करून काढलेले निष्कर्ष आहेत. यात अंदाजपंचे असे काहीही ठोकलेले नाही. जो आहे तो केवळ तुमचा पूर्वग्रह आहे. मोदींनी काहीही केलं तरी त्याला रेटून शिव्या घाल ही काहीजणांची सवय सुटणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मिडियाने चित्रबित्र कोठेही छापलेले नाही.
मोदी काय म्हणाले ते नीट वाचा.
Abhi kuchh din pehle… media mein dardnaak chitra dekhney ko mila…Jo Communist party ka qila maana jaata hai, jahaan voh hamesha jeet-ti hai, us Peravoor mein Scheduled Tribe ke baalak koode ke dher mein bhojan talaash kar rahe hain, yeh media mein prakaashit hua hai,” Modi said.
हे खोटं आहे काय? मोदींनी कोणतीही आकडेवारी दिलेली नाही किंवा अभ्यासलेली नाही. अभ्यासली असती तर असे अंदाजपंचे ठोकले नसते. आपले पंतप्रधान खोटारडे आहेत हे सांगायला लाज वाटते का? खालील लिंकमध्ये मोदींनी अभ्यासलेला फोटो, तोडलेले तारे, सोमालीया केरळ तुलना सगळे काही आहे. http://indianexpress.com/article/explained/narendra-modi-somalia-commen… .

In reply to by मार्मिक गोडसे

काय चाललंय हे? आधीच्या प्रतिसादात लिहिलंत की मोदींनी "शिशू म्रुत्यु दराची तुलना सोमालियाशी केली होती. तेही केरळमधील एका आदिवासी भागातील जमतीचा उल्लेख करून.". त्या आदिवासी जमातींबद्दल जो संशोधन प्रबंध आहे त्यात त्या आदिवासींच्या विकास निर्देशांकाची तुलना सोमालियाशी व इतर काही गरीब व मागासलेल्या आफ्रिकन देशांशी केली आहे. मी त्या प्रबंधाची लिंक दिली होती. तुम्ही तो प्रबंध न वाचतात मोदींना दूषणे दिली होती. त्याचा उल्लेख मी दुसर्‍या प्रतिसादात केल्यावर तुमच्या प्रतिसादात आता वेगळाच उल्लेख आहे. तुमच्या प्रतिसादातील वाक्यांनुसार - "आदिवासी बालके कचर्‍याच्या ढिगात अन्न शोधताना दिसल्याचे एक चित्र माध्यमात आले आहे". - असे मोदी बोलले होते. जे माध्यमातून छापून आलं त्याचाच मोदींनी उल्लेख केला, जे संशोधन प्रबंधात दिलेलं आहे त्याचाच मोदींनी उल्लेख केला. यात अंदाजपंचे काय आहे? यात काय ठोकले आहे? यात कोणते तारे तोडले आहेत? तुम्हाला मोदी आवडत नाहीत. त्यामुळे मोदी काय बोलले ते न वाचता, त्याचा अभ्यास न करता, आपण काय लिहितो आहोत ते न वाचता व न समजता, दिलेल्या लिंक्स न वाचता निव्वळ मोदीद्वेषातूनच असे द्वेषी प्रतिसाद येतात.

In reply to by श्रीगुरुजी

काय चाललंय हे? आधीच्या प्रतिसादात लिहिलंत की मिडियाने चित्रबित्र कोठेही छापलेले नाही. मी लिंक दिली ज्याने तुमचे सगळे दावे फोल ठरल्यावर म्हणता,जे माध्यमातून छापून आलं त्याचाच मोदींनी उल्लेख केला . मोदींनी तुम्ही म्हणता त्या संशोधन प्रबंधाचा उल्लेख कुठेही केला नाही. बिनधास्त ठोकून देता राव.
यात अंदाजपंचे असे काहीही ठोकलेले नाही. जो आहे तो केवळ तुमचा पूर्वग्रह आहे. मोदींनी काहीही केलं तरी त्याला रेटून शिव्या घाल ही काहीजणांची सवय सुटणार नाही.
मी कुठे शिवी दिली ते दाखवून द्या. पूर्वग्रह व भयगंडाने तुम्हाला पछाडलेय त्यामुळे तुमचा तोल जातोय. मी विद्यमान सरकारच्या चांगल्या निर्णयाचे स्वागतही केले आहे. नसेल वाचले तर लिन्कही देईन. काहीही खोटेनाटे आरोप करू नका.

In reply to by मार्मिक गोडसे

केरळमधील आदिवासी समाजातील विकास निर्देशांक या विषयावर तुमचा सगळ्यात पहिला प्रतिसाद -
एक तर मिडियाने छापलेल्या कुठल्याश्या एका चित्रावरून सगळे अंदाजपंचे ठोकून द्यायचे, आकडेवारीचा पत्ता नाही.तुलना करताना आकडेवारी तरी द्यायची ना? मुख्य म्हणजे केरळातील ज्या जमातीतील बालमृत्यु दर मोदींना सोमालियातील बालमृत्यु दरापेक्षा धोकादायक वाटतो तोही प्रत्यक्षात तसा नाही ही वस्तुस्थीती आहे, परंतू खोटं बोल पण रेटून बोल ही सवय सुटनार नाही.
त्यावर माझा प्रतिसाद -
मिडियाने चित्रबित्र कोठेही छापलेले नाही. संयुक्त राष्ट्रसंघ व अनेक गैरसरकारी संस्था अशा तर्‍हेचा अभ्यास व संशोधन करून निष्कर्ष काढत असतात. विद्यावाचस्पती मिळविलेले अनेक विद्यार्थी देखील आपल्या प्रबंधासाठी असा अभ्यास करतात. हे निष्कर्ष माध्यमांनी काढलेले नसून अभ्यास करून काढलेले निष्कर्ष आहेत. यात अंदाजपंचे असे काहीही ठोकलेले नाही.
त्यावर तुमचा प्रतिसाद व त्यात विकास निर्देशांक व आकडेवारी याऐवजी एका भलत्याच विषयावरील चित्राचा उल्लेख -
Abhi kuchh din pehle… media mein dardnaak chitra dekhney ko mila…Jo Communist party ka qila maana jaata hai, jahaan voh hamesha jeet-ti hai, us Peravoor mein Scheduled Tribe ke baalak koode ke dher mein bhojan talaash kar rahe hain, yeh media mein prakaashit hua hai,” Modi said.
म्हणजे आपण बोलत होतो तो विषय होता केरळमधील आदिवासी समाजाच्या विकास निर्देशांकाची आकडेवारी व त्या संदर्भात माध्यमांनी काहीतरी चित्र प्रसिद्ध केले आहे व त्यावर विसंबून मोदी खोटे बोलले असा तुमचा दावा होता. त्यासंबंधात माध्यमांनी चित्र वगैरे काहीही प्रसिद्ध केलेले नाही. परंतु या विषयावर काही संशोधकांनी एक प्रबंध प्रसिद्ध केला आहे व मोदी जे म्हणाले तोच निष्कर्ष त्यात काढला आहे असे मी सांगितले. त्यावर तुमच्या पुढच्या प्रतिसादात माध्यमात प्रसिद्ध झालेल्या एका वेगळ्याच चित्राचा तुम्ही उल्लेख केला ज्यात आदिवासी समाजातील मुले कचर्‍याच्या ढिगात अन्न शोधताना दाखविली होती. काय चाललंय हे? आधीच्या प्रतिसादात लिहिलंत की मिडियाने चित्रबित्र कोठेही छापलेले नाही. मी लिंक दिली ज्याने तुमचे सगळे दावे फोल ठरल्यावर म्हणता,जे माध्यमातून छापून आलं त्याचाच मोदींनी उल्लेख केला . मोदींनी तुम्ही म्हणता त्या संशोधन प्रबंधाचा उल्लेख कुठेही केला नाही. बिनधास्त ठोकून देता राव. आदिवासींच्या विकास निर्देशांकासंबंधीच्या आकडेवारीचे चित्र आणि कचर्‍याच्या ढिगात अन्न शोधणार्‍या मुलांचे चित्र ही दोन्ही चित्रे एकच असतात का?

In reply to by श्रीगुरुजी

माझा पहीला प्रतिसाद- नरेंद्र मोदी केरळमधील सभेत जे मार्मिक गोडसे - Fri, 13/05/2016 - 11:18
नरेंद्र मोदी केरळमधील सभेत जे म्हणाले ते चूक नव्हते.
मोदी त्या सभेत काय बोलले? “Yahan Keral ki janjaati, janta, ST Scheduled Tribe, usmey jo child death ratio hai, Somalia se bhi sthiti khatarnaak hai… Abhi kuchh din pehle… media mein dardnaak chitra dekhney ko mila…Jo Communist party ka qila maana jaata hai, jahaan voh hamesha jeet-ti hai, us Peravoor mein Scheduled Tribe ke baalak koode ke dher mein bhojan talaash kar rahe hain, yeh media mein prakaashit hua hai,” Modi said. आदिवासी समाजातील सोशल इंडिकेटरची तुलना सोमलियाशी केली नाही. शिशू म्रुत्यु दराची तुलना सोमालियाशी केली होती. तेही केरळमधील एका आदिवासी भागातील जमतीचा उल्लेख करून. सोमालियाशीच का केली? मेळघाटातील आदिवासी शिशू म्रुत्यु दराशी का नाही केली? तुलना करायचीच होती तर संपुर्ण केरळ राज्याच्या सोशल इंडिकेटरची देशाच्या सोशल इंडिकेटरशी करायला हवी होती. सोयीचे घ्यायचे व लोकांची दिशाभूल करायची, वर त्यांच्या चूकीचे समर्थनही करायचे. त्यामुळे तुम्ही केलेला पहीला दावा चुकीचा आहे. माझा दुसर प्रतिसाद- जे मोदिवचन तुम्ही टंकलय तसच मार्मिक गोडसे - Fri, 13/05/2016 - 14:21
जे मोदिवचन तुम्ही टंकलय तसच जर मोदि बोलले असतील तर त्यात आक्षेपार्ह काय आहे कळलं नाहि.
माझ्या वरील प्रतिसादात थोडक्यात सांगितले आहे. एक तर मिडियाने छापलेल्या कुठल्याश्या एका चित्रावरून सगळे अंदाजपंचे ठोकून द्यायचे, आकडेवारीचा पत्ता नाही.तुलना करताना आकडेवारी तरी द्यायची ना? मुख्य म्हणजे केरळातील ज्या जमातीतील बालमृत्यु दर मोदींना सोमालियातील बालमृत्यु दरापेक्षा धोकादायक वाटतो तोही प्रत्यक्षात तसा नाही ही वस्तुस्थीती आहे, परंतू खोटं बोल पण रेटून बोल ही सवय सुटनार नाही. हा प्रतिसाद अर्धवटरावांकरता होता. तुम्हीच त्यावर खालील उपप्रतिसाद दिला. एक तर मिडियाने छापलेल्या श्रीगुरुजी - Fri, 13/05/2016 - 15:05 मिडियाने चित्रबित्र कोठेही छापलेले नाही. संयुक्त राष्ट्रसंघ व अनेक गैरसरकारी संस्था अशा तर्‍हेचा अभ्यास व संशोधन करून निष्कर्ष काढत असतात. विद्यावाचस्पती मिळविलेले अनेक विद्यार्थी देखील आपल्या प्रबंधासाठी असा अभ्यास करतात. हे निष्कर्ष माध्यमांनी काढलेले नसून अभ्यास करून काढलेले निष्कर्ष आहेत. यात अंदाजपंचे असे काहीही ठोकलेले नाही. जो आहे तो केवळ तुमचा पूर्वग्रह आहे. मोदींनी काहीही केलं तरी त्याला रेटून शिव्या घाल ही काहीजणांची सवय सुटणार नाही. माझा तिसरा प्रतिसाद - मिडियाने चित्रबित्र कोठेही मार्मिक गोडसे - Fri, 13/05/2016 - 16:28
मिडियाने चित्रबित्र कोठेही छापलेले नाही.
मोदी काय म्हणाले ते नीट वाचा.
Abhi kuchh din pehle… media mein dardnaak chitra dekhney ko mila…Jo Communist party ka qila maana jaata hai, jahaan voh hamesha jeet-ti hai, us Peravoor mein Scheduled Tribe ke baalak koode ke dher mein bhojan talaash kar rahe hain, yeh media mein prakaashit hua hai,” Modi said.
हे खोटं आहे काय? मोदींनी कोणतीही आकडेवारी दिलेली नाही किंवा अभ्यासलेली नाही. अभ्यासली असती तर असे अंदाजपंचे ठोकले नसते. आपले पंतप्रधान खोटारडे आहेत हे सांगायला लाज वाटते का? खालील लिंकमध्ये मोदींनी अभ्यासलेला फोटो, तोडलेले तारे, सोमालीया केरळ तुलना सगळे काही आहे. http://indianexpress.com/article/explained/narendra-modi-somalia-comment.. आता माझ्या कोणत्या प्रतिसादात मी केरळमधील आदिवासी समाजातील विकास निर्देशांकावर चर्चा करत होतो हे दाखवा. काहीही खोटे आरोप करयची सवयच आहे तुम्हाला. आणि ते तुम्ही माझ्यावर मोदींना शिवी दिल्याचा आरोप केला होता त्याचेही उत्तर द्या.

In reply to by मार्मिक गोडसे

आदिवासी समाजातील सोशल इंडिकेटरची तुलना सोमलियाशी केली नाही. शिशू म्रुत्यु दराची तुलना सोमालियाशी केली होती. तेही केरळमधील एका आदिवासी भागातील जमतीचा उल्लेख करून. सोमालियाशीच का केली? मेळघाटातील आदिवासी शिशू म्रुत्यु दराशी का नाही केली? तुलना करायचीच होती तर संपुर्ण केरळ राज्याच्या सोशल इंडिकेटरची देशाच्या सोशल इंडिकेटरशी करायला हवी होती. सोयीचे घ्यायचे व लोकांची दिशाभूल करायची, वर त्यांच्या चूकीचे समर्थनही करायचे. त्यामुळे तुम्ही केलेला पहीला दावा चुकीचा आहे.
मी दिलेली पीडीएफ तुम्ही अजूनही वाचलेली नाही व न वाचताच अपुर्‍या माहितीवर प्रतिसाद देणे सुरू आहे. आरोग्य, शिशू मृत्यु दर, शिक्षण, आर्थिक स्थिती इ. घटक आदिवासींच्या विकास निर्देशांकाचाच भाग आहेत. सोमालियाशी तुलना का केली, मेळघाटाशी का केली नाही असल्या खुसपटांना काहीही अर्थ नाही. समजा मेळघाटाशी तुलना केली असती तर बस्तर जिल्ह्यातल्या आदिवासींशी का केली नाही असे खुसपट निघाले असते. एखाद्याच्या बाबतीत काहीतरी खोट काढायची असेल तर असली खुसपटे काढली जातात.
हे खोटं आहे काय? मोदींनी कोणतीही आकडेवारी दिलेली नाही किंवा अभ्यासलेली नाही. अभ्यासली असती तर असे अंदाजपंचे ठोकले नसते. आपले पंतप्रधान खोटारडे आहेत हे सांगायला लाज वाटते का? खालील लिंकमध्ये मोदींनी अभ्यासलेला फोटो, तोडलेले तारे, सोमालीया केरळ तुलना सगळे काही आहे.
केरळमधील आदिवासींच्या विकास निर्देशांकाचा अभ्यास या क्षेत्रातील जाणकारांनी पूर्वीच केलेला आहे. मोदी जे म्हणाले त्यात नवीन काहीही नाही. खालील वृत्तांत वाचा (धन्यवाद गॅरी). http://timesofindia.indiatimes.com/elections-2016/kerala-elections-2016… जे मोदींनी सांगितले तेच केरळचे माजी मुख्यमंत्री मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अच्युतानंदन यांनी ३ वर्षांपूर्वीच सांगितले होते. अच्युतानंदनही मोदींप्रमाणेच "खोटारडे" (!) आहेत असा तुमचे ठाम मत असेल तर मात्र नाईलाज आहे. टाइम्स ऑफ इंडियातील या वृत्तांतातील काही वाक्ये - The Somalia remark upset many Keralites, who saw it as an insult to Malayalee pride.This, despite the fact that a 2014 study by scholars of Chittur College, Palakkad, had analysed the livelihood status of tribes in Attapadi block and found that the human development indices (HDI) of this tribal block and countries like Somalia are almost similar. Factually speaking, Modi perhaps wasn't off the mark.The Chittur College study said the development indices of the Irula, Muduga and Kurumba tribals of Attapadi were similar to countries like Somalia. Child rights activist Rajendra Prasad said Modi's remark had a reason. Successive UDF and LDF governments have done nothing in the region. "The conditions are akin to what exist in an impoverished African country," he said. In three years 595 infants have died here and nothing has moved despite the government announcing a Rs 400-crore package for the region two years ago. या विषयावर संशोधन करून प्रबंध लिहिणारे संशोधक, केरळचे माजी मुख्यमंत्री अच्युतानंदन, टाइम्स ऑफ इंडिया इ. मोदींप्रमाणेच खोटारडे असले पाहिजेत. नाही का?
आता माझ्या कोणत्या प्रतिसादात मी केरळमधील आदिवासी समाजातील विकास निर्देशांकावर चर्चा करत होतो हे दाखवा.
काय हे? तुम्हीच ही चर्चा सुरू केलीत आणि विकास निर्देशांकाचे चित्र न दाखविता कचर्‍यात अन्न शोधणार्‍या मुलांच्या चित्राचा संदर्भ दिलात. आपले सर्व प्रतिसाद सुरवातीपासून नीट वाचा, म्हणजे त्यातील विसंगती व विरोधाभास लक्षात येईल.
काहीही खोटे आरोप करयची सवयच आहे तुम्हाला. आणि ते तुम्ही माझ्यावर मोदींना शिवी दिल्याचा आरोप केला होता त्याचेही उत्तर द्या.
आपले पंतप्रधान खोटारडे आहेत हे सांगायला लाज वाटते का? हे तुमचेच वाक्य आहे ना?

In reply to by श्रीगुरुजी

आपले पंतप्रधान खोटारडे आहेत हे सांगायला लाज वाटते का? हे तुमचेच वाक्य आहे ना?
आपले पंतप्रधान खोटारडे आहेत हे सांगायला लाज वाटते का? ह्या तुम्ही ठळक केलेल्या वाक्यातील कोणता शब्द तुम्हाला शिवी म्हणून वाटतो? मिपावरील माझा एकतरी असा प्रतिसाद दाखवा ज्यात मी थेट मोदींचे नाव घेतले आहे व पुर्वग्रहाने किंवा मोदीद्वेषाने लिहिले आहे. मला भाटगीरी करायला जमत नाही. ज्यांना मी माझे अमुल्य मत देवून देशाचा गाडा हाकायला दिला आहे तो ते काम सोडून भलतेच वेडेचाळे करत असेल तर त्यावर मला बोलण्याचा अधिकार आहे. शिव्या देणे किंवा दारावर जाऊन थूंकणे हे भ्याड लोकांचे काम आहे. प्रथम तुमचे ते 'सोशल इंडिकेटरचे' तुणतुणं बंद करा. मी चर्चा सोशल इंडिकेटरवर करतच नव्ह्तो, हे वर सांगूनही तुमचं तुणतुणं चालूच. मोदींचे केरळ मधील भाषण नीट ऐका हिंदी नसेल समजत (समजत असती तर असा निरर्थक वाद घातलाच नसता) तर मल्याळममधेही ऐकायची सोय केली आहे, दुभाषी ठेवून. त्यात मोदींनी तुम्ही म्ह्णता तशी त्या आदिवासींच्या विकास निर्देशांकाची तुलना सोमालियाशी व इतर काही गरीब व मागासलेल्या आफ्रिकन देशांशी केलेली नाही. हां, आपल्या देशाच्या बेरोजगाराची तुलना केरळच्या बेरोजगारीशी केली आहे. आणी मोदींना केरळातील ज्या जमातीतील बालमृत्यु दर सोमालियातील बालमृत्यु दरापेक्षा भयानक वाटला त्याची आकडेवारी भाषणात दिलेली नाही. मोघम ठोकून दिले आहे. प्रत्यक्षात सोमालियात बालम्रूत्युचे प्रमाण १००० मधे ९० असे आहे, तर मोदी म्हणतात त्या केरळमधील आदिवासी जमातीत बालमृत्युचे प्रामाण १००० मधे ६५. ह्याचा अर्थ मोदी म्हणतात त्याप्रमाणे सोमालियापेक्षा परिस्थीती भयानक नाही हे सिद्ध होते व मोदी खोटं बोलतात हेही दिसून येते.

In reply to by मार्मिक गोडसे

आपले पंतप्रधान खोटारडे आहेत हे सांगायला लाज वाटते का? ह्या तुम्ही ठळक केलेल्या वाक्यातील कोणता शब्द तुम्हाला शिवी म्हणून वाटतो?
ज्या व्यक्तीने सत्यपरिस्थितीचा उल्लेख केलेला आहे त्याचा उल्लेख खोटारडा असा करणे हे कौतुक करण्यासारखे आहे का?
मिपावरील माझा एकतरी असा प्रतिसाद दाखवा ज्यात मी थेट मोदींचे नाव घेतले आहे व पुर्वग्रहाने किंवा मोदीद्वेषाने लिहिले आहे.
मोदींनी सत्यपरिस्थिती सांगितलेली असताना आधीच्या प्रतिसादात त्यांचा खोटारडा असा उल्लेख केला होता आणि या प्रतिसादातही "मोदी खोटं बोलतात" असा उल्लेख आहे. या प्रतिसादातील "ज्यांना मी माझे अमुल्य मत देवून देशाचा गाडा हाकायला दिला आहे तो ते काम सोडून भलतेच वेडेचाळे करत असेल तर त्यावर मला बोलण्याचा अधिकार आहे." हे वाक्यही मोदींच्याच संबंधात आहे.
प्रथम तुमचे ते 'सोशल इंडिकेटरचे' तुणतुणं बंद करा. मी चर्चा सोशल इंडिकेटरवर करतच नव्ह्तो, हे वर सांगूनही तुमचं तुणतुणं चालूच. मोदींचे केरळ मधील भाषण नीट ऐका हिंदी नसेल समजत (समजत असती तर असा निरर्थक वाद घातलाच नसता) तर मल्याळममधेही ऐकायची सोय केली आहे, दुभाषी ठेवून. त्यात मोदींनी तुम्ही म्ह्णता तशी त्या आदिवासींच्या विकास निर्देशांकाची तुलना सोमालियाशी व इतर काही गरीब व मागासलेल्या आफ्रिकन देशांशी केलेली नाही. हां, आपल्या देशाच्या बेरोजगाराची तुलना केरळच्या बेरोजगारीशी केली आहे. आणी मोदींना केरळातील ज्या जमातीतील बालमृत्यु दर सोमालियातील बालमृत्यु दरापेक्षा भयानक वाटला त्याची आकडेवारी भाषणात दिलेली नाही. मोघम ठोकून दिले आहे. प्रत्यक्षात सोमालियात बालम्रूत्युचे प्रमाण १००० मधे ९० असे आहे, तर मोदी म्हणतात त्या केरळमधील आदिवासी जमातीत बालमृत्युचे प्रामाण १००० मधे ६५. ह्याचा अर्थ मोदी म्हणतात त्याप्रमाणे सोमालियापेक्षा परिस्थीती भयानक नाही हे सिद्ध होते व मोदी खोटं बोलतात हेही दिसून येते.
परत तेच! नवजात अर्भक मृत्यु दर हा घटक हा विकास निर्देशांकाचाच एक भाग आहे. एखादा विद्यार्थी मॅट्रिक पास झाला असे सांगितले तर तो त्या परीक्षेतील गणित, शास्त्र, इतिहास इ. सर्व विषयात पास झाला असा त्याचा अर्थ असतो. हे सर्व विषय मॅट्रिकच्या परीक्षेचाच भाग आहेत. तो मॅट्रिक पास झाला असला तरी तो मुद्दा नसून तो गणितात नापास झाला असे कोणी म्हटले तर ते अत्यंत हास्यास्पद होईल. हेही तसेच आहे.

In reply to by श्रीगुरुजी

ज्या व्यक्तीने सत्यपरिस्थितीचा उल्लेख केलेला आहे त्याचा उल्लेख खोटारडा असा करणे हे कौतुक करण्यासारखे आहे का?
प्रत्यक्षात सोमालियात बालम्रूत्युचे प्रमाण १००० मधे ९० असे आहे, तर मोदी म्हणतात त्या केरळमधील आदिवासी जमातीत बालमृत्युचे प्रामाण १००० मधे ६५. ह्याचा अर्थ मोदी म्हणतात त्याप्रमाणे सोमालियापेक्षा परिस्थीती भयानक नाही ही सत्यपरिस्थीती मोदींनी आपल्या भाषणात मांडली का? नाही ना? मग मी त्यांचे का कौतूक करायचे? खोटारडेपणा सिद्ध करणे म्हणजे शिवी देणे हे नवीनच समजले. पुन्हा सांगतो मोदींचे भाषण नीट ऐका.

In reply to by मार्मिक गोडसे

वरील प्रतिसादावरून मला एक पूर्वीची घटना आठवली. १९९६ मध्ये अमेरिकेतील अ‍ॅटलांटा शहरात शताब्दी ऑलिंपिक स्पर्धा होणार होत्या. त्यासाठी शहरात जोरदार तयारी सुरू होती. विमानतळाचे सुशोभीकरण, विमानतळावर नवीन टर्मिनल्स निर्माण करणे, नवीन रस्ते, आधी असलेले रस्ते रूंदीकरण, नवीन वाहनतळ इ. अनेक कामे अहोरात्र सुरू होती. स्पर्धा सुरू होण्याच्या काही महिने आधी एका वृत्तवाहिनीने अमेरिकेतील सर्वाधिक गुन्हेगारी असलेली १० शहरे असा एक वृतांत सादर केला. त्या १० शहरात प्रथम क्रमांकावर अ‍ॅटलांटाचे नाव होते. तो वॄतांत पाहिल्यावर शहरात खळबळ माजली. त्या वृत्तांतावर वृत्तवाहिन्यांनी अ‍ॅटलांटा महापौरांची प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी संतापाने सांगितले, "हा वृत्तांत खोटा आहे. अशा वृत्तांतामुळे अ‍ॅटलांटाची बदनामी होऊन ऑलिंपिक स्पर्धांवर नकारात्मक परीणाम होईल. सर्वाधिक गुन्हेगारी असलेले प्रथम क्रमांकाचे शहर अ‍ॅटलांटा नसून न्यू ऑरलिन्समध्ये सर्वाधिक गुन्हेगारी आहे. अ‍ॅटलांटा दुसर्‍या क्रमांकावर आहे." हे ऐकल्यावर मला हसावे का रडावे तेच कळेना. महापौरांच्या दाव्यानुसार अ‍ॅटलांटात सर्वाधिक गुन्हेगारी नसून अ‍ॅटलांटा तब्बल दुसर्‍या क्रमांकावर आहे. अजून एक प्रत्यक्ष उदाहरण - एका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षेत पहिल्या सत्रात १० विषय होते. दुसर्‍या सत्राचा निकाल अजून लागलेला नव्हता. दुसर्‍या वर्षात (म्हणज तिसर्‍या सत्रात) काही विशिष्ट विषय निवडताना पहिल्या सत्राचे गुण पाहून मगच ते विषय निवडता येत असत. माझ्या ओळखीच्या दोघांमध्ये एकजण १० पैकी ६ विषयात अनुत्तीर्ण होता तर दुसरा १० पैकी ७ विषयात अनुत्तीर्ण होता. दोघांनाही तिसर्‍या सत्रात एक विशिष्ट विषय निवडायचा होता. परंतु त्या विषयाचे विभागप्रमुख यांच्या पहिल्या सत्राच्या कामगिरीमुळे दोघांनाही तो विषय निवडू देण्यास अनुत्सुक होते. त्यांच्याशी बोलताबोलता पहिला विद्यार्थी म्हणाला "सर, त्याचे पहिल्या सत्रातले ७ विषय राहिलेत. माझे फक्त ६ च राहिलेत.". त्याच्या या दाव्यावर पुन्हा एकदा हसावे का रडावे ते कळेना. केरळमधील आदिवासींची अवस्था व सोमालियाशी तुलना यावर तावातावाने जे युक्तीवाद सुरू आहेत व मोदी खोटारडे आहेत असे बिनदिक्कतपणे बोलले जात आहे, ते वाचून मला वरील दोन प्रसंगाची आठवण झाली आणि पुन्हा एकदा हसावे का रडावे ते समजले नाही. केरळमधील आदिवासींची स्थिती भीषण आहे. माजी मुख्यमंत्री अच्युतानंदन यांनी देखील याची कबुली दिली होती. समाजशास्त्राच्या संशोधकांनी आदिवासींच्या जीवनाचा अभ्यास व संशोधन करून त्यांच्या विकास निर्देशांकाची तुलना इथिओपिआ, सोमालिया इ. देशांशी केली होती. मोदींनी त्याच वस्तुस्थितीचा उल्लेख केला असताना, 'मोदी खोटारडे आहेत', मोदींचा खोटारडेपणा सिद्ध झाला आहे' इ. व्यक्तिगत आरोप सुरू आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

प्रत्यक्षात सोमालियात बालम्रूत्युचे प्रमाण १००० मधे ९० असे आहे, तर मोदी म्हणतात त्या केरळमधील आदिवासी जमातीत बालमृत्युचे प्रामाण १००० मधे ६५. ह्याचा अर्थ मोदी म्हणतात त्याप्रमाणे सोमालियापेक्षा परिस्थीती भयानक नाही ही सत्यपरिस्थीती मोदींनी आपल्या भाषणात मांडली का?
गोंधळलेल्या मनस्थीतीमूळे माझ्या वरील प्रश्नाचे स्पष्टपणे उत्तर देता येत नसल्यामुळे, तुम्हाला हसावे का रडावे हा प्रश्न पडलाय. खरं बोला आणि मनसोक्त हसा किंवा रडा.

In reply to by मार्मिक गोडसे

तुम्ही हसा अथवा रडा. मला काहीही फरक पडत नाही. मी सुरवातीपासून दिलेल्या लिंक्स वाचल्या असत्या तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडली असती. . दुर्दैवाने स्वतः कोणतेही वाचन करून माहिती मिळविण्यापेक्षा पूर्वीच्या एका प्रतिसादात दिलेल्या दोन हास्यास्पद उदाहरणांप्रमाणे तुमचे प्रतिसाद देणे सुरू आहे. मागेही एका धाग्यावर कच्च्या तेलाच्या संदर्भात तुमच्या प्रत्येक प्रतिसादात "केंद्र सरकारने राज्य सरकारांना अमुकतमुक आवाहन केले आहे का?" हे वाक्य असायचे. कसले आवाहन, काय आवाहन, असल्या आवाहनांचा काही उपयोग असतो का इ. गोष्टींचा विचार न करता आवाहन केले का, आवाहन केले का हे एकच पालुपद प्रत्येक प्रतिसादात होते. इथेही तसेच पालुपद सुरू आहे. वास्तव समजून घेतले नाही तर अशी पालुपदे प्रतिसादात येत राहतात. असो.

In reply to by श्रीगुरुजी

पंतप्रधान केरळच्या सभेत जे काही खोटं बोलले त्यावर मी चर्चा करत होतो. परंतू तुमचं सारखं 'सोशल इंडिकेटर' आणि 'लिंका'चे तुणतुणे चालू होते. सगळं तुम्हाला समजत होतं, परंतू तुम्ही खोटं बोलण्यात पंतप्रधानांनाही मागे टाकले. आता राहीली गोष्ट तुमच्या 'त्या' धाग्यावरील चर्चेची. तिकडेही सरकार इंधनावर देत असलेलं अनुदान पॉझिटीव्ह आहे का निगेटीव्ह हे माहीत नसताना सारखं अनुदानाचं तुणतुणं लावलं होतं. बरंच सलत होतं वाटतं.

In reply to by मार्मिक गोडसे

मला काहीच सलत नव्हतं. तुमच्या त्या 'आवाहनाच्या' निरर्थक पालुपदांचा कंटाळा आला होता. या धाग्यातही तेच सुरू आहे. अ‍ॅटलांटाच्या महापौरांनी जसे अत्यंत हास्यास्पद उत्तर दिले होते, इथे तुमचे तसेच सुरू आहे. एकतर स्वतःला काहीही माहिती नाही, दुसरा माहिती पुरवत आहे ती वाचायची इच्छा नाही, त्रयस्थाने पुरविलेली माहिती वाचायची नाही, स्वतःचा अभ्यास व वाचन शून्य, मनात बसलेली ठाम चुकीची मते, चुकीच्या मतांवर आधारीत निरर्थक पालुपदे आणि शेवटी दुसर्‍यांना शिव्या अशी तुमची मोड्युस ऑपरंडी आहे. चालू द्या.

In reply to by श्रीगुरुजी

उसमे जो चाइल्ड डेथ रेशो है, सोमलिया से भी स्थीती खतरनाक है! - मोदी सोमालियापेक्षा स्थीती खराब नसतानाही मोदी खोटं बोलतात,वरील एका प्रतिसादात मी आकडेवारी दिली आहे. बाकी तुमच्या त्या लिंका गेल्या चुलीत. वरील विडीओ नीट ऐका, मी काय लिहीले ते नीट वाचा. उगाच फालतू तुलना करू नका. तुमच्या 'त्या' धाग्यावर दिसला तुमचा 'अभ्यास'. तुमची 'डाळ' शिजली तर नाहीच, पण अज्ञान उघडे पडून तुमचे हसू झाले. सरकार इंधनावर देत असलेलं अनुदान पॉझिटीव्ह आहे का निगेटीव्ह हे ही माहीत नसताना सारखं अनुदानाचं तुणतुणं लावलं होतं. अभ्यासाचा पत्ता नाही. माघार घ्यायची लाज वाटत होती. अजुनही खुमखुमी गेली नाही वाटतं? जो 'खोटं बोलणे' ह्या गुणविशेषाला शिवी समजतो त्याला काय कळणार आहे दुसर्‍याची मोड्युस ऑपरंडी?

In reply to by मार्मिक गोडसे

अजूनही तेच निरर्थक पालुपद सुरू दिसतंय. "आवाहन केलं होतं का", "आवाहन केलं होतं का" या पूर्वीच्या निरर्थक पालुपदाप्रमाणे इथेही निरर्थक पालुपद सुरूच आहे. सात्विक संतापही वृद्धिंगत होताना दिसत आहे. समाजशास्त्रज्ञांनी स्वतःच्या अभ्यासाने व संशोधनाने जे सिद्ध केलं ते नाकारून आपले अज्ञान झाकण्यासाठी इतरांवर खोटारडेपणाचे आरोप सुरूच आहेत. चालू द्यात. लगे रहो.

In reply to by श्रीगुरुजी

केरळमधील आदिवासी जमातीतील बालमृत्युचे प्रमाण ६५ आणि सोमालियातील बालमृत्युचे प्रमाण ९०, तब्बल २५ चा फरक असतानाही खुशाल हे प्रमाण सोमालियापेक्षा अधिक आहे असे म्ह्णायचे. एकाही समाजशास्त्रज्ञाने आकडेवारीने हे सिद्ध केलेले नाही. खरंच असे आकडे असते तर एव्हाना मोदी किंवा त्यांचे समर्थक गप्प बसले नसते. मोदी खोटं बोलत नाही असं तुम्हाला वाटत असेल,तर तुम्ही आकडे द्या आणि सिद्ध करा. ज्या विषयावर चर्चा चालू आहे, त्याचे उत्तर मिळत नाही तो पर्यंत तीच तीच वाक्ये पुन्हा पुन्हा वापरली जाणार. उत्तर देता येत नसल्यामुळे तुम्हाला ते पालुपद वाटते.

In reply to by मार्मिक गोडसे

तुमचा अभ्यास व वाचन कमी आहे. तुमची स्वतःची काही ठाम पण चुकीची मते आहेत. त्या चुकीच्या मतांपलिकडे तुम्ही जाऊ शकत नाही. वाचन व अभ्यास वाढविला तर फरक पडू शकेल. पण ते होण्याची शक्यता कमी दिसते. मी दिलेल्या लिंक्स नीट वाचल्या तर तुमच्या मतात नक्कीच फरक पडेल. असो. या धाग्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्या निकाल असल्यामुळे नवीन धागा काढला आहे. त्यामुळे उद्यापासून या धाग्यावर कोणी फिरकणार नाही. हा प्रतिसाद १४७ वा प्रतिसाद आहे. आपले नेहमीचेच पालुपद वापरून अजून ३ प्रतिसाद दिलेत तर १५० चा आकडा गाठता येईल. लगे रहो.

In reply to by मार्मिक गोडसे

मोदि नामक राजकारणी आवष्यक तेंव्हा खोटं नक्कीच बोलतो. पण इथे त्यांचा खोटेपणा किंवा आक्षेप घेण्यालायक काहिच दिसलं नाहि. असो.

In reply to by मार्मिक गोडसे

आदिवासी समाजातील सोशल इंडिकेटरची तुलना सोमलियाशी केली नाही. शिशू म्रुत्यु दराची तुलना सोमालियाशी केली होती. तेही केरळमधील एका आदिवासी भागातील जमतीचा उल्लेख करून. सोमालियाशीच का केली? मेळघाटातील आदिवासी शिशू म्रुत्यु दराशी का नाही केली? तुलना करायचीच होती तर संपुर्ण केरळ राज्याच्या सोशल इंडिकेटरची देशाच्या सोशल इंडिकेटरशी करायला हवी होती. सोयीचे घ्यायचे व लोकांची दिशाभूल करायची, वर त्यांच्या चूकीचे समर्थनही करायचे.
मी वर दिलेल्या लिंकमधील रिसर्च रिपोर्ट न वाचतात पूर्वग्रहदूषित प्रतिसाद दिलेला आहे. संशोधन पेपर वाचल्यास बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळतील. ज्या संशोधकांनी केरळमधील आदिवासींच्या जीवनाचा अभ्यास केला त्यात त्यांनी आदिवासींच्या आरोग्य, शिक्षण व स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग या प्रमुख घटकांचा अभ्यास करून निष्कर्ष काढले आहेत. आरोग्याचा अभ्यास करताना life expectancy at birth या घटकाचा देखील अभ्यास केलेला आहे. नवजात अर्भकांचा मृत्यु दर हा याच घटकाचा भाग आहे. त्यांच्या अभ्यासानुसार आदिवासींच्या सरासरी आयुर्मर्यादेचा निर्देशांक फक्त ०.४६० इतका कमी आहे.

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

भरभर टंकन करण्याच्या नादात चूक झाली. ते नाव national marine police academy असे हवे होते. चुकीबद्दल क्षमस्व.

उत्तराखंड मधील घडामोडी यांचा उरलेल्या तीन राज्यातील मतदानावर काय परिणाम होईल यावर कोणी भाष्य करू शकेल का ? माझ्या मते सर्वोच न्यायालयाने उत्तराखंड मधील मतदान १० मे ऐवजी या तीन राज्यात १६ मे ला मतदान झाल्या नंतर आणि १९ तारखेच्या मतमोजणीच्या आधी म्हणजे १७ किंवा १८ मे ला करवले असते तर फार काही बिघडले नसते.

In reply to by रमेश आठवले

उत्तराखंड मधील घडामोडींच्या इतर राज्यातील मतदानावर अत्यल्प परीणाम होईल असे मला वाटते. या ५ राज्यांपैकी भाजपच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे राज्य आहे आसाम. आसाममध्येच भाजपला सर्वाधिक जागा मिळविण्याची संधी आहे. इतर राज्यात भाजपला अत्यंत किरकोळ संधी आहे. आसाममधील मतदान एप्रिलमध्येच पूर्ण झाले आहे. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने उत्तराखंडमधील घडामोडींचा फारसा परीणाम होणार नाही. उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट उठविल्याने काँग्रेस व हरीश रावत यांच्या बाजूने सहानुभूती निर्माण होऊन त्याचा त्यांना फेब्रुवारी २०१७ मधील विधानसभा निवडणुकीत फायदा होईल व काँग्रेस त्याचा जास्तीतजास्त लाभ उठविण्यासाठी विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस करून निवडणुक अलिकडे आणण्याचा प्रयत्न करेल असे बोलले जाते. मी याच्याशी सहमत नाही. त्याची कारणे म्हणजे, - अगदी उद्याच हरीश रावतांनी राजीनामा देऊन विधानसभा बरखास्तीची शिफारस केली तरी भारतात पावसाळ्यामुळे साधारणपणे १५ जून ते १५ सप्टेंबर या काळात मतदान घेतले जात नाही. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान हे किमान ४ महिन्यांनंतर होईल व त्यावेळी तथाकथित सहानुभूतीची लाट ओसरलेली असेल. - उत्तराखंडमध्ये सुमारे दीड महिना राष्ट्रपती राजवट होती. त्यामुळे काम ठप्प झाले होते. हरीश रावत विधानसभा भंग करण्यापूर्वी काही लोकप्रिय योजना जाहीर करतील, आपल्याला हव्या त्या बदल्या करतील व त्यानंतरच विधानसभा भंग करू शकतील. अर्थात त्यासाठी त्यांना ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंत वेळ आहे. - काँग्रेसचे सर्व आमदार विधानसभा बरखास्तीसाठी उत्सुक असतील असे वाटत नाही. त्यांना पक्षातूनच विरोध होऊ शकतो. - हरीश रावतांच्या लाचखोरीच्या दोन वेगवेगळ्या स्टिंग ऑपरेशनची चौकशी सुरू झाली आहे. त्यात ते अडकू शकतात व सावधगिरी म्हणून केंद्रीय नेतृत्व त्यांना दूर करू शकते. - एखाद्या राज्यात विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी सरकार बरखास्त करणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणे यामुळे त्या सरकारविषयी सहानुभूती निर्माण होतेच असे नाही. याची काही उदाहरणे - १) १९७७ मध्ये जनता पक्ष सत्तेवर आल्यावर तत्कालीन जनता सरकारने कॉंग्रेसशासित ९ राज्यांची सरकारे मुदतपूर्व बरखास्त केली होती. मुदतपूर्व निवडणुकीनंतर त्यापैकी ८ राज्यात जनता पक्ष सत्तेवर आला होता व तामिळनाडूत अद्रमुकला सत्ता मिळाली होती. २) १९८४ मध्ये एन टी रामारावांचे जेमतेम दीड वर्षांपूर्वी सत्तेवर आलेले सरकार काँग्रेसने उलथण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी लोकमताचा अंदाज घेऊन पुन्हा सत्तेवर आल्यावर स्वतःच राजीनामा देऊन मुदतपूर्व निवडणुक घ्यायला लावली व इंदिरा काँग्रेसची देशभर लाट असताना सुद्धा पुन्हा एकदा तेलगू देसमला बहुमत मिळाले होते. एकंदरीत तेलगू देसमला सहानुभूतीच्या लाटेचा फायदा झालेला होता. ३) १९८९ मध्ये जवळपास कर्नाटकातील सव्वाचार वर्षे सत्तेवर असलेले बोम्मईंच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे सरकार बरखास्त केल्यावर काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बोफोर्समुळे कॉंग्रेसविरोधात लोकमत होते तरी कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाले होते. ४) बाबरी प्रकरणानंतर डिसेंबर १९९२ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने सुमारे पावणेतीन वर्षे सत्तेवर असलेली हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान येथील सरकारे बरखास्त केली होती. त्याचवेळी सुमारे दीड वर्षे सत्तेवर असलेले उ.प्र. मधील भाजपचे कल्याणसिंगांचे सरकार देखील बरखास्त केले होते. या सरकारांना बरखास्तीमुळे मिळालेल्या सहानुभूतीची लाट ओसरावी म्हणून काँग्रेसने १ वर्ष वाट पाहून डिसेंबर १९९३ मध्ये निवडणुक घेतल्यावर म.प्र. व हि.प्र. मध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले, राजस्थानमध्ये भाजपने पुन्हा सत्ता मिळविली व उ.प्र. मध्ये भाजपचा आकडा २०९ वरून १७७ वर आला व बहुमत गमाविले. उ.प्र. मध्ये बसप व सप यांनी युती करूनसुद्धा त्यांना एकत्रित १७६ जागा मिळाल्या होत्या. नंतर काँग्रेसने पाठिंबा दिल्याने बसप व सप चे संयुक्त सर्कार सत्तेवर आले. म्हणजे या ४ पैकी २ राज्यात बरखास्त केलेल्या सरकारला सहानुभूती मिळाली नाही, एका सरकारला मिळाली व उ.प्र. मध्ये सुद्धा कल्याणसिंगांना सहानुभूती मिळाली असे म्हणता येईल. ५) १९९१ मध्ये हरयानातील ४ वर्षे पूर्ण केलेल्या लोकदलाचे सरकार बरखास्त केल्यावर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले होते. म्हणजेच लोकदलाला सरकारची बरखास्ती होऊनसुद्धा मतदारांची सहानुभूती मिळाली नव्हती. ६) १९८० मध्ये इंदिरा गांधी सत्तेवर आल्यावर त्यांनी विरोधकांची सरकारे असलेली आणि सुमारे अडीच-पावणेतीन वर्षे सत्तेवर असलेली ८-९ राज्यांची सरकारे बरखास्त केली होती. नंतरच्या मध्यावधी निवडणुकीत सर्व राज्यात इंदिरा कॉंग्रेसची सरकारे निवडून आली. एकंदरीत असे दिसते की एखादे सरकार स्थापन झाल्यावर साधारणपणे सुरवातीच्या २ वर्षांच्या काळात ते बरखास्त केले गेले तर त्या सरकारला नंतरच्या मध्यावधी निवडणुकीत मतदारांची सहानुभूती मिळते. परंतु ज्या सरकारची निम्म्याहून अधिक मुदत संपलेली आहे त्या सरकारला मतदारांची सहानुभूती मिळेलच असे दिसत नाही. हिमाचल प्रदेशमधील वर्तमान काँग्रेस सरकारची सुमारे सव्वाचार वर्षे संपलेली आहेत. तिथे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली असून जवळपास २५ टक्के आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. आधीचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा व वर्तमान मुख्यमंत्री रावत यांची प्रतिमा चांगली नाही. त्यामुळे जरी उत्तराखंडमध्ये रावत सरकार उलथण्याचा प्रयत्न झाला असला तरी त्यांना जनतेची सहानुभूती मिळण्याची अत्यल्प शक्यता आहे. हे ओळखूनच हरीश रावत विधानसभा भंग करून मुदतपूर्व निवडणुक घेण्याची शक्यता वाटत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

एकंदरीत असे दिसते की एखादे सरकार स्थापन झाल्यावर साधारणपणे सुरवातीच्या २ वर्षांच्या काळात ते बरखास्त केले गेले तर त्या सरकारला नंतरच्या मध्यावधी निवडणुकीत मतदारांची सहानुभूती मिळते.
हो बहुतांश वेळा असे बघायला मिळते. तरीही याला काही अपवाद आहेतच. तामिळनाडूमध्ये जानेवारी १९८९ मध्ये निवडणुक होऊन करूणानिधी मुख्यमंत्री झाले. चंद्रशेखर यांच्या केंद्र सरकारने त्यांचे राज्य सरकार ३१ जानेवारी १९९१ रोजी दोन वर्षात बरखास्त केले. पण त्याचा फायदा करूणानिधींना झाला नाही. उलट १९९१ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये द्रमुकचा अभूतपूर्व पराभव झाला. अर्थातच त्याला राजीव गांधींची तामिळनाडूतच प्रचारादरम्यान झालेल्या हत्येची पार्श्वभूमी नक्कीच होती. पण राजीव गांधी हयात असतानाही करूणानिधी मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या १० महिन्यातच लोकसभा निवडणुकांमध्ये द्रमुकचा जोरदार पराभव झाला होता. ३९ पैकी अवघी १ जागा द्रमुकला मिळाली होती. याचे कारण जानेवारी १९८९ मध्ये अण्णा द्रमुकमधील जयललिता आणि जानकी रामचंद्रन या दोन्ही गटांनी निवडणुक लढवली होती आणि जानकी रामचंद्रन गटाने नऊ-साडेनऊ टक्के मते घेतली होती आणि कॉंग्रेसने जयललितांबरोबर युती न करता स्वतंत्र निवडणुक लढवली होती. पण नोव्हेंबर १९८९ मध्ये कॉंग्रेस आणि अण्णा द्रमुक यांच्यात युती झाली आणि जानकी रामचंद्रन गट नामशेष झाला होता त्यामुळे मतविभाजन टळले. तेव्हा मला वाटते की राज्य सरकार कधी बरखास्त केले गेले आहे त्याबरोबरच राज्यातील निवडणुकांचे इतर dynamics हे महत्वाचे आहे.
१९९१ मध्ये हरयानातील ४ वर्षे पूर्ण केलेल्या लोकदलाचे सरकार बरखास्त केल्यावर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले होते. म्हणजेच लोकदलाला सरकारची बरखास्ती होऊनसुद्धा मतदारांची सहानुभूती मिळाली नव्हती.
हरियाणामध्ये १९९१ मधील पार्श्वभूमी जरा वेगळी होती. १९८७ मध्ये देवीलालांनी कॉंग्रेसला चोप देऊन ९० पैकी ८५ जागा भाजपच्या साथीने जिंकल्या. त्यानंतर १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये देशभरात कॉंग्रेसविरोधी वातावरण असताना हरियाणामध्ये मात्र कॉंग्रेसची कामगिरी १९८७ च्या मानाने खूपच चांगली होती. कॉंग्रेसने लोकसभेच्या १० पैकी ४ जागा जिंकल्या. याचे कारण १९८७ ते १९८९ या काळात देवीलालांनी माजवलेली अनागोंदी. पुढे देवीलाल केंद्रात उपपंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे पुत्र ओमप्रकाश चौटाला मुख्यमंत्री झाले. मधल्या काळातील इतर भानगडींमुळे त्यांना राजीनामा द्यायला लागला.वितारभयास्तव त्याचे डिटेल लिहायचे टाळतो. जनता दलात नोव्हेंबर १९९० मध्ये फूट पडल्यानंतर देवीलाल-चौटाला चंद्रशेखर यांच्या समाजवादी जनता दलात सामील झाले. भाजपने (१६ आमदार) हरियाणा सरकारचा पाठिंबा काढलाच होता. २१ मार्च १९९१ रोजी चौटाला परत मुख्यमंत्री झाले. तोपर्यंत त्यांच्याबरोबर सगळे आमदार राहिले नव्हते. त्यावेळी विधानसभा बरखास्त करायची शिफारस त्यांनी राज्यपाल धनिकलाल मंडल यांच्याकडे केली. बहुदा विधानसभा बरखास्त करून निवडणुका होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राहायचा त्यांचा डाव होता. पण राज्यपालांनी त्यांना बहुमत सिध्द करायला सांगितले. त्याला चौटालांनी नकार दिल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची शिफारस राज्यपालांनी केली.ती केंद्रातील काळजीवाहू चंद्रशेखर सरकारने मान्य केली. तेव्हा १९९१ मध्ये हरियाणातील चौटाला यांचे सरकार बरखास्त करणे आणि इतर राज्यांमधील बरखास्ती यांची तुलना करता येणार नाही. (संदर्भ: इंडिया टुडेमधील ३० एप्रिल १९९१ चा http://indiatoday.intoday.in/story/with-president-rule-in-haryana-fiefd… हा लेख)

In reply to by गॅरी ट्रुमन

हरयानाविषयी जे लिहिले आहे ते बरोबर आहे. त्यात अजून थोडी भर टाकतो. जुलै १९८७ ते डिसेंबर १९८९ या काळात देवीलाल हरयानाचे मुख्यमंत्री होते. नोव्हेंबर केंद्रात सत्तापरिवर्तन झाल्यावर वि. प्र. सिंग पंतप्रधान झाले. त्यांनी आपल्या मंत्रीमंडळात देवीलाल यांचा उपपंतप्रधान व कृषिमंत्री म्हणून समावेश केल्यावर देवीलालांनी हरयानाचे मुख्यमंत्रीपद सोडून आपल्या जागी आपले सुपुत्र ओमप्रकाश यांना बसविले. चौताला ५ महिने मुख्यमंत्री होता. तो सुरवातीपासूनच गुंड प्रवृत्तीचा होता. विधानसभेत निवडून येण्यासाठी चौतालाने मेहम मतदार संघातून निवडणुक लढविली होती. त्या निवडणुकीत मतपेट्या पळविणे, मतदान केंद्र बळकावणे, मतदारांना दहशत दाखविणे असे अनेक प्रकार झाल्यामुळे चौताला व देवीलालांवर प्रचंड टीका झाल्यामुळे शेवटी लाजेगाजेस्तव चौतालाने मुख्यमंत्रीपद सोडले व आपल्या जागी बनारसीदास गुप्ता या आपल्या बनिया पित्त्याला (गुप्ता हे जाट नव्हते) आपला प्रॉक्सी म्हणून मुख्यमंत्रीपदावर बसविले. वि. प्र. सिंग देवीलालांचे खच्चीकरण करण्याची संधी शोधतच होते. त्यांनी चौतालाचे निमित्त करून देवीलालांना शह दिला. माध्यमांनी देखील चौतालाच्या गुंडगिरीविरूद्ध झोड उठविली होती. वातावरण थोडे शांत झाल्यावर केवळ ५२ दिवसात गुप्तांनी राजीनामा दिला व लगेचच मुख्यमंत्रीपदावर पुन्हा एकदा चौताला जाऊन बसला. चौताला व देवीलालांविरूद्ध पुन्हा एकदा जोरदार आरडाओरडा झाल्यावर केवळ ६ व्या दिवशी चौतालाने पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व यावेळी आपल्या गादीवर हुकूमसिंग नावाच्या एका जाट पित्त्याला आपला प्रॉक्सी म्हणून मुख्यमंत्रीपदावर बसविले. ८ महिन्यांनी मार्च १९९१ मध्ये हुकूमसिंगांनी राजीनामा दिल्यावर पुन्हा एकदा चौताला मुख्यमंत्रीपदावर बसला. दरम्यानच्या काळात चौताला एका पोटनिवडणुकीत दरबाकलान या मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झाला होता. मार्च १९९१ मध्ये चंद्रशेखरांनी राजीनामा दिल्यामुळे केंद्रात सरकार अस्तित्वात नव्हते. मे १९९१ मध्ये लोकसभेची निवडणुक होणार होती. त्यामुळे चौताला पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यावर फारसा आरडाओरडा झाला नाही. चौतालाने तिसर्‍यांदा मुख्यमंत्री झाल्यावर पुन्हा एकदा केवळ १६ दिवसात राजीनामा दिला व वर लिहिल्याप्रमाणे हरयानामध्ये मुदतपूर्व निवडणुक जुलै १९९१ मध्ये झाली. त्यात देवीलालांच्या पक्षाचा दारूण पराभव होऊन काँग्रेसला बहुमत मिळाले होते. हरयानातील जनमत मोठ्या प्रमाणात आपल्याविरूद्ध आहे हे देवीलालांनी ओळखले होते. त्यामुळे त्यांनी मुदतपूर्व विधानसभा निवडणुकीत आपल्या दोन्ही मुलांना (चौताला व दुसरा मुलगा) तिकीट दिले नव्हते. परंतु त्याचा फायदा झाला नव्हता.

In reply to by श्रीगुरुजी

मी यात आणखी भर टाकतो :)
विधानसभेत निवडून येण्यासाठी चौतालाने मेहम मतदार संघातून निवडणुक लढविली होती. त्या निवडणुकीत मतपेट्या पळविणे, मतदान केंद्र बळकावणे, मतदारांना दहशत दाखविणे असे अनेक प्रकार झाल्यामुळे चौताला व देवीलालांवर प्रचंड टीका झाल्यामुळे शेवटी लाजेगाजेस्तव चौतालाने मुख्यमंत्रीपद सोडले
देवीलाल २ डिसेंबर १९८९ रोजी केंद्रात गेले. त्यांच्याजागी त्यांचे पुत्र ओमप्रकाश चौटाला यांचा हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.त्यावेळी चौटाला राज्यसभेचे सदस्य होते त्यामुळे त्यांना २ जून १९९० पूर्वी हरियाणा विधानसभेवर निवडून जाणे भाग होते. तसेच देवीलाल हरियाणातील रोहतक आणि राजस्थानातील सिकर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. १९८७ मध्ये ते मेहम मतदारसंघातून हरियाणा विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांनी त्या जागेचा राजीनामा दिला आणि त्या जागेसाठी २७ फेब्रुवारी १९९० रोजी पोटनिवडणुक झाली. ओमप्रकाश चौटाला मुख्यमंत्री झाले हे त्यांचे बंधू रणजितसिंग यांना फारसे रूचले नव्हते (कारण त्यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे होते).देवीलाल लोकसभा निवडणुकांनंतर केंद्रात जाणार हे वातावरण जाणीवपूर्वक आधीपासून निर्माण केले गेले होते आणि देवीलालांचा ओढा ओमप्रकाशांकडे होता हे पण स्पष्ट होते. हे रणजितसिंगांना आवडले नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकांपूर्वीच त्यांनी ७ आमदार बरोबर घेऊन बंडाचे निशाण फडकावले. या सगळ्या आमदारांना पक्षातून काढण्यात आले.दरम्यान २७ फेब्रुवारी १९९० च्या पोटनिवडणुकीसाठी राज्यातील चतुर्थश्रेणीचे कर्मचारी नियुक्त करायच्या महामंडळाचे अध्यक्ष आनंदसिंग डांगी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. इतर सगळ्या महामंडळांप्रमाणे या महामंडळावरही पक्षातील निवडणुकीला उभ्या न राहिलेल्या/हरलेल्या नेत्यांची वर्णी लागत असे. तर देवीलालांनी रिकाम्या केलेल्या या जागेवर ओमप्रकाश चौटाला हे जनता दलाचे अधिकृत उमेदवार होते. रणजितसिंग आणि पक्षातील इतर बंडखोरांचे उमेदवार म्हणून आनंदसिंग डांगी पुढे आले. हे तितके कमजोर उमेदवार नव्हते. त्यांनी महामंडळाचे अध्यक्ष असताना मेहम भागातील अनेकांना सरकारी नोकर्‍या लावून दिल्या होत्या आणि त्या भागात त्यांचा जोर होता.त्यामुळे या निवडणुकीत काहीही करून जिंकायचेच असा चंग चौटालांनी बांधला. त्यासाठी त्यांनी त्यांचे पुत्र अभय चौटालाला जबाबदारी दिली. २७ फेब्रुवारी १९९० रोजीच्या पोटनिवडणुकीत मेहममध्ये ८ मतदारकेंद्रांवर खुल्या वातावरणात मतदान झाले नाही म्हणून निवडणुक आयोगाने या ८ मतदानकेंद्रांवर दुसर्‍या दिवशी (२८ फेब्रुवारीला) फेरमतदानाचा आदेश दिला. चौटाला यांचे समर्थक (पुत्र अभय चौटालांसह) बैंसी या गावातील शाळेत असलेले मतदानकेंद्र 'कॅप्चर' करायला गेले. त्याचवेळी आनंदसिंग डांगींच्या समर्थकांनी शाळेची गेट बंद करून शाळेला बाहेरून वेढा घातला. मग आतून चौटाला समर्थकांनी गोळीबार केला. पोलिस चौटालांच्या ताब्यात असल्यामुळे पोलिसांनीही गोळीबार केला. या गोळीबारात सुमारे २० लोक मारले गेले. या घटनेचा निवडणुक आयोगाने अहवाल मागवला आणि मतमोजणी स्थगित केली. आठवड्याभराने निवडणुक आयोगाने मेहम मतदारसंघातील मतदान रद्द केले आणि पोटनिवडणुक भविष्यात होईल असे जाहिर केले. या घटनेचा उपयोग जनता दलातील अजितसिंग आणि इतर देवीलाल विरोधकांनी देवीलालांवर शरसंधान करायला वापर करून घेतला.चौटालांवर राजीनाम्यासाठी दबाव वाढला. पण तरीही चौटालांनी राजीनामा दिला नाही. मेहम आणि दिरबा कलान मतदारसंघात पोटनिवडणुक २६ मे रोजी होणार हे निवडणुक आयोगाने जाहिर केले.ही निवडणुक जिंकूनही चौटाला २ जूनपूर्वी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेऊ शकणार होते. त्यांनी मेहमबरोबरच दिरबा कलान मधूनही उमेदवारी अर्ज भरला. मतदानाला १० दिवस राहिलेले असताना (१६ मे १९९० रोजी) आमीर सिंग या मेहममधील अपक्ष उमेदवाराचा मृतदेह सापडला. त्यानंतर चौटालांवर राजीनाम्याचा दबाव आणखी वाढला. शेवटी २३ मे रोजी त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर बनारसीदास गुप्ता यांना मुख्यमंत्री केले गेले. त्यानंतर बनारसीदास गुप्तांनी राजीनामा दिला आणि १२ जुलै रोजी ओमप्रकाश चौटाला परत मुख्यमंत्री झाले. त्याविरूध्द केंद्रातील वि.प्र.सिंग सरकारमधील अरूण नेहरू, आरिफ महंमदखान, मेनका गांधी इत्यादी मंत्र्यांनी वि.प्र.सिंगांकडे आपले राजीनामे दिले. शेवटी १५ जुलै रोजी स्वतः वि.प्र.सिंगांनी जनता दल अध्यक्ष एस.आर.बोम्मईंकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवू अशी धमकी दिली. त्यानंतर चौटालांनी १७ जुलै रोजी राजीनामा दिला. मेहम पोटनिवडणुक आणि त्यावेळी झालेला हिंसाचार हा भारतीय लोकशाहीतील एक काळाकुट्ट अध्याय आहे. देवीलाल आणि चौटालांच्या डोक्यात सत्तेची हवा शिरली आणि त्यांचे वर्तनाला 'माजणे' असे म्हणणे हा खूपच चांगुलपणा दाखविणे झाले. पण त्यानंतर देवीलाल त्यांच्या आयुष्यात परत एकदाही एकही निवडणुक जिंकू शकले नाहीत. १९९१, १९९६ आणि १९९८ मध्ये त्यांचा भूपिंदरसिंग हुडांनी त्यांच्या हक्काच्या रोहतकमधून पराभव केला.१९९१ मध्ये त्यांचा तर हरियाणा विधानसभा निवडणुकीतही पराभव झाला.

In reply to by गॅरी ट्रुमन

वा! खूपच सविस्तर माहिती. मला त्यावेळच्या घटना आठवत होत्या. पण इतके सविस्तर लक्षात नव्हते. सध्या ओमप्रकाश चौताला व त्यांचे सुपुत्र अजय चौताला हे दोघेही शिक्षक भरती घोटाळा सिद्ध झाल्यामुळे तब्बल १० वर्षे तुरंगवासाची शिक्षा भोगत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

अजून थोडी माहिती - १९९६ मधील विधानसभा निवडणुकीत कोणालाच बहुमत मिळाले नाही. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या बन्सीलालांनी हरयाना विकास पक्ष नावाचा पक्ष स्थापन केला होता. त्या पक्षाला सर्वाधिक ३२ जागा (९० पैकी) मिळाल्या होत्या. भाजपने बन्सीलालशी युती केली होती. भाजपला (बहुतेक) ८ जागा होत्या. काँग्रेस व चौतालाचा भारतीय राष्ट्रीय लोकदल हे बहुमतापासून दूर होते. भारालोद ला बहुतेक ३० च्या आसपास जागा होत्या. भाजपच्या सहाय्याने बन्सीलाल मुख्यमंत्री झाले. त्यांची कारकीर्द अत्यंत निराशाजनक होती. हरयानात त्यांच्या निष्क्रीयतेमुळे संताप वाढत होता. काळाची पावले ओळखून भाजपने गुपचुप चौतालाशी संधान बांधले व सव्वातीन वर्षाच्या बन्सीलाल सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे बन्सीलालना राजीनामा द्यावा लागला. उत्तराखंड मध्ये सध्या साधारण अशीच परिस्थिती आहे. त्यानंतर उर्वरीत पावणेदोन वर्षांकरिता भाजपच्या मदतीने चौताला पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाला. चौतालाने पावणेदोन वर्षे शिल्लक असताना केवळ ६-७ महिन्यात राजीनामा देऊन विधानसभा भंग करून मध्यावधी निवडणुकीची शिफारस केली. त्यामुळे मे २००१ ऐवजी मार्च २००० मध्ये मध्यावधी निवडणुक झाली व त्यात भारालोद व भाजपची युती असूनसुद्धा भारालोद ला ९० पैकी ४७ व भाजपला फक्त ६ जागा मिळाल्या. बन्सीलालचे सरकार चौताला व भाजपने संयुक्त प्रयत्नाने उलथवून सुद्धा मध्यावधी निवडणुकीत बन्सीलालला फायदा मिळाला नाही त्याचे कारण असावे की त्या सरकारची जवळपास सव्वातीन वर्षे संपली होती. जर बन्सीलालचे सरकार पहिल्या दीडदोन वर्षातच उलथविले असते तर कदाचित बन्सीलालला जनतेची सहानुभूती मिळाली असती.

In reply to by श्रीगुरुजी

जर बन्सीलालचे सरकार पहिल्या दीडदोन वर्षातच उलथविले असते तर कदाचित बन्सीलालला जनतेची सहानुभूती मिळाली असती.
अर्थात कोणत्या परिस्थितीत काय झाले असते हे एक speculation झाले. पण असे दिसते की बन्सीलालांनी पहिल्या दीड-दोन वर्षातही आपला जनाधार बऱ्याच अंशी गमावला होता. १९९६ मध्ये हरियाणात भाजप आणि बन्सीलालांचा हरियाणा विकास पक्ष यांच्यात युती होती. या युतीने ९० पैकी ४४ (हविप--३३ + भाजप--११) जागा जिंकल्या होत्या म्हणजे जवळपास बहुमत मिळवले होते. त्यावेळी देवीलाल आणि ओमप्रकाश चौटाला जॉर्ज फर्नांडिस-नितीशकुमारांच्या समता पक्षात होते. भाजप-समता युती बिहारमध्ये होती पण इतर राज्यांमध्ये नव्हती (उत्तर प्रदेशात बलियामधून चंद्रशेखरही समता पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते). या पक्षाने ९० पैकी २४ जागा जिंकल्या होत्या. बन्सीलालांनी हरियाणात दारूबंदी आणायचे आश्वासन दिले होते. आणि इतर सगळ्या राज्यांमध्ये (किंवा जगात कुठेही) दारूबंदीचे होते तेच बन्सीलालांच्या राज्यातही झाले. आणि दारूचा महसूल बंद झाल्यामुळे सरकारच्या तथाकथित कल्याणकारी योजनांवर परिणाम झाला. त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्या सरकारविरूध्द रोष वाढला. १९९६ च्या निवडणुकांनंतर देवीलाल-चौटाला यांनी समता पक्षातून बाहेर पडून स्वत:चा भारतीय लोक दल (राष्ट्रीय) हा पक्ष स्थापन केला. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये या पक्षाने लोकसभेच्या १० पैकी ४ जागा जिंकल्या. वाजपेयी सरकार स्थापन झाल्यावर त्या सरकारला हरियाणा विकास पक्ष आणि हरियाणा लोक दल (राष्ट्रीय) या दोन्ही पक्षांचा पाठिंबा होता. दरम्यान बन्सीलालांविरूध्द नाराजी वाढत आहे हे भाजपला लक्षात आलेच. १९९९ मध्ये वाजपेयी सरकार एका मताने पडल्यानंतर भाजपला बन्सीलालांचे जोखड दूर करणे शक्य झाले आणि त्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. नंतर ओमप्रकाश चौटाला मुख्यमंत्री झाले. चौटालांच्या पक्षाचे १९९९ मध्ये नामांतर Indian National Lok Dal (INLD) असे झाले. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप-INLD युतीने राज्यातील सर्वच्या सर्व १० जागा जिंकल्या. या निवडणुकांमध्ये बन्सीलालांच्या हरियाणा विकास पक्षाने १० पैकी दोनच जागा लढविल्या--म्हणजे आपली डाळ या निवडणुकीत शिजणार नाही हे लक्षात घेतले . त्यानंतर चौटालांनी विधानसभा लवकर बरखास्त करून राज्यात निवडणुका फेब्रुवारी २००० मध्ये (बिहार आणि ओरिसाबरोबर) घेतल्या. तेव्हा बन्सीलालांचे सरकार पाडले तोपर्यंत ते सरकार आधीच जनमताचा पाठिंबा गमावून बसले होते.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, तुमच्याशी सहमत. मला अंधुकसं आठवतं त्याप्रमाणे डांगी नावाच्या कोण्या उमेदवाराची हत्या याच सुमारास झाली होती. त्यामुळे कायद्यानुसार पोटनिवडणूक सहा महिने सहा महिने पुढे ढकलली गेली. ही हत्या चौताला गटाने घडवून आणली की विरोधी गटाने ते आठवत नाही. आ.न., -गा.पै.

लोकसभा आणि त्यानंतर ताबडतोब झालेल्या विधानसभा निवडणुका सोडुन भाजपाला सतत पराभव बघावा लागत आहे. उत्तराखंड भलेही निवडणुक नसो, पण सत्ताप्राप्तीची खेळी तर फेल झालीच. तिथे सत्ता प्राप्त झाली असती तरी फार काहि कर्तुत्व किंवा भूषणावह कार्य झालं नसतं, तरी साम-दाम-दंड-भेद यापैकी काहिही वापरण्यात भाजपला अपयश येतय असच दिसतय. भाजपाचं अपयश हा ट्रेण्ड बनत चालला आहे कि काय...

In reply to by अर्धवटराव

२०१५ मध्ये दोनच राज्यांची विधानसभा निवडणुक झाली. फेब्रुवारी २०१५ मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाला. २०१३ मधील विधानसभा निवडणुकीत जितकी मते भाजपला मिळाली होती, जवळपास तितकीच मते २०१५ मध्ये पण मिळाली. परंतु काँग्रेसने आपली मते मोठ्या प्रमाणावर आआपकडे वळविल्याने आआपच्या मतात प्रचंड वाढ होऊन भाजपचा पराभव झाला. नोव्हेंबर २०१५ मध्ये बिहारमध्ये याचीच पुनरावृत्ती झाली. मे २०१४ मध्ये बिहारमध्ये भाजपला जितकी मते मिळाली होती ती जवळपास सर्व मते भाजपने टिकविली. परंतु संजदने राजद व काँग्रेसशी युती केल्याने त्यांच्या मतांची बेरीज भाजपपेक्षा ७% हून अधिक झाल्याने भाजपचा दारूण पराभव झाला. असे दिसत आहे की भाजपची मते फारशी कमी झालेली नाहीत. परंतु विरोधी पक्ष युती करून निवडणुक लढवित असल्याने भाजपचा पराभव होत आहे. २०१७ मध्ये पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा, गुजरात अशा अनेक राज्यांच्या निवडणुका आहेत. तिथे सर्व प्रमुख विरोधक एकत्र आले तर भाजपचा पराभव अटळ आहे (गुजरात वगळता).

In reply to by श्रीगुरुजी

२०१७ मध्ये पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा, गुजरात अशा अनेक राज्यांच्या निवडणुका आहेत. तिथे सर्व प्रमुख विरोधक एकत्र आले तर भाजपचा पराभव अटळ आहे
त्यातून उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा एकत्र आले (सध्या तरी तशी शक्यता कमी आहे) तर भाजपने विधानसभा निवडणुक लढवूच नये. ४०३ पैकी कमितकमी ३५० जागा ही सपा-बसपा युती मिळवेल.

In reply to by श्रीगुरुजी

पंजाबमध्ये जरा विचित्र स्थिती आहे. भाजपा/अकालीबद्द्ल अ‍ॅटिइइन्कम्बन्सी असणार आहे. भाजपा परत यायचे चांस शून्य आहेत अससं बरेच लोक मानतायत. आप बरीच बलशाली आहे पंजाबात. काँग्रेसकडे अमरिंदर सिंग सारखा लोकप्रिय नेता आहे पण त्यांच्या पक्ष संघटनेत बर्‍याच अंतर्गत लाथाळ्या आहेत हा एक मोठा डिअ‍ॅड्व्हांटेज आहे. आप आणि काँग्रेस दोघांसाठी विन-विन सिचुएशन म्हणजे हंग असेंब्ली. मग आप आणि काँग्रेस युती सरकार बनवू शकतील. किंवा आपच्या पाठिंब्यावर काँग्रेस. भाजपा/अकालीला या दोघांच्या भांडणात लकीली हात धूवून घेता आले तरच काही आशा.