Skip to main content

' जनसेवा दुग्ध मंदिर '

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 25/05/2012 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
गेली कित्येक वर्षे मोठ्या दिमाखात उभ असलेल ' जनसेवा दुग्ध मंदिर ' , लक्ष्मी रोड पुणे हे बंद झाले अशी वार्ता कानावर चेपू माध्यमातून आहे. अनेक वर्ष चविष्ट बेसन लाडू, खरवस, श्रीखंड वाडी आणि नंतर अनेक नाश्त्याचे पदार्थ येथे मिळत असत. गेल्या काही वर्षात इतर खाद्य पदार्थ द्यायची देखील येथे प्रथा पडली होती. परंतु हे जनसेवा बंद झालेले ऐकून वाईट वाटले. जनासेवाची स्पेशा लिटी म्हणजे तिखट मिठाचा सांजा.खर तर हा मराठ मोळा घरगुती पदार्थ. पण त्याच्या वर अतिक्रमण केले ते उडप्याच्या उप्पीट ने. फार फर्मास डिश तिखट मिठाचा सांजा. जनसेवाची खासियत म्हणजे तिथे मिळणारे फर्मास मसाला दुध...मटार कारंजी ..बटाट्याचा चिवडा ... अशीच हळ हळ वाटली जेंव्हा लक्ष्मी रोड वरचे संतोष उपहार गृह व सदाशीव पेठेतले पेशवाई बंद पडले तेंव्हा... संतोष मधली दही बटाटा पुरी चे डिश म्हणजे क्या बात..अजूनही जिभेवर चव रेंगाळत आहे. अन पेशवाई सारखी मटार उसळ ची चव पण मस्त.. नारळाचे दुध घालून केलेली अतिशय चवदार उसळ व ब्रेड स्लाईस..मजा यायची चापायला अरेरे ..वाईट झाले. मराठी उपहार गृहे बंद पडण्या अनेक कारणा पैकी एक महत्वाचे कारण म्हणजे कामगार.. मराठी कामगार टिकत नाही.. उडप्यांचे तसे नसते.ते गावाकडून मुले आणतात व त्याना सांभाळतात .. उडप्याच्या कोणत्याही उपहार गृहात गेले कि एक गोष्ट जाणवते ती म्हणजे १००% कामगार हे कानडी असतात. व ते त्या ठिकाणी वर्षानु वर्षे काम करीत असतात .. आपल्या उपहार गृहातली काम करणारे मुले बहुतेक कोकणातून आलेली असत. पण हल्ली प्रगतीचा आलेख वाढता असल्याने ती मुले पण ह्या व्यवसायात फिरकताना दिसत नाही.. कुठल्याही व्यवसायाचा आत्मा व यश हे तिथे काम करणा~या कामागारावर अवलंबून असते. ह्या व्यसायाताल्या एका मित्राशी गप्पा मारताना त्याने संगीतले कि लहान उपहार गृहात २ माणसे अत्यंत महत्वाची. एक आचारी व दुसरा मोरीवर काम करणारी मुले..जी डीशेस साफ करतात.. ह्याना जो पर्यंत मालक सांभाळून ठेवतो तो पर्यंत अडचणी येत नाहीत... आमच्या एक मित्राचे एम आय डी सी त छोटे वर्क शॉप होते..हॉटेल मध्ये लई पैसा असे डोक्यात खूळ आले अन त्याने टपरी टाकली.. काही दिवस हॉटेल मस्त चालले पण जेंव्हा कामगार ्पळु लागले व शेवटी उष्ट्या प्लेटस उचलायची व धुवायची वेळ आली त्या वेळी त्याच्या आईच्या xxxxx म्हणत टपरी बंद केली व परत जोब भादराण्याचे काम शॉप मध्ये सुरु केले ...

वाचने 19375
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

आता एक न्युज, मिपाची सदस्य पण फारशी अ‍ॅक्टिव्ह नसलेल्या एका सदस्येने सिंहगड रोडवर "साहिल्स" नावाने व्हेज्/नॉनव्हेज रेस्टॉरेंट उघडले आहे नवीनच १ मे पासुन. कृपया लाभ घ्यावा. पत्ता असा आहे. साहिल्स व्हेज नॉनव्हेज, शॉप ६-७ आदित्यराज, राजयराजयोग, लगड माळा, वडगाव खुर्द, सिंहगड रोड पुणे ४११०४१