Skip to main content

चूक..!

लेखक उपटसुंभ यांनी सोमवार, 19/01/2009 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
कैफात चूक झाली, डोळे भरून आले. "सैतान" ती म्हणाली, डोळे भरून आले. टाहो न ऐकले मी, धिक्कारल्या विनवण्या, रचला कलंक भाली, डोळे भरून आले. निःशब्द ती तिथे अन आक्रोश आत माझ्या कल्लोळ भोवताली, डोळे भरून आले. वदली अता जगाच्या छळतील रोज नजरा. मृत्यूच एक वाली, डोळे भरून आले. विझला इथे सुडाचा वणवा मनातला पण झाली चिते हवाली, डोळे भरून आले. तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन. खपली पुन्हा निघाली, डोळे भरून आले. -- अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2540
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

टाहो न ऐकले मी, धिक्कारल्या विनवण्या, रचला कलंक भाली, डोळे भरुन आले. निःशब्द ती तिथे अन आक्रोश आत माझ्या कल्लोळ भोवताली, डोळे भरुन आले. हे विशेष भिडलेत. अन् हा शेवटचा म्हणजे.. तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन. खपली पुन्हा निघाली, डोळे भरुन आले. अगदी टोचतो :( मुमुक्षु

तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन. खपली पुन्हा निघाली, डोळे भरुन आले. क्या बात है !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन. खपली पुन्हा निघाली, डोळे भरुन आले. क्या बात है !!

तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन. खपली पुन्हा निघाली, डोळे भरुन आले. क्या केहेने..! तात्या.

अतिशय करूण! हे वाचतानाच माझे डोळे भरून आले. खूपच सुरेख गझल. तसबीर पाहिली ती भिंतीवरी तुझी अन. खपली पुन्हा निघाली, डोळे भरुन आले. जबरदस्त! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

>> वदली अता जगाच्या छळतील रोज नजरा. मृत्युच एक वाली, डोळे भरुन आले. क्या बात है... एकदम उच्च गझल आहे ही,,, खूपच आवडली अभिजीत.