साहित्यःरातांब्याचा गर एक वाटी, गूळ चिरलेला दोन वाटया, मीठ चवीनुसार, एक टीस्पून जीरे पावडर, दोन ओल्या मिरच्या वाटून, पाणी.
कृती:रातांबे स्वच्छ करून घ्या. दोन भाग करून आतला गर बियांसह काढून घ्या.( सालींचे कोकमसरबत करता येते.) गर मोजून त्याच्या दुप्पट गूळ आणि चवीनुसार मीठ मिसळून गर अर्धा तास झाकून ठेवा,
गूळ पूर्ण विरघळला की त्यात जीरेपूड आणि वाटलेली मिरची घालून मिश्रण गाळून घ्या. मिश्रणाच्या चौपट पाणी लागते.
चव बघून लागल्यास मीठ घाला. तयार पन्हं थंडगार करून सर्व्ह करा.
माझ्या माहेरी पाडव्याला गावच्या देवळात सर्व गावकरी एकत्र जमून वसंत पूजा करतात. गणपतीची पूजा करून नवीन पंचांगाचे वाचन करतात. त्यावेळी नैवेद्याला आंबेडाळ आणि रातांब्याचं पन्हं असा नैवेद्य असतो. नंतर आलेल्या सर्वाना डाळ आणि पन्हं वाटलं जातं.
या पन्ह्याला कोकम सरबतासारखा रंग येत नाही, पण जीरं, मिरची आणि गूळ याने अप्रतिम चव येते. आमच्याकडे थोड्या फुगीर अशा ओल्या मिरच्या येतात या सिझनला, त्याचा वास मस्त असतो. मिरची तिखटपणासाठी नसून फक्त स्वादासाठी आहे. हे पन्हं टिकावू नाही.

वाचने
8091
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकदम भारी.
+ १
In reply to एकदम भारी. by प्रचेतस
अहाहाहा!!!! गाsssssर वाटलं
आहा...मस्तं!!!
धन्यवाद!
यमी!
मस्त! हे रातांबे खायलाही मस्त
अहाहा झालं बघून वाचून!
भारी फोटू व कृती.
वाह ! मिरची ची अॅडिशन फार
हो स्रुजा
In reply to वाह ! मिरची ची अॅडिशन फार by स्रुजा
आज ह्ये असलच कै तरी चिपलूऩात
सुपर्ब.. कसले भारी दिसयेत.
थंडपेयाना नैसर्गिक पर्याय
रातांबे पूर्वी सरबतासाठी घरी
सुंदर.
का बरं, नाही आवडलं नाही?
साखरेत मुरलं की त्याला किंचित
In reply to का बरं, नाही आवडलं नाही? by अनन्न्या