Skip to main content

रातांब्याचं (कोकम) पन्हं

लेखक अनन्न्या यांनी बुधवार, 11/05/2016 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यःरातांब्याचा गर एक वाटी, गूळ चिरलेला दोन वाटया, मीठ चवीनुसार, एक टीस्पून जीरे पावडर, दोन ओल्या मिरच्या वाटून, पाणी. sarbat कृती:रातांबे स्वच्छ करून घ्या. दोन भाग करून आतला गर बियांसह काढून घ्या.( सालींचे कोकमसरबत करता येते.) गर मोजून त्याच्या दुप्पट गूळ आणि चवीनुसार मीठ मिसळून गर अर्धा तास झाकून ठेवा, sarbat गूळ पूर्ण विरघळला की त्यात जीरेपूड आणि वाटलेली मिरची घालून मिश्रण गाळून घ्या. मिश्रणाच्या चौपट पाणी लागते. चव बघून लागल्यास मीठ घाला. तयार पन्हं थंडगार करून सर्व्ह करा. माझ्या माहेरी पाडव्याला गावच्या देवळात सर्व गावकरी एकत्र जमून वसंत पूजा करतात. गणपतीची पूजा करून नवीन पंचांगाचे वाचन करतात. त्यावेळी नैवेद्याला आंबेडाळ आणि रातांब्याचं पन्हं असा नैवेद्य असतो. नंतर आलेल्या सर्वाना डाळ आणि पन्हं वाटलं जातं. sarbat या पन्ह्याला कोकम सरबतासारखा रंग येत नाही, पण जीरं, मिरची आणि गूळ याने अप्रतिम चव येते. आमच्याकडे थोड्या फुगीर अशा ओल्या मिरच्या येतात या सिझनला, त्याचा वास मस्त असतो. मिरची तिखटपणासाठी नसून फक्त स्वादासाठी आहे. हे पन्हं टिकावू नाही.

वाचने 8091
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

किती दिवस झाले रातांब्याचे पन्हे पिऊन!

सुंदर.

In reply to by अनन्न्या

साखरेत मुरलं की त्याला किंचित आंबूस वास येतो तो आवडत नसे. पन्हं ताबडतोब बनवून संपवायचा प्रकार असल्याने बनवून बघायला हरकत नाही.