✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

संघाने मला काय दिले?

र
रमेश भिडे यांनी
गुरुवार, 05/12/2016 - 08:33  ·  लेख
लेख
कालच दहावीची परीक्षा दिलेला माझा धाकटा मुलगा संघाचे पंधरा दिवसांचे शिबीर पूर्ण करून परतला. आठ दिवस सातारा येथे प्राथमिक शिबीर झाले आणि नंतर लगेच विस्तारक म्हणून शिरवळ येथे फिल्ड वर काम केले. तिथे तो वार लावून जेवला. वरती पत्रा असलेल्या एका जुन्या वाड्यात राहिला. तिथे त्याला स्वावलंबन शिकायला मिळाले. गावातील अनेक लोकांकडे दिवसभर फिरून त्याने अनेक ओळखी करून घेतल्या. सायंकाळी लहान मुलांच्या शाखेत काम केल्याने नेतृत्व कसे करावे हे त्याच्या लक्षात आले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संघाची शिस्त त्याच्या अंगात भिनू लागली. त्याची आई गावाला गेलेली, त्यामुळे घराची अवस्था बघण्यासारखीच होती. "काय बाबा, घर आहे की उकिरडा ?" असे म्हणून चहासुद्धा न पिता त्याने संपूर्ण घर आवरले. पादत्राणे एका ओळीत ठेवली. यावेळचा उकाडा सहन न होऊन तो पूर्वी मला म्हणाला होता, "बाबा, एसी किंवा कुलर घ्या की !" त्या वाक्याची त्याला आठवण करून दिली तर तो उत्तराला, "अजिबात नको कुलर वगैरे......झोपडपट्टीतल्या लोकांकडे पंखाही नसतो !" बाथरूम मधला नळ टिपकत होता, ते पाहिल्यावर त्याने स्वतः प्लम्बरला फोन केला. अर्थात प्लम्बर आला नाहीच, पण मुलाने टिपकणा-या नळाखाली बालदी लावली आणि रात्री त्यातले पाणी कुंडीतल्या झाडांना घातले. मला म्हणाला, "बाबा आम्ही शिबिराच्या पहिल्या दिवशी 33000 लिटर पाणी वापरले पण आम्हाला पाणी कसे वाचवायचे हे शिकवले त्यामुळे शेवटच्या दिवशी फक्त 12000 लिटर पाणीच खर्च झाले. आम्हाला शिक्षकांनी शिकवले की दुस-याला नावे ठेऊ नका, चांगल्या कामाची सुरवात स्वतः:पासून करा !" ह्या मुलाला क्रिकेट पाहण्याचे भयानक वेड होते, ते या पंधरा दिवसात निघून गेले. IPL पाहण्यापेक्षा पुस्तक वाच असे सांगता सांगता माझ्या दाताच्या कण्या झाल्या पण त्याने ऐकले नव्हते. गेल्या पंधरा दिवसात एकदाही टीव्ही पहावा असे त्याला वाटले नाही. उलट त्याने शिबिरात वाचलेल्या पुस्तकांची मला माहिती दिली आणि कोणती पुस्तके विकत आणायची याची यादी मला दिली. आज सकाळी तो सवयीने लवकर उठला आणि लगेच स्नान करून स्वतः:चे कपडे स्वतः: धुवून टाकले. आणि म्हणाला, "आई एवढे काम करते मग कशाला तिला आणखी त्रास ?" हे सारे बदल किती दिवस टिकतील मला माहीत नाही पण पाऊल घसरू शकणा-या या वयात संघाने मनावर बिंबवलेले संस्कार सहजी पुसले जाणार नाहीत हे नक्की ! एका आईबापाला मुलांकडून दुसरे काय हवे असते ? संघाने आमचा मुलगा घडवायला मदत केली, "हे" दिले संघाने आम्हाला ! अभय देवरे, सातारा सातारा येथे नुकताच संघाचा प्राथमिक शिक्षा वर्ग आयोजित केला होता. संघ स्वयंसेवक अभय देवरे ह्यांना आलेला त्याचा अनुभव त्यांच्याच शब्दात.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34005 वाचन

💬 प्रतिसाद (221)

प्रतिक्रिया

अहो, ते एकच आहेत.

बोका-ए-आझम
Fri, 05/13/2016 - 09:21 नवीन
ते दररोज सकाळी टाॅस करुन ठरवतात - आज कोण म्हणून वावरायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शलभ

एक हिंदी म्हण प्रकर्षाने

उगा काहितरीच
Fri, 05/13/2016 - 06:19 नवीन
एक हिंदी म्हण प्रकर्षाने आठवते... "हाथी चले बाजार , कुत्ते भोके हजार ।"
  • Log in or register to post comments

संघावर टीका जरूर करा, पण योग्य मुद्द्यांवरून

चलत मुसाफिर
Fri, 05/13/2016 - 08:09 नवीन
1. संघ हा हिंदू समाजातील दुही नष्ट करून एकता निर्माण करण्याचे ध्येय बाळगतो. कारण हिंदू एकतेत खरे राष्ट्रहित आहे असा संघाचा विश्वास आहे. संघाशी संबंधित माणूस भाजपमध्येच जायला हवा असे नाही. तो इतर पक्षातही जाऊ शकतो. इतर पक्ष त्याला स्वीकारतात की नाही हा वेगळा प्रश्न. सामाजिक समरसता हे संघाचे ध्येय आहे. जातिभेद निर्मूलन त्यातूनच साध्य होईल असे संघ मानतो. आंबेडकर आणि गांधी हे संघात प्रातःस्मरणीय मानले जातात. 2. माझा संघाशी प्रत्यक्ष काहीच संबंध नाही. वैयक्तिक पातळीवर संघाच्या काही गोष्टी पटत नाहीत. विहिंपबद्दल तर जवळजवळ चीड आहे. उदा. कुठे जातीय हिंसा घडल्यावर डाव्या संघटना ज्या तत्परतेने पोचतात, तसे संघ आणि विहिंप का पोचत नाहीत याचा राग येतो. पण संघ ही भारलेल्या, निरिच्छ माणसांची संघटना आहे याची खात्री वाटते.
  • Log in or register to post comments

कुठे जातीय हिंसा घडल्यावर

गणामास्तर
Fri, 05/13/2016 - 09:36 नवीन
कुठे जातीय हिंसा घडल्यावर डाव्या संघटना ज्या तत्परतेने पोचतात, तसे संघ आणि विहिंप का पोचत नाहीत याचा राग येतो कैच्याकै. गोध्राला नव्हते का पोचले ? मुझफ्फरनगर विसरलात का ? सगळ्यात पहिल्यांदा तेच पोचत असतात, बाकीचे सगळे वरातीमागून घोडे. अभ्यास वाढवा जरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चलत मुसाफिर

नंदीग्राम, सिंगुर,

बोका-ए-आझम
Fri, 05/13/2016 - 10:30 नवीन
झालंच तर १९८४ ची दिल्ली - रक्त प्रत्येक पक्षाच्या हातावर आहे. एकाकडे बोट दाखवू नये. उरलेली तीन स्वतःकडे रोखली जातातच. झालंच तर मुझफ्फरनगरमध्ये भाजप नेत्यांनी दंगल घडवून अाणली हे अजून सिद्ध झालेलं नाही आणि गोध्रा स्थानकावर जे जळित कांड घडलं त्याच्या मुख्य आरोपीला अटक झालेली आहे. दिल्ली, नंदीग्राम, सिंगुर इथल्या एकाही आरोपीला शिक्षा तर सोडाच, साधा खटलाही भरला गेलेला नाही. याउलट गुजरात दंगलींमध्ये निकाल लागून लोकांना शिक्षाही झाल्या. त्यात एकेकाळच्या मंत्री माया कोदनानींचा समावेश आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

नंदीग्राम, सिंगुर,

बोका-ए-आझम
Fri, 05/13/2016 - 10:30 नवीन
झालंच तर १९८४ ची दिल्ली - रक्त प्रत्येक पक्षाच्या हातावर आहे. एकाकडे बोट दाखवू नये. उरलेली तीन स्वतःकडे रोखली जातातच. झालंच तर मुझफ्फरनगरमध्ये भाजप नेत्यांनी दंगल घडवून अाणली हे अजून सिद्ध झालेलं नाही आणि गोध्रा स्थानकावर जे जळित कांड घडलं त्याच्या मुख्य आरोपीला अटक झालेली आहे. दिल्ली, नंदीग्राम, सिंगुर इथल्या एकाही आरोपीला शिक्षा तर सोडाच, साधा खटलाही भरला गेलेला नाही. याउलट गुजरात दंगलींमध्ये निकाल लागून लोकांना शिक्षाही झाल्या. त्यात एकेकाळच्या मंत्री माया कोदनानींचा समावेश आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

अभ्यास वाढवण्याचा प्रयत्न चालू आहेच. धन्यवाद.

चलत मुसाफिर
Fri, 05/13/2016 - 12:18 नवीन
मुझफ्फरनगर आणि गोधरा ही धार्मिक हिंसा होती, जातीय नव्हे. समजू इच्छिणारे समजतात. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

अभ्यास वाढवण्याचा प्रयत्न चालू आहेच. धन्यवाद.

चलत मुसाफिर
Fri, 05/13/2016 - 12:23 नवीन
मुझफ्फरनगर आणि गोधरा ही धार्मिक हिंसा होती, जातीय नव्हे. जाऊ द्या. समजू इच्छिणारे आपोआप समजतात. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

भारत स्वतंत्र झालाच पाहिजे

लालगरूड
Fri, 05/13/2016 - 09:02 नवीन
भारत स्वतंत्र झालाच पाहिजे
  • Log in or register to post comments

संघाने मला काय दिले ?

मितान
Fri, 05/13/2016 - 09:37 नवीन
१. संघाने मला 'व्यक्ती तितक्या प्रकृती' हे शिकवले. त्यामुळे आपल्या भिन्न मताचा आदर आहे. २.माझ्या देशाचा त्यातील भल्या बुर्‍या सर्व गोष्टींसह स्वीकार करायला शिकवले. त्यामुळे देशात / समाजात अनेक वाईट गोष्टी आहेत हे मान्य आहे. संघ अशाच समाजाचा भाग असल्याने त्या वाईटाचा अंश संघातही आहे हे ही मान्य आहे. ३.प्रपंच सांभाळत देशसेवा करण्याचा मार्ग दाखवला. समाजाचं देणं म्हणून खारीचा वाटा का होईना पण तो उचललाच पाहिजे ही शिस्त लावली. यात फार मोठा त्याग किंवा भारी परिवर्तन किंवा सामाजिक क्रांती असं मी म्हणत नाही.एक उदाहरण देते मी शाखा चालवते. संध्याकाळी टी व्ही समोर बसण्यापेक्षा ४ ते १५ वयोगटातील मुली शाखेत येतात, मैदानावर भरपूर खेळतात, देशभक्तिपर गाणी म्हणतात, प्रार्थना म्हणतात. अधुनमधुन परिसरातील मंदिर स्वच्छ करणे, जवळपासच्या जेष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन (जे एकटे राहतात किंवा मदतीला जवळ कोणी नाही) त्यांना बाहेरच्या कामात मदत करणे, एकत्र सहलीला कुठे गेलो तर त्यानिमित्ताने त्या परिसराचा लोकवस्तीचा अभ्यास / दर्शन करणे असे शेकडो उपक्रम आम्ही करतो. त्यात कोणी स्वतःचा एक पैसा खर्च करत नाही वा कोणाला मिळत नाही. काय होतं यातून ? माझ्या शाखेतल्या प्रत्येक मुलीचा इतर प्रत्येक घरात संपर्क आहे. हे एक विस्तारित कुटुंब झाले आहे. आम्ही आग्रह न करता ते आपोआप वाढते आहे. मी, माझं घर यापलिकडे विचार करण्याची सवय या वयात लागते आहे. शाखेत येणार्‍या ३०-३५ मुली हे सहज शिकत आहेत. यात वाईट काय आहे ? द्वेष करण्यासारखे काय आहे ? ४. मी निवडलेला मार्ग सरळ आहे, यात माझा भावनिक स्वार्थ साधला जातो. हे करताना कोणाचे नुकसान मुळीच होत नाही. त्यामुळे आपल्या मार्गावर विश्वास ठेवून पुढे चालत रहा, काम करत रहा ही संघाने मला दिलेली शिकवण मी जगते. मी त्यात समाधानी आहे. हे सगळं संघामुळे आहे असा माझा अनुभव आणि मत असेल तर यात इतरांना न पटण्यासारखे काय आहे ? ५. संघाबाहेर हे कोणीही करत नाही, कोणतीही दुसरी संघटना चांगली नाही, संघाशिवाय देशाचा तारणहार कोणी नाही हे संघात कधीही कुठेही म्हटले/लिहिले गेलेले आठवत नाही. त्यामुळे तुलनेचा प्रश्नच नाही. व्यक्तिशः मला नुसतीच पोकळ बडबड करत राहणार्‍या सो कॉल्ड बुद्धिमंतांपेक्षा दिवसातला थोडा वेळ घरदार विसरून एकत्र येऊन २ भजनं म्हणणार्‍या लोकांबद्दल जास्त आदर आहे. निदान ते कोषाच्या बाहेर तरी येतात. बाकी ते 'आम्ही खालच्या जातीच्या लोकांसोबत सुद्धा एका पंगतीला बसून जेवतो. अजिबात भेद मानत नाही' या एवढं पाखंडी वाक्य दुसरं कोणतं नाही. असुद्या. या पाखंडासह तुम्ही आपलेच आहात. कधीतरी ते बदलेल. ता क : माझी सासर माहेरची कुटुंबं गेल्या ३ पिढ्या संघाचे सक्रीय सदस्य आहेत. अतिशय महत्वाच्या जबाबदार्‍या आजही कुटुंबातील जवळच्या सदस्यांकडे आहेत. माझ्या पुढची पिढीही स्वेच्छेने शाखेत व इतर कार्यक्रमात सक्रीय सहभागी होत आहे.
  • Log in or register to post comments

सहमत !

विटेकर
Fri, 05/13/2016 - 11:31 नवीन
१०० % सहमत !
५. संघाबाहेर हे कोणीही करत नाही, कोणतीही दुसरी संघटना चांगली नाही, संघाशिवाय देशाचा तारणहार कोणी नाही हे संघात कधीही कुठेही म्हटले/लिहिले गेलेले आठवत नाही. त्यामुळे तुलनेचा प्रश्नच नाही. व्यक्तिशः मला नुसतीच पोकळ बडबड करत राहणार्‍या सो कॉल्ड बुद्धिमंतांपेक्षा दिवसातला थोडा वेळ घरदार विसरून एकत्र येऊन २ भजनं म्हणणार्‍या लोकांबद्दल जास्त आदर आहे. निदान ते कोषाच्या बाहेर तरी येतात.
विशेषत्वाने आवडले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

बाकी ते 'आम्ही खालच्या

बोका-ए-आझम
Fri, 05/13/2016 - 13:58 नवीन
बाकी ते 'आम्ही खालच्या जातीच्या लोकांसोबत सुद्धा एका पंगतीला बसून जेवतो. अजिबात भेद मानत नाही' या एवढं पाखंडी वाक्य दुसरं कोणतं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

समाधान !

विटेकर
Fri, 05/13/2016 - 09:55 नवीन
गेली ३५ वर्षे संघात जातो आहे , आणि पुढचे अनेक जन्म जाईन ! ही सगळी चर्चा वाचून मला फार मज्जा वाटते. जितका विरोध जास्त तितका संघ वाढतोय ! केला जरी पोत बळेची खाली , ज्वाला तरी ती वरती उफाळे ! तेव्हा विरोध करणार्‍यांचे मनःपूर्वक आभार ! त्यांनी अधिक जोमाने आणि त्वेषाने संघावर हल्ला चढवावा, अगदी दात- ओठ खाऊन अंगावर धावून यावे ! दणकून आरोप करावेत! त्यामुळे कूंपणावर असणारे न्युट्रल लोक देखील संघाकडे वळतील.( हे तर इथल्या इथेच दिसते आहे ! अनेक प्रतिसादात सदस्यानी लिहले आहे की, मी संघाचा नाही पण संघ चांगले काम करतो ) यापेक्षा संघाला अधिक काय हवे ? आणि संघाला संघटना म्हणून , कल्ट म्हणून अजिबात मोठ्ठे व्हायचे नाही. अखिल हिण्दूसमाज संघटीत झाला , त्याला आपली बलस्थाने समजली की आपोआपच हे राष्ट्र परम वैभवाला जाणार आहे. आणि हे राष्ट्र गुरुस्थानी असणे हे जगाच्या हिताचे आहे, ते कसे ही घडले तरी हवेच आहे ! संघाच्याच कोंबड्याने पहाट झाली पाहीजे असे थोडेच आहे ? माझ्या दृष्टीने जगात दोनच प्रकारचे लोक राहतात - १. जे आज स्वंयसेवक आहेत आणि २. जे उद्या स्वंयसेवक होणार आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात साक्षात्कार केव्हा व्हावा हा ज्याच्या-त्याच्या पूर्वसंचिताचा भाग आहे, त्याची वाट बघणे एवढेच आपल्या हातात असते ! या जन्मी नाहीतर पुढच्या जन्मी ! आपल्याला कुठे घाई आहे? आणखी एका गोष्टीचे समाधान आहे , यातला एक ही आरोप नवा नाही ! संघाची प्रतिवाद करण्याची पद्धत नव्हती , नाही आणि नसते ! संघ आपल्या कामाने उत्तरे देत असतो, या सर्व आरोपांना संघाने आपल्या कामाने उत्तरे दिली आहेत. त्यामुळे नव्याने सांगण्यासारखे काहीही नाही ! जे आरोप करताहेत त्यांना फक्त आरोपच करायचे आहेत. माझे आव्हान आहे की विरोधकांनी कोणतेही विधायक काम सुरु करावे , मी सर्व शक्तीने त्यात सामील होईन ! रेष पुसून लहान करायची नसते हो , मोठ्ठी रेष ओढा की ! तजो ना तर मी हे व्यक्तिगतरित्या अन्यत्र लिहिले आहेच ! सोन्याबापू आणि तजो ना मी व्यक्तिगत भेट ही मागितली आहे. कोणते गैरसमज चर्चेनी सुटत नाहीत ? पण......???? माध्यान्हि सुर्यावर थुन्कती ! ती थुंकी आपणावरी !! अशी हौस असेल तर कोण काय करणार ?
  • Log in or register to post comments

संघ....

अनिरुद्ध प्रभू
Fri, 05/13/2016 - 09:59 नवीन
@मारवा
१-मुस्लिम २-ख्रिश्चन ३-कम्युनिस्ट्स गोळवलकर गुरुजी इतक्या स्पष्टतेने हे तीन धोके कसे आहेत ते सांगतात त्यावर उपाययोजना सुचवितात.
राजे, १.जगातले बहुतांशी मुस्लिम जिहाद मानतात. जिहाद पसरवन्यासाठी ते दहशतवाद व इतर गोष्टींचा वापर करतात. परिणामी तो धोका आहेच. २.ख्रिश्चन धर्मिय लोक उघडपणे जरी आपला धर्मप्रसार दाखवत नसले तरी त्यांच्या बर्‍याच प्रमाणात छुप्या कारवाया चालतात. उदा. द्यायचे झाल्यास वेंगुर्ल्यात ३ लाख ते ५ लाख हा दर दरडोइ किंवा कुटुंबामागे ( परिस्थितीवर अवलंबून) देऊन धर्मांतर केलं जात होतं आणि हा प्रयत्न संघानेच हाणुन पाडला. अजुन सांगायच झाल तर राष्ट्रिय किर्तनकार श्री. चारुदत्त आफळे यांच्या जाहिर किर्तनानुसार बर्‍याच मोठ्या लोकांच्या शाळा या कपडे अन्न निवारा या मुद्द्यांवर धर्मांतर करतात. परिणामी हा हि धोका आहेच. ३. कम्युनिसम बाबतित आझम साहेबां सोबत सहमत. @ श्री.चंद्रनील मुल्हेरकर साहेब,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा उघड मुस्लिमविरोधी आहे हे नागडं सत्य आहे.त्यामुळे या संघटनेला " राष्ट्रीय" म्हणावं का ईथपासुनच सुरवात आहे.मुस्लिम ,ख्रिश्चन ,बौद्ध व दलित हिंदू यांना राष्ट्रीयत्वाच्या व्याख्येतून वगळणे ज्यांना मान्य आहे अश्या संघाला जनाधार का लाभला नाही हे उघड गुपीत आहे.
१. आपल्या या वक्तव्यावरुन आपण संघात खरचं होता का हा फार महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो. चला आपण संघात होता असे मानू. तर माझा आपल्याला एक सवाल आहे, श्री.के.सी. सुर्दर्शन कोण आहेत हे आपल्याला ठाउक आहेत का? जर आहेत तर आपल्याला स्वतःच्या वक्तव्यातील खरी गोम लक्षात येइल. उर्वरीत आपण उत्तर दिल्यानंतर बोलु... (आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत असलेला) अनिरुद्ध
  • Log in or register to post comments

..

mugdhagode
Fri, 05/13/2016 - 19:23 नवीन
वेंगुर्ल्यात ३ लाख ते ५ लाख हा दर दरडोइ किंवा कुटुंबामागे ( परिस्थितीवर अवलंबून) देऊन धर्मांतर केलं जात होतं आणि हा प्रयत्न संघानेच हाणुन पाडला. अरेरे ! म्हणजे इतकी वर्षे ते पिचलेले होते, कुणी मदत करत होते तर तीही करु दिली नाही. हेच का ते राष्ट्रकार्य ? ख्रिस्ती लोक तीन लाख देत होते तर संघाने चार लाख द्यायचे की ! हाणुन पाडले , ही फुकट फुशारकी कशाला मारायची ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प्रभू

आँ कुठे ओ कुठे ओ. चांगला

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 05/15/2016 - 07:01 नवीन
आँ कुठे ओ कुठे ओ. चांगला धंदा अहे की हा. पहिलं महिनाभर धर्मांतर करायचं. पैसे घ्यायचे. मग घरवापसी. मग रिन्ज अँड रिपिट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

अजुन सांगायच झाल तर राष्ट्रिय

टवाळ कार्टा
Sat, 05/14/2016 - 20:15 नवीन
अजुन सांगायच झाल तर राष्ट्रिय किर्तनकार श्री. चारुदत्त आफळे यांच्या जाहिर किर्तनानुसार बर्‍याच मोठ्या लोकांच्या शाळा या कपडे अन्न निवारा या मुद्द्यांवर धर्मांतर करतात. परिणामी हा हि धोका आहेच.
धर्म न बदलता वरिल सोयी मिळत नाहीत असे असेल आणि धर्म बदलून वरील सोयी मिळत असतील तर त्यात चुकीचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प्रभू

स्वेच्छेने केलं तर अजिबात चुकीचं नाही.

बोका-ए-आझम
Sat, 05/14/2016 - 22:50 नवीन
पण प्रलोभनं दाखवून केलं जात असेल तर ते वाईटच. कोणी प्रलोभन दाखवून हिंदू करत असेल तर तेही वाईटच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

शाळा या कपडे अन्न निवारा हे

टवाळ कार्टा
Sat, 05/14/2016 - 23:10 नवीन
शाळा या कपडे अन्न निवारा हे मिळत नसेल अशी परिस्थिती असेल...आणि समोर येउन कोणी म्हणत असेल की आम्च्या धर्मात या...आम्ही हे सगळे देउ...मग लोक का नाही जाणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

कुणाला शाळा, कपडे, अन्न, निवारा

बोका-ए-आझम
Sun, 05/15/2016 - 08:36 नवीन
या गोष्टी धर्माशिवायही देता येतात की. धर्म बदलला तरच हे सगळं मिळेल असं म्हणणं प्रलोभनच म्हणायला पाहिजे. या गोष्टी मूलभूत गरजा अाहेत. त्या द्यायला धर्म हे अधिष्ठान कशाला पाहिजे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

टका

विटेकर
Mon, 05/16/2016 - 10:06 नवीन
टकाश्री, तुमचे विचार वाचून आश्चर्य वाटले. मुद्दा धर्मांतरावर थांबत नाही. एकदा विशिष्ट धर्माची संख्या वाढली की भूभाग तोडून द्यावा लागतो हे सत्य आहे. सिन्ध आणि पंजाब प्राण्ताचा लचका तोडला, नागभूमी तोडून मागत आहेत , ईशान्य भारताची अवस्था बिकट आहे , ते दिल्ली - मुम्बईला आले तर भारतात आलो असे म्हणातात ! धर्मान्तर हेच राष्ट्रांतर हा इतिहास आहे. आम्ही त्या इतिहासापासून काहीच शिकणार नाही का? आणि प्रलोभने दाखवून धर्मांतर करण्यात काही चूक नाही असे आपल्याला वाटत असेल तर शंभू महाराजांचे बलिदान व्यर्थच गेले म्हणायचे ! उगाचच त्यांनी आपल्या देहाचे हाल आणि विटंबना करुन घेतली ! कृपया आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

आणखी एक !

विटेकर
Mon, 05/16/2016 - 10:10 नवीन
धर्म बदलून त्याण्चे प्रश्न सुटत नाहीत ! एकदा धर्म बदलला की मदतीचा ओघ थांबतो, त्यांना दरवेळी नवीन गिर्‍हाईक शोधायचे असते , त्यांची टार्गेट्स असतात. धर्म बदलला की त्यांचे जीणे आणखी भेसूर होते ! नातेवाईक तुटतात, लगनकार्यात अडचणी येतात. जुने धर्मांतरीत नव्या बाटग्याना आपले मह्णत नाहीत. आणि धर्म बदलल्यावरही जात शाबूत राहतेच हे नग्न सत्य आहे. फार जवळून पाहीले आहे हे सगळे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

ह्या दुसऱ्या बाबतीत 100% सहमत

नाईकांचा बहिर्जी
Wed, 05/18/2016 - 07:06 नवीन
ह्या दुसऱ्या बाबतीत 100% सहमत, बाकी वरची कॉमेंट एकांगी गोळीबार वाटला.असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

ह्म्म...

अनिरुद्ध प्रभू
गुरुवार, 05/19/2016 - 15:46 नवीन
अरेरे ! म्हणजे इतकी वर्षे ते पिचलेले होते, कुणी मदत करत होते तर तीही करु दिली नाही. हेच का ते राष्ट्रकार्य ? ख्रिस्ती लोक तीन लाख देत होते तर संघाने चार लाख द्यायचे की ! हाणुन पाडले , ही फुकट फुशारकी कशाला मारायची ?
कळालं काय ते..... ______/\_____ कोपरापासुनच नाही तर ढोपरापासुन सुद्धा.. असो.. शेवटी.. स्वामी विवेकानंद यांच्या शब्दात काहीतरी... धर्म , पंथ आणि संप्रदाय याचा गैराभिमान जगाला नाशाकडे नेतो . त्यामुळे कोणी कोणाला धर्म बदलण्यास न सांगता स्वतःचा धर्म पाळून दुसऱ्या धर्मातील सर्व चांगलेच आपल्या आचरणात आणावे . जगातील सर्वात प्राचीन भाषा संस्कृतमध्ये ” Exclusion ” याला शब्द नाही म्हणजेच हिंदू धर्म हा सर्वांना समावेश करून घेणारा आहे रच्याकाने श्री.चंद्रनील मुल्हेरकर साहेब(????) गायब झाले वाटतं? उत्तर नाही दिले ते.. (उत्तराच्या प्रतिक्षेत असलेला) अनिरुद्ध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प्रभू

चंद्र राव,

सुबोध खरे
Fri, 05/13/2016 - 10:16 नवीन
चंद्र राव, एकीकडे आपण संघाला जातीयवादि म्हणता आहात. पण प्रत्यक्षात पहिल्यांदा ब्राम्हणाविरुद्ध गरळ ओकलीत. यानंतर तुम्ही श्री उमाभारती यांची "जात" काढून आरोप केलेत. वर तुम्ही सर्वसमावेशक संघटनेत काम करता असे म्हणता. जेथे तेथे जात काढणे हे तुम्हीच चालू केलेत तरी नशीब तुम्ही श्री देवरे यांची "जात" काढली नाहीत. श्री देवरे यांच्या लिखाणात कुठेही जातीचा उल्लेखहि नसून केवळ मुलावर झालेले चांगले "संस्कार" याबद्दल लिहिले आहे. यावरून आपला दांभिकपणा सिद्ध होतो. आपण हसे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला अशी आपली स्थिती आहे. डोळे उघडे ठेवून जगाकडे पहा.
  • Log in or register to post comments

नानासाहेब नेफळ्यांकडून

श्रीगुरुजी
Fri, 05/13/2016 - 15:41 नवीन
नानासाहेब नेफळ्यांकडून संघद्वेष, ब्राह्मणद्वेष, जातीयवाद इ. शिवाय दुसरे काय अपेक्षित आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

श्री दत्ता जोशी यांच्या चेपु पानावरुन ...

विटेकर
Fri, 05/13/2016 - 10:29 नवीन
  • Log in or register to post comments

श्री दत्ता जोशी यांच्या चेपु पानावरुन ...

विटेकर
Fri, 05/13/2016 - 10:29 नवीन
  • Log in or register to post comments

श्री दत्ता जोशी यांच्या चेपु पानावरुन ...

विटेकर
Fri, 05/13/2016 - 10:29 नवीन
  • Log in or register to post comments

श्री दत्ता जोशी यांच्या चेपु पानावरुन ...

विटेकर
Fri, 05/13/2016 - 10:29 नवीन
  • Log in or register to post comments

श्री दत्ता जोशी यांच्या चेपु पानावरुन ...

विटेकर
Fri, 05/13/2016 - 10:30 नवीन
  • Log in or register to post comments

श्री दत्ता जोशी यांच्या चेपु पानावरुन ...

विटेकर
Fri, 05/13/2016 - 10:30 नवीन
  • Log in or register to post comments

श्री दत्ता जोशी यांच्या चेपु पानावरुन ...

विटेकर
Fri, 05/13/2016 - 10:30 नवीन
  • Log in or register to post comments

श्री दत्ता जोशी यांच्या चेपु पानावरुन ...

विटेकर
Fri, 05/13/2016 - 10:30 नवीन
  • Log in or register to post comments

श्री दत्ता जोशी यांच्या चेपु पानावरुन ...

विटेकर
Fri, 05/13/2016 - 10:31 नवीन
  • Log in or register to post comments

श्री दत्ता जोशी यांच्या चेपु पानावरुन ...

विटेकर
Fri, 05/13/2016 - 10:31 नवीन
  • Log in or register to post comments

श्री दत्ता जोशी यांच्या चेपु पानावरुन ...

विटेकर
Fri, 05/13/2016 - 10:31 नवीन
  • Log in or register to post comments

श्री दत्ता जोशी यांच्या चेपु पानावरुन ...

विटेकर
Fri, 05/13/2016 - 10:31 नवीन
  • Log in or register to post comments

सोन्याबापुंनी दिलेल्या

तर्राट जोकर
Fri, 05/13/2016 - 11:07 नवीन
सोन्याबापुंनी दिलेल्या प्रतिसादावर दंगा एवढा कै नै झाला...? तोच प्रतिसाद मी दिला असता तर.. =))
  • Log in or register to post comments

लोक तुमच्या मेगाबायटी

सुबोध खरे
Fri, 05/13/2016 - 11:09 नवीन
लोक तुमच्या मेगाबायटी प्रतिसादाना घाबरतात. "भिक नको पण कुत्रा आवर" अशी स्थिती आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

मी लिहिलंय काय, तुम्ही

तर्राट जोकर
Fri, 05/13/2016 - 12:38 नवीन
मी लिहिलंय काय, तुम्ही लिहिताय काय... काय टोटल नै लागत है... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

त्याचं कारण इथल्या लोकांना बापूंविषयी आदर वाटतो

बोका-ए-आझम
Fri, 05/13/2016 - 13:50 नवीन
आणि त्यांच्या मतभेद स्वीकारून मैत्री जपण्याच्या वृत्तीचा अभिमान वाटतो. बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

म्हणजे 'काय' लिहिलंय ह्या

तर्राट जोकर
Fri, 05/13/2016 - 13:58 नवीन
म्हणजे 'काय' लिहिलंय ह्या पेक्षा 'कोण' लिहितो ह्यावरुन जज होतं हेच सिद्ध होतंय तर... हेच म्हणायचं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

असे नाही, तर तुम्ही केवळ इथे

आनन्दा
Fri, 05/13/2016 - 14:32 नवीन
असे नाही, तर तुम्ही केवळ इथे काय लिहिलय यापेक्षा तुम्ही इथे, तिथे आणि तिकडे काय लिहिलय यावरून जज होते ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

अर्थात!

बोका-ए-आझम
Fri, 05/13/2016 - 14:44 नवीन
Any problem?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

सहमत. सोन्याबापुंशी कैक

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 05/14/2016 - 19:43 नवीन
सहमत. सोन्याबापुंशी कैक मुद्द्यांवरुन मतभेद आहेत. त्यावरुन व्यनि व्यनि मधुन अधुन मधुन चर्चाही होतं असतात. म्युचुअल रिस्पेक्ट ह्या एका मुद्द्यावर हे वादविवाद असुनही मिपादोस्ती आहे आणि तिचा अभिमानही आहे. तर बोकोबा तुम्हाला सांगायचं तात्पर्य काय? रिकामे मुद्दे मांडुन, विषय भरकटवुन (उदा. सदर लेखाचा विषय काय आपण त्यावर पोष्टी टाकतो काय ह्याची समज नसणं किंवा वेड पांघरुन पेडगावला जाणं वगैरे वगैरे), लोकांना उसकावुन त्यांचे आयडी उडायला लागतील असं वर्तन करायला भाग पाडुन, आपण एशियन पेंट्सच्या लाल रंगाचे जनक आहोत असा समज करुन घेउन मी सांगतो तिच्चं पुर्व दिशा असं वागुन लोकांचा आदर आणि मैत्री जिंकता येत नाही. त्यातुन प्रत्येक ठिकाणी गरळ ओकायची सवय तर लैचं वाइट बरं आरोग्याच्या दृष्टीने. एवढं पित्तं असं जातं राहिलं तर अन्नपचनावर गंभीर परिणाम होउन चारधाम यात्रेस जायची वेळ येते म्हणे. सोन्याबापु वरपैकी एकही गोष्टं करताना कधीचं दिसलेले नाहीत. तस्मात त्यांनी ती लायकी कमावलेली आहे. वरचे सगळे प्रकार करणारा माणुस लोकांच्या नजरेत पडत जातो हे मिपावरच्या काही आयडींना कळुन त्यांनी वर्तन सुधारलं तरं मिपा किती छान होईल नै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

अगदी अगदी.

बोका-ए-आझम
Sun, 05/15/2016 - 08:41 नवीन
पण दारुड्याला बासुंदीची चव किंवा for that matter - मटणाची चव सांगून काय फायदा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

हे अनेक वेळा आलेले , जरा संपादित केले तर बरे !

विटेकर
Fri, 05/13/2016 - 11:08 नवीन
क्षमा ! , चेपु वरुन आणलेले इथे पोस्ट्वायचा प्रयत्न करत होतो , पोस्त तर झाले नाहीच .... नुस्ते शीर्षक आले आहे
  • Log in or register to post comments

श्री दत्ता जोशी यांच्या चेपु पानावरुन ...

विटेकर
Fri, 05/13/2016 - 11:09 नवीन
श्री दत्ता जोशी यांच्या चेपु पानावरुन ... ------------------------------------------- अन्वर शेख आणि कलीम शेख -------------------------------- (दत्ता जाेशी आैरंगाबाद) मला `आमच्या` कलीम शेख बद्दल काही सांगायचे आहे. युपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या अन्वर शेखचे यश साजरे करण्याच्या निमित्ताने काही प्रवृत्तींना अकारण मुस्लिमनिष्ठेचा उमाळा आलेला दिसतोय. अन्वर हा मराठवाड्यातील जालना येथील एका गरीब मुस्लीम रिक्षा चालकाचा मुलगा. तो स्वतःच्या बुद्धिमत्तेने वर चढत गेला, याचा आनंद आहेच. संपूर्ण मुस्लीम समाजाने याचा आदर्श घ्यावा. मुख्य प्रवाहात सहभागी व्हायचे तर मुख्य प्रवाह नेमका कोणता, याचे डोळस भान या समाजाला आले पाहिजे. हा मूळ विषय दूर ठेवून `त्याला कसे नाव बदलून पुण्यात राहावे लागले`, या विषयी `निरांजने` ओवाळली जात आहेत... `विश्वम्भरी` आरोळ्या ठोकल्या जात आहेत. पण ही वेळ का आली यावर कुणी प्रकाश टाकण्याचे कष्ट घेत नाही. वैयक्तिक पातळीवर या मंडळीनी या विषयात काही योगदान दिलेय का, याचाही शोध लागत नाही. हे साहजिक आहे. स्वयंघोषित पुरोगाम्यांकडून अशी आत्मपरीक्षणाची अपेक्षाही करू नये. या पार्श्वभूमीवर मला `आमच्या` कलीम शेख बद्दल काही सांगायचे आहे. त्या आधी मी माझ्याबद्दल बोलतो. आम्ही जोशी, देशस्थ ब्राह्मण. माझे आजोळसुद्धा देशस्थ ब्राह्मणाचे. घरी पूजा-अर्चा चालते. आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. मी स्वतः प्रथम वर्ष शिक्षित प्रतिज्ञीत स्वयंसेवक. अभाविपचा एकेकाळचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य. आजही या विचाराची नाळ घट्ट रुजलेली आहे. मी स्वतः रामजन्मभूमी आंदोलनात सक्रीय राहिलो. ६ डिसेंबर १९९२ रोजी मी अयोध्येत होतो. आता, या पार्श्वभूमीवर मी `कलीम शेख`बद्दल सांगतो आहे. कलीम सध्या पुण्यात एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. तो संगणक शास्त्राचा पदवीधर आहे. मी त्याच्याबद्दल लिहिताना `आमचा` म्हटले आहे. तो `आमचा` कसा? कलीमने त्याची पदवी लातुरात शिकून मिळविली. ही ३ वर्षे तो आमच्या लातूरच्या घरात एका छोट्या खोलीत (हिंदू, ब्राह्मण परिवाराच्या!) भाड्याने राहिला. कलीमचे आणि आमचे नाते त्याच्या जन्माच्याही आधीचे. त्याचे वडील निजामुद्दीन शेख हे ही रिक्षाचालक. ते उदगीर येथे रिक्षा चालवितात. आम्ही उदगीर मध्ये वास्तव्यास असताना हा परिवार आमच्या घराजवळ राहायचा. त्या अर्थाने ते आमचे शेजारी. त्यांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी असू. निजामुद्दीन मामुंच्या वडिलांच्या निधनानंतर कब्रस्तानात गेलेल्यांपैकी एकमेव हिंदू म्हणजे आमचे वडील उमाकांतराव जोशी. माझ्या बाबतीत लिहिताना रामजन्मभूमी आंदोलनाचा उल्लेख आलेला आहे. मी अयोध्येला गेलेलो होतो. ६ डिसेंबरला बाबरी भुइसपाट झाली, देशभर दंगे उसळले. उदगीरमध्ये शंभरावर दुकाने जाळली, गोळीबारात ४ जण ठार झाले. या काळात निजामुद्दीन शेख यांचा रिक्षा जोशींच्या अंगणात त्यांच्या गाडीच्या सोबत लावलेला होता. शेख परिवार जोशींच्या घरी सुरक्षित होता. हा विषय रामजन्मभूमीचा, परकीय आक्रमक विरुद्ध राष्ट्रीय अस्मितेचा होता, देशांतर्गत हिंदू मुस्लिमांचा नव्हे. म्हणूनच ज्या घरातील एक व्यक्ती एकीकडे कारसेवेला जाते त्याच घरात एका सामान्य मुस्लीम कुटुंबाला संरक्षण मिळते...! निजामुद्दीन शेख यांनी एकच लग्न केलेले. त्यांना ३ मुले १ मुलगी. त्यातील कलीम लहानपणापासूनच हुशार. उदगीरला असताना त्याची प्रगती डोळ्यासमोर दिसत होती. पुढे माझे आई वडील लातूरला शिफ्ट झाले. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी कलीम शिक्षणासाठी लातूरला आला. त्याच्या राहण्यासाठी माझ्या वडिलांनी नाममात्र भाड्यात त्याची व्यवस्था आमच्या घरातच केली. त्यानेही जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. नांदेड विद्यापीठात त्याने प्रथम क्रमांक मिळविला. या ३ वर्षांत तो जणू आमच्या घरचा सदस्यच होता. आमच्याकडील सणावाराला किंवा त्याची मेस बंद असेल तर त्याचे जेवण आमच्याकडे असे. आणि, यात आमचा कसलाही उपकृत करण्याचा भाव नव्हता. ती सामान्य माणुसकी होती. तोही आमच्या आई-वडिलांची काळजी घ्यायचा. त्याला दुसऱ्या वर्षात असताना प्रोग्रामिंग साठी laptop हवा होता. ती किंमत ३०-३२ हजार होती. त्याने १० हजार जमवले होते. माझ्याकडे तेव्हा पुरेशी रक्कम नव्हती, पण मी लातूरचे contractor गणपतराव मोरगे यांच्याकडे शब्द टाकला आणि त्यांनी उरलेली २२ हजाराची रक्कम दिली...! कलीमचे काम झाले. आम्ही आई-वडिलांकडे लातूरला गेल्यावर माझा मुलगा गंधार आजी-आजोबांपेक्षा त्याच्या `कलीमभैय्या`कडे अधिक रमत असे! पदवी मिळाल्यानंतर कलीमने लातूर सोडले, तेव्हा तो माझ्या आई-वडिलांच्या पाया पडून गेला. इस्लाममध्ये कुणाच्या पाया पडले जात नाही! पुण्यात त्याच्या नोकरीसाठी माझ्या भावानेही मदत केली. काही काळ तो माझ्या भावाच्या flat वर वास्तव्याला होता. आता तो पुण्यात चांगला मार्गी लागला आहे. लवकरच त्याचे लग्न होईल, त्या `निकाह`ला आम्ही सगळे जाऊ. मला या लेखात `आम्ही किती कर्तबगार` हे सांगायची इच्छा नाही. मुद्दा परस्पर विश्वास निर्माण होण्याचा आहे. स्वजातीयाना भाड्याने घर देऊन पस्तावलेली माणसेही आहेत. पण तरीही पुन्हा पुन्हा मुस्लिमाला घर देण्याचा मुद्दा समोर आणला जातो. दुर्दैवाची बाब म्हणजे असे मुद्दे उकरून काढणारी मंडळी आपल्या वैयक्तिक आयुष्यात कधी सकारात्मक पाउल उचलत नाहीत. अर्थात, जे दिसते ते मांडले आहे. तसे पाउल उचलले असते तर ते किती मिरवले गेले असते याची कल्पनाही करवत नाही. जात काय आणि धर्म काय... हे सारे भेद नष्ट झाले पाहिजेत. पण त्यासाठी ते पूर्णतः विसरण्याची आवश्यकता आहे. आम्हाला संघाने हे शिकवले. मी जेवढा काळ संघाच्या आणि विद्यार्थी परिषदेच्या कामात होतो त्या काळात कधीही कुणी मला जात विचारली नाही की कधी मी कुणाला विचारायला गेलो नाही. हेच या परिवारात प्रत्येकाच्या बाबतीत घडते. भेद विसरायचे असतील तर ते समग्रपणे विसरले पाहिजेत. आणि जे विसरायचे ते आठवायचेच कशाला? संघाने माझ्यावर हा पवित्र संस्कार केला. मी संघाचा ऋणी आहे. -----------------------------------------
  • Log in or register to post comments

या पोस्टवरील श्री कलिम शेख यांची प्रतिक्रिया -

विटेकर
Fri, 05/13/2016 - 11:10 नवीन
या पोस्टवरील श्री कलिम शेख यांची प्रतिक्रिया - Thank you very much Bappa bhaya for such a nice post and true story. This really motivates me to struggle more... I learn lot of things from you and your whole family. Your support was really helpful... kaka and mavshi liked me more than my parents...Love you all!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा